परभाषिक - साहित्य, लेखक आणि इतर

0
0
आपल वाचन

आपण सगळेच काहीना काही वाचतो. अगदी काही न वाचणारे लोक देखील किमान रस्त्यावरच्या जाहीराती तरी अनिच्छेने का होइना वाचतातच. इथे अनेक वाचनखोर © (wink) लोक आहेत आणि वेळोवेळी त्यांच्या व्यासंगाचा प्रत्यय आपल्याला येतच असतो. अनेकदा वाचक आपण वाचलेल्या साहित्याची ओळख करून देतात, बरेचदा नुसतीच आश्वासन देतात. ते एक असो.

मुद्दा तो नाही.

मुद्दा असा आहे की, आपण जे काही वाचतो ते प्रामुख्यान मराठी आणि नंतर इंग्रजी अस असत. याव्यतिरिक्त तिसर्‍या भाषेतील साहित्य वाचणारे काही सहसा पाहण्यात येत नाहीत. किंवा वाचत असले तरी त्यावर जालावरच नव्हे तर इतरत्रही कधी चर्चा होत नाही. परभाषिक चित्रपटांवर थोडीफार चर्चा होताना दिसते पण परभाषिक, भारतीय असो वा अभारतीय, साहित्यावर (लेखन हो) मात्र तेवढ लक्ष जात नाही.

मला फार पूर्वीपासून अस वाटत आलय की त्यामुळे आपल विश्व फारच मर्यादित होत. अगदी साध हिंदीच उदाहरण घेतल तरी त्यातल्या एकाही लेखकाच नाव मला तरी सांगता येणार नाही, एक हरिवंशराय बच्चन सोडले तर.

मराठीत उपलब्ध असणारी भाषांतरे बहुतांश इंग्रजी पुस्तकांची आहेत, त्यानंतर बहुतेक कन्नड आणि थोडफार बंगाली असावीत. रशियन साहित्य थोड फार उपलब्ध आहेस दिसत पण ते रशियन - मराठी आहे का रशियन - इंग्रजी - मराठी आहे माहीत नाही, पण दुसर असण्याची शक्यताच जास्त वाटते.

अस का झालं असाव बर? तुमचही निरिक्षण काय सांगत?

आता मूळ मुद्दा

जग एवढ मोठ्ठ आहे, प्रत्येक छोट्या छोट्या भागाचा स्वत:चा स्वतंत्र इतिहास आहे, वर्तमान आहे. आपण (पक्षी मी) फक्त मराठीत व्यक्त होणार्‍या भावविश्वाशी ओळख ठेवून आहोत. पण मला नेहमीच कुतूहल वाटत आल आहे की आत्ता जगातल्या वेगवेगळ्या ठीकाणी काय काय चाललय. त्यांच्या संस्कृतीतील ठळक गोष्टी कोणत्या वगैरे वगैरे. आपला भला मोठ्ठा शेजारी चीन, त्याचे लोक, त्यांचा इतिहास, तिथल साहित्यविश्व यांच्यामधे काय चाललय. इंग्रजी माध्यमातून येणारी माहीती नेहमीच त्यांच्या चष्म्यातून असते (ती तशी नसण्याच काहीच कारण नाही तरीपण). आणि बरीच मर्यादीत असते.

मराठी माणूस जगभर पसरला आहे. आपले इथले लोकच इतक्या वेगवेगळ्या देशांमधे आहेत.

तर अशा परदेशांमधे असणार्‍या तुमच्यापैकी, आता परदेश म्हणजे मराठी न बोलणारा तो परदेश अशा अर्थी, किंवा महाराष्ट्रात असणार्‍यांपैकीदेखील ज्यांचा वेगवेगळ्या भाषांमधल्या साहित्याशी संबंध आला असेल त्यांनी इथे त्याची ओळख, त्या भाषेतल्या प्रमुख साहित्यिकांची ओळख करून दिली तर आपण मराठीत एका चांगल्या उपक्रमाची सुरुवात करु शकू.

