सुफी गीते...
सुफी हा इस्लाम धर्मातला एक पंथ आहे. त्यांची तत्वे परंपरागत इस्लाम धर्मापेक्षा खूप वेगळी आहेत. त्यामुळे हा पंथ मूळ इस्लाम धर्मापासून थोडासा तुटलेला आहे. अजमेरचे ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती हे महान सुफी संत होऊन गेले. आजही अजमेरला त्यांच्या दर्ग्यावर सर्वधर्मींयांची रीघ लागलेली दिसून येते. सुफी पंथात ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तींसारखे अनेक महान संत होऊन गेले.
या सर्व संतांनी समाजाला दिलेली अनमोल देणगी म्हणजे त्यांच्या गीतरचना! ईश्वराला आळवण्यासाठी त्यांनी अनेक चांगल्या चांगल्या रचना रचल्या, जसे आपल्या हिंदू संतांनी अभंग रचलेत. आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक गाण्यांमधे त्यांच्या गीतांचा वापर केला गेलेला आहे. काहीही असो, कुणीही लिहिलेली असोत,पण ही गीते कानाला खूप सुमधुर वाटतात. ही गीते ऐकतांना मनावर एक धुंदी चढते आणि गाणं संपल्यावरही ही धुंदी कित्येक तास मनावर असते. उदाहरणादाखल खालील गीते बघा... नक्कीच ही तुमची आवडती गीते असतील.
१) मौला मेरे मौला
२) ख्वाजा मेरे ख्वाजा दिल मे समा जा
३) पिया हाजी अली
४) तेरी दिवानी
५) आफ़्रीन आफ़्रीन
६) दमा दम मस्त कलंदर
७) धागे तोड लाओ चांदनी से नूर के
८) बुल्ला की जाना मै कोन
९) मै जहाँ रहू... मै कहीभी हूँ
१०) अल्ला के बंदे हस दे
११) ओ रे पिया
१२) लागी तुमसे मन की लगन...
१३) जिया धडक धडक जाये
१४) रूठे यार नु मना ले
१५) छन से जो टूटे कोई सपना
१६) झुले झुले लाल
१७) किन्ना सोना तेनु रब ने बनाया
१८) आज मेरा जी करदा
१९) लंबी जुदाई
अजूनही बरीच गाणी आहेत. मला कधीकधी खूप उदास वाटत असलं की मी ही गाणी ऐकतो, मन अगदी प्रसन्न होऊन जातं. तुम्हीही अनुभव घेऊन बघा!

{राहत फते अली खान ची,... लागी}
राहत फते अली खान ची,... लागी तुमसे मन की लगन... आणि ....जिया धडक धडक जाये... ही दोन्ही गाणी सुंदर आहेत
.ऒल टाईम फ़ेव्हरीट ..कितिही वेळा ऎका, समाधान होत नाही.पण ही सुफ़ी संगितावर आधारलेली प्रेमगीते आहेत .सुफ़ी संगीत म्हणजे भक्तीसंगीताचा प्रकार असावा असे वाटते.असो .चांगल्या गीतांची ओळख करून दिल्याबद्दल आदित्य चंद्रशेखर यांना धन्यवाद.
..............................................................
क्या फर्क पडता है?
{धन्यवाद!}
धन्यवाद निवांत पोपट!
माझी अनुदिनी....
{अप्रतिम धागा. अश्याच}
अप्रतिम धागा.
अश्याच प्रकारच्या गाण्यांचे येथे संकलन होऊन जाऊ दे.
something terribly wrong with this country, isn't there?
{धन्यवाद मालक!}
धन्यवाद मालक! प्रत्येकाने आपल्याला माहित असलेले गाणे दुव्यासकट इथे जोडलं तर नक्कीच भर पडेल.
माझी अनुदिनी....
{बहुतेक सर्वच गाणी आवडती आहेत.}
बहुतेक सर्वच गाणी आवडती आहेत.
जसे आपले संत देवाला माऊलीच्या रुपात पहायचे तसे सुफी संत प्रेयसीच्या असं मागे कुठेच वाचलं/ऐकलं होत.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{चुकीची माहीती तौबा ! तौबा ! तौबा}
गणपाभाऊ,
सुफी संत देवाला प्रेयसी नव्हे गुरुच्या रुपात पहायचे
~ वाहीदा
{असंच काहीतरी }
असंच काहीतरी मीपण ऐकलं होतं.
माझी अनुदिनी....
{क्षमा असावी}
क्षमा असावी आमच्या अज्ञाना बद्दल.
शब्द मागे घेतो.
पण खाली दिलेल्या दुव्यातील गाण्याच्या निरुपणा मुळे हा समज झाला होता हे ही नमुद करतो.
(५२ ते ५९ सेंकदा दरम्यान हे ऐकता येईल.)
