मी संपादक झालो तर ?
णमस्कार्स लोक्स ,
मी लेखकर्मी, आज मी दहावीच्या मराठीच्या पेपरची तयारी करतोय. तसा मी भरपुर संस्थळांवर लिहीतो आणि सगळीकडे भरपुर प्रसिद्ध आहे, ह्याचे कारण माझे "विकली हिणकस " मधे बर्याचदा छापुन येणारे लेख. असो बदलीन.
तो विषय येथे नाही , पण तरीही रहावले नाही म्हणून सांगतो , "कॅफेटाईम्स" मधे सुद्धा माझ्या वाचनिय अशा प्रतिक्रीया छापुन येतात ! तर असा मी .. असामी लेखकर्मी .
आता २१ अपेक्षित उघडलन् ! प्रश्न पडला कोणत्या विषयावर निबंध गाळू ? तसे ऑप्शन्स बरेच होते, जसे
१. संकेतस्थळमालकांच्या दुष्काळी व्यथा
२. हिणकसकुमार , संकेतस्थळासाठी शाप की वरदान ?
३. मी संपादक झालो तर ?
४. बांग्लादेशी लेखकांचे मनोगत
५. वातुळ बटाट्यांना कसे आवरावे ?
परंतु सगळंच ह्या आधी कोणी ना कोणी उष्ट करून ठेवल्याने मी त्यातल्या त्यात एका विषयाला हात घालतो.
तर चला , निबंधाला सुरूवात करतो ! काही संवाद म्हणजे स्वतःशीच केलेली उद्बोधक चर्चा 
मित्रांनो , आपल्या प्रत्येकामधे एक सुप्त इच्छा नेहमीच ठरलेली असते. आपण फलाना फलाना झालो तर ? आपल्याला फलाना फलाना सुपरपॉवर्स मिळाल्या तर ? नुसत्या कल्पनांनी मन कसं भ्रंम्हाडी सफरीचा लुफ्त (घो त्या "त्फ" चा ) लुटू लागतं, नाही ? मला सुद्धा असंच काहीसं वाटे . तसे सुपरपॉवर असणे म्हणजे एक युनिकनेस असतो . पत्त्यांमधे जशी "हुकमाचे पत्ते" असतात आणि ते बाकी प्रकारच्या पत्त्यांवर भारी असतात त्याच प्रमाणे संपादकपॉवर आहे असे मला प्रांजळपणे वाटते . पुन्हा इथे ही एक्का एकंच .. मग येतात राजा-राणी-गोट्या वगैरे ..
हो ... पण ह्या आतल्या गोटातल्या गोष्टी . बाहेरू मात्र हुकमाचं पान म्हणजे हुकमाचं पान
!
मी जर संपादक झालो तर आधी माझे नाव बदलून कात्रीकर्मी ठेवुन घेईन , काय म्हणता ? णॉट रेकमेंडेड आय.डी ? सगळेच आपल्याला फाट्यावर मारून आपल्या फाट्याचं भजं करतील ? मग "का.त्र्या. मारुदे" ते ही घेतल्या गेला आहे ? ह्या अरेरे .. मग "कापुरंग" ? काय ? नाही घेता येणार ? का ? दोन तारांवर पाय ठेऊन कसरत करावी लागेल ? नको .. आपली ती कुवत नाही ... आता काय घेऊ ? "(सर्वकापी) कात्रु" घेऊ? नको .. नाजुक पण डेंजर ? नको बॉ .. एवढं बहुआयामी व्यक्तिमत्व आपलं नाही .. पण छ्या .. इथे ही फेल्ड् .. थांबा "कापिन कात्रीसार्खे" घेतो .. फेल्ड् अगेन.. मुस्तस्द्दीपणा हा मँडेटरी आहे ? तो कोणा लेकाच्यान आहे ? सोडा नाद ! .. लेम्मी कीप ट्रायिंग .. "कात्रा" ... नाही? .. ह्या आय.डी.चाही विकास झालाय वाटतं ऑलरेडी ... एखादं ६० वर्षापुर्वीचं नाव ट्राय करतो .. ते शक्यतो कोणी घेतलं नसेल .. "कापुन ठेव" .. फेल्ड .. आय.