चिकन-६५

2
0

नमस्कार मंडळी,
इंडो-चायनीझ च्या नवीन भागात आपल सहर्ष स्वागत हास्य
या विकांताला काही मित्र मंडळी आली होती. सगळे अट्टल नॉन व्हेज खाणारे असल्याने एक छोटे खानी कौल टाकुन एक मुखाने चिकनच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. हास्य
आपल्या व्हेज मंडळींसाठी याचं व्हेज वर्जनआधीच दिलेल आहे.

साहित्य:

३/४ किलो चिकन मध्यम आकाराचे तुकडे करुन.
१ मोठा चमचा आल-लसुण पेस्ट.
३-४ पाकळ्या किसलेला लसुण.
१.५ लहान चमचा वर्‍हाडी ठेचा. (असल्यास)
२ चमचे सोया सॉस.
१ लहान चमचा हळद.
२ लहान चमचे लाल तिखट.
३-४ हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करुन.
३-४ कडिपत्याची पाने.
१ लहान चमचा घट्ट दही.
१ मोठा चमचा कॉन फ्लॉवर.
२ मोठे चमचे मैदा.
स्वादानुसार मीठ.
आवडत असल्यास तंदुर रंग.
तळण्यासाठी तेल.

कृती:


सर्व प्रथम चिकन स्वच्छ धुवुन त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करुन घ्या.
त्यात सोया सॉस, हळद,आल लसुण पेस्ट, हिरवी मिरची, कडिपत्ता, ठेचा, किसलेला लसुण आणि लाल तिखट टाका.


त्यातच दही, मैदा , कॉन फॉवर, रंग आणि स्वादानुसार मीठ टाका.


चांगल मिक्स करुन १ ते २ तास मुरत ठेवा.


२ तासांनी कढईत तेल तापवून खरपुस तळुन घ्या.


नाटक्याशेठ पासुन स्फुर्ती घेउन एक जहाल मादक पेय बनवले. वॉटरमेलन्-मार्टिनी.
आस्वाद घ्या हास्य

{हल्कत}

1

हल्कत

{झक्कास...}

2

झक्कास...

{काही नियमित प्रतिसाद आपोआप }

3

काही नियमित प्रतिसाद आपोआप गणपा ह्यांच्या धाग्याला येतील असे एखादे मोड्युल तयार करावे म्हणतो Big smile

लै भारी !

झ्क्क्क्कस !

झक्कास्स्स्स्स्स !

इत्यादी.


Hope is a good thing...

{काही नियमित प्रतिसाद आपोआप}

4

काही नियमित प्रतिसाद आपोआप गणपा ह्यांच्या धाग्याला येतील असे एखादे मोड्युल तयार करावे म्हणतो

व्हेज वर्जन आधिच टाकुन आमचा प्रतिसाद बदलायला लावणार्‍या गणप्याचा निषेध...
बाकी एखाद्या दिवशी जाउन मी नॉन व्हेज खाणार आणि त्याचे पाप फक्त तुझ्या डोक्यावर


-निखिल

{जहाल मादक आणी लुसलुशीत}

5

जहाल मादक आणी लुसलुशीत wink

{झऽकाऽस!!!}

6

जबरी!!!

{लै भारी!}

7

चिकन शिक्श्टीफाय हा एकेकाळी आमच्या टेबलावरचा अनिवार्य चखणा होता रे..... हास्य

बाकी, गणपाच्या पाककृतींना आता तेच ते तेच ते प्रतिसाद देऊन कंटाळलोय. एकदा ह्याच्या हातचा पदार्थ खाल्ले म्हणजे कसं, नवे नवे प्रतिसाद सुचतील wink

अवांतरः वॉटरमेलन मार्टिनी???? च्यायला...कसं करायचं ते सांग की भौ हास्य

{वॉटरमेलन मार्टिनी :आमची}

8

वॉटरमेलन मार्टिनी :

आमची कंट्री रेशीपी हो भौ..
नाटक्या शेठ सारखी अत्याधुनीक साहित्य नाहीत आपल्या कडे हास्य.
जस केल तस सांगतो.
ताजा कलिंग्डाचा रस करुन घेतला.
त्यात १ हिरवी मिरची (बी काढुन) ठेचुन टाकली.
मिक्सरमध्ये थोडा बर्फाचा चुरा करुन घेतला.
शेकर मध्य मध्ये ४० ml Smirnoff व्होडाका + १६० ml कलिंगडाचा रस घेउन चांगले ढवळुन घेतले.
(आमच्याकडे शेकर नसल्याने, हात गाडीवरल्या लिंबुसरबत विकणार्‍याची ट्रिक वापरली wink )


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

{लै खास!!}

9

च्यामारी...कलिंगडाचा इतका भारी उपयोग होतो हे आमच्यासारख्या गावंढळांना माहितीच नव्हतां राव हास्य

आणि कंट्री तर कंट्री ना भौ, चव जमल्याशी कारण! हास्य

तुम्ही लै कॉकटेलशिरोमणि नाटक्या भौसारखं साग्रसंगीत करुन दाखवलंत, तरी आम्हाला ते जमायला पाहिजे की नाही? तुम्ही भले भले कॉकटेलचे टूल्स वापराल हो, घरी आम्हाला कुंडेच वापरावे लागणार की...आणि गेलाबाजार शेकर म्हणुन थर्मास Big smile

{अरे धम्या.... ह्या गणपाचा जो}

10

अरे धम्या....

