२००४ च्या ऑक्टोबर मधली गोष्ट. सहज एकदा T.V. लावला तर शाहरुख खान! इथे जर्मनीत BBC व CNN हीच काय ती दोन सायबाच्या भाषेतली चॅनेल्स,एक फ्रेंच आणि बाकी सगळी जर्मन चॅनेल्स! शाहरुख कसा असेल? ही शंका मनात, म्हणून नीट पाहिले,तर खरंच तोच आणि ती होती K3G अर्थात 'कभी खुशी कभी गम' ह्या सिनेमाची जाहिरात!हा सिनेमा जर्मन मध्ये डब करून (नावासहित- त्याचे जर्मन नाव: guten tagen wie in schweren tagen!)RTL2 या चॅनेलवर दाखवला जाणार होता दिवाळीत,आणि त्याची जाहिरात १५ /२०दिवस आधीपासून चालू होती.मला आणि दिनेशला आमच्या मित्रमैत्रिणींचे फोन,मेल्स यायला लागले "हा सिनेमा पहायला आम्ही तुमच्या कडे येणार!"
हा काही महान सिनेमा नव्हे.कचकड्या महालातल्या श्रीमंती दुःखाला भरजरी आवरणात पेश केलेला सिनेमा! त्यातल्या कलाकारांमुळे जरा सह्य होतो इतकेच; पण इतर सिरियलमधल्या फिरंग्यांनी तो आपल्याला का आणि कित्ती,कित्ती आवडलाय हे डोळे टिपत सांगायची चढाओढच लावली आणि आमचे मित्रमंडळ आणि तमाम जनतेची उत्सुकता वाढू लागली.
शुक्रवारी रात्री ८ वाजता सिनेमा सुरू होणार तर मंडळी ७.३० वाजताच आमच्याकडे हजर!ख्रिश्चनने सिनेमा रेकॉर्ड करण्याचा फतवा काढला.मला सगळी गंमतजंमतच वाटत होती, या टुकार सिनेमाला इतके फुटेज?पण सुझनचा फोन आला की तिला येता येणार नाहीये तरी तिच्यासाठी सिनेमा रेकॉर्ड करा..यावियर (हे लोक झेवियरला यावियर म्हणतात.आणि ja= जा ला या! ) तर यावियरची "भारतीय जेवण कर ."अशी 'आर्डर' देऊन झाली.आपापल्या फर्माइशी पण यायला लागल्या. हा प्राणी पुलावावर अडून बसला होता, ख्रिश्चनला ब.वडे हवे होते तर श्वेन,रोमेन 'काहीही कर पण भरऽऽ पूर कर आणि मस्त चमचमीत कर' या गटातले होते.आमचे हे मित्र बकासुराचे अगदी सख्खे नसले तरी मावस,चुलत,आते इ,इ भाऊ आहेत त्यामुळे सकाळपासूनच माझी स्वैपाकाची धांदल सुरू होती आणि जोडीला पसारा आवरणे सुद्धा.
असा सगळा सरंजाम तयार झाला,मंडळी जमली.पूर्वी रामायण पहायला लोक TV समोर भक्तीभावाने जमायचे, हारबिर घालायचे (टीव्हीला!), रस्ते ओस पडायचे तेच दृष्य डोळ्यासमोर यायला लागलं... सिनेमा सुरू झाला. अमिताभ पासून ह्रतिक पर्यंत सगळे जर्मन बोलायला लागले आणि आमचे वीर टक लावून पहायला लागले.(आणि त्यांच्या शंकांचे निरसन करताना पुरेवाट झाली..) अमिताभ हेलीकॉप्टर मधून उतरतो तो प्रसंग चालू होता. अरेऽऽ हे लोक फारच श्रीमंत दिसतायत...तिकडे सिनेमा,इकडे एक्सपर्ट कमेंटस, जाहिरातींच्या ब्रेक मध्ये शंकानिरसन आणि गाण्यांचे इंग्रजी,जर्मनमध्ये अर्थ समजावणे (कारण संवाद डब केले होते पण गाणी हिंदीत german subtitles सहित होती) असे सिनेमा संपेस्तोवर चालू होते.
