लुफ्त लुटा थालिपीठाचा

0
0

आठवडाभर काम केल्यावर आज काहीतरी वेगळं करायचा मूड होता.सो आज बेत केला होता थालिपीठांचा.

साहित्य :
१.आडीच - तीन कप थालिपीठ भाजणी

२.दोन लहान चमचे तिखट
३.एक लहान चमचा मीठ
४.एक चमचा धणे-जिरे पुड
५.५-६ काड्या चिरलेली कोथिंबीर

६.एक चिरलेली मिरची
७.एक कांदा चिरून

एका भांड्यात वरील सर्व साहित्य घ्या.
पाण्याचा हबका मारा.
हळू हळू पाणी टाकत भाजणीचा गोळा बनवा.

या गोळ्याचे चार ते पाच समान आकाराचे गोळे बनवा.
एका प्लास्टीकच्या कागदाला तेलाचा हात लावा.
त्यावर ह्यातला एक गोळा घेउन बोटाने थापा.
पसरट झाला की त्याला तीन चार छिद्रे पाडा.

आता हे थालिपीठ एका तव्यावर ठेवा.
पाडलेल्या तीन-चार छिद्रांमधे थोडे थोडे तेल ओता.
झाकण ठेवून चार पाच मिनिटे शिजू द्या.

एकदा पलटून मिनीटभर दुसरी बाजू भाजून घ्या.


मस्त दही आणी साजुक तुपासोबत लुफ्त लुटा.

व्वा !! रात्री २.५२ ला ही हे

व्वा !! रात्री २.५२ ला ही हे पाहुन अंमळ भुक लागली Sad आणि हात हलवण्यापलिकडे आम्ही काहीच करू शकत नाही .. प्रभ्याचा निषेध !!

व्वा !! रात्री २.५२ ला ही हे

व्वा !! रात्री २.५२ ला ही हे पाहुन अंमळ भुक लागली Sad आणि हात हलवण्यापलिकडे आम्ही काहीच करू शकत नाही .. प्रभ्याचा निषेध !!

व्वा !! रात्री २.५२ ला ही हे

व्वा !! रात्री २.५२ ला ही हे पाहुन अंमळ भुक लागली Sad आणि हात हलवण्यापलिकडे आम्ही काहीच करू शकत नाही .. प्रभ्याचा निषेध !!

हॅहॅहॅ

कंची भुक लाग्ली व्हती राच्च्याला? हात हलवण्या ऐवजी हातानीच करायला शिकायच. यखांदा पदार्त म्हंतो.



प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

सही!

थालिपीठ छान रे प्रभो!

एक शंका

थालिपीठाला मधे भोकं का पाडतात??
बाकी फोटो पाहुन भुक मात्र चाळवली गेली आहे हास्य

मस्त

थालीपीठ हाणायचं सोडून हा कसला 'छिद्रान्वेषीपणा'? wink

अवांतर - थालीपीठ भाजताना जे तेल सोडतात ते सगळीकडे नीट पोचून थालीपीठ खमंग भाजले जावे ह्या उद्देशाने भोके पाडतात.

लै भारी ..

जियो प्रभो ... खूप छान ..

जबरा रे ! मस्त फोटो...

जबरा रे !

मस्त फोटो... हास्य



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मस्तच दिसता आहेत थालिपीठ

मस्तच दिसता आहेत थालिपीठ हास्य

मस्त रे.... @ मोडक - भोक

मस्त रे....

@ मोडक - भोक बहुतेक घालायला.. तेल हास्य

मस्त!

थालिपिठ मस्त.. पण 'लोन्याचा गोला' नसेल तर थालिपिठ खाण्यात काय मजा? तूप, दही ठीक आहे.. पण लोण्याचा गोळा हवाच...
स्वाती

+१ वोईच

बोलनेवाला था आपुन!

(लोणीचाप्या)रंगा

स्वातीताई, मला स्वतःला

स्वातीताई, मला स्वतःला थालिपीठावर लोण्याच्या गोळ्यापेक्षा साजुक तुप जास्त आवडतं...म्ह्णून मी तुप वापरतो. हास्य

अरे वा!