जर पुरेस साहित्य उपलब्ध होणार असेल तर इथेच एखादा परभाषी किंवा तसाच काहीसा विभाग देखील चालू करायला मालकांना सांगू.

बोला, काय म्हणता?

__________________________________________________________________________________________________

(वाचनखोर © - नाना फडणवीस)

{बाप रे }

1

अवघड आहे. आपण तर फक्त मराठी, हिंदी नि इंग्रजी तीनच भाषेतील साहित्य वाचू शकतो.

अवांतरः सहज असं वाटलं की साहित्यापाशीच का थांबावे, परभाषिक चित्रपटांबद्दलही लिहिले तर चालेल का?


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{का नाही?}

2

परभाषिक चित्रपटांबद्दलही लिहिले तर चालेल का?
का नाही? (चक्क आम्हाला विचारताय? )

हे तर लिहाच, वाट पाहतो आहे.

पण ज्या लोकांना इतरही भाषा येतात अशा लोकांना लिहीतं करता येइल काय?
युरोपातील सदस्यांना तिथल्या भाषा येत असण्याची दाट शक्यता आहे, तिथल्या व्यवस्थेमुळे.

आपल्याकडील इतर भाषा येत असणारे लोक असतीलच की. पाहू प्रयत्न करून.
(विजुभाऊंपासून सुरुवात करु त्यांना बहुतेक गुजराती वाचता येत)

{महत्त्वाचा मुद्दा आहे. मी}

3

महत्त्वाचा मुद्दा आहे.
मी हिंदी मध्ये अमृता प्रीतम, प्रेमचंद, हरिवंशराय बच्चन, अखिलेश मिश्र, काका हाथरसी व थोडे फार तरुण विजय यांचे लेखन वाचले आहे.
पण यापुढे जाऊन इतर भाषेतील वाचावे तर भाषेची मुख्य अडचण येते.


Hope is a good thing...

{भाषाभाषातील जवळीक}

4

श्री.सातारकर यांचा नेमका मुद्दा मला समजला नाही. म्हणजे असे की, त्याना असे अभिप्रेत आहे असे वाटते जसे उदाहरणार्थ 'श्री.राजकुमार जैन' या व्यक्तीने मल्याळी भाषा शिकलेली आहे आणि त्यामुळे त्यानी थेट नायर, कुरुप, पिल्लई आदी थोर लेखकांच्या समग्र साहित्याचे वाचन, पारायण केले आहे, तेव्हा आता श्री.जैन यानी त्या भाषेतील साहित्याविषयी इथे विचार मांडावेत.

हाच नियम मग अन्य भारतीय भाषांसाठी [म्हणजे त्या त्या भाषेचे ज्ञान अवगत करूनच] लागू होणार का ?

मला वाटते तसा समज असेल तर मग ती बाब फार अप्राप्य वाटेल. असे बहुभाषीक होण्यासाठी अगदी लहानपणापासून तयारी असली पाहिजे. सीमाभागातील मराठी माणसाला थोडे थोडे कन्नड येते याचा अर्थ असा बिलकुल होणार नाही की त्याला त्या भाषेतील वाङ्मयाची सखोल जाण येईल. 'कामचलावू' आणि 'सखोल' ज्ञान यात खूप अंतर असते. सरकारी नोकरीतील फिरतीमुळे माझ्या एका सीनिअर मित्राला दक्षिणेकडील सहासात भाषा अवगत आहेत, पण त्या भाषेतील तो वर्तमानपत्रही वाचू शकत नाही, कारण लिप्याबाबत शून्य ज्ञान. सारे काही बोली आणि मुद्राभिनयातून तो त्या चार राज्यात लिलया हिंडतो-फिरतो.