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{सुफीयानाकलाम(मराठी?) अन सुफीमौसीकी (संगीत) यात फरक आहे }
हल्लीची गाणी सुफीसंगीत वापरुन स्वरबध्द केली जातात सर्वांनाच सुफी कलाम समजेल असे नाही
सुफी कलाम वापरलेले नाही
अन हे ही सांगू इच्छिते की सुफीईसम हे इस्लामचाच भाग आहे. त्यांची तत्वे इस्लाम धर्मापेक्षा वेगळी नाहीत त्यात कडवटणा कुठे ही नाही
"sufi" is a second-century name applied to a type of Muslim earlier known as "zahid."
Some definitions of sufism: tasawwuf:
Purification of the self from all that is other than the remembrance and obedience of Allah; the realization of ihsân (excellence); zuhd (asceticism) combined with ma`rifa (knowledge of Allah); the attribute of the Sufi. Ceasing objection (al-Su`luki); Abandoning the world and its people (Ibn Sam`un).
सध्या फक्त सुफीयाना संगीताचा आनंद घ्या , सुफी कलाम समजले तर पहा
{धन्यवाद!}
धन्यवाद वाहीदा, माझा वर लिहिलेला गैरसमज दूर झाला. काहीही असलं तरी सुफी संगीत अतिशय उत्कृष्ट आहे यात वादच नाही.
माझी अनुदिनी....
{वाह मस्त !! मला आवडलेली काही}
वाह मस्त !!
मला आवडलेली काही गाणी -
सजदा (माय नेम ईज खान - चित्रपट टुकार होता पण सुफी गाणी मस्त आहेत)
एकतारा... - (वेक अप सिद)
एहसान इतना ... - दिल कब्बडी !!
मितवा... - कभी अलविदा ना केहना !!
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!
मन उधाण वार्याचे…
{माय नेम ईज खान - चित्रपट}
माय नेम ईज खान - चित्रपट टुकार होता पण सुफी गाणी मस्त आहेत
+१
something terribly wrong with this country, isn't there?
{हे राहिलं..... जिंदगी ये सफर}
हे राहिलं..... जिंदगी ये सफर मैं
:)
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!
मन उधाण वार्याचे…
{खालील गाणे सुफी संगीत आहे काय}
खालील गाणे सुफी संगीत आहे काय ते माहीत नाही.असावे असा अंदाज आहे.
..............................................................
क्या फर्क पडता है?
{सगळी माझी आवडती गाणी आहेत आणि}
सगळी माझी आवडती गाणी आहेत आणि तुम्ही म्हणता ते खरं आहे. सुफी गाणी तुम्ही केव्हाही ऐकू शकता. पण जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा ही गाणी अजिबात तुम्हाला तुमचा एकटेपना जाणवू देत नाहीत. एक वेगळ्याचप्रकारचा सुकुन आहे ह्या गाण्यांमध्ये.
एक नविन collection करता येईल जर सगळ्यांनी हा धागा आपापल्या परीने वाढवला तर. इतका छान धागा काढल्याबद्दल तुम्हाला
परिजा
******
बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)
{धन्यवाद!}
धन्यवाद परिजा, मला नेमकं असंच म्हणायचं होतं.
माझी अनुदिनी....
{मस्त}
गाणी मस्त आणि आवडणारी आहेत
{धन्यवाद!}
सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद!
माझी अनुदिनी....
{अरेच्या}
अजून इथे आबेदा परवीनचा उल्लेख नाही? आश्चर्य आहे. खिळवून ठेवणार्या अलौकिक पहाडी आवाजाच्या या गायिकेचे अनेक अप्रतिम अल्बम आहेत सूफी क़लाम गायलेले. यात कबीर, बुले शाह, अमीर खुस्रो, साँग्स ऑफ मिस्टिक्स (दोन भागात) असे अनेक संग्रहणीय अल्बम्स उपलब्ध आहेत.
त्यांनी गायलेले बाबा बुलेशाह यांचे काही क़लाम
रक्स-ए-बिस्मिल
Abida Perveen शोधा तूनळीवर, भरपूर गाणी आहेत. पुणेकरांसाठी खास ऑफर, आमच्याकडून हवी ती गाणी घेऊन जाणे.
Every 'ism' is euphemism, every religion a contagion.
{खिळवून ठेवणार्या अलौकिक}
खिळवून ठेवणार्या अलौकिक पहाडी आवाजाच्या या गायिकेचे अनेक अप्रतिम अल्बम आहेत सूफी क़लाम गायलेले.
+१
सगळीच गाणी उत्तम आहेत.
{आबेदा परवीनचं नाव}
आबेदा परवीनचं नाव ऐकलं होतं, पण गाणे कधी ऐकले नव्हते. अधिक माहीतीबद्दल धन्यवाद! मला आबेदा परवीनच्या गाण्यांचं कलेक्शन हवं आहे.