'शाहरुख जयाला खाली वाकून नमस्कार करतो.' तो खाली का वाकला? 'ग्रीट' करताना पायाशी का वाकतात?तिने त्याच्या कपाळाला काय लावलं? या सगळ्या बायकांनी कपाळाला पिअर्सिंग का केलय?मी देवातलं कुंकू आणि माझ्याकडच्या टिकल्या दाखवल्या." ह्या तर खडे वाल्या नाहीत,त्या बायकांनी जे लावलय ते वेगळं आहे.ते पिअर्सिंगच आहे.तुलाच नीट माहिती नाही."पुढचा बराच वेळ मी खडेवाल्या टिकल्या शोधण्यात घालवला,आणि जेव्हा त्या दाखवल्या तेव्हा या महाशयांची खात्री पटली.
'आलोकनाथ मरतो' तो प्रसंग.." तुमच्या धर्मात अंत्ययात्रेला पांढरे कपडे घालतात,आमच्यात काळे घालतात"अशी सांस्कृतिक देवाण घेवाणही झाली.
जेवता जेवता हात तसाच ठेवून टी.ही.वरची नजर न हटवता सिनेमा पाहणे सामुदायिकरीत्या चालू होते.काजोलला करीनापेक्षा जास्त मार्क देऊन झाले, ब्रेक मध्ये गाणी शिळेवर वाजायला लागली, चुडीदार,झब्बा पाहून "किती छान कपडे आहेत? तू असे कपडे हपिसात का नाही घालून येत?" अशी दिनेशची विकेट निघाली,आणि "पुढच्या वेळी तिकडे जाल तेव्हा असे कपडे आणा" असा आदेश आला.आमची करमणूक ही मंडळी करत होती.शेवटी अमिताभ, शाहरुख,ह्रतिक यांचे भावनिक प्रसंग आले.यावियर उठून म्हणाला "मला डॅडला फोन करावासा वाटतोय,आता मी रडेन.."मला हसूच यायला लागलं. त्यावर त्याचा ओरडाही खायला लागला.आमच्या बऱ्याच हिंदी सिनेमात रडायला 'फूल्ल स्कोप' आहे हे त्याला सांगता सांगता आणखीच हसू यायला लागलं.
यश चोप्रा,करण जोहर आणि मंडळींनी त्यानंतर इथे बॉलिवूड सिनेमांचा सिलसिलाच चालू केला.मोहब्बते,वीर-झारा,काल, कल हो ना हो,लगान,स्वदेस असा दरमहा एका सिनेमाचा जर्मन रतिब सुरू झाला.(त्यांची नावं पण जर्मनाळली.)त्यांच्या DVD दुकानातून दिसायला लागल्या. एवढेच नव्हे तर काही दिवसांनी त्यातील डीव्हीडी आमच्या मित्रांच्या घरातही दिसू लागल्या आणि तुला हवी तर घेऊन जा बघायला.. हे आणि वर!
अर्थात त्यातले बरेचसे सिनेमे 'कचकड्याच्या महालातले' ,हिंदीत पहातानाही कष्ट होणारे होते,तर जर्मन मध्ये कोण पहात बसणार?पण 'स्वदेस' मात्र जर्मन मध्येही भावला.अर्थात आता त्यातलं नाविन्य आता संपलं आहे,तरीही 'आता कोणता हिंदी सिनेमा जर्मन मध्ये येतो आहे?'याची एक उत्सुकता उगाचच असते.
खूप छान ...
>> हा काही महान सिनेमा नव्हे.कचकड्या महालातल्या श्रीमंती दुःखाला भरजरी आवरणात पेश केलेला सिनेमा
वाह !!! किती सही उपमा आहे ...
बाकी नेहमीप्रमाणेच एक नंबर लेख
जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख !
जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख ! जबरदस्त लेख !
स्वातीताई मस्त खुसखुशीत
स्वातीताई मस्त खुसखुशीत लिहिलयस
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
प्रतिसाद ...
प्रतिसाद ...अगदी "गणपा"ला साजेसा ...
हा हा हा ! सही लिहले आहेस
हा हा हा !
