ऊघडं आहे का ?
डिसक्लेमर : हेतु-थोडीशी गम्मत जम्मत ..(नो ऑफेन्सेन मेंन्ट अॅट ऑल)
माननीय श्री परिकथेतील राजकुमार आज आमचे गुरुवर्य आहेत,पण एके काळी आमचे टॉम अॅण्ड जेरीचे संबध होते.अर्थात त्या प्रेमळ संबधाला गालबोट लागण्याचे कारण नव्हते.पण एक दिवस आंतरजालीय "ट्रॉयच्या दुसर्या महायुध्दापासुन" माझा संयम सुटला.आमच्या ह्या आंतरजालीय दुष्मनाच्या कॅफेवर जाउन थडकावे आणी एकदा कावेरी-किनारी बसुन तह करावा असा उदात्त निर्णय आम्ही घेतला आणी त्याकरिता स्वतापुरताच का होईना शनीवारचा मुहुर्त निश्चीत केला.
अश्या प्रकारे आम्ही आजपावेतो कोणाशीही तह केला नव्हता.त्यामुळे आधी कुलदैवतेच दर्शन आम्ही घेतलं.मग थोडीशी हिम्मत यावी म्हणून थोडस तीर्थ प्राशन केल.आणी मग आमचा दौरा निघाला निंबाळकर तालमीच्या दिशेने.कॅफेचा पत्ता,नाव आम्हास ठावुक होते.तसेच श्री परा यांचे खरे नावही ठावुक होते.कट्ट्यावरचा पराचा चेहरा आमच्या डाव्या मेंदुच्या "फोटोग्राफीक मेमरीत" फिट्ट बसलेला होता,त्यामुळे अडचण नव्हती.कॅफेसमोर दुचाकी पार्कींग नाही.त्यामुळ गाडी जरा आडबाजुला लावली आणी कॅफेपर्यंत चालत गेलो.
लाईट/कस्टमर नसल्याने की काय श्री.परा बाहेरच्या पायर्यांवर बसलेले होते.दोन्ही हाताच्या तळव्यांमध्ये त्यांनी एक जाडजुड पुस्तक धरले होते.डोळ्यावरचे भिंग नाकावरुन आता खाली सांडते की काय अश्या स्थितीत होते.डोक,नजर आणी लक्ष पुस्तकात खुपसुन घेतले होते.त्यांच्या समोर एक चाळीशीचे एक काका,पराच्या कॅफे कडे न्याहाळत होते.एखाद्याच्या बुटाला चिंगम चिकटले आणी त्याच अवस्थेत त्याला चकचकीत टाईल्सवर चालावे लागले की जसा भाव चालणार्याच्या चेहर्यावर येईल तसाच भाव त्यांच्या चेहर्यावर चिकटुन होता.त्याच गलबलेला अवस्थेत त्या काकांनी पर्याला विचारले.
"उघडं आहे का ?"
पर्यानी,नाकावरुन सांडणारा चष्मा,उजव्या हाताच्या मधल्या बोटाने सावरत त्यांना प्रतिप्रश्न विचारला.
" काय उघडं आहे का ?"
मित्रांनो,मला ईथे खुप हसायल आले.हसता-हसताच मी गाडीपाशी आलो आणी तह करण्याचा प्लान तात्पुरता रद्द केला.पुढे अपाची कट्ट्याला पराशी भेट झाली आणी हळु-हळु पर्याचे आणी माझे संबध चांगले झाले.आज जरी घट्ट मैत्री नसली तरी मैत्री आहे असे मी छातीठोकपणे म्हणु शकतो,पण मला तो शनीवराचा प्रसंग नेहमी आठवतो आणी ते काका ही.असे अर्धवट प्रश्न विचारण्याची काही जणांना खोडच असते.आपण जे सांगतोय ते समोरच्याला समजतयच असा त्यांना जन्मसिध्द गैरसमज असतो. जर समजा असेच हे काका जर आपल्या काही मिमकरांना भेटले आणी तोच प्रश्न जर त्यां काकांनी मिमकरांना विचारला तर काय होईल.मी काही अंदाज लावण्याच्या प्रयत्न करतोय.
काका : उघडं आहे का ?
