मुक्तक
रस्त्याने फिरता फिरता अचानक नजर कुठेतरी अडकून जाते
आणि मनात विचारांची आवर्ते डूलू लागतात.
रोजच्या सरावातला रस्ता असतो.
तेच तेच पाहून सवयीच्या झालेल्या पाट्या असतात.
पाट्यांच्या खालची दुकाने किंवा पाट्यांच्या मागची घरे जणू माहितीतली असावीत अशी सलगी झाली असते.
कधी काळी त्याच दुकानांच्या पाय-यांवर रात्र घालवली असते.
कधी एकटेपणाने तर कधी मित्रांच्या संगतीने.
पूर्वी मित्र समजूत घालत.
काळ बदलत गेला.
मित्र बदलत गेले.
समजूत पटता पटता समजूत घालण्याचे काम करावे लागले.
ती ही भुमिका जगून पाहू म्हणून जगत आहे.
काळ मलमपट्टी करतो असे म्हणतात.
मला नाही वाटत.
कधी तरी अचानक आपल्यालाच त्या जखमांचा विसर पडतो झाले.
दु:खाचे पण दु:ख वाटेनासे होते आणि त्या दु:खातच सुख वाटू लागते.
मग अचानक मनात भिती येते जर का हे दु:ख संपले आणि सुख आले तर जगायला आधार तरी काय?
असेच काही बाही मनात येते आणि मग परत मनाकडे दुर्लक्ष करावे झाले.
येते आपोआप वठणीवर.
परवाच फिरता फिरता त्याच ठिकाणावर नजर गेली.
कॅन्सर झालेला पाय तोडावा म्हणतात.
मी डॉक्टर नाही कुणीतरी काहीतरी सांगत असतं.
मी ऐकत असतो.
किती तरी दिवसांनी त्या भागातुन चाललो होतो.
मुद्दाम टाळत असे त्या भागात जाणे.
जुन्या आठवणी येतात, त्यांना येउ न देण्यासाठी ओळखीच्या खुणा न दिसु देणे हाच उपाय असतो.
वाटलं होतं आता जखमा भरल्या आहेत.
बघु तरी त्या भागातून चक्कर मारुन.
पण नाही.
काळ मलम पट्टी करत नाही असेच दिसते.
जखम तशीच होती फक्त मीच पहात नव्हतो.
जखमा भरतात की नाही माहित नाही.
पण त्या भागातून परत जायचे नाही एवढे नक्की.

.jpg)
{मस्त!}
बर्याच दिवसांनी लिहलेस पण मस्त लिहलेस! नेहमीसारखे!!
{खुप छान....}
<<काळ मलम पट्टी करत नाही असेच दिसते.
जखम तशीच होती फक्त मीच पहात नव्हतो.
जखमा भरतात की नाही माहित नाही.
पण त्या भागातून परत जायचे नाही एवढे नक्की.>> खुप छान....
परिजा
******
बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)
{नाना... जबरा!}
नाना... जबरा!
Hope is a good thing...
{+१}
मालकांशी सहमत.
{तुला परत लिहिता झालेलं पाहुन}
तुला परत लिहिता झालेलं पाहुन बर वाटल.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{+ १}
तंतोतंत.
{लिहिता झालास हे छान पण मुक्तक}
लिहिता झालास हे छान
पण मुक्तक वाचुन जरा मास्तरांचा गंडा (परत) बांधलाय की काय असे वाटुन गेले
{+१ वाश्याशी सहमत}
+१ वाश्याशी सहमत
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{मस्तच}
जखम तशीच होती फक्त मीच पहात नव्हतो.
जखमा भरतात की नाही माहित नाही.
पण त्या भागातून परत जायचे नाही एवढे नक्की.
या ओळींनी डोळे पाणावले नाना.... जबर्या
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{मस्तच...".काळ मलम पट्टी करत}
मस्तच...".काळ मलम पट्टी करत नाही असेच दिसते.
जखम तशीच होती फक्त मीच पहात नव्हतो.
जखमा भरतात की नाही माहित नाही.
पण त्या भागातून परत जायचे नाही एवढे नक्की."
खुप आवडल
विनीता देशपांडे
मी एक अक्षरयात्री..http://vineetadeshpande.blogspot.com
{मस्त... खूप आवडला.}
मस्त... खूप आवडला.
मीऽच तो...
{हम्म्म...}
जखमा भरत नाहीत, फक्त वर खपली धरते आणि नकळत कधी धक्का लागला तरी परत खूप दुखावून जाते....
-----------------------------------------------------------------------------------------------------------
चिंगी
{व्वा....................}
व्वा....................
धुंद रवीचं बेधुंद जग
{........... आताच बाजूला}
...........
आताच बाजूला स्पिकरवर संदिप खरे यांचे "हे भलते अवघड असते" हे गाणे चालू आहे.
___________________________________
योगेश नाईक
{नान्या, का चावतो आहेस लेका?}
नान्या,
का चावतो आहेस लेका?
-पुण्याचे पेशवे