ज्ञान, संस्कृत, इतिहास, समज, जाण वगैरे वगैरे - भाग ४ (अंतिम)

0
0

तिसरा भाग

निवेदन - पहिल्या भागाप्रमाणेच.

***

मागच्या भागात आपण पाहिले की संस्कृतचा सुवर्णकाळ हा विविध प्रकारच्या लेखनाने, साहित्याने फुलुन गेलेला होता. ह्याच काळात कधीतरी अथर्वण संहितेला वेद म्हणुन मान्यता मिळुन तीन वेदांच्या ठिकाणी चार वेद झाले. हे चार प्रमुख वेद म्हणुन मान्यता पावुन होते तर यांची अंगे असलेली काही रचनाकृती उपवेद म्हणुन मान्यता पावली. जसे धनुर्वेद, आयुर्वेद इत्यादी. वेदांचे जतन करणे ही प्रमुख समस्या होती. कारण लेखन लिपी जरी अस्तित्वात आलेली असली तरी संस्कृत ही भाषा होती. भाष म्हणजे बोलणे. संधी, स्वराघात, उच्च नीच स्वर यांची विशिष्ट पद्धतीनेच उच्चारण करण्याची आवश्यकता होती. कारण बलाघात बदलले तरी अर्थ बदलतो.

याच दरम्यान संस्कृत ही देवकृत भाषा आहे असा विचार प्रवाह बळावत चालला. देव म्हणजे दिव्य माणसे असा पुर्वीचा अर्थ जावुन आता देव म्हणजेच ईश्वरी अवतार असा मतप्रवाह वाढु लागला होता. त्यामुळे संस्कृतला देववाणी असा मान मिळाला. अर्थातच त्यामुळे केवळ पुस्तकी पांडित्य असणा-या काही ढुढ्ढाचार्यांनी संस्कृतच्या वापराविषयी काही निर्बंध घालायला सुरवात केली. साहित्यात काय असावे काय नसावे याचा निर्णय समीक्षकी वृत्तीच्या कधीही लेखन न करणा-या मंडळीनी करायला सुरवात केली की त्या त्या प्रदेशातील साहित्याला अवकळा येत असते. साहित्य हे जनमानसाचे प्रतिबिंब असले पाहिजे, नव्हे ते तसे असेल तरच लोकादरास प्राप्त होते. लोकमान्यता असेल तरच साहित्य निर्मितीत आनंद असतो, तेच साहित्य टिकुन रहाते. अन्यथा अशा साहित्याचे आयुष्य क्षीण असते.

पुर्वीच्या संस्कृत ग्रंथांचा नाटकांचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की त्यातील भाषा, विषय, संवाद हे अगदी बोली भाषेप्रमाणे आहेत. परंतु जसजसे निर्बंध वाढु लागले तसतसे विनोदी, अश्लिल, सुचक, द्वैयर्थी संवादासाठी प्राकृत भाषेचा आधार घेत लेखन होवु लागले. त्यामुळे अनेक नंतरच्या काळातील नाटकांमधे श्रेष्ठींचे संवाद संस्कृत मधे तर दासदासी , विदुषक यांचे संवाद प्राकृतात असे दिसते. संस्कृतमधून शिव्यांचा सुद्धा वापर करण्यास मनाई येत गेली. एकमेकांची खिल्ली उडवणारे विनोदी संवाद मग भले ते श्रेष्टींचे का असेना ते संस्कृतात नको असे निर्बंध आल्यावर विपुल लेखन जे एकेकाळी होत होते ते हळुहळू कमी होवु लागले. लेखक अशा साहित्यासाठी प्राकृत भाषांचाच जास्त वापर करु लागले.

संस्कृतातले लेखन केवळ व्याकरण, धार्मिक कृत्ये, अध्यात्मिक तत्वज्ञान, राजकीय घोषणापत्रे यांच्या पुरते सिमीत राहिले. पुढे पुढे बादशाही अंमलात तर राजकीय बाबी सुद्धा फारशी, अरबी अशा भाषांमधे होवुन सर्वच भारतीय भाषा मागे पडल्या. त्या आजही मागेच आहेत. जसजसे प्राकृतात लेखन सुरु झाले तसतसे ती भाषा अधिक ठासीव, रेखीव बनत चालली. वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या बोली बनु लागल्या. आवश्यकतेनुसार स्थानिक लिपीबदल होत गेला. बदलत बदलत आजच्या भाषा जन्माला आल्या. त्यांच्यात लेखन सुरु झालेच होते त्याला मान्यता मिळतच होती पण अजुनही धार्मिक कारणाने संस्कृतचे महत्व टिकुन होते.

त्या वर्चस्वाला सुद्धा हळूहळु धक्का बसत होता. महाराष्ट्राचा विचार केला तर ख-या अर्थाने जोरदार धक्का दिला ज्ञानेश्वरांनी. इतक्या लहान वयात येवढी मोठी कर्तबगारी केली की आजही विस्मयचकित व्हायला होते. महाराष्ट्रात म-हाठी ख-या अर्थाने रुजली, फोफावली, बहरली. पुढे अनेक संतांनी, लेखकांनी मराठीला वाढवले. आजही ही परंपरा चालुच आहे. मराठी ही वीरांची भाषा मानली जाते. समोरच्या भाषेतील शब्दांना आपल्यात सामावुन घेण्याची युरोभारतीय कुलातील भाषांची परंपरा मराठी तितक्याच ताकदीने पुढे नेत आहे.