छोटा डॉन :(सर्वप्रथम हातातल पुस्तक खट्ट करुन बंद करतात) गल्लत होते आहे मालक आपली. ईथे,सायबर कॅफेच दुकान उघड आहे का ? असे म्हणायला हवे..असो. तुर्तास गडबडीत आहे ..सवड मिळाली की ह्या विषयावर सविस्तर उहापोह करुयात..तरी आपल्या आत्ताच्या प्रश्नाच मी माझ्या परीन ऊत्तर देण्याच्या प्रयत्न करतो..अनादी कालापासुन पुण्यातील पेठांमध्ये अनेक दुकाने आहे.त्यातील एक एतिहासिक वारसा आजही जपलेली(पक्षी:मेन्टेन केलेली) पेठ म्हणजे सदाशिव पेठ , सदाशिव पेठ म्हणजे सदाशिवभाऊराव पशवे ह्यांच्या स्मरणार्थ बांधलेली पेठ.तर अशी पारंपारिकता पाळणारी पेठ,केवळ रविवारीच दुकाने बंद ठेवण्याची परंपरा पाळते आणी आज शनीवार असुनही, त्याच पेठेच्या सुप्रसिध्द निंबाळकर तालमीच्या चौकात उभे राहुन, " उघडं आहे का ?" असा प्रश्न विचारुन आपण सदाशिव पेठेच्या ईभ्रतीचे धिंडवडे काढत आहात. घिक्कार असो ..त्रिवार धिक्कार असो....आम्ही ह्या प्रकाराच्या निषेधार्थ आमच्या महिरपमधील छटाकभर वजन कमी करु.
(काकांच्या मेंदुत रक्तस्त्राव होतो)
काका:उघडं आहे का ?
प्रकाश घाटपांडे :हॅ हॅ हॅ
काका:उघडं आहे का ?
प्रकाश घाटपांडे :हॅ हॅ हॅ
काका:उघडं आहे का ?
प्रकाश घाटपांडे :हॅ हॅ हॅ
काका:(वैतागुन)उघडं आहे का ?
प्रकाश घाटपांडे :हॅ हॅ हॅ, जे झाकायच ते झाकलेल आहे,जे उघडं असायच ते उघडं आहे.
काका : उघडं आहे का ?
राजे : ऊघड आहे, दहा रुपये एका तासाचे, पंधरा मिनीटे बसलात तरी दहाच रु पडतील.ईथे दहा मिनीटाच्या अंतरावर दुसरा कफॅ आहे पण तो स्पीडच्या बाबतीत एकदम "वरिष्ठ" आहे.
(सुचना " वरिष्ठ ह्या शब्दाचा अर्थ राजेंनाच विचारा)
काका : उघडं आहे का ?
प्राजु (तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा) : (कवितेच्या सुरात)
विचारताय ऊघड असुन उघड आहे का ?
काका,तुम्हाला ईतके ही ना कळे ?
असे कसे हो तुम्ही,
उतारवयात ईतके खुळे ?
काका : उघडं आहे का ?
श्रावण मोडक : बर आहे उघड,मगं....आतातरी मोठ्ठे व्हा !!
काका : उघडं आहे का ?
३_१४ विक्षिप्त अदिती (खुप हिम्मत करुन हे नाव घेतोय) : (नजर पुस्तकातुन न हटविता) दिसत नाही का रे चोच्या ?
काका : उघडं आहे का ?
केशवसुमार : का ? एखाद लुगडं आहे का ?
काका : उघड आहे का ?
धमाल मुलगा(तुला कसा सोडेन ?) : हो काका ,या ना, दुकान उघडच आहे,आपलच आहे,बसा.
(दहा मिनीटानी धम्या कोणाच्यातरी खवत किंवा फोनवर ...कै च्या कै काका असतात एक्-एक, अगदी *** च्यां **** कांदबरीतल्या/नाटकातल्या ***** च्या सारखे ...(समोरचा उगाचच समजल्यासारखे करतो).हां हां....ईकडे धम्या अजुन एक्साटेड होउन.....तुला सांगतो .काय एक नंबर कांदबरी/नाटक आहे ते....*** च .त्यात दाखविलेला **** ,**** ईतका झकास रंगविलाय.)