डी. एग्झिस्ट सिन्स जिजस बॉर्न ? च्यामारी हा आय.डी आपल्या बारश्यालाही घेणं शक्य नव्हतं ! च्यायला ... सुपरपॉवर व्हायची स्वप्न पहातोय खुशाल .. पण असं ठोस , भरीव आणि वजनदार का बरं लागत नाहीये ? "कात्रोबा टर्टर " .. "डोन्च्यू डेयर टू थिंक ऑफ धिस आय.डी. यू वान्ना लिव्ह ऑर यू वान्ट पॅरागॉन ?" असा काहीसा मेसेज आला .. शिवधनुष्यापेक्षाही जड नाव घेतल्यावर काय होणार ? .. आहे त्याच नावाने संपादक व्हावे काय ? नाही .. असं कसं .. असं कसं ? सुपरहिरो ला नेहमी एक आभासी नाव असलंच पाहिजे .. पण नाही ना सुचत .. अर्रे पण मी होतो ना "अपवाद पारा " ! आपण आहे ह्याच नावाने "संपादक - द सुपर कापर" बनुया !
मी संपादक झालो तर !!!! वा वा वा !!! काय सुरेख आणि तरल विचार आहे ! नुसत्या कल्पनेनेच माझी बोटं कशी शिवशिवायला लागली ! योग्य जागी ह्यांचा तसाही हल्ली उपयोग होत नाही ... घ्या अवघे अंतरजालंची माझे घर म्हणा ! आणि दाखवा बोटांची जादू जगाला
साला कोण नडतो पहातोच मला ! एकतर संपादक झाल्यावर सर्वेसर्वा आपल्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो ! मग काय ? पुर्ण राण मोकळं आहे आपल्याला ! कापा कुठेही आणि कसेही .... आणि लावा आग जंगलाला
कोणी बोंबललाच .. तर म्हणायचं .. अरे हल्ली उण्ह फार तापतात .. वणवा पेटला असेल .. आम्ही नाही .. आम्ही नाही केलं हो काही .. हॅहॅहॅ .. आम्ही तर वेगळ्याच संस्थळांवर / ब्लॉग्ज वर काड्या करण्यात मश्गुल होतो .. असं करून हलकेच कॉलरवरची (नसलेली) धुळ झटकावी. नाही तरी अशी वेळ येते फार कमी ... कारण सर्वेसर्वा कसा रोखठोक आहे .. जसा युद्धावर जाणार्या सोल्जरच्या अंगावर बॉंब्ज , मॅग्झिन्स , चाकूज, गन्स इत्यादी सामान लोड केलेला असतो तसा आपला सर्वेसर्वा आंगभर चपला लटकवून असतो सगळ्या साईझच्या. आहे काय नाय काय !! सरळ पीन मारावी ... हे पहा मालक .. हे बेणं आपल्याविरूद्ध ( स्वत:विरुद्धचे हल्ली हे "आपल्या" विरुद्ध केल्यावर एखादा वेगळा इफेक्ट येतो ) लै बडबड करतं हल्ली .. ह्याला धडा शिकवलाच पाहिजे. ह्याची लेखणी हल्ली आपल्याविरुद्ध फार चालते . आपल्याच संस्थळावर येऊन आपली तासतो म्हणजे काय ? कापला त्याला ! मग मालकंही डोक्यावर कौतुकाने हात फिरवून "व्वा रे माझ्या संपादका ~! कसा बाणेदार संपादक वाटतोस
म्हणतील आणि एक पाठीला चोळण्याचा साबण बक्षिस म्हणून देतील .. की लग्गेच आपले ढोरास रोड ला पळावे .. तीकडे म्हणे भरपुर म्हशी डूंबत असतात
आपण मात्र साबणाबरोबर डर्मीकुलही न्यावे .