याचा अर्थ संस्कृत संपली का ? मी मानत नाही. भाषा कधीही मृत होत नाही, तिचे स्वरुप बदलते. आज मराठीतील अनेक शब्द संस्कृत आहेत. मराठी व्याकरण पद्धती संस्कृतसारखीच आहे. अनेक साम्य आहेत. भेदही आहेत. संस्कृतवर देववाणी म्हणुन बंधने आली नसती तर आजही संपुर्ण भारतात संस्कृत प्रचलीत राहिली असती. प्राकृत भाषा राहिल्या असत्याच पण संस्कृतचा वापर चालुच राहिला असता. साहित्य बनत राहिले असते. पण बंधने आली की प्रगती खुंटते. भाषा म्हणजे बोलीवर बंधने आणू नयेत, समाजाला असे बोला तसे बोलु नका असे सांगितले की समाज ती बंधने काही काळ पाळेल, पण नवे शब्द, नवी बोली तयार करुन संवाद साधतच राहिल, मनातले विचार व्यक्त करतच राहील येवढे जरी लक्षात आले तरी पुरे. भाषेवर बंधने आणली की नवी भाषा तयार होण्याचा इतिहास आहे. आणि ह्या इतिहासाची अनेकवेळा पुनरावृत्ती झालेली आहे, होत आहे, आणि होईल.

इत्यलम्

वाह ! छान लेखमाला .. अतिशय

1

वाह !

छान लेखमाला .. अतिशय उत्तम पध्दतीने लिहले आहेस नाना !

आवडले.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मस्त रे नाना!

2

इतिहास तर सांगीतलासच पण इतिहासापासुन सगळे थोडेच बोध घेतात? जरा भविष्याची झलक देउन इत्यलम करायचास. हास्य

ले.आ. हे. वे. सां. न. हास्य

या ले़खमालेचे उद्दीष्ट केवळ

3

या ले़खमालेचे उद्दीष्ट केवळ काही इतिहास सांगणे हेच होते.

या इतिहासापासुन आपली बुद्धी वापरुन भविष्याचा वेध घेणे हे ज्याच्या त्याच्या समज आणि जाणिवेवर अवलंबुन असते. नाही का ?

:-(

4

मला वाटले काही देवमाणसे (देव म्हणजे दिव्य माणसे ) जरा मार्गदर्शन करतील Sad असो.

हल्ली

5

मार्गदर्शनाची आस खूप लागलेली दिसते सहजकाका. हास्य

देव मार्गदर्शनाची

6

देव मार्गदर्शनाची wink


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

देव... देव्हा-यात नाही...

7

देव... देव्हा-यात नाही...

हास्य

वा!

8

भाषेचा प्रवास आवडला. लेखमाला सुरेख झाली आहे.

बदलत्या भाषेचा समाजावरचा परिणाम ( व उलटे) अधिक विस्ताराने आवडले असते तर अधिक आवडले असते. शेवटचा भाग जरा घाईत गुंडाळल्यासारखा वाटला.


-ऋ

जबरदस्त लेखमाला ..

9

जबरदस्त लेखमाला .. बरीच माहिती मिळाली
मलाही शेवटचा भाग जरा घाईत गुंडाळल्यासारखा वाटला.... असो

>>संस्कृतवर देववाणी म्हणुन बंधने आली नसती तर आजही संपुर्ण भारतात संस्कृत प्रचलीत राहिली असती
जरा अवांतर वाटेल ... पण या वरून मला एक जाहिरात आठवली, त्यावर शोधले असता .. कर्नाटकमधील "मत्तूर" या गावी आजही बोलीभाषा म्हणून संस्कॄत वापरतात असे कळाले
Mattur (also spelled Mathur, Matthur and Mathoor) (Kannada: ಮತ್ತೂರು, Sanskrit: मत्तूरु) is a small village near the city of Shivamogga in Karnataka, southern India. It is on the bank of the Tunga River. In recent times, it has become known for Sanskrit learning. Most families in this village use Sanskrit as their daily language.

Another notable feature in the village is the study of Vedas and Vedanta. The vedanta school in the village is closely associated with Holenarsipura Trust and is supposed to be one of the rare schools where Shankara Vedanta is taught as it was originally enunciated by Shankara.
सौजन्य - विकीपिडिया

टाईम्स ऑफ इंडिया मधील लेख -
http://timesofindia.indiatimes.com/articleshow/msid-1199965,curpg-1.cms

एवढी

10

घाई का बरे?

अतिशय उत्तम लिहले आहे. मी

11

अतिशय उत्तम लिहले आहे. मी प्रिन्ट काढून घेऊ का ?

धन्यवाद

12

प्रिंट घेतल्यास माझी काहीही हरकत नाही. हास्य

लेखमाला आवडली... शेवटचा भाग

13

लेखमाला आवडली...
शेवटचा भाग अजुन विस्तॄत वाचायला आवडला असता...

भाषेवर बंधने आणली की नवी भाषा तयार होण्याचा इतिहास आहे. आणि ह्या इतिहासाची अनेकवेळा पुनरावृत्ती झालेली आहे, होत आहे, आणि होईल.

महत्वाचे बोललास ...


-निखिल

नानाश्री...एक

14

नानाश्री...एक नंबर....

संग्रहणीय अशी लेख माला.....

आजपर्यंत साठवलेली पहिली वाचनखुण...

सर्व प्रतिसादकांचे आणि

15

सर्व प्रतिसादकांचे आणि वाचकांचे आभार हास्य

छान. पण नानाच्या लेव्हलची

16

छान. पण नानाच्या लेव्हलची नाही. नाना या पेक्षा अजून बरंच काही लिहू शकला असता. असो.

लेखमाला सुरेख झाली आहे.

17

लेखमाला सुरेख झाली आहे.