मित्रांनो, मी ईथेच थांबतो...पण बरेचसे मिमकर अजुन बाकी आहेत
.jpg)
{(विषय दिलेला नाही)}
{हाहाहा जबर्या रे}
हाहाहा
जबर्या रे सुहास 
ह्या लेखावरून आमच्या मिमवरच्या पहिल्या (विनाकारण) उडालेल्या लेखाची आठवण झाली
असो ! तुझा लेख उडणार नाही ह्यासाठी शुभेच्छा
{हाण तेज्यायला !!}
हाण तेज्यायला !!
{आता लावा रे रांग}
आता लावा रे रांग बाकिच्यांच्या नावाने
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{पर्याचा कॅफेतली पुणेरी}
पर्याचा कॅफेतली पुणेरी पाटी

सुहाश्या भारी लेख...
आमचे नाव नाहि घेतलेस
-निखिल
{सुहास लेख भारी रे... नि फोटो}
सुहास लेख भारी रे...
नि फोटो चोरणार्या कंपांचा जाहिर निषेध!!!
{हा फोटो मी चोरला नाहीए.. फोटो}
हा फोटो मी चोरला नाहीए..
फोटो काढताना मी हजर सभासद होतो
-निखिल
{(विषय दिलेला नाही)}
Hope is a good thing...
{(विषय दिलेला नाही)}
{हॅहॅ}
खिक
{च्यामायला....घ्या आता एकेकाला}
{खीखीखीखी...}
खीखीखीखी....
माझ्याबाबत निरिक्षण कमी पडलं रे दोघांचंही. बाकी बरंच जमलेलं दिसतंय...
{माझ्याबाबत निरिक्षण कमी पडलं}
माझ्याबाबत निरिक्षण कमी पडलं रे दोघांचंही.
तरी बरंचसं जमलंय असं माझं वैयक्तिक मत!!
द्मु.. अजून येऊ दे रे!!!
{(विषय दिलेला नाही)}
सुरमई
{हा}
हा हा हा.
मस्त
{च्यायच्च ...}
कायबी लिहतय हलकट ...
लै भारी रे सुहास्या, भाड्या मी कधी अशा स्टायलीत प्रतिसाद देतो बे ?
तुर्तास जरा गडबडीत आहे. जराश्या सवडीने बाकी जणांच्या स्टायलीत टंकतो.
छान धागा आहे, चालु द्यात.
{(विषय दिलेला नाही)}
{खतरनाक}
सुहास जबरदस्त लिहलयसं रे!!
एकदम पट्या. लै आवड्या
{लै भारी}
लै लै भारी ..
{=))}
=))
/\
_____/ \_____
ऋषिकेश
-ऋ
{मस्त रे भौ ३_१४ मावशींचे}
मस्त रे भौ
३_१४ मावशींचे उत्तर एकदम भन्नाट रे चोच्या
आता परबू मास्तर , जल्ला ब्रीटीश , रामदास यांच्या ष्टायलीबी मार एकदा
अन त्या स्वानंदयात्रेकरूलापण सोडू नकोस
होऊन जाउ दे जोर्रात
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
{हॅहॅ}
काका: उघडं आहे का?
सुहास: या या खोलूनच बस्लोय तुमच्यासाठी ! नवनिर्माण म्हंतोय
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
{=)) }
=))
स्थळ : कॅफेच्या पायर्या... सुहास एका हातात 'मिलिंदवख्ख' आणि दुसर्या हातात 'महाराष्ट्रातील किल्ल्यांवरची गुप्त कुंडं' अशी दोन्ही पुस्तकं एकदम वाचतो आहे...
काका : उघडं आहे का?
सुहास : (काहीच बोलत नाही... पण नजरेने माणूस मरू शकत असेल तर आत्ता पर्यंत काकांच्यासाठी तयारी करायला घेतली असती लोकांनी...)
काका : अहो, उघडं आहे का?
सुहास : &^%$ एऽऽऽ.... कळत नाय का? नीट बघा ना...
काका : अहो उघडं दिसतंय पण रिकामंपण दिसतंय म्हणून विचारतोय ... उघडं आहे का?
सुहास : (जवळच उभ्या असलेल्या पोरांकडे बघून)... ए घ्या रे याला आत...
काका वायुवेगाने पसार.
