राज ठाकरे डोंबिवलीत

0
0

३ फेब्रुवारी २०१० रोजी राज ठाकरे यांची डोंबिवली येथे सभा झाली. सभा नेहमीसारखीच सॉलिड झाली. मराठीचा नेहमीचा मुद्दा तर होताच, पण त्याबरोबरच सध्या गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जे काही प्रकार चालू आहेत त्याचाही उत्तम समाचार घेतलाय.

टॅक्सी परवान्यांचा इश्यु, त्यावरून मुख्यमंत्र्यांनी केलेलं घुमजाव याबद्दल राज बोललेच, पण त्याचबरोबर ह्याप्रकारानंतर विधानसभेत विरोधी पक्षाबरोबरच राष्ट्रवादींनीही झाल्या प्रकाराचा विरोध केल्याबद्दल राजनी त्यांचं अभिनंदनही केलं. राज जे नेहमी सांगत आलेले आहेत, की जे चांगलं असेल त्याचं कौतुक करूच मग तो रायव्हल पक्ष का असेना, त्याचं पुन्हा एकदा प्रत्यंतर आल. राहिला टॅक्सी ड्रायव्हर्सना मराठी येण्याचा मुद्दा - आपल्या राज्यात असा कायदाच आहे मुळी की टॅक्सी चालकाला पहिले मराठी, आणि इतर कुठलीही एक भाषा कामचलाऊ येण बंधनकारक आहे. प्रश्न येतो तो फक्त हा कायदा इंप्लीमेंट करण्याचा जे शक्य नाही हे आपण सगळ्यांनी बघितलच.

दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे "मुंबई पुरे देशकी" हे प्रसार माध्यमांनी लावलेलं रडगाण आणि त्यात सचिन, मुकेश अंबानी यांची विनाकारण इनवॉल्वमेंट. भारतातलं प्रत्येक गाव, प्रत्येक शहर हे पुर्ण भारताचच आहे ह्याबद्दल कोणाचच दुमत नाही, पण म्हणून कोणालाही स्थानिक लोकांच्या हक्कांवर गदा आणण्याचा अधिकार प्राप्त होत नाही.

याच अनुशंगाने राजनी कर्नाटकचं उदाहरण दिलं. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी फतवा काढलेला आहे की, तिकडे काम करणार्या आय.ए.एस. ऑफीसर्सना कन्नड बोलता यायलाच पहिजे नाहीतर त्याचा परिणाम त्यांच्या प्रगतीपुस्तकावर होवू शकतो. या लेवल वरचे महाराष्ट्रातले ऑफीसर्स मात्र "मुंबई ही कुणाच्या बापाची नाही" अशी भाषा करताना आढळतात. असो. भाषण फार नाही, जेमतेम अर्ध्या तासाचच झालं. मी स्वतःही युट्युबवरच बघितलं आणि तुम्ही सगळ्यांनी बघावं म्हणून हा दुवा इकडे शेयर करतोय.

http://www.youtube.com/watch?v=rH4QVcWLb4Y

सुमीत भातखंडे

जर हिंमत असेल तर चेन्नईमधे

1

जर हिंमत असेल तर चेन्नईमधे जाउन हिंदीच्या नावानं गळे काढावेत.
ते तर रजनीकांतला सुद्धा "बाहेरचा" समजतात.

नेहमीप्रमाणेच राज ठाकरेंना

2

नेहमीप्रमाणेच राज ठाकरेंना डोळे झाकून पाठिंबा.

मी मराठी!!
जय मराठी!!



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

सहमत

3

+१

राजचे भाषण...

4

राजचे भाषण... हास्य


-निखिल

धन्यवाद ! छान दुवा दिला आहे.

5

हास्य

धन्यवाद !

छान दुवा दिला आहे.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."