माझी अनुदिनी....
{वाह... काय आवाज आहे प्रथम}
वाह...
काय आवाज आहे प्रथम त्यांची गाणी ऐकली छान वाटली.
धन्यु धन्यु मालक!
नवीन काहीतरी ऐकाला मिळाले
something terribly wrong with this country, isn't there?
{ह्म्म!!! अबिदा परवीनच}
ह्म्म!!! अबिदा परवीनच collection कोणाकडे असेल तर दुवा द्या. त्यांच्याविषयी थोडसं :The uncrowned Sufi Queen
{आबिदा परवीन निश्चितच!}
आबिदा परवीन यांची गुलजारच्या निवेदनासहित 'कबीर बाय आबिदा' माझ्याकडे आहे. 'विरूध'* चित्रपटात पार्श्वसंगीत म्हणून यातले काही तुकडे वापरले आहेत. म्युझिकइंडीयाऑनलाईन किंवा तत्सम संस्थळांवर ही गाणी ऐकून संधी मिळाल्यावर सीडीच घेतली. त्यातलंच एक भला हुआ मेरी मटकी शब्द, अर्थ, आबिदाचा आवाज, संगीत ... सगळंच सुंदर आहे.
इतर तीन:
ही सुद्धा तेवढीच सुंदर आहेत.
याच अल्बममधे गुलजार एका ठिकाणी निवेदनात म्हणतात, "नशे एकहरी ही अच्छे होते है। एक कबीर उपर आबिदा परवीन।...." ही गाणी गेली सहा-एक वर्ष अगदी नियमितपणे (सुरूवातीचं वर्षभर रोजच आणि त्यानंतर निदान आठवड्यांतून एकदा) ऐकते आहे, तेव्हा नशा म्हणजे गुलजारना नक्की काय म्हणायचं आहे हे मला नक्कीच समजलं आहे.
आमीर खुस्रो यांचा कलाम, आबिदाच्याच आवाजातलं 'छाप तिलक' मला भयंकर भयंकर आवडतं. नुसरतबद्दलही काय बोलावं! त्याच्या आवाजातलं, त्याच्या पद्धतीचं इथे आहे; ते ही (आबिदा एवढं नाही तरी) आवडतं. रिचा शर्मा यांच्या आवाजातलं इथे आहे. तिचा आवाज मला आवडतो, एकूण गाणंही आवडतं. पण हे विशिष्ट गाणं (rendering) फिल्मी किंवा नृत्यासाठी म्हटल्यासारखं वाटतं. आबिदाच्या आवाजातच मला शुद्ध काय ते वाटतं.
कैलाश खेरची गाणी किती शुद्ध सूफी असतात हे मला माहित नाही. पण प्रेयसी, प्रेमातून परमात्म्याचा शोध अशा काही प्रकारची त्याची गाणी अर्थातच असतात. उदा: सैय्या** गाण्यातले शेवटी येणारे हे शब्दः
ये नरम नरम नशा है बढता जाये
कोई प्यार से घुंघटीयां देता उठाये
अब बावरा हुआ मन
जग हो गया है रौशन
ये नयी नयी सुहागन
हो गयी है तेरी जोगन
कोई प्रेम की पुजारन
मंदीर सजाये ... सैया
साधारण त्याचं संगीतही सूफी प्रकारचं वाटतं. 'कैलासा'मधली गाणी आणि 'तेरी दीवानी' तशी प्रसिद्ध असल्यामुळे सगळ्यांना माहित असतील आणि शोधता येतील असं समजून जाते.
कविता सेठ, रिचा शर्मा यांची सगळी गाणी नाही आवडली तरी मधूनमधून आवडतात. धाग्यात उल्लेख केलेलं 'इकतारा' मला शब्दांमुळेही आवडतं.
या सगळ्या गायकांची अनेक गाणी यूट्यूबवर आहेत. ऐका आणि आपापल्या आवडीप्रमाणे सीड्या घ्या.
*चित्रपट तसा काही वर्षांपूर्वी आलेला आणि पडेल आहे.
**चित्रीकरण अगदी भिकार आहे, हवंतर व्हीडीओ बंद करा, डोळे बंद करा किंवा या फीतीची ऑडीओ क्लिप बनवून ऐका.
{केवळ अप्रतीम धागा... आणि}
केवळ अप्रतीम धागा... आणि अप्रतीम गाणीदेखील..
सर्वांचे खूप खूप आभार...
दुवादानासाठी ..
{खजिनाच मिळाला की या धाग्यावर!}
खजिनाच मिळाला की या धाग्यावर! आभार.
**
अब्द शब्द
{सर्व गाणी सुंदर आहेत.}
सर्व गाणी सुंदर आहेत.
{व्वा. क्या बात है. येऊदे}
व्वा. क्या बात है. येऊदे अजुन.