{कोष}
रामदास पाठमोरे
काका: अहो उघड आहे का?
रामदासः (वळुन) हो तर. उघड असल्याशिवाय धातुकोषावर रिसर्च कसा होइल?
काका बेशुद्ध.
अर्ध्या तासाने शुद्धीवर आल्यावर.
रामदासः आता बरे वाटतय का? भांडे आणले नाहीत.
काका: आता भांडे कशाला.
रामदासः रिसर्च पुर्ण झाला. आता भांड्याला कल्हई १२ वेगवेगळ्या प्रकाराने लावता येईल. बारामती वरुन राजराजेश्वर मा.खा.ध्.मु साहेब खास बोलवले आहेत.
(धमु "लावा भांड्याला कल्हई" हे गाणे म्हणताना)
काका परत बेशुद्ध.
{ऑबॉबॉबॉबॉ....}
मुनीवर्यांचं ठीक आहे...ते पोहोचलेले युगपुरुष आहेत...मास्तर, तुम्ही बव्हत्येक माझं लग्न मोडणार
{सुहास लै भारी धागा}
"उघड हाय का" वर लै फोटो घावल्यात खर डकवायची हिम्मत हुईना तेच्या आयला आय डी च गुल व्हाचा ;-)
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
{मी मात्र कॅफेत गेलो तर}
मी मात्र कॅफेत गेलो तर विचारतो:
खाली है क्या? बैठनेका है|
आता विचारेन उघडं आहे का?
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
{ऑं?}
बैठनेका है|
काsssssssय?
{हाँ, मंग. आप्ल झाकेल थोडीच}
हाँ, मंग. आप्ल झाकेल थोडीच हाये. उघडच हाये संम्द.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
{३_१४ विक्षिप्त अदिती (खुप}
नाय बा ... आपण वयाने मोठ्या लोकांचा सादर उल्लेख करतो (जोडे हाणायचे असतील तरीही)!
आणि काय रे चोच्या, तू माझं नाव का घेतोयस? तुझ्या बायकोचा फोन नंबर व्यनी कर, तिच्याशीच बोलते डायरेक्ट!
{अरे वा ह्या धाग्याचा लुत्फ उठवलाच नव्हता!!}
आमचेही दोन पैसे -
काका : उघडं आहे का?
मुक्तसुनीत : रोचक प्रश्न. हा प्रश्न अनादी कालापासून असाच नाही तरी साधारण ह्याचप्रकारानी किती किती व्यक्तींनी आणि कुठेकुठे विचक्षणपणाबे विचारला असेल ह्याच्या किती शक्यता असतील काही समजत नाही! तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे हे मला समजलं असलं तरी ते तसेच असेल ह्याची खात्री देता येईलच असे नाही. कोदंड गवाणकर ह्या काहीश्या दुर्लक्षित कवीच्या एका कवितेतल्या ओळी मला आठवल्या....
(काकांना फिट आलेली आहे!)
----------------------------------
काका : उघडं आहे का?
तात्या : अहो काका काय हे! ह्या वयात असले चाळे? बाझवला भांचोद! लोकं चेहेर्यावरुन वाटत नाहीत ना?
(काका सुमडित गुल!)
-----------------------------------
काका : उघडं आहे का?
बिका : केफ हाल!
काका : ?
बिका : उघडं आहे का विचारलंत म्हणून वाटलं की थेट दुबईहून अरबमामांच्या सहवासातून इकडेच की काय?
(काका घाईघाईने पँट सावरत निघून जातात)
-----------------------------------
काका : उघडं आहे का?
ब्रिटिश : हां उघरं हाय की रं बाला, आन आत पोकल बांबू पन हाय! चल आत!!
(काका बुंगाट....)
-----------------------------------
काका : उघडं आहे का?
पिवळा डांबीस : आँ! तुझ्या आवशीचो घो! अरे इथे कोण उकडताय मग काय सगळं झाकून उबवून घेऊ की काय? उघडंच तर आहे दिसत का नाय तुला! ये असा आत ये, तुझं झाडंच बनवतो!!
(काका जागच्याजागी ....)
{रंगराव फॉर्मात एकदम!}
रंगराव फॉर्मात एकदम!
