सर्व प्रथम मी मराठीला माझ्या शुभेछा!!
लेखन वगैरे करण तसा माझा प्रांत नाही आहे, तरी पण खालील कथा तुम्ही बहुतेकांनी वाचली असेल.. व्यवस्थापकाला पुर्ण अधीकार लेख रद्द करण्यास... हा लेख माझ्या मनाला खुप चटका लावुन गेला आहे...म्हणुन टंकते आहे...
आज शिकारीचा पाचवा दिवस होता. संध्याकाळी कंदील, धनुष्यबाण घेउन मी जंगलाकडे वाट्चाल करु लागलो. माझे पाय परत त्या गावाजवळील झुडुपाच्या कडेला उभ्या हरणाला पाहुन स्थिरावले. त्या हरणावर मी धनुष्यबाणाने नेम धरला. पण मी जसे त्याच्या डोळ्यात पाहीले, त्याच क्षणी माझ्या हातातला धनुष्यबाण निखळलेला, गेले चार दिवस माझ्या बाबतीत हेच घड्त होतं. रोज संध्याकाळी मी शिकारीला बाहेर पडत होतो, रोज ते हरिण त्या ठिकाणी उभं असायचं, रोज हरणावर लक्ष केंद्रित करायचो व त्याच्या डोळ्यांमधला करुण् भाव रोज माझा धनुष्यबाण निखळवायचा.
हे माझ्या बाबतीत का घडतय ह्या विचाराने मी अस्वस्थ झालो होतो. म्हणुन मी त्या आदिवासी गावातील एका ओळखीच्या व्यक्तीस विचारले असता त्याने सांगिनतले की, हे हरिण रोज वाजत असलेले ढोल एकण्यासाठी रोज त्या वेळी त्या ठिकाणी येतो.
त्याच्य ह्या उत्तराने माझे समाधान नाही झाले. कारण हवेच्या एखाद्या लहानशा झुळुकीने उडणार्या पानाच्या आवाजाला घाबरुन पळुन जाणारं हरिण ढोल एकायला येतं, हे त्या माणसाचे उत्तर मला पटले नाही. अशा भांबावलेल्या स्थितीत मला पाहताच तो माणुस म्हणाला, 'साहेब,खरं सांगु का, हे हरिण आम्ही वाजवत असलेलं ढोल पाहण्यासाठीच येतं, त्याच्यातील हे साहस व त्याच्या डोळ्यातील ह्या करुणेचे कारण एकच आहे...
ह्या ढोलावरील कातडे आहे त्याच्या जिवन साथीचं'
सुंदर...
सुंदर कथा किर्ती..
अगदी मनाला हळवे केले तुझ्या कथेने.
असेच
असेच म्हणतो, मला वाटते लहानपणी चंपक मध्ये वाचली होती ही कथा.
मनाला चटका
मनाला चटका लावून गेले.
संकेतस्थळ
संकेतस्थळावर काय लिहावे काय नाही हा सर्वस्वी सदस्यांचा निर्णय आहे, काही जागी व्यवस्थापन लेखन ठेवणे/नठेवणे ह्याचा निर्णय घेईल, ते देखील इतर सदस्यांचे मत लक्षात घेता.
तरी ही लेखन नष्ट करावे लागावे असे लेखन करु नये ही विनंती.
व्यवस्थापक
***************
सुंदर कथा...
सही
सही !!!
छोटीशी पण उत्तम कथा !!
+१
छान कथा. आवडली.
छान
आधी वाचली होती कुठेतरी. भावस्पर्षी आहे..
--मधु मलुष्टे
खरंच
खरंच भावस्पर्षी कथा.. छान आहे, अश्याच लहान लहान कथा अजुन लिहा.
खरच
मस्त.........
धन्यवाद!!!
तुमच्या सर्वांचे मी मला प्रोत्साहन दिल्या बद्दल आभार मानते....
सहज सुंदर
सहज सुंदर कथा.
छान लिहली आहे, अवड्ली.
सुंदर कथा.
सुंदर कथा. आधी वाचली होती पण पुन्हा एकदा वाचायाल आवडली.
असेच म्हणते....
असेच म्हणते....
Excellent
Kharach khupach chhan aahe katha ya aadhi wachali navati.
Pan yawarun ek lakshat yet ki mansa sarkhach kholwar prem he jivahi kartat
खूप छान...
आधी वाचली होती पण ढोलावरील कातडे आहे त्याच्या आईचं असं वाचलेलं आठवतयं