मंडळी आज सकाळ सकाळ बेत केला होता दडपे पोहे.
साहित्यः
१. ३-४ चमचे तेल
२.जिरे (फोडणीसाठी)
३.मोहरी (फोडणीसाठी)
४.एक चमचा हळद
५.एक चमचा मीठ
६.एक चमचा पिठीसाखर
७.दोन भरलेल्या मिरच्या तुकडे करुन (माझ्याकडे भरलेल्या मिरच्या नसल्याने मी लाल मिरच्या वापरल्या)
८.१०-१५ कडिपत्त्याची पाने
९.कोथिंबीर

१०.एक मिरची कापून
११.एक कांदा कापून (बारीक कापला नसला तरी चालेल)
१२.मूठभर शेंगादाणे.

१३.दोन चमचे दही
१४.पातळ पोहे
कृती:
एका कढईमधे तेल घ्या.
त्यात शेंगादाणे परतून्/तळून घ्या.

त्यातच आता जिरे मोहरी हिंग टाकून फोडणी करा.
आता कोथिंबीर, कडीपत्ता, कांदा, हिरवी आणी लाल मिरची फोडणीत परतून घ्या.
परतल्यानंतर त्यात हळद टाका.

एका पातेल्यात पातळ पोहे घेउन त्यावर ही फोडणी टाका.
वरून दोन चमचे दही टाका. कालवा.

कोणाचीही वाट न बघता हाणायला सुरुवात करा.