{+१ सहमत फुल्ल फॉर्मात}
+१ सहमत
फुल्ल फॉर्मात
-निखिल
{आगायाअयाआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ}
आगायाअयाआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ
ह्या अफलातुन माणसाची प्रतिभा संपादकपणाचा तुरा लागल्याने कशी कुचंबली गेल्या आहे हे पाहुन मन हळवे झाले
{दंडवत साहेब}
दंडवत साहेब
Hope is a good thing...
{आमचेही २.७२ पैसे - काका :}
आमचेही २.७२ पैसे -
काका : उघडं आहे का?
नंदन: उघडं आहे का हे उघड असताना उघडं आहे का हे उघडपणे सांगण्याच्या मजेच्या भावनेवर मुरारी दवणेंनी एक स्फुट १९९८ च्या मटाच्या दिवाळी अंकात लिहीलं होतं, त्याची लिंकही दाखवतो तुम्हाला!
(काका दचकून नंद्याच्या पाया पडून नौ दो ग्यारह)
काका : उघडं आहे का?
सहज: उघडं आहे का ही माहिती व्यक्तीगत असल्यामुळे मी उघड करू शकत नाही. क्षमस्व.
(काकांच्या तोंडाचा चंबू बंद होतच नाही.)
काका : उघडं आहे का?
ऋषीकेशः आत्ता वाजले आहेत दुपारचे तीन वाजून दोन मिनीटं, गाणं ऐकूया 'उघड दार देवा आता'.
(काका सुमडीत आत घुसतात.)
काका : उघडं आहे का?
लिखाळः या प्रश्नावर टाळ्या झाल्याच पाहिजेत.
(काका हतबुद्ध)
काका: उघडं आहे का?
आनंदयात्री (शेजारच्या कॅफेतून): या, आमच्या गरीबाच्या कॅफेतही अधूनमधून येत जा.
(काका घाबरून पर्याच्या कॅफेतच घुसतात.)
{खल्लास!!!}
अदितीबै जोरदार फटकेबाजी!!

ह्या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत!!
{+ १ लै भारी !}
+ १
लै भारी !
Hope is a good thing...
{आग्गायायाया ...}
हुच्च हुच्च अगदी हुच्च ...
काय, मालकांनी पाठवलं वाट्टं ?
{हुच्च हुच्च अगदी हुच्च}
हुच्च हुच्च अगदी हुच्च ...
असेच म्हणतो...
-निखिल
{रंगाकाकांच्या, दु.बैंच्या जबरदस्त प्रतिक्रिया वाचून }
काका : उघडं आहे का?

राजे :
(काका बघतच राहतात लोळण काही थांबत नाही पाहून कटतात....)
---------------------------
काका : उघडं आहे का?
प्रभो : मी पण केव्हांचा तेच विचारतोय, आता दोघे मिळून विचारुया.
(काका लगेच कटतात....)
---------------------------
काका : उघडं आहे का?
नाना (हेल्मेट घालून) : आता सगळं बंद. पाध्ये आल्यापासुन सगळे झाकून ठेवावे लागते तुमचे पण झाका व तुम्ही पण हेल्मेट घ्या खारका लै लागतात.
(काका कोपर्यावर जाउन नाना कटायची वाट बघतात....)
----------------------------
काका: उघडं आहे का?
टारझण: या कोदाकाका या! तुमच्याकरताच खोलुन ठेवलयं. आत आता फक्त तुम्ही आणि मी
(काका मेलेच आता..)
----------------------------
काका: उघडं आहे का?
(पैचान कोन?): शी बै! अच्र्त
(काका टांग लावून पळतात..)
----------------------------
काका: उघडं आहे का?
कुंदन: नमस्कार. तुम्ही कुठले? च्यायला तिकडे असताना रोज बोलवायचे कधी येतो? कधी येतो? आता आलोय तर सगळे गायब. तुम्हाला पण चुना लावला का?
(काका बुचकळ्यात..)
----------------------------
{है शब्बाश!!}
आज काय एकामागून एक फटकेबाजी सुरु आहे!
सहजराव, "पैचान कौन" म्हणजे तर एकदम रिवर्स फ्लिकवर षटकार खेचलात राव!
{+१}
काका: उघडं आहे का?