आणि आपली आवडती म्हैस पाहुन काळ्या पाठी पांढर्या करण्याचे निष्फळ प्रयत्न करावे
होत नाही पाहुन तात्पुरता उपाय म्हणून बरोबर आणलेलं डर्मिकुल फासावं
म्हैसही खुष .. आपण ही खुष ..
पण असं सुपरहिरो ने आपल्या हेतु पासुन अवांतर होऊन असं चालेल ? गप गुमान कितीही (आणि काहीही) वाटलं तरी कम ब्याक टू दं ड्युटी ! इट्स आवर वावर शेवटी .. नाही का ? 
असो , संपादक झालो तर अवांतरपणा किंवा कल्ला करण्याची काही विषेश शक्ति नष्ट होतात
अर्थात त्या करायच्या असल्यास आपली "अय्यार" शक्ती वापरून आपला क्लोन तयार करून तो जंगलात सोडावा ! ह्याच्या तारा आपल्या हातात नाहीत हे लपवण्याचे कौशल्य मात्र आपल्यात हवे ! ह्या "अय्यारी क्लोन्स" चा अजुन एक उपयुक्त उपयोग असतो
ह्याला काही तरी वाकडे-तिकडे लिहीण्यास लावावे , मग आपण (अचानक) प्रकट होऊन भर चौकात हाणावे , ह्यामुळे आपला दरारा कसा तरारून वाढतो.
संपादक झाल्यावर अजुन एक गोष्ट करायची ! ते म्हणजे सपक किंवा आळणी लिहायला लागायचे
काय ? अरे पण आपल्याला कल्ला किंवा राडा नसलेली प्रत्येक गोष्ट सपक आळणीच लागते , असं जनरलाईझ करून कसं चालेल ? आणि किती अवघड हे आव्हान ? सगळी थेरं आपण स्वतःच्या नावाने करूच शकणार नाही ? हे म्हणजे "अल् कायदा" ने आतंकवादी हमले करून गुप्तता पाळायला लागली तर त्या "अल् कायदा" च्या जेवढं जिवावर येईल त्यासारखं होईल राव ! मग ? संपादकपणा म्हणजे काय पोरखेळ वाटला ? आपल्याला कर्मी वगैरे बिरुदं लावली की लगेच महाण होतो का कोणी ? लक्षात ठेव ! संपादक ही पॉवर आहे मोठी वेगळी पॉवर ...
वाटतं सोपं पण नाहीये तसं .. वारंवार कासर्याचे घाव पडून पडून रहाटाचं चाक जसं गुळगुळीत होतं तसं एका क्षणात करणं सोप्पं आहे की काय ? तेवढे घट्टे आणि घाव सोसावे लागतात तेवढा वेळ द्यावा लागतो .. तेवढी परिपक्वता यायला हवी .. कोणीही आल्ल्याबल्ल्या संपादक होऊन चालेल का? निसर्ग ते कधीही मान्य करणार नाही !
त्यामुळे तु आहे तसाच लेखकर्मी रहा बाबा ! नसत्या सुपरपॉवर्स ची स्वप्न पाहु नकोस !
तुझं वय आहे आवडत्या नट्यांची स्वप्न पहाण्याचं .. ती पहा
उपयोगात तरी येतील किमान .. (कुठाय तो आयेशाचा फोटू ? )
ह्या सगळ्या गोष्टींच्या पलिकडे गेलास .. की मग पहा संपादकपणाची स्वप्न !
टिप : पेपर लिहून भरपूर टाईम उरला तर बाकी विषयांवरचे निबंध लिहीन 
.jpg)
क ह र.... टार्या
क ह र....
