कथा एका प्रवासाची........ भाग १.
मुंबई एअरपोर्टच्या थंडगार एसीच्या हवेत बसून सुद्धा शमिका घामाने भिजली होती. छोट्या राजसचा हात तिने घट्ट पकडून ठेवला होता. सामानाचं चेक-इन करुन झालं होतं आणि विमान वेळेवर सुटणार असल्याची उदघोषणाही होत होती. कधी एकदा विमानात बसतेय असं तिला झालं होतं. ती सारखं-सारखं घड्याळ पहात होती. तिची घालमेल छोट्या राजसला मात्र कळत नव्ह्ती. तो विमानतळावरचं चकचकीत वातावरण बघण्यात गुल झालेला. त्याला राहून्-राहून एकच प्रश्न पडत होता की, "पप्पा पण येणार होते US ला, मग ते का नाही आले अजून?" पण मम्मीची अवस्था बघून त्याला विचारावसं वाटत नव्हत. एकदाचं विमान लागलं आणि विमानात बसण्याची घोषणा झाली तसं शमिकाने हुश्श केलं. भराभर चालत ती विमानात बसली. ती छानशी एअरहोस्टेस ज्या सूचना देत होती त्याकडे तीचं अजिबात लक्ष्य नव्हतं. राजस मात्र कुतुहलाने तिचं म्हणणं ऐकत होता. इतक्यात विमानाला हलकासा धक्का बसला, विमान रन वे च्या दिशेने चाललं होतं अन् कॅप्टनचा आवाज आला,"we are ready to fly. Have a wonderful journey all of you."
विमानाचा जो आवाज एरवी कर्णकर्कश्श वाटतो तोच आज शमिला गोड वाटत होता. घाबरुन राजस मम्मीला चिकटला. विमानाने हळू-हळू वेग घेतला आणि आकाशात झेपावले. त्याचबरोबर इतकावेळ चाललेली शमीच्या जिवाची घालमेल शांत झाली. राजसही आता सावरला होता. मघापासून त्याच्या मनात जो प्रश्न सारखा येत होता तो शेवटी त्याने विचारलाच,"मम्मी पप्पा कुठे आहे. तो पण येणार होता ना आपल्याबरोबर. मग का नाही आला? विमान तर सुटलं, आता कसा येणार तो?" "अरे, पप्पाना थोडं काम आलं ना म्हणून तो नंतर येणार आहे." शमीने त्याची तात्पुरती समजूत घातली.
विमानात सगळं सेटल झाल्यावर ती शांतपणे डोळे मिटून विचार करायला लागली; आपण जे मुंबईत करुन आलोय त्याचे परिणाम काय होतील याचा. तिच्या अंगावर सरसरुन काटा आला. पण शेवटी सत्य तिला नाकारुन चालणारच नव्हतं. विमान पहाटेचं होतं म्हणून शमी रात्रीच घरातून बाहेर पडली होती सगळं सामान अन् राजसला घेऊन. जेव्हा शेजार्यांनी तिला शैलेश बद्दल विचारलं तेव्हा तिने सांगितलं,"तो नं जरा कामात busy होता म्हणून direct एअरपोर्टलाच येणार आहे." शेजार्यांच्या काळजी घेण्याच्या हजार सुचना ऐकून ती वाटेला लागली. ईतक्यात राणेकाकू मागून ओरडल्या,"अगं शमी, माझी एक लांबची भाची राहते ऑस्ट्रेलियात. तिला सांगितलय मी तुमच्या येण्याबद्दल. काही लागलं-सवरलं तर फोन कर गं बाई तिला. नवखा देश आहे जरा सांभाळून रहा तिघेही."
बरोबर वाचलंत राणेकाकू ऑस्ट्रेलियाच म्हणाल्या आणि शमीचं विमान मात्र US चं आहे. विचार करताय? शमीने असं काय केलं असेल याचा?...
क्रमश:

.jpg)
{हो, विचार करतेय...पण तुम्ही}
हो, विचार करतेय...पण तुम्ही इतका बारीक धागा का काढला याचा. जरा मोठ्ठे भाग टाका. वाचतेय हे कळेपर्यंत संपलं पण!!
बाकी कथा छान वाट्टेय.
http://shilpasview.blogspot.com/
http://facebook.com/shilpket
{वा.. वेगवान रचना असलेली}
वा.. वेगवान रचना असलेली कथा.
"
शमिकाने काय केले असेल याचा विचार करून डोक्याचा भुगां होईल असे वाटत आहे.. पण एवडे चित्रपट पाहिले आहेत पहिली शक्यता तर हीच येत आहे की "टपका दिया क्या
Hope is a good thing...
{छान अप्रतिम}
पण शिल्पा म्हणताहेत ते बरोबर आहे.... थोडे मोठ्ठे भाग टाका
झाडे लावा आणि जगवा...
{सध्या वेळ नाही मिळत}
सध्या वेळ नाही मिळत आहे....बर्याच दिवसापासून लिहायचं चाललं होतं पण जमतच नव्हतं. सुरुवात तर करुया म्हणून लिहिलं. प्रयत्न करते मोठे भाग टाकण्याचा.......
परिजा
******
बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)
{सुरुवात छानच !! भाग थोडे}
सुरुवात छानच !!
भाग थोडे मोठ्ठे टाकावेत !
{वेगवान सुरुवात, पण क्रमश:}
वेगवान सुरुवात, पण क्रमश: स्पीडब्रेकर आडवा आला
पुढचा भाग प्लीजजजजजज लवकर आणि मोठा टाका
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!
माझा ब्लॉग - मन उधाण वार्याचे…
{अजुन दोन - चार ओळी कमी करता}
अजुन दोन - चार ओळी कमी करता आल्या नसत्या का?
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{जानी... जिनके खुदके घर शिशेके}
जानी... जिनके खुदके घर शिशेके होते है...
बाकी... सुरुवात चांगली जोरदार झाली आहे. या भागाला टीजर ट्रेलर समजूयात हवंतर.
पण पुढचे भाग मात्र पटापट येऊद्यात. नाहीतर कराल विशालभौंसारखं आणि लावाल आमच्या डोक्याला शॉट आणखी.
मीऽच तो...
{सुरुवात छान आहे. पुढचे भाग}
सुरुवात छान आहे. पुढचे भाग पटापट टाका.
{कथानक एकदम वेगवान आहे }
कथानक एकदम वेगवान आहे
पुढचे भाग पटापट टाका ( नाहीतर विशालदा सारखा डोक्याला शॉट लावून ठेवाल )
बन्सी को लकडी सदा समझा किये तुम पर उसके नग्मो कि धुन कहाँ सुन सके तुम!
{प्रयत्न करते आहे गोष्ट पटापट}
प्रयत्न करते आहे गोष्ट पटापट पूर्ण करण्याचा आणि हो तुमच्या सर्वांच्या डोक्याला शॉट नाही लावणार मी.....
परिजा
******
बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)
{नशीब एकटीने तरी मान्य केले की}
नशीब एकटीने तरी मान्य केले की आम्हाला डोके आहे
Hope is a good thing...
{अहो तुम्हाला डोकं नाही असं}
अहो तुम्हाला डोकं नाही असं कोण म्हणणार? त्याशिवाय का तुम्ही मी मराठीचं इतकं भलंमोठं साम्राज्य उभं केलयं?
परिजा
******
बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)