१) त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी आपण आठवड्यातून दोन/तीन वेळा आपण हा उपाय करू शकतो. बेसन, हळद आणि दूध मिक्स करून, त्यात साधे मीठ टाकावे आणि कोणत्याही तेलाचे 5/7 थेंब टाकावे. मिश्रण एकजीव करून चेहर्याला व मानेला लावावे. पेस्ट वाळल्यानंतर 10-15 मिनिटांनी काढून टाकावी.
२) डोळ्यांभोवती क्रीम लावताना ते डोळ्यात जाणार नाही, याची काळजी घ्यावी. क्रीमचा वापर साधारणपणे रात्री झोपताना करावा.
३) डोळ्याखालची वर्तुळे घालविण्यासाठी चंदन आणि जायफळाची पेस्ट डोळ्यांभोवती रात्री लावून ठेवावी. सकाळी धुऊन टाकावे. यामुळे डोळ्यांना गारवा मिळून त्याखालील काळी वर्तुळे नाहीशी होतील.
४) सावळेपणा दूर करण्यासाठी आजकाल बाजारात अनेक प्रकारची क्रीम्स उपलब्ध आहेत. पण आपण जर घरच्या घरीच काही उपाय केले तर त्वचेचा सावळेपणा काही अंशी दूर होऊ शकतो. एक बादली पाण्यात एका लिंबाचा रस टाकावा. या पाण्याने स्नान करण्याने त्वचेची बंद रंध्रे खुलतात आणि त्वचा उजळते. हिवाळ्यात हा प्रयोग करताना गरम पाणी घ्यावे आणि उन्हाळ्यात थंड पाणी घ्यावे. सावळेपणा दूर करण्यासाठी आवळा चूर्णात थोडं पाणी मिसळून ती पेस्ट चेहर्यावर व पूर्ण शरीरावर लावावी.
५) ओठांचे सौंदर्य राखण्यासाठी ओठ काळे पडले असतील तर दुधात मीठ मिसळून लावावे. काही वेळाने स्वच्छ पाण्याने धुवून टाकावे. ओठांवर पापडी जमा होत असेल तर लोण्यात केशर मिसळून ओठांना लावावे.
६) हातापायांवरील व्रण, डाग घालवण्यासाठी लिंबाची साल त्यावर पाच ते सात मिनिटांसाठी चोळावी. हा उपाय दिवसातून दोनदा असा कमीतकमी सात दिवस तरी करावे. डाग कमी होतील.
७) चेहरयावरील सुरकुत्या घालवण्यासाठी तोंडावर सुरकुत्या पडल्या असतील तर आल्याचा रस कोमट करून तो रात्री झोपताना चेहर्यावर लावावा. सकाळी चेहरा स्वच्छ धुऊन खोबरेल तेल चोळावे. या उपायाने सुरकुत्या कमी होऊन त्वचा तेजस्वी होते.
८) कोमल त्वचेसाठी दोन चमचे दूध किंवा सायीमध्ये लिंबाचा रस पिळून त्याला तोंड आणि मानेवर थोडा वेळ लावावे, आणि थोड्या वेळाने धुऊन टाकावे. चेहर्याला ब्लीच केल्यासारखे वाटेल. त्यामुळे त्वचा कोमल आणि तजेलदार बनेल.
९) पुटकुळ्या घालविण्यासाठी कारल्याची साल चेहर्यावर चोळावी. यामुळे पुटकुळ्या, काळी वर्तुळे, काळे डाग निघण्यास मदत होईल. हा उपाय साधारणतः तीन ते पाच दिवस करून पाहावा.
१०) केसांमधील कोंडा घालविण्यासाठी आंबट दही केसांना लावावे. आंबट दही आंघोळीपूर्वी केसांना लावावे व साधारणपणे १५ ते २० मिनिटांत केस धुवून टाकावे. तसेच आपण लिंबाचा रस केसाला लावला तर कोंड्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
११) हिवाळ्यात पावलांची खूप काळजी घ्यावी लागते. त्यासाठी रात्री झोपण्याआधी थोडावेळ कोमात पाण्यात पाय बुडवून ठेवावेत व मऊ कपड्याने पुसून घ्यावे.
१२) नखांची स्वच्छता ठेवण्यासाठी गरम पाण्याने हात धुवावेत म्हणजे नखं लगेच स्वच्छ होतात. लांब नखं असतील हात धुतांना काळजी घ्यावी, कारण गरम पाण्याने हात धुतल्याने नखं मऊ होऊन तुटू शकतात.
By : Anuradha Velankar
माहितीची देवाण-घेवाण करण्याच्या हेतूने हा लेख येथे देत आहे. आपण सर्वजणी मिळून यामध्ये काही भर घालू शकतो का ते पाहू या.
माझ्या टिप्स :
१. समतोल आहार घ्या.
२. लवकर झोपा व लवकर उठा
३. जेवल्या जेवल्या झोपू नका, थोडी शतपावली करा.
४. क्रिम, कलर , केमिकल यांचा वापर कमीत कमी करा
५. नैसर्गिंक गोष्टीचा वापर आपले सौंदर्य वाढवण्यासाठी करा, जे शरीराला घातक नसतात.
६. गाजराच्या रसामध्ये दोन लहान चमचे मध घालून ते नियमित रोज घेतल्यास दृष्टी क्षमता वाढते तसेच डोळ्यांना पाणी येणे यांसारखे आजार बरे होण्यास मदत होते.
७. सर्दी, पडसे किंवा छातीत कफ झाला असेल तर दोन लहान चमचे मध तेवढय़ाच मात्रेच्या आल्याच्या रसाबरोबर नियमित घेणे तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरेल.