लिखित स्वरूपाच्या भाषाभाषातील हाच भेद दूर करण्यासाठी भारत सरकारने 'साहित्य अकादमी' ची स्थापना केली आहे. अकादमीतर्फे घटनेतील मान्यताप्राप्त भाषांतील साहित्यांना जी पारितोषिके प्रतिवर्षी प्रदान केली जातात, त्या सर्व कलाकृतींचे अकादमीतर्फेच इंग्रजी आणि हिंदी या भाषात प्रामुख्याने अनुवाद केले जातात. अन्य प्रादेशिक भाषांतूनही त्या दर्जाचे भाषांतरकार मिळाले तर अकादमी त्या लेखकावर त्याच्या भाषेत त्या पारितोषिकप्राप्त कलाकृतीच्या अनुवादाचे कामे सोपविते.

रविन्द्रनाथ टागोरांच्या 'गीतांजली' ला नोबेल मिळाले त्याचा इंग्रजी अनुवाद त्या 'रिव्ह्यू कमिटी' तील सदस्यांकडे गेल्यानंतरच. तिच गोष्ट टॉलस्टॉयच्या 'वॉर अ‍ॅण्ड पीस' ची. या भव्य कादंबरीची जगाला महती कळाली ज्यावेळी ती इंग्रजी भाषेमधून जगातील वाचकांपर्यंत पोचली त्यावेळी.

~ वेल. तरीही या निमित्ताने श्री.सातारकर यांच्या अनोख्या कल्पनेतून प्रकट झालेल्या साहित्यप्रेमाला दाद दिलीच पाहिजे.

{परभाषेचे ज्ञान आणी परभाषेतील}

5

परभाषेचे ज्ञान आणी परभाषेतील साहित्याचे ज्ञान (अथवा इतर कला) यात फरक आहे..

पण तरीही, परभाषेतील मराठीत किंवा इंग्रजीत भाषांतरीत झालेले साहित्यही फार नजरेस पडत नाही हे चिंताजनक आहे

{मूळ मुद्दा}

6
पाटील

श्री.सातारकर यांचा नेमका मुद्दा मला समजला नाही. म्हणजे असे की, त्याना असे अभिप्रेत आहे असे वाटते जसे उदाहरणार्थ 'श्री.राजकुमार जैन' या व्यक्तीने मल्याळी भाषा शिकलेली आहे आणि त्यामुळे त्यानी थेट नायर, कुरुप, पिल्लई आदी थोर लेखकांच्या समग्र साहित्याचे वाचन, पारायण केले आहे, तेव्हा आता श्री.जैन यानी त्या भाषेतील साहित्याविषयी इथे विचार मांडावेत.

हाच नियम मग अन्य भारतीय भाषांसाठी [म्हणजे त्या त्या भाषेचे ज्ञान अवगत करूनच] लागू होणार का ?

हो. अगदी असच. तुम्ही मला जे म्हणायच आहे ते अचूकरित्या मांडल आहे.

पण

हे पहिल्या घासात अपेक्षित नाही.

सुरुवातीला अगदी नुसती तोंडओळखच झाली तरी चांगलच आहे. इथे मुळात त्या भाषेच ज्ञान सर्वांना होण अपेक्षीत नसून, साहित्य / कला आणि अशाच भाषेच्या माध्यमातून व्यक्त होणार्‍या गोष्टी यांच ज्ञान होण अपेक्षीत आहे. जेणेकरून आपल्या मातृभाषेत जास्तीत जास्त माहीती उपलब्ध होइल.

प्रथम प्रथम त्या त्या व्यक्तींनी वाचलेले, पाहीलेल जरी मराठीत सांगितल तरी चांगली सुरुवात होइल. इतरांना "तिकडे" काय काय असू शकत याची कल्पना येइल. आपल्याला तिथले प्रमुख साहित्यकार (चित्रपट साहित्य या वर्गात बसवावेत काय?) आणि साहित्य यांची नुसती नावच माहीत होतील. कालांतरान खोलात जाउन वेगळ्या संकल्पना, संदर्भ वाढत जाउन आपण एकूणच समृद्ध होत जाउ, अस वाटत.

जर ही योजना अशीच पुढ गेली तर अनेक भाषांच, संस्कृतींच साहित्य आणि इतर माहीती मराठीत येइल. त्याहीपुढे जाउन कधीतरी मराठी जागतिक भाषा बनण्याच्या दृष्टीन ही गोष्ट उपयोगी ठरेल अशी स्वप्न बघायला आणि एक एक पाउल टाकायला काय हरकत आहे?

