हे नवरे मंडळी कधी कसा वेंधळेपणा करतील सांगता येत नाही. आम्ही जर चार दिवस घरात नसलो तर घराची अवस्था आताच भुकंप येऊन गेला की काय अशी असते व यांच्या चेहर्याची अवस्था बेरोजगारी दर ९% च्यावर गेल्यावर ओबामाच्या चेहर्यावर जसा शुन्य भाव असतो किंवा मनमोहन सिंग यांच्या चेहर्यावर जसा निरागस भाव असतो अगदी अशीच.
तर मुळ मुद्दा मी माहेरी आली आहे तर यांनी केलेले प्रताप खालील प्रमाणे.
१. मोबाईल कधीच चार्ज केला नाही.
२. लॅपटॉपवर कॉफी सांडली.
३. चहा करण्यासाठी तीन पातेली करपून ठेवली.
४. दोनदा घराला कुलुप न लावता फिरायला गेले.
५. माझी आज्जी मावशी घरी काही तरी सामान देण्यासाठी आली होती तर तीला कोण तुम्ही असे विचारले.
६. औषध सापडत नाही म्हणून घरातला सगळा पसारा बाहेर काढून ठेवला आहे.
७. रद्दी विकायला सांगितली होती, शक्यता आहे रद्दी सोडून माझी सगळी मासिके विकली असतील.
अजून खूप आहे, पण यांच्या वेंधळेपणा कसा आवरावा या बद्दल स्त्रीयांनी मार्गदर्शन करावे. तुमचे ते असे वागल्यावर तुम्ही त्यांच्याशी कसे वागता ?

{स्वत: मुकादम बनुन यांच्याकडुन}
स्वत: मुकादम बनुन यांच्याकडुन कामं करुन घ्यावी लागतात. विश्वासाने " दुकानात चाललाच आहेस तर कोथिंबीर फक्त आण" असं पन्नास वेळा बजावुन, लिहुन देउन सुद्धा कोथिंबीर सोडुन बाकीचंच सामान घेउन येणार...वर चिठ्ठी हरवणार.
नाईलाज आहे.
http://shilpasview.blogspot.com/
http://facebook.com/shilpket
{उपाय काय?}
उपाय काय?
{स्वत: मुकादम बनुन यांच्याकडुन कामं करुन घ्यावी लागतात}
माझी बायको काय करते ते सांगतो -
पहिलं म्हंजे मला अहोजाहो करत नाही. हे काम आज झाले पाहिजे असे फर्मावते.
व दुसरं म्हंजे -
स्वत: मुकादम बनुन यांच्याकडुन कामं करुन घ्यावी लागतात.
माझी बायको असेच मुकादम बनून काम करून घेते. म्हंजे मी दुकानात पोहोचल्याबरोब्बर सातव्या मिनिटाला तिचा फोन येतो - स्टेटस काय आहे ?
(दुकान घरापासुन जवळच आहे.)
---------
मी माझे नाव गब्बर का घेतलेय ते आतातरी कळले असेल. (की कमीतकमी जालावर तरी मी शेर आहे हे भासवू शकतो ... घरात चूहां असलो तरी).
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{बेचारा योगेश...}
बेचारा योगेश...
Hope is a good thing...
{बेचारा योगेश... >>>>>>>>>>>}
बेचारा योगेश... >>>>>>>>>>> तुमची अवस्था काही वेगळी नाही
नशीब आमच्या मातोश्री (सासुबाई ) असतात त्यामुळे शनिवारी पुण्यात आली कि किमान बेडरूम मध्ये पाय तरी टाकता येतो नाहीतर
********************************************************
"When you are just about to finish your journey, LIFE changes your destination."
{ये मारा पापडवालेको ........}
ये मारा पापडवालेको ........
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{ये मारा पापडवालेको ........}
ये मारा पापडवालेको ........ >>>> तुमच्या सौ. न पण इथे बोलावले पाहिजे
********************************************************
"When you are just about to finish your journey, LIFE changes your destination."
{आमची सौ. प्रकांड पंडित आहे या}
आमची सौ. प्रकांड पंडित आहे या बाबतीत. नवर्याचा वेंधलेपणा सांगायला मीमची आवश्यकता नाही भासत तिला
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{नवर्याचा वेंधलेपणा सांगायला}
नवर्याचा वेंधलेपणा सांगायला मीमची आवश्यकता नाही भासत तिला >>>>> त्या निमित्ताने आम्हालाहि कळेल
********************************************************
"When you are just about to finish your journey, LIFE changes your destination."
