बोलट

0
0

नमस्कार मंडळी!

शिर्षक पाहून गोंधळलात? जुन्या जाणत्या लोकांना मात्र हा प्रश्न पडला नसेल.

बोलट, म्हणजे नक्की काय बुवा? तो आहे बोल्टचा अपभ्रंश. आता तुम्ही म्हणाल "बरं मग? त्याचं काय इथे?"

तर मंडळी त्याचं असं झालं की, मध्यंतरी जेव्हा मी मुंबईत होतो, तेव्हा एका संध्याकाळी कचेरीतून राहत्या खुराड्याकडे एकांतवासात जाताना अचानक मनात मळभ दाटून आलं...खुराड्याकडे जावंसंच वाटेना. मग पावलं आपसुक वळली ती साकीच्या मैखान्याकडं.
हंsss अजुन बोलटाचा गुंता काही सुटत नाहीय्ये नाही का? तर ह्या मैखान्यात मला बोलट भेटला.
हा शब्द आहे तसा बर्‍यापैकी जुन्या काळचा. नारायणराव-बालगंधर्व यांच्याकाळचा. नायकाची कामं करणारा तो "नट" आणि हल्ली ज्याला "सपोर्टींग ऍक्टर" म्हणतात तो म्हणजे "बोलट".

महिनाअखेर असल्याने मी जरा यथा-तथा ठिकाणीच बसलो होतो,जश्न-ए-तनहाई साजरा करत. सर्वसामान्य बारमध्ये असते तशी इथेही गर्दी होतीच. जोरजोरात गप्पा, बढाया, खिदळणं हे सगळं मी एका कोपर्‍यात बसून शांतपणे अनुभवत होतो. साला एव्हढी गजबज होती पण मी मात्र एकटाच. एकजात सगळी टेबलं फुल्ल आणि ती फुल्ल करणारे त्याहून फुल्ल.

थोड्या वेळाने एक वयस्कर गृहस्थ माझ्या टेबलाजवळ आले आणि "साहेब, जागा फक्त तुमच्या टेबलावर आहे, तुमची हरकत नसेल तर मी इथे बसु का?" असा प्रश्न विचारुन अदबीने ऊभे राहिले. मला कंपनी हवीच होती, केवळ रद्दड माणसं नकोत म्हणून मी जरा ताठ्यात होतो. ह्या गृहस्थांना पाहताच ते बरे वाटले म्हणून "अहो हरकत कसली, टेबल माझ्या बापाचं थोडंच आहे?" असं म्हणून खरं तर माझीच सोय पाहिली.

त्यांनी आपली ऑर्डर दिली आणि आम्ही दोघंही मुकाट्यानं आपापले ग्लास रिकामे करण्यामध्ये गुंग झालो. बहुधा तेही बोलघेवडेच होते. गप्प दोघांनाही बसवत नव्हतंच. हळूहळू गप्पा सुरू झाल्या. एकमेकांची माहिती विचारत असताना कळलं की ते "बोलट" होते. म्हणलं चला आपलाच माणूस भेटला.

मी : अरे वा! आपणही नाट्यकर्मी?
ते : आपणही? म्हणजे आपणही का?
मी : म्हणजे अगदीच नाही, पण थोडीफार कामं केली आहेत.
ते : हं..बोलण्यावरुन जाणवत होतंच ते, जिभेवरचे संस्कार कोणाचेयत? विजयाबाई का? (हे उगाचच!)
मी: छे: हो. आमचं कुठलं आलय एव्हढं भाग्य. बारामतीसारख्या छोट्या गावातून हौशी संस्थेत केलीत झाली चार दोन नाटकं अन् काही फुटकळ एकांकिका.
ते : हं...छान्..उत्तम.
मी: तसा विचार होता व्यावसायिक मध्ये यायचा, पण मध्येच MBA आलं आणि ते स्वप्न मागं पडलं ते पडलंच.
ते: (उसळून) गाढव आहेस ! खंत करतोयस ते. एव्हढं चांगलं शिक्षण घेतलस आणि कसले भिकेचे डोहाळे रे तुला?