सही लिहले आहेस तै
मज्जा आली... बाकी भावनीक संवाद विदेशी भाषेमध्ये कसे वाट्त असतील ह्याचा विचार करतो आहे सध्या
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
हा हा हा! धमाल! शेवटी
हा हा हा! धमाल! शेवटी 'फिरंग्यांचं' अप्रुप गोर्यांनाही चुकलं नाही आहे तर!
-Nile
हे हे हे
मस्त खुसखुशीत वर्णन.
हा हा हा
सही चित्रण!! मजा आली.
गंमत आहे आपण इथे गुडबाय लेनिन इ सिनेमांबद्दल लिहायचे ते त्यांच्या माइनडोइश.नेट वर स्वदेस बद्दल लिहणार
गमतीदार लेख आवड्या!
बाय द वे पुढल्यावेळी जुना मराठी, तामिळ सिनेमा दाखवु नका बिचार्या दिनेशभावोजींना धोतर, लुंगी नेसायला लागायचे
मस्तच खुसखुशीत लेख..
मस्तच खुसखुशीत लेख..
स्वाती ताई मस्त लेख
स्वाती ताई मस्त लेख
-निखिल
मस्त लेख
मस्त लेख
कचकड्या महालातल्या श्रीमंती
कचकड्या महालातल्या श्रीमंती दुःखाला भरजरी आवरणात पेश केलेला सिनेमा
हे अगदी बरोब्बर...
चुडीदार,झब्बा पाहून "किती छान
एकदम कुरकुरीत लेखन , सॉल्लीड मजा आली वाचताना.
K3G चा एक कुठेसा वाचलेला किसा आठवला. त्यात लिहिणार्याने लिहिले होते की म्हणे हा शाहरुख हेलिक्रॉप्टर मधुन घराच्या अंगणात उतरतो आणी आत येउन आईला विचारतो की तुला कसे कळले मी आलो ते ??
हट लेका.... त्या हेलिकॅप्टर्
हट लेका.... त्या हेलिकॅप्टर् ला सायन्लेंसर लावलेला होता तुला दिसलाच नाही मग
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
हॅहॅहॅ!!
माझ्या मित्रानं टाकलेली कमेंटः
हॅलिकॉप्टर अंगणात उतरतं, शाहरुख धावत घरात शिरतो की लगेच त्याची माय दारात ओवाळायचं तबक घेऊन उभी! ह्ये म्हाराज विचारतात, "मां तुम्हे कैसे पता चला मै आ गया?"...
जयाबच्चन (मनातल्या मनात म्हणाली असेल, "भाड्या घराच्या माळवदावर ह्यालीकॉप्टर उतरवलंस..पार घरातली भांडीकुंडी पडली त्या हादर्यानं...उभ्या गावाला कळलं तू झक मारलेली..मी काय बहीरी आहे होय?) : माँ का दिल बेटे की हर आहट को भी जान जाता है.. वगैरे वगैरे वगैरे...
लै हसलो होतो!
अणि अशी दणकुन कॉमेंट ह्या बहाद्दरानं भर थेट्रात टाकलेली...
लै भारी! लै भारी! लै
लै भारी! लै भारी! लै भारी!!!!
बाकी,
दिनेश सदरा-धोतर घालून ऑफीसला चाल्लेत आणि स्वातीतै नऊवारी नेसून, डोक्याला मण्यांची टिकली (जर्मनीत मिळाल्यास नथ आणी चिंचपेटीस हरकत नाहि) त्यांना गेटपर्यंत सीऑफ करताहेत आणि बाजुचे गोरे ह्या "फॅशनेबल कपल" कडे असूयेने + उत्सूकतेने + गंमतीने पहाताहेत असे दृश्य डोळ्यासमोर तरळले
ऋषिकेश
-ऋ
हा हा हा ... सदरा-धोतर घालून
हा हा हा ... सदरा-धोतर घालून आहेच, त्याजोडीला स्वातीताई रोजच्या रोज हा नऊवारी, खड्यांची टिकली बरोबर आरतीचं ताट घेऊन ओवाळते आहे वगैरे .... पळा आता नाहीतर मार पडेल.
स्वातीताई, लेख आधी वाचला होताच. आता पुन्हा वाचला आणि पुन्हा मजा आली.