{जरा काडी टाकावी म्हणुन ;) }
त्यामुळे शनिवारी पुण्यात आली कि किमान बेडरूम मध्ये पाय तरी टाकता येतो नाहीतर >>
अवांतर : हाणातीया आता
{(विषय दिलेला नाही)}
********************************************************
"When you are just about to finish your journey, LIFE changes your destination."
{राजे, हॊलमधली एखादी जागा बघुन}
राजे, हॊलमधली एखादी जागा बघुन ठेवा आत्ताच !
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{राजे, हॊलमधली एखादी जागा बघुन}
राजे, हॊलमधली एखादी जागा बघुन ठेवा आत्ताच ! >>>> बेडरुम मधिल पुस्तकांची गर्दी पहाता ती वेळ लवकरच येणार असे दिसते
********************************************************
"When you are just about to finish your journey, LIFE changes your destination."
{ बायकांचं काहीही म्हणणं असतं!!}
सर्व लग्न झालेल्या बायकांची हीच कहाणी...
काही भूकंप झाल्यासारखी परिस्थिती नसते... कदाचित, आनंदाने वेडेपिसे होणे जे काय म्हणतात ना तसं काहीतरी होत असावं
विरोचन
{कदाचित, आनंदाने वेडेपिसे होणे}
कदाचित, आनंदाने वेडेपिसे होणे जे काय म्हणतात ना तसं काहीतरी होत असावं >>>>
********************************************************
"When you are just about to finish your journey, LIFE changes your destination."
{आपले पती विदिन नॉर्मल लिमिट्स}
आपले पती विदिन नॉर्मल लिमिट्स आहेत असा दिलासा देऊ इच्छितो.
आमच्याकडे या एकदा..
{आयला एक मिनीट ! }
आयला !! एक मिनीट !!
डु यु मीन बायका गों-ढळत(असाच लिहितात) नाहीत का ?
हा घ्या आमचा एक किस्सा
एक दिवस हिला सहज छेडले की घरातले काम जमत नसेल ना ! बाई पेटल्या ....मी सकाळी घराची चावी हिच्याकडे देवुन निघुन गेलो रात्री उशीरा येणार म्हणुन सांगीतले आणि उशीरा आलो ..
घरात गेलो , सवयी प्रमाणे आणी भिजलो असल्याने कापड काढली , टावेल गुंडाळला आणि कपाटाकडे वळालो , पाहतो तर सारे कप्पाट रिकामे, या बयेन सारे (म्हणजे धुतलेले देखील) कपडे धुवुन टाकले, मग मला वाटले की किमान टेरेस वर सुकत असतील, वर गेलो तर एकच ड्रेस !! तो ही ओला, रात्रीचे दोन वाजलेले ! ही काय भुताटकी ......
काय सांगु मित्रांनो , हिने कपडे टाकले तर खरे सुकायला पण पिना लावल्या नाहीत, त्या दिवशी लोहगावात वादळी पावुस झाला, सारे कपडे उडुन गेले, दुसर्या दिवशी माझी गत पहा, माझी(माझ्या समृध्द कलेक्शन) एक पॅन्ट आमच्या वाण्याकडे सापडली, त्यावरुन समजा की माझे ईतर (अंर्तवस्त्रे ई.) कुठे आणी कशी सापडली असतील आणी माझे लाजुन-लाजुन काय झाले असेल..आणी म्हणे फक्त पुरुषच वेंढळे असतात
{(विषय दिलेला नाही)}
होत असा कधी कधी. कितीतरी कामे असतात त्या गडबडीत राहिले असेल
********************************************************
"When you are just about to finish your journey, LIFE changes your destination."
{आईशप्पथ काय हसलोय मी सुहासराव}
आईशप्पथ काय हसलोय मी
सुहासराव तुम्हाला बिना साबणाने धुवून वाळत टाकला म्हणायचं कि बायकोने..
विरोचन
{वाळतच घातला की}
वाळतच घातला की
{हॅ हॅ हॅ}
बरे तरी एखादे इंजेक्सन नाय सोडत पेशंट च्या पोटात !
{जाऊ द्या हो}
मेलेल्याला किती मारायचं म्हणतो मी. किती घाबरले बिचारे, कुठे दडी मारून बसले आहेत कुणास ठाऊक.. खरंतर तुमच्याशी लगीन केले तेव्हाच त्यांचा वेंधळेपणा लक्षात यायला हवा होता तुमच्या.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{बायकोला विसरलो...}
माझे लग्न होउन थोडेसेच दिवस झाले होते. बायकोला घेउन मोटारसायकलवर बाजारात गेलो. नंतर ती काही वस्तू पहात बाजार फिरू लागली, मला हव्या त्या वस्तू दुकानात नव्हत्या. मी दुकानातून बाहेर पडलो, मोटरसायकल ला किक मारली अन सरळ अलिबाग बीच कडे प्रयाण!!