आत्तापर्यंत बरा असलेला हा म्हातारा एकदम का बिघडला काही कळेना. एकदम डोळे मिटून शांत बसुन परत नॉर्मलला येत ते म्हणाले,

ते: माफ करा, भावनेच्या भरात अरे-तुरे केलं, अपशब्द वापरले...
मी : असुद्या हो, नाही तरी लहानच आहे की मी आपल्यापेक्षा.
ते: तसं नाही. शिक्षणाने, कर्तबगारीने आपण मोठे आहात. विद्येचा मान नेहमी पहिला, लक्षात ठेवा, विद्या असेल तर सगळं आहे, नाहीतर सगळं असलेलं मातीमोल आहे.

मी अंदाज बांधला, म्हातार्‍याचं विमान उडायला लागलं बहुतेक.

ते: अहो, ह्याच नाटकाच्या वेडापायी वयाच्या १७ व्या वर्षी घर सोडलं. नाटक कंपन्यात ओझ्याचं गाढव झालो, इतर कलाकार स्टेजवर टाळ्या घ्यायचे आणि मी आपलाही असा एक दिवस असेल अशी स्वप्न रंगवायचो.
एकदा एक बोलट आजारी पडला, त्याला फणफणून ताप भरला, आता त्याच्या जागी कोणाला उभं करायचं?
धीर केला आणि आमच्या मॅनेजरपुढे जाऊन उभा राहिलो. म्हणालो मी करतो हा रोल.
आधी सगळ्यांनी उडवून लावलं पण खड्या आवाजात जेव्हा डायलॉग म्हणून दाखवले तेव्हा सगळ्यांचा विश्वास बसला.
तिथुन जी सुरुवात केली ते पुन्हा मागं वळून पाहिलंच नाही. भले भले कलाकार, 'आप्पा' चांगलं काम करतोस रे, बेअरिंग एकदम बेस्ट देतोस इ.इ.प्रकारे स्तुती करु लागले. आपल्याला काय, हेच हवं होतं, आता तो दिवस दूर नाही, जेव्हा मी स्टेजवर येताच टाळ्या पडतील, आवाज ऐकुन प्रेक्षक मंत्रमुग्ध होतील अशी स्वप्नं पडू लागली. पण अशी संधी काही मिळेना...
त्यातल्या त्यात प्रभाकरपंताच्या "तो मी नव्हेच" मध्ये, आणि अशाच इतर उत्तम नाटकांत फुटकळ कामं केली, म्हणलं, असेच मोठे लोक पुढे येतात.

आता खिशात पैसा खुळखुळत होता, नाटकातल्या भुमिकांचा माज स्टेज सोड्ल्यावरही जात नव्हता. पैशाला हजार पाय फुटले, जसे यायचे तसेच ते जायचेही. हिशेब कधी ठेवला नाही. अरे, नटसम्राट कधी हिशेब ठेवतो का?

नंतर कंपनीतल्याच एकीच्या प्रेमात पडलो, लग्नही केलं. तिने संसारासाठी नाटक सोडलं, मला दुसरं काहीच जमत नसल्याने आणि बरीच कामं मिळत असल्याने मी नाटकातच खुश असायचो.

मी: मग? एव्हढं सगळं छान चालू आहे तर मगाशी का चिडलात?
ते: अरे बबड्या, हे माझ्या तरुणपणीचं, हळूहळू कामं कमी मिळायला लागली. हौशी व्यसनांत बदलल्या.पैसा पुरेनासा झाला.
११ वर्षांखाली माझा एकुलता एक मुलगा धबधब्यात पडून गेला. माझी काठीच गेली. बायकोला दमा आणि गर्भाशयाचा कॅन्सर...३ वर्षांखाली तीही गेली. सुटली बिचारी..शेवटी शेवटी तिच्या औषधपाण्यालाही पुरेसे पैसे नसायचे,टाचा घासून गेली.
असो, म्हणून म्हणतो रे लेकरा, असं सोन्यासारखं आयुष्य दिलंय देवानं,त्याचं मातेरं नको करूस बेटा.