ब्रिटीश टिंग्या: हॅ हॅ हॅ, बोला तिरशिंगराव माणूसघाणे!
(काका बुच्चकळ्यात!)
{बव्लत पन तकय्ला पहिजे.......}
बव्लत पन तकय्ला पहिजे.......
{आज काही खरं नाही राव!!}
काका : उघडं आहे का?
विजूभौ : तुम्हाला मर्सिडिज घ्यावी असं नाही वाटत काका?
(काकांची कवळी पडते)
विजूभौ : तुम्ही नक्कीच मॅनेजर असणार, जिथं कुठं नोकरी केलीत तिथे! असा संदिग्ध प्रश्न विचारुन समोरच्याला बुचकळ्यात टाकायचं आणि मग आपल्याला हवं तसं उत्तर काढून घ्यायची ही खुबी फार महत्त्वाची! या आत या. जपानी गाद्या आणि आंब्यांची आढी असं एकदम दोन्ही लावलंय आतमध्ये! झोपून बघा गादीवर परत उठणारच नाही!!
(काका तिथेच पडतात)
----------------------------
काका : उघडं आहे का?
चुचुत्सु : शनी-मंगळाची युती पत्रिकेत बिघडलेली असली की माणसं ऑब्विअस गोष्टींबद्दलही प्रश्न विचारायला लागतात! तुमची सप्तपदी झाली होती का हो काका? चला आता बसूया तुमच्या स्त्रीला काय हवं आहे ते शोधून देतो!!
(काका वेडेवाकडे सुम्माट पळत सुटतात.....)
{काका : उघडं आहे का? चतुरंग (}
काका : उघडं आहे का?
चतुरंग ( अर्थात खुद के साथ बाता मोडमध्ये ) : गंमतच आहे ना रे रंगा, मालकांनी स्पष्ट "उघड आहे, येईल त्याचे स्वागत, जाईल त्याला खाऊ आणि शुभेच्छा" अशी स्वछ पाटी लावली असताना लोक असे विचारुन कमालच करतात ना. काकांना स्टीलमेट करावे की संपादकीय लगाम घालावा ?
{हा हा हा!!}
ज बर्या!! हा आला डॉनरावांचा आहेर!!
{लै भारी}
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
{अजून काही}
काका : उघडं आहे का?
धनंजय : (थंडपणे) एक दार बंद आणि दुसरं उघडं आहे आणि आत लाईट नाहीयेत म्हणजे तीन शक्यता
१ - तार्किक दृष्ट्या उघडं आहे की नाही ते माहीत नाही
२ - व्यावहारिक दृष्ट्या उघडं आहे
३ - वापराच्या दृष्टीने बंदच आहे.
(काका डोक्याचे केस उपटून खाली बसतात)
-------------------------------------
काका : उघडं आहे का?
विकास : हा प्रश्न अतिशय फसवा आहे. काँग्रेस जशी एकगठ्ठा मतांवर नजर रोखून निवडणुकांचया काळात फक्त नजिकच्या भविष्याचा विचार करते त्या दृष्टिकोनातून उत्तर द्यायचे झाल्यास उघडं आहे! डाव्या आघाडीतल्या कम्युनिस्टांचा गोंधळ जसा सर्वकाळ चालू असतो त्यांच्या नजरेतून बघाल तर निम्म्यांसाठी उघडं आहे आणि निम्म्यांसाठी बंद. पण राष्ट्रीय हिताचा दूरगामी विचार करुन तुमचा वेळ वाया जाऊ नये म्हणून मी खरं उत्तर देतो की सध्याच्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे विजेसारखी मूलभूत गोष्ट नसल्याने कॅफे बंद आहे!
(काका कधीच निघून गेलेले असतात!)
{हे जे काही लिहीलं आहेत याचा}
हे जे काही लिहीलं आहेत याचा अर्थ तुम्हाला नक्कीच कळला असेल, नाही?
{अजुन काही }
काका : उघडं आहे का?
राष्ट्रवादी मुखपत्र : अरे उघडे नसेल तर काय मराल काय ?
---------------------------------------
काका : उघडं आहे का?