डॅनबरीला चक्कर मारावी की काय?

गरिबांचा गणपा = प्रभो

कधीपण या....

कधीपण या....

प्रभो

मित्रा तुझा हा गुण मला माहीतच नव्हता. साधी, सोपी आणि रुचकर पा.कृ. फोटो तर अप्रतीम आहेत.
(अजुन काही फुल पाखरंचे फोटो पाठव वाट बघतोय )



*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

कान्दा बारिक चिरत जा रे

Angry कान्दा बारिक चिरत जा रे

आली आली!

चुचुतै आली! wink

चुचे, चांगली स्मायली तरी

चुचे, चांगली स्मायली तरी टाकायचीस की गं....

रूमपार्टनर नी आधीच चिरून कांदा फ्रीज मधे ठेवला होता भाजीसाठी...तोच वापरला मी.... 8)

वा वा वा ...

सुंदर पाककॄती हो, आम्हाला आमच्या जुन्या थालिपिठाची याद आली एकदम कच्चकन.

बाकी तुमचे रुममेट्स काय "देव (आडनाव नव्हे, स्वभाव किंवा व्यक्तिविषेश )" आहेत का हो ?
न्हाई म्हणजे कांदा वगैरे चिरुन रेडी असतो म्हणजे आश्चर्यच म्हणायला हवे.

आ हा हा!

सॉलिड्ड फोटो... प्रभो....

सॉलिड्ड फोटो...
प्रभो.... Grade
मानल बॉस तुला...
ठाण्यात परत कधी येत आहेस???



-निखिल

डायरेक्ट दिवाळीला

डायरेक्ट दिवाळीला Big smile

ह्म्म.. छे उस्गावात जायच्या

ह्म्म..
छे उस्गावात जायच्या आधी अश्या पाकृ का टाकल्या नाहीस..



-निखिल

कोणत्या दिवाळीला भाड्या ???

कोणत्या दिवाळीला भाड्या ??? माझा आयफोन देऊन जा .. मग कायम्चा हिरवा पत्ता घेऊन तिकडे उलथलास तरी हरकत नाही !
गोळ्या देणार्‍या प्रभ्याचा जाहिर निषेध !!

अछा अच्छा!

इकडे नोटा कमवून मग हिरवा माज दाखवत 'दिवे लावायला' (दिवाळीचे म्हणतोय मी) तिकडे असंच ना? wink

मस्त फोटो...

मस्तच....फोटोपण किती छान आलाय...!

आय्ला आधी वाटल तिकडच्या

आय्ला आधी वाटल तिकडच्या निवडणुकांचे निकाल इथे जाहीर झाले की काय thinking
आहाहा प्रभोशेठ उत्त्म जमलाय बेत.
येताना आफ्रिकेच्या जंगलात विमान वाकड करुन जा हास्य



*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

=)) =)) कहर आहेस!!

Laughing out loud
=)) Laughing out loud
=)) Laughing out loud Laughing out loud

कहर आहेस!! _/\_

प्रभ्या लेका, तु ऊसात जाऊन एकदम सुगरण्याच झालास की रे हास्य

बेश्ट!!!!

लय भारी

जीव घेणार हा फोटु... मस्त रे मित्रा..

मस्त रे !!

मस्त रे !!

अतिशय आव्हानात्मक असे थालिपीठ

अतिशय आव्हानात्मक असे थालिपीठ !!!

सावळ्या तरुणीच्या दंडासारखे

हे शब्द राहिले का परा? thinking

(गोरापान)चतुरंग

फोटो बघुनच भुक लागली....

फोटो बघुनच भुक लागली.... हास्य

नुसतं थालिपीठ आहे. दही अन तुप

नुसतं थालिपीठ आहे. दही अन तुप न दिल्यामुळे निषेध.




मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

बर्‍याच दिवसात खाल्ले

बर्‍याच दिवसात खाल्ले नाही....... घरपे बोलना पडेंगा ! pray



Ignited Mind ! हा माझा , माझ्या कवितांचा ब्लॉग आहे बरं का ! हास्य