घेत असलेली दारू मेंदूतून डोळ्यावाटे बाहेर पडायला लागली.एव्हढ्या कळकळीनं सांगणार्‍या त्या गृहस्थांबद्दल प्रचंड सहानुभुती वाटायला लागली.
तिथे अगदीच बसवेना, वेटरला बिल आणायला सांगितले, म्हणलं, "दोघांचं एकत्रच आण" ह्यावर कमावलेल्या खर्जातला आवाज आला "मेरा अलगसे लेआ"
मला म्हणाले, "साहेब, मी जे काही बोललो ते दारूच्या भिकेसाठी किंवा फुकटच्या दयेसाठी नाही, फक्त वाटलं म्हणून. तुम्ही आपलेपणाने सगळं ऐकून घेतलंत, मला सगळं पावलं." आणि बिलाचे पैसे टेबलाबर फेकून तरातरा निघूनही गेले. क्षमा मागायची सुद्धा संधी न देता.

मी टेबलावर सुन्नपणे तसाच. क्षणभर वाटलं, योगेश सोमणांचं बोलट तर नाही ना पाहिलं मी? पण नाही, जे घडलं ते खर होतं. मी खर्‍या बोलटाशी बोलत होतो.

-------------------------------------------------------------------------------------------
इतरत्र पुर्वप्रकाशित.

(विषय दिलेला नाही)

1

Sad

!

2

!

पुर्वीचावल नव्हत..असाच

3

पुर्वी वाचल नव्हत..
असाच लिहिता रहा...


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

ह्म्म्म धम्या बारचे एक टेबल

4

ह्म्म्म धम्या बारचे एक टेबल जगातले काय काय अनुभव देउन आणी दशावतार दाखवुन शहाणे करुन जाईल काय सांगता येत नाही बघ.

पर्‍या महत्वाचे बोललास

5

पर्‍या महत्वाचे बोललास


-निखिल

खरंय भाऊ.

6

अगदी खरंय!

टेबलावरच इतक्या प्रकारचे लोक पहायला मिळतात.... Sad

छान लिहले आहेस रे. * पर्‍या

7

Sad

छान लिहले आहेस रे.

* पर्‍या शीसहमत.

ते टेबल नसतं त्यावेळ आखाडा असतो एक एक पैलवान येतो व रिंगात खेळ दाखवून जातो !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

चांगल

8

चांगल लिहिलय.

अंमळ दुनियादारीची आठवण

9

अंमळ दुनियादारीची आठवण झाली...

असेच म्हणतो ... ..

10

असेच म्हणतो ... एम्.के.श्रोत्री डोकावले .... Sad

खुप छान लिहीतोस तु...

11

खुप छान लिहीतोस तु...

:(

12

Sad
सगळ्या बोलटांची हीच गत होते का? योगेश सोमणांचं बोलट, पुलंचा बोलट सगळे आठवले
बाकी, लिहिले छान आहेस

ऋषिकेश


-ऋ

धन्यवाद!

13

सर्वाचे मनापासुन धन्यवाद हास्य

वा!

14

धम्या बेष्ट लिवलय! आदुगर वाचल नव्हत


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

ह्म्म

15

इतरत्र वाचले नव्हते. छान किस्साकथन!

छान.

16

छान.

छान रे!

17

(बोल्ट ढिला झालेला नट)चतुरंग

जबरी

18

जबरी लिहितोस. मस्त. लिहित रहा.

कणव आली त्या बोलटाची. एखादाच

19

कणव आली त्या बोलटाची. एखादाच नट होतो त्यातून बाकीचे सगळे बोलट.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

!!मस्त

20

छान लिहलय.

कणव आली त्या बोलटाची. एखादाच

21

Sad

कणव आली त्या बोलटाची. एखादाच नट होतो त्यातून बाकीचे सगळे बोलट.

मनातलं बोललात.

लिखाण आवडले!

22

लिखाण आवडले!


-Nile

लिखाण छान आहे.

23

Sad

लिखाण छान आहे.

सुरेख.

24

आधी वाचले नव्हते.

छानच लिहिलंय.

हा धागा वाचायला

25

Sad
हा धागा वाचायला मिळाला....आभार !


Ignited Mind ! हा माझा , माझ्या कवितांचा ब्लॉग आहे बरं का ! हास्य