...... पुढचे लिहायला हवेच का?
बीच वर भेळ वगैरे मिळते पण आईस्क्रीमही मिळते ही किती चांगली गोष्ट आहे हे मला त्या दिवशी प्रथमच लक्षात आलं.
थोड्या वेळाने मला जरा चुकल्या चुकल्या सारखं वाटायला लागलं. मागे कानाशी अखंड बडबड एकू येत नव्हती ना!!
तेव्हा मोबाईल वगैरेचा जमाना यायचा होता. मग परत फिरलो . बायको दुकाना च्या अवतीभवती गोंधळलेल्या नजरेने इकडे तिकडे बघतां ना दिसली
{(विषय दिलेला नाही)}
********************************************************
"When you are just about to finish your journey, LIFE changes your destination."
{दिशा.}
बाकीचं राहू दे! मावशीला "तुम्ही कोण" विचारल्याबद्दल बिनपाण्याने केलीस की नाही?
सुहास आणि श्रीकांत "टाळ्या!!!"
माझ्या नवर्याला पण मोबाईलची अॅलर्जी आहे, चार्ज करत नाही. मी चार्ज केला तर खिशात ठेवायला विसरतो. ४ वस्तू सांगितल्या तर २ आणतो. याल एक उपाय आहे. ५०% तरी यशस्वी होतो. मला जेव्हा २ वस्तू पाहिजे असतात तेव्हा मी ४ आणायला सांगते, त्यातही आवश्यक नसलेल्या आणच म्हणून बजावून सांगते, मग बहुतेक वेळा दुसर्या २ वस्तू तरी सुखरूप घरी येतात!
-----------------------------------------------------------------------------------------------------------
चिंगी
{माझ्या नवर्याला पण मोबाईलची}
माझ्या नवर्याला पण मोबाईलची अॅलर्जी आहे, चार्ज करत नाही. मी चार्ज केला तर खिशात ठेवायला विसरतो. ४ वस्तू सांगितल्या तर २ आणतो. याल एक उपाय आहे. ५०% तरी यशस्वी होतो. मला जेव्हा २ वस्तू पाहिजे असतात तेव्हा मी ४ आणायला सांगते, त्यातही आवश्यक नसलेल्या आणच म्हणून बजावून सांगते, मग बहुतेक वेळा दुसर्या २ वस्तू तरी सुखरूप घरी येतात! >>>>>>>>>>>. राजे परवडले म्हणायचे
काहीही दंगा नसतो आणि विसरभोळेपणा तर अजिबात नाही सांगितल्या तेवढ्या वस्तू बरोबर आई कडे पोच होतात ( कधी जात नाही आणायला हि गोष्ट वेगळी )
फक्त समान पसरवणे हा आवडता छंद आहे त्यांचा (आम्ही आटोपले तर एकाही वस्तू मिळणार नाही म्हणून आटोपून देत नाहीत )
@ चिंगी आपणास आपल्या नवऱ्याची एवढी स्तुती करताना पाहून डोळे पाणावले
********************************************************
"When you are just about to finish your journey, LIFE changes your destination."
{परत भेटली पाँईट मध्ये ;) }
फक्त समान पसरवणे हा आवडता छंद आहे >>>
समान कसे पसरवतात ब्वा !
{घ्या!}
फक्त नवरेच काय, मी म्हणते पुरुष सगळेच विसराळू. इथल्या एका भाऊरायाने मला मूगडाळीची भजी करून रेसिपी देतो म्हटलेलं, त्याला काय दीड तरी वर्ष झालं. अजून मूगडाळ भिजत पडली नाही!
-----------------------------------------------------------------------------------------------------------
चिंगी
{सौ. सुहास यांचे प्रताप दिसत}
सौ. सुहास यांचे प्रताप दिसत आहेत हे
Hope is a good thing...
{इथल्या एका भाऊरायाने मला}
इथल्या एका भाऊरायाने मला मूगडाळीची भजी करून रेसिपी देतो म्हटलेलं, त्याला काय दीड तरी वर्ष झालं. अजून मूगडाळ भिजत पडली नाही >>>
कोण ? कोण ?