{>>जर ही योजना अशीच पुढ गेली}

7

>>जर ही योजना अशीच पुढ गेली तर अनेक भाषांच, संस्कृतींच साहित्य आणि इतर माहीती मराठीत येइल. त्याहीपुढे जाउन कधीतरी मराठी जागतिक भाषा बनण्याच्या दृष्टीन ही गोष्ट उपयोगी ठरेल अशी स्वप्न बघायला आणि एक एक पाउल टाकायला काय हरकत आहे?

+१

असेच म्हणतो.


Hope is a good thing...

{कॉ पी राईट बद्दल}

8

"वाचन खोर" कोणास म्हण्तात?

{ह्यॅ:}

9

खोर्‍याने वाचतो तो वाचनखोर... यवडं शिंपल समजंना व्हय.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{भाषेशिवाय}

10

भाषेशिवाय व्यक्ती विचार करू शकते का व भावना महसूस करू शकते का हा मला अनेक वर्षे पडलेला प्रश्न आहे? भावना महसूस करू शकत असेल पण विचार .... ?

(च्यायला प्रश्न प्रश्न प्रश्न...)

त्याचबरोबर शब्दाचा अर्थ, उप-अर्थ (connotation?), context-free Vs. context sensitive अर्थ वगैरे आहेतच छळायला बसलेले.

बोली भाषेसाठी सुद्धा एखादी मार्कप लँग्वेज असती तर XSLT वापरून ...... (जाऊदे.)

---------------------

सातारकर, तुमची कल्पना उत्तम आहे.

आमचे एक तेलुगु साहेब चेन्नईत जन्मले व वाढले. त्यांनी तिरुवल्लुर या तमिळ कवीने लिहिलेल्या अनेक कविता (दोन ओळींच्या) ... भाषांतरित करून सांगितल्या होत्या. उदा. धोतर सुटायला लागले की आपला हात आपोआप पटकन ते सावरायला जातो. त्याचप्रमाणे मित्र आपसुक संकटसमयी मदतीस धावतो.

यातील अनेक कविता (तिरुकुरल) इथे वाचायला मिळतील.

http://twitter.com/#!/ThirukuralADay

तिरुकुरल चे आयफोन अ‍ॅप पण आहे म्हणे.


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

{भाषेशिवाय विचार करता यायला हवा...}

11
@ गब्बर सिंग

भाषेशिवाय विचार करता यायला हवा (येत असावा या अर्थी) असं वाटत. आपण मनात* असंख्य गोष्टी बघतो, तिथ त्या गोष्टींच वर्णन करायला शब्द नसतात.

भाषेची भानगड आपला विचार दुसर्‍याला सांगण्याच्या (to convey) करण्याच्या गरजेतून निर्माण झाली असावी. आणि मग उत्क्रांती होत होत भावनांचा ल.सा.वि. काढला जात जात सर्व संमत (खर तर बहुसंमत) भाषा तयार झाली असावी. म्हणूनच कित्येकदा आपण बोलतो एक आणि समोरचा दुसरच समजतो. अगदी एकही अक्षर न बदलता एकच वाक्य दोघांना सांगितल तरी त्याचा वेगवेगळा अर्थ काढला जातो.

दोनोळी भारी आहे. तिरुवल्लुवरांच नाव इतिहासाच्या पुस्तकात वाचल्याच आठवतय, पण ते बहुतेक संत म्हणून, असो.

*(म्हणजे कुठे ते विचारू नका)

@ नाना फडणवीस

तुम्हीच सांगा.
आम्ही त्याचा अर्थ खोर्‍यान वाचणारे असा घेतला आहे. wink

{सातार्‍यातील प्रत्येकास आमचा खास सलाम.}

12

सातार्‍यातील प्रत्येकास आमचा खास सलाम.


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

{कळ्ळल नाही}

13

कवीला काय म्हणायच आहे कळ्ळ नाही...