कांदा
कांदा बारीक चिरत जा ना. एवढं ती चुचु सांगून गेली, तरी तसाच तू. कधी शिकायचा कुणास ठाऊक!!!
कांदा कमी खात जा ना. एवढं ती
कांदा कमी खात जा ना. एवढं ती प्रभी सांगुन गेली , तरी तसाच तु. कधी कंट्रोल करायचा कुणास ठाऊक !!!
बाकी गरमा गरम् मसाले च्या च्या घोटांसोबत पोह्यांचा एक घास .. त्यात तो शेंगदाणा=कांदा=मिरची चा स्वाद ! आहाहा !! क्या केहने ... जिने का मजा तो खाने मे है ..
बाकी ते कढई चेंबलीये का? पेग ज्यास झाल्यावर हाणला नाय ना कोणाला ?
आपल्या हॉस्टेलका पिऊन तर्राट झाल्यावर पोरं किबोर्डानी मारामारी करायची न सगळ्या कीज इकडे तिकडे व्हायच्या त्याची आठवण झाली .
और बी आणे दो
- गण्पो
व्वा!!
मला पण आवडतात हे पोहे..
आजच घरी जाउन करायला हवेत...मस्तच..
राधा
||मी इ-मेल फॉरवर्ड करतो,याचा अर्थ असा नाही,मला काही काम नाही;
कामात फोन करुन व्यत्यय टाळण्यासाठी, इ-मेलसारखे दुसरे साधन नाही||
झकास!
सकाळी सकाळी हे बघुन तोंडाला पाणी सुटलं आहे. संध्याकाळी करायलाच हवेत!!
वाह ! लै भारी रे....
वाह !
लै भारी रे....
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
प्रभो
टिपीकल दडपे पोहे जरा वेगळे असतात पण जे काय केले आहेस ते पण भारी दिसतेय
टिपीकल दडपे पोहे जरा वेगळे
टिपीकल दडपे पोहे जरा वेगळे असतात
अंस मंग येवु द्या की तु मी बी एक पाकृ
-निखिल
+१
अंस मंग येवु द्या की तु मी बी एक पाकृ
ऑ?
बरं बरं असेच असतात हो दडपे पोहे अगदी अस्सेच!
आता काउन पल्टी मारुन
आता काउन पल्टी मारुन राहिले..
मले तर वाट्ल.. तुम्ही आमच मार्गदर्सन का काय ते करसाल
-निखिल
तुम्ही आमच मार्गदर्सन का काय
तुम्ही आमच मार्गदर्सन का काय ते करसाल >>>>>
ते फ़क्त माग्ल दल्शन कलतात
*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो.
ऐसी अक्षरे मेळविन
:)
आवो, तुम्ही ती पाकृ टाकली की
आवो, तुम्ही ती पाकृ टाकली की आम्ही करून बघू.म्हणून म्हटलं.
तसं तुम्ही गणपाला टीप्स दिल्या होत्या ते आठवा.
प्रभो... सकाळी सकाळी दडपे
प्रभो...
सकाळी सकाळी दडपे पोहे पाहिले रे....
लै भारी रे गरिबांचा गणप्या..
आपल्या आवडत्या डिश मधली एक...
-निखिल
तोंडाला पाणी सुटले
अरे प्रतिक,
जे केले आहेस ते एक्दम भारी आणि तोंडाला पाणी आणणारे आहे.
दडपे पोहे असे नसतात रे पण. मला वाटते पोहे दडपलेले दिसत नाहियेत
मला पाककृती माहीती नाही. पण माझी आई खूप छान दडपे पोहे करते.
थोडे कच्चे ठेवतात पोहे. आणि कांदा पण बारिक चिरतात. पोह्याला मस्त पैकी फोडणीत वर वर परतून घेतात आणि पोहे दडपताना, मुख्य म्हणजे टोमॅटो पण टाकतात त्यात.
पुण्याला आलो की आई कशी करते पोहे ते नीट पाहून सांगेन तुला...
पण तुझे पोहे पाहून एवढेच म्हणेन की ... मजा आ गया ...
आज घरी संध्याकाळी लवकर पळेन आणि बायकोला पोह्यांची फर्माईश करेन 
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
प्रभ्या जो काही पोह्याचा
प्रभ्या जो काही पोह्याचा प्रकार केलायस तो जबरा आहे.
सक्काळी सक्काळी उपाशी पोटी धागा उघडल्याचे दु:ख आज जाणले.
चकली ताईंची दडप्या पोह्यांच्या रेसिपीचा दुवा
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
छानच रे.. त्या सहजकडे लक्ष
छानच रे.. त्या सहजकडे लक्ष देवु नकोस अंमळ दडपला गेला आहे तो.
:)
अंमळ दडपला गेला आहे तो. >>
झ्क्कास फक्त ओल खोबर मिसिंग
झ्क्कास
फक्त ओल खोबर मिसिंग आहे
जबरदस्त मराठमोळी अस्सल
जबरदस्त मराठमोळी अस्सल महाराष्ट्राची पाकृ.
पोह्यांनी जगावर राज्य करावे ही तो आमची इच्छा.
मी मराठी !! जय मराठी!!
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
प्राजुच्या लेखाच्या
प्राजुच्या लेखाच्या निमित्ताने दडपे पोहेची पाक्रु बघून घ्या
पाहुन खुप भुक लागली आहे
प्रेझ्नटेशन खुप छान आहे. नक्की करुन पाहेन. साधी सोप्पी रेसेपी.
रश्मि मेस्त्री.
कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील..... पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं...
....कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही..!!
व्वा
पण दही का टाकल
वेगळी कृती
प्रभ्या, जे काही केलंयस ते मस्त! पण माझ्या आईची कृती अशी आहे:
पोहे कच्चे घ्या. त्यात भरपूर ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, चिमुटभर साखर, थोडं कच्चं तेल, हिंग आणि बारीक चिरलेला कांदा घाला. जरासं ताक शिंपडा. मग थोडावेळ दडपून ठेवा. आणि फस्त करा हे सांगायला नको.
प्रभ्याच्या कृतीला माझ्या आईने नाव सांगितलं ते म्हणजे "हातफोडणीचे पोहे."
-----------------------------------------------------------------------------------------------------------
चिंगी
एक टीप
दडपे पोहे करताना पातळ पोहे आधी उन्हात गरम केले किंवा उन नसेल तर मंद आचेवर ५-१० मिनिटे भाजून घेतले तर अजून छान होतात..
मी करताना कांदा, टोमतो, काकडी , कोथिंबीर , ढब्बू मिरची , गाजर हे सगळे बारीक चिरून घालते (अवेलेबअल असेल तर ) सगळे बारीक चिरणे न ओला नारळ मस्ट... आणि फोडणीत मोहरी, हिंग, शेंगदाणे , कढीपत्ता... सगळे एकत्र केले लिंबू पिळून ५-१० मिनिटे दडपून ठेवायचे .. झाले ....
वा १ नंबर पदार्थ आहे का खरच.. कधीही खाल्ला तरी आवडतो ...
आता एकदा दही घालून करून बघेन.. कदाचित हे दहीकाला type लागेल...
आम्ही या पोह्यात दही नाही
आम्ही या पोह्यात दही नाही घालत......
लिंबाचा रस वापरतो.............
आणी कांदा कच्चाच घालतो...........
आणी एक आख्खा नारळ खोवुन घालतो...तसेच नारळाचे पाणी पोहयावरशिंपडून ते आधी दडपुन ठेवतो.
बाकी दडपे पोहे ..........काय .............मस्तच लागतात.
----निवेदिता--------
मस्तच
मस्तच .........................
वेरी वेरी टेस्टी टेस्टी.
वेरी वेरी टेस्टी टेस्टी.
And then !
दडपशाहीशिवाय दडपे पोहे?
अरेच्चा! दडपशाहीशिवाय दडपे पोहे?
साहित्य ठीक आहे. थोडे इकडे-तिकडे चालेल पण सगळे एकत्र केल्यानंतर काही काळ ते दडपून ठेवायचे असते म्हणजे सगळे कसे एकजीव होते.
मग हाणायचे!
मस्तच! तोंपासु!
मस्तच! तोंपासु!
या धाग्याचे मालक सध्या कोठे
या धाग्याचे मालक सध्या कोठे हरवले आहेत, देव जाणे
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
आहे ...इथेच आहे...
आहे ...इथेच आहे...