८. मलावरोध, हायपर अॅसिडिटी आणि स्थूलपणा घालवण्यासाठी एक चमचा मध हलक्या गरम पाण्यातील अध्र्या लिंबाच्या रसामध्ये घेणे अत्यंत उपयुक्त ठरते.
९. मध, आले आणि काळी मिरी पावडर यांच्या समप्रमाणातील मिश्रणाच्या नियमित सेवनाने दम्याच्या आजारामध्ये खात्रीलायक फरक पडतो.
१०. मध हे एक अॅन्टी ऑक्सिडंट असल्यामुळे त्याच्या सेवनामुळे त्वचा ताजीतवानी व चमकदार राहण्यास मदत होते.
११. जेवण कमी घेणे व लिक्विड आहारावर लक्ष केद्रिंत करा.
{मोलाचा सल्ला आणि बरीच माहित}
मोलाचा सल्ला
आणि बरीच माहित दिल्याबद्दल धन्यवाद
********************************************************
"When you are just about to finish your journey, LIFE changes your destination."
{उत्तम. स्त्री वर्गाला गरज}
उत्तम. स्त्री वर्गाला गरज नाही आहे असे वाटत आहे असल्या धाग्यांची
{या धाग्याचा उपयोग आजीबाईचा}
या धाग्याचा उपयोग आजीबाईचा बटवा या पध्दतीने करू या.
काही घरगुती उपाय छोट्या छोट्या आजारावर.
१. पोटात गॅस झाला असेल तर दोन लसूण पाकळ्या सोलून खाल्यास गॅस कमी होतो.
२. सारखी उचकी लागत असेल तर पाण्यात सुंठ उगाळून हुंगल्यावर थांबते किंवा थोडे आल्येचे तुकडे खावे.
३. कफ झाला असल्यास आले सोलुन एक छोटा तुकडा चघळल्यास कफ कमी होतो.
४. दात दुखत असल्यास थोडासा कापुर दाताखाली दाबून ठेवावा.
५. डोळ्याखाली काळे वर्तुळ आले असल्यास त्यावर काकडी ची फोड घासावी, नाहीतर गाजर किसून वापरावे, लगेच फरक जाणवतो.
६. नवीन चपले मुळे पायात फोड किंवा जखम झाली असे तर जांभळाच्या बिया पाण्यात उगाळून लावावे, जखम बरी होते.
७. चेहर्यावर मुरूम, फुटकळ्या मुळे डाग पडले असतील तर बटाटे उकडून थंड करावे व साली बरोबरच वाटून घ्या त्यात काकडीचा रस टाकुन थोडा लिंबाचा रस मिक्स करा व याचा लेप चेहर्यावर लावा एक तासाने चेहरा धूवून टाका, काही दिवस हा प्रयोग केल्यावर डाग जातात.
८. चेहर्यावर मुरूम, फुटकळ्या च्या डागासाठी पपईचा तुकडा कापूंन चेहर्यावर रगडावा, दहा मिनिटांनी चेहरा धुवून टाकावा, यामुळे चेहर्यावरील सुरकुत्या देखील जातात.
९. एक कप दुध आटवून, घट करावे व त्यात एक लिंबू पिळून हलवत थंड करावे व रात्री झोपताना चेहर्यावर लावून चोळावे. सकाळी चेहरा धुवून घ्या त्याने मुरूम बरी होते व चेहरा तजेलदार होतो.
१०. मसूरची डाळ बारीक वाटून दुधात मिक्स करून चेहर्यावर लावावी, दहा मिनिटांनी चेहरा धुवावा, आठवड्याभरात मरूम कमी होतात.
{ही माहिती फक्त स्त्रीयांसाठीच}
ही माहिती फक्त स्त्रीयांसाठीच आहे की आमच्या सारख्या सरळ, सज्जन, गरिब, बेचारे,असहाय्य पुरूषवर्गासाठीपण उपयोगी आहे
Hope is a good thing...
{कुजकटपणा करण्यापेक्षा योग्य}
कुजकटपणा करण्यापेक्षा योग्य ती भर घाल थोडी
{ ^}
+ १००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
{तुला काय जातं +१ करायला }
तुला काय जातं +१ करायला
लिही बघू काहीतरी या विषयावर मग समजेल.
Hope is a good thing...
{दिशा नाइ़क, खूप उत्तम माहिती}
दिशा नाइ़क,
खूप उत्तम माहिती दिली आहेत तुम्ही.
{उत्तम माहितीचा धागा.}
उत्तम माहितीचा धागा.
{छान धागा काढलाय्....यात भर}
छान धागा काढलाय्....यात भर घालायला नक्कीच आवडेल......
परिजा
******
बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)
{घाला घाला भर, स्त्री-विश्व}
घाला घाला भर, स्त्री-विश्व जिवंत कसे ठेवायचे याचे पण बघा म्हणावे वरच्या महा-कडक-लक्ष्मींना
Hope is a good thing...
{राजे, अती होत आहे.}
राजे, अती होत आहे.
{सुंदर दिसण्यासाठी खात्रीचा उपाय - }
सुंदर दिसण्यासाठी सगळ्यात सोपा आणि खात्रीचा उपाय -
adobe photoshop 7.0 free download
धुंद रवीचं बेधुंद जग
{सुंदर दिसण्यासाठी सगळ्यात}
सुंदर दिसण्यासाठी सगळ्यात सोपा आणि खात्रीचा उपाय -
adobe photoshop 7.0 free download >>>>>>>>>>>>>>>>
बन्सी को लकडी सदा समझा किये तुम पर उसके नग्मो कि धुन कहाँ सुन सके तुम!
{काय चाललय रे? कोण ती पोर दंगा}
काय चाललय रे?
कोण ती पोर दंगा करतायत??