टार्या
-निखिल
खरेच रे टार्या... कहर आहेस
खरेच रे टार्या... कहर आहेस कहर ! संपादक =
*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो.
ऐसी अक्षरे मेळविन
हा लेख कुणा संपादकांनी
हा लेख कुणा संपादकांनी अप्रकाशित केल्यास मला कृपया तसे कळवावे इतकीच विनंती..
ह्या लेखात अप्रकाशित करण्यासारखे मला तरी काही वाटत नाही. अर्थात, चुकीच्या टाचणामध्ये माझी ढवळाढवळ होऊ शकत नाही हे नक्की..
असो,
राजे
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
काही कळाले नाही.
काही कळाले नाही.
+१
.
डर्मीकुलही टार्या __/\__
डर्मीकुल टार्या
__/\__ हाणतेज्यायला !!
बाकी काही काही पंचेस शॉलेड रे !!
'भ्रंम्हाडी सफरीचा लुफ्त', 'लेखकर्मी' , 'ढोरास रोड' एक से बढके एक .
छान लिहिले आहेस...
छान लिहिले आहेस...
मस्तं रे टारू.
मस्तं रे टारू.
-पुण्याचे पेशवे
मस्त लेख ...
टारझनराव आपल्या किर्तीला जागले.
सुरेख लेख, आवश्यक तितके टोण्ट्स व्यवस्थित बसले आहेत.
लेख आवडला.
छाण लेखण....
केलयस रे टारझणा....
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
हा हा हा टार्या मस्त
हा हा हा टार्या मस्त रे.
बर्याच ठिकाणी खळखळून हसलो.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
"विकली हिणकस "
मुंबईहून
चुचुआजी मुंबईहून परतल्या वाटते...
प्रकाटाआ
प्रकाटाआ
लै भारी ...
लै भारी रे ...
हम्म!!!
हम्म!!!
संपाद्क नाय रे पाहुणा संपादक
संपाद्क नाय रे पाहुणा संपादक !
ही अॅन्ड ही..... तीर
ही अॅन्ड ही.....
मी संपादक झालो तर ? देव
मी संपादक झालो तर ?
देव देवाचेच भले करो
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
बिधास्त तसेच दचकत बिचकत, थबकत
बिधास्त तसेच दचकत बिचकत, थबकत प्रतिसाद देणार्यांचे धन्यवाद !

लेख वाचून प्रतिसाद द्यावासा वाटला पण दिला नाही त्यांचे आणखिण आभार
आणि ज्यांनी लेख वाचला पण प्रतिसाद द्यावासा वाटलाच नाही , त्यांचे लेख वाचल्याबद्दल शतशः आभार .
आपलाच,
पुण्यकर्मी
धन्य
आहेस लेका ..
स्वप्निल
जै जै टार्या
जै जै टार्या म्हाराज्की.....
पण वरीजीन्ल टार्या न्हाय वाट्ला
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
ह्हा ह्हा ह्हा !!! चालायचंच
ह्हा ह्हा ह्हा !!! चालायचंच ..
बाकी प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद्स
टारोबा थोडे काजु खात जा
टारोबा थोडे काजु खात जा रोज...
-पुण्याचे पेशवे
(विषय दिलेला नाही)
झक्कास. हाण्ण.
झक्कास. हाण्ण.
-पुण्याचे पेशवे
टारुदादा
लै पावर बाज संपादक बनाल तुम्ही

लेख म्हणाल तर जबरा + खतरा + क ड क
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
आज ह्या लेखकाची आणी लेखाची
आज ह्या लेखकाची आणी लेखाची आठ्व्ण झाली !!
का बॉ !
का बॉ !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
सुहास, नुस्तीच आठवण आली? डोळे
सुहास,
नुस्तीच आठवण आली? डोळे णाहीत पानावले, मण णाही भरुण आले...?
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)
जे ब्बात.
And then !