हां..तुझं बरोबर आहे!
उद्या म्हणशील, पहाटे फटफटल्यावर स्वातीताई अंगणातल्या तुळशीला पाणी घालतेय, दिनेशभाऊजी ओलेत्यानं अंगणातल्या हनुमानाला अभिषेक करताहेत हे पण अॅड करा...
च्यामारी ...
तुम्ही लेकांनो अविनाश खर्शिकराच्या वरचे आहात.
एखाद्या गोष्टीचा कल्पनाविस्तार करायचा म्हणजे किती ? त्याला काय लिमिट्स ?
उद्या ह्या घोळात मला स्वातीताईच्या दाराशी भिक्षा मागणारा भिकबाळीधारी मुंजा म्हणुन उभे करताल किंवा गेलाबाजार पर्वचा घोकणारा किंबा "भॄभुत" चालवणारा एखादा लहन पोरगा म्हणुन उभे करताल.
आवरा ...
असो, स्वातीताई, लेख आधीही वाचला होता पण त्यावेळी जर्मन्स पाहिले नव्हते.
आता पुनर्प्रत्यायाचा झकास आनंद मिळाला.
सुरेख लेख, अजुन येऊदेत !
हा हा हा...
अरेऽऽ....
इतका दंगा? तेही K3Gवरुन? धन्य आहेत जर्मन्स. 
काय अशक्य आहे पब्लिक!
अगाबाब्बो..... स्वातीताई, मग त्याला अलका बुकलचे शिणुमे दाखवले तर काय होईल गं? डायरेक्ट अॅडमिटच करावं लागेल

जर्मन भाषेत "हा काय यडाय क्काय?" हे कसं म्हणतात गं? नक्की तिथलं पब्लिक शिणुमा बघुन झाल्यावर ह्याच अर्थाचं काहीतरी म्हणत असणार ना?
आयला,
हा अनुभव लैच्च भारी आहे राव.
+१
काहीही असो आपल्या संस्कृतीचं
काहीही असो आपल्या संस्कृतीचं ते लोक स्वागत करतायेत अन आपण?
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
तुम्हाला नक्की असे वाटत आहे
तुम्हाला नक्की असे वाटत आहे की ही आपली संस्कृती आहे
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
एकदम खरं
राजे,
एक्दम खरा बोललात.
मस्त
मस्त लेख. खुसखुशीत झालाय
मस्तच अनुभव स्वातीताई!
'काबी कुशी काबी गम'! असा अमेरिकन उच्चार आहे त्याचा!
बाकी झब्बा - धोतर (आणि पायात कोलापुरी!
) घातलेले दिनेश भाऊजी खांद्याला ल्यापटॉप अडकवून निघालेत आणि नऊवारी, नथ, छानसा अंबाडा त्यावर गजरा, हातात हिरवा चुडा असं सगळं केलेली स्वातीताई त्यांना निरोप देत्येय असं डोळ्यांस्मोर आलं!!!

(कभी रंगा कभी दंगा)चतुरंग
(कभी रंगा कभी दंगा) लै
लै लै लै आवडलं हे!
झब्बा-धोतर, कोल्हापुरी आणि शबनममधे ल्यापटॉप का लेदरच्या ब्यागेत ....
(उगाच खुस्पट) अदिती
झब्बा-धोतर,
झब्बा-धोतर, कोल्हापुरी आणि शबनममधे ल्यापटॉप का लेदरच्या ब्यागेत ....
हॅ हॅ हॅ ते प्रत्येकाची जाण, समज, आकलन, आवड, इ. इ....वर अवलंबून आहे
क आणि ह आणि र!
क आणि ह आणि र!
मस्त लेख आहे स्वातीताई
मस्त लेख आहे स्वातीताई
हाउस फुल्ल!
कखुकग बॉक्स ऑफिसवर असा हिट होईल असं वाटलं नव्हत ,
शिनूमा पाहिला आलेल्या सर्वांना धन्यवाद,
स्वाती
अनुभव खरोखर मनापासून आवडला.
अनुभव खरोखर मनापासून आवडला.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
सहीच
जबरदस्त आहे एकदम!!