{वेंधळ्यांचा नवरेपणा}
वेंधळ्यांचा नवरेपणा
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{ द्विरुक्ती}
वेंधळ्यांचा नवरेपणा.... ही तर द्विरुक्ती झाली, ( जसेकी चुकुन मिष्टेक / डोक्याला हेडेक !!) जाउद्या झाली आहे आता घ्या चहा घ्या
{वा वा}
वा वा क्या बात है...
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{माझा नवरा कामात खूपच परफेक्ट}
माझा नवरा कामात खूपच परफेक्ट आहे, त्यामुळे तो घरात् नसतानाच मी सर्व कामे उरकते
{५. माझी आज्जी मावशी घरी काही}
५. माझी आज्जी मावशी घरी काही तरी सामान देण्यासाठी आली होती तर तीला कोण तुम्ही असे विचारले.
याबद्दल यांचे सर्व पुरूषजातीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करावयास हवा, असे माझे स्पष्ट मत आहे.
{सुटकेचा निश्वास}
सुटकेचा निश्वास
m still unmarried!!!
मी स्मरणांच्या वाटांनी वेड्यागत अजून फिरतो .... सुकलेली वेचीत सुमने भिजणारे डोळे पुसतो....
-मेघ
{सुटकेचा निश्वास}
सुटकेचा निश्वास
m still unmarried!!!
मी स्मरणांच्या वाटांनी वेड्यागत अजून फिरतो .... सुकलेली वेचीत सुमने भिजणारे डोळे पुसतो....
-मेघ
{कॉलिंग चु चु... कॉलिंग चुचु. }
कॉलिंग चु चु...
कॉलिंग चुचु.
तिच्याक्दे अस्तील भर्पुर गोष्टी
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
{विजुभाऊ}
ब्याक टू खाणकामगार मोड. बादवे तुम्ही मध्ययुगातून डायरेक्ट एकविसाव्या शतकात उगवलात काय? मधल्या काळात काय गाढनिद्रा वगैरे लागली होती काय? चुचुने म.सं. संन्यास घेतल्याला युगं लोटली आता. उगाच खाणकाम करताना जेन्युईन प्रतिसादाचा आव कशाला.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{(विषय दिलेला नाही)}
----निवेदिता--------
{राजेंचे महान प्रयोग}
राजेंचे महान प्रयोग सगळ्यांनाच माहित आहेत तेव्हा मी अधिक काय लिहु
********************************************************
"When you are just about to finish your journey, LIFE changes your destination."
{स्त्रीयांचे मार्गदर्शनः}
वरील सर्व बायकांचे पर्तिसाद वाच्ले.
वाचून लै आणंद झाला.
लै अभ्यासपूर्ण, संयत लेख. बरीच नवी माहिती कळाली.
यावर आपण एक लेखमालाच लिवा. अश्या लेखमालांची गरज हाये.
दहनन्स!
(सूसिक्ष्यीत पर्तिसाद लिवून हयाप्पी झालेला)
इब्लिस!
"To feel superior to other humans, which I often do, I need a better reason than color of my skin." -Archie Goodwin.
{हा हा हा हा!}
हा हा हा हा!
Hope is a good thing...
{वेंधळेपणा. }
वेंधळेपणा करणं हा सगळ्यांचाच गूण (?) आहे. त्याला स्त्रीयाही अपवाद नाहीत. मी माझ्या वेंधळेपणाचा अनुभव
सांगतो. मला "द एझॉर्सिस्ट " हा सिनेमा पाहायचा होता. मी स्वतः जाऊन इरॉस थिएटरमधे आगाऊ तिकिट काढलं.
संध्याकाळी शोला जाऊन बसलो. माझ्या शेजारी दुसरे दोघे बसले होते. सिनेमा चालू झाला. तो एक्झॉर्सिस्ट नसून "थर्टी
थावजंड फीट अबाऊ द सी लेव्हल" असा होता. त्या दोघांपैकी एक जण म्हणाला ,"अरे मी अमक्या तमक्याला तिकिट काढायला सांगितलं , त्याने न पाहताच काढलं. 'द एक्झॉर्सिस्ट " या पोस्टरच्यावर "कमिंग " असं लिहिलेलं न पाहताच
तिकिट काढलं. " त्याला ही एक्झॉर्सिस्टच पाहायचा असावा. निदान दुसर्याच्या चुकीमुळे त्याला हा सिनेमा पाहावा लागत होता. माझं काय ? मी कपाळावर हात मारून घेतला. मी स्वतःच आगाऊ तिकिट काढलं होतं. तेही न पाहता.
आता कोणाला दोष देणार ? अर्थातच मी माझे पैसे वसूल करीत बसलो.
अरूण कोर्डे.