बझबझपुरी !

0
0

ज्या दिवशी गुगल बझचा जन्म झाला त्या संध्याकाळी सुचलेली ही विडंबने माझ्या बझनंतर इथे लिहीत आहे.

*************************************************
जे जे आपणांसि ठावे, ते ते इतरांसि शिकवावे, बझोनी सोडावे सकळ जनांसि

**********************

बझले रे गुगल माझे ! बझले रे !
हलले रे FB वाले हलले रे !

***********************

नाही कशी बझू तुला , बझते रे गीत,
परि सारे हलक्याने, आड येते ट्वीट !

*************************

गंजल्या बुद्धिस माझ्या धार बझाची मिळू दे ।
वादळी सृजन माझे चार भिंतींना कळू दे ॥

*******************************

एक बझ सुखाचा, शंभर बझ हे दु:खाचे
बझ आहे रे अस्त्र माणसा, तुझिया अस्तित्वाचे

**********************************
दिवस तुझे हे बझायचे ! ट्विटर वाचून ट्विटायचे !

**********************************
आणि बरोबर १२ वाजता लिहून झाला होता तो हा.

चैत पुनवेची रात आज आलीया घरात
बझबझ काळजात माझ्या माईना

कदी कवा कुठं कसा जीव झाला बझपीसा
याचा न्हाई भरवसा तोल ऱ्हाईना

बझ सोडा आता तरी काळ येळ न्हाई बरी
पुन्हा बझु कवातरी साजणा ...
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा.

*********************************

{बाझवला तिच्यायला!}

1

बाझवला तिच्यायला!



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

{ओ आम्ही अंमळ गंडलो थोड्या}

2

ओ आम्ही अंमळ गंडलो थोड्या वेळ..
पण वाचुन बरे वाटले छान हो


-निखिल

{हो आम्ही पण गंडलो नाव}

3

हो आम्ही पण गंडलो नाव वाचून.....
पण हे छान आहे.

{छान आहे.}

4

छान आहे.


Hope is a good thing...

{मस्त रे निल्या !! नाही कशी}

5

मस्त रे निल्या !!

नाही कशी बझू तुला , बझते रे गीत,
परि सारे हलक्याने, आड येते ट्वीट !

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

{पाषाणभेद, निखिल, कवटी,राजे व}

6

पाषाणभेद, निखिल, कवटी,राजे व सुहास प्रतिक्रियेबद्दल अत्यंत आभारी आहे !
निखिल, अरे मला अरे तुरेच म्हणत जा.