ह्या गणपाचा जो कोणी कीडनॅप करे त्याला फलाना फलाना बक्षिस असे काही तरी फतवा जाहीर करु या का आपण thinking


Hope is a good thing...

{आमेऽऽन!!!!}

11

आमेऽऽन!!!!

{कल्पना चांगली आहे. पण किडनॅप}

12

कल्पना चांगली आहे. पण किडनॅप करणार्‍याचं पुढं काय होईल याचा विचार केलाय का wink

{स्टॉकहोम सिंड्रोम}

13

स्टॉकहोम सिंड्रोम. वेगळ्या पद्धतीनं.

{ग्रेट आहे. कुठला सिंड्रोम}

14

ग्रेट आहे. कुठला सिंड्रोम कुठे वापरायचा हास्य

{जबरा !! "गो ईस्ट कोस्ट ऑर गो}

15

जबरा !!

"गो ईस्ट कोस्ट ऑर गो वेस्ट कोस्ट"
"गणपा ईज द बेस्ट कुकींग घोस्ट"

{+१}

16

बल्लवाचार्य गणपा ... जियो ..

{एक नंबर}

17

एक नंबर

{छान}

18

मी शाकाहारी आहे पण नव्ररा चिकन खातो. वीकेन्ड ला नक्की करुन बघेन.

{आयला झकास एकदम. चिकन लॉलीपॉप}

19

आयला झकास एकदम. चिकन लॉलीपॉप पण येऊ देत.

{या प्रकाराला ६५ असे का}

20

या प्रकाराला ६५ असे का म्हणतात


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

{चिकन ६५}

21

गणपा भौ,
चवीला एकदम भन्नाट जमलं होत ! मैदा नव्हता त्याऐवजी थोडं ज्वारीचं पीठ घातलं त्यामुळे थोडं वेगळं दिसत होत, पण मला स्वतःला चव खूप आवडली.

Photobucket"

{झकास .....}

22

झकास .....

{करून बघितले...}

23

मिरची, लसूण, आल्याची पेस्ट करताना मिक्सरमध्ये पाणी जास्त घालावं लागलं. म्हणून थोडंसं पीठ वाढवलं. ठेचा नव्हता म्हणून अमेरिकेत एक चिली पेस्ट मिळते (त्याला मी कोंबडा सॉस म्हणतो - ब्रॅंडवर कोंबड्याचं चित्र व अगम्य पौर्वात्य अक्षरं असतात म्हणून) ती घातली. शिवाय मीट टेंडरायझर घातला.

फोटो वगैरे काढायच्या भानगडीत पडलो नाही, तळता, तळताच निम्मे संपले...

भन्नाट...

राजेश

{मस्त}

24

मि पण केलीली ही रेसिपि. Party झक्कास झालेली..... फोटु टाकीन.....


स्वरालि

{यम्म्मी......................}

25

यम्म्मी......................... हास्य

{आहाहा ...}

26

आहाहा ...कसले सह्ही आहे हे... पाकक्रुती एकदम सोप्पी करता तुम्ही...

{काय आस्वाद घ्या? नुसते दाखवले}

27

काय आस्वाद घ्या? नुसते दाखवले अन झाले का? काहीतरी तोंडात जायला नको का?



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

{याला म्हनत्यांत पाककृती}

28

हा चिकन चा माझा सर्वात आवडता प्रकार हास्य

लई भारी रे गणपा

दिल खुश झाला ही पाककृती पाहून


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{चिकन-६५}

29

झकास...
चिकन चा माझा सर्वात आवडता प्रकार....

{१ च नंबर}

30

लई भारी .. तुमचा काय कोर्स झाला आहे का? wink

{होय कोर्स झालाय}

31

लग्न केले आणि रोजच बिचार्‍याचे कोर्सेस चालू आहेत wink
पण आपल्यासारख्या खादाडमाऊंची मात्र मेजवानी आहे Big smile

गणपा मित्रा, तुला बल्लव करणार्‍या वहिनी तुला मिळाल्या हे आमचे नशीब हास्य


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{चिकन-६५}

32

आवडता प्रकार.... हास्य

{जबरदस्त... चिकन ६५ हा प्रकार}

33

जबरदस्त... चिकन ६५ हा प्रकार जबरी आहेच.. पण आपले फोटो बघूनच .. उद्या मी खाणार एवढे नक्की.. हास्य


... तुमचा अभिषेक