जोशीसर : मला जरी समोर ते उघडं दिसत असले तरी मी साहेबांचा आदेश आल्याशिवाय ते उघड आहे की बंद आहे ह्याविषयी खात्रीशीर माहिती देऊ शकत नाही. अर्थात ते उघडे असणे किंवा बंद असणे ह्या दोन्हीही गोष्टी साहेबाम्च्या आदेशाशिवाय शक्य नाही हे मी नमुद करु इच्छितो.
----------------------------------------
काका : उघडं आहे का? ( चप्पल काढायला लागतात आत जायला )
बागवेशेठ : ( तोंडाने काहीच बोलत नाही, नजर मात्र चपलांकडे व हालचालीत कमालीचे चापल्य )
काका : राहुद्यात राहुद्यात, मी पहातो दुसरीकडे
-----------------------------------------
काका : उघडं आहे का?
पवारकाका : असल्या ग्रामपंचायत पातळीवरच्या प्रश्नांना उत्तरे द्यायला मी काय ज्योतिषी आहे काय ?
ते उघडे असावे की नसावे ह्याचा काय तो निर्णय पक्ष कार्यकारणीच्या बैठकीत चर्चा करुन त्याच्या निर्णयाचे अधिकार एकमताने मला देण्यात येतील व पुढची कार्यवाही होईल.
------------------------------------------
काका : उघडं आहे का?
धाकले पवारसाहेब : काय रे, मस्ती आली आहे काय भडव्या ? उघडं आहेस काय म्हणुन काय विचारतो, इथे आम्ही काय माश्या मारत बसलो आहे काय मग ?
------------------------------------------
काका : उघडं आहे का?
खासदार आणि कार्यकारी संपादक : विचारा विचारा, असेच बिनडोक प्रश्न विचारुन मराठी माण्साच्या पाठीत खंजीर खुपसा.
माननीय उद्धोजी बाळाजी साहेब ह्यांच्या नेतॄत्वाखाली आम्ही सर्व काही 'उघडे ठेवण्यास' कटिबद्ध आहोत.
------------------------------------------
काका : उघडं आहे का?
थोरले साहेब : महामुर्ख आहात ! इथे आमच्या एकाअ आदेशावर आमचा कडवट सैनिक आख्खी मुंबई बंद करत असताना तुमच्यासारखे शेठजींनी पोसलेले शेणात वळवळणारे शेणकिडे असा प्रश्न विचारायची हिंअत करुन आपल्या अकलेची दिवाळखोरी जाहीर करत आहात.
बंद करा ह्या दाढ्या कुरवाळणे. जेव्हा विधानसभेवर भगवा फडकेल तेव्हा हेच काय समस्त दुकाने उघडी असतील अशी आम्ही ग्वाही देतो.
-------------------------------------------
काका : उघडं आहे का?
आशुकराव शीयेम : जरी ह्या परिसरातला एखादा नेटकॅफे बंद असला तरी ह्याचा अर्थ असा नव्हे की आख्ख्या पुण्यातले नेटकॅफे बंद आहेत. उच्चस्तरिय चौकशी समितीचा अहवाल लवकरच येईल, तपास चालु आहे.
कोणी कायदा हातात घेऊन समांतर सरकार चालवण्याची झुंडशाही करु नये, आमचे सरकार त्याचा योग्य तो बंदोबस्त करण्यास कटिबद्ध आहे.
--------------------------------------------
काका : उघडं आहे का?
हसमुखराय शिंदे : हॅ हॅ हॅ, काय बंद आहे काय ? हॅ हॅ हॅ.
--------------------------------------------
काका : उघडं आहे का?
गडकरी साहेब : मायला कायबी बोल्तं पोट्टं, उघडेल हो काका, अरे तोवर कोणीतरी भेळपुरी आणा रे २ , काका तुम्ही काय घेणार ?
असो.
बाकी नंतर सवडीने.
{टिपिकल डॉनराव.. लै}
टिपिकल डॉनराव..
लै भारी...
अजुन दोन चार येउद्या
-निखिल
{काका: उघडं आहे का? निखिलः}
काका: उघडं आहे का?
निखिलः उघडं आहे का यातून तुम्हाला नक्की काय सुचवायचं आहे? उघडं असलं-नसलं काय फरक पडतो? प्रत्येक वेळी असे विचारजंती प्रश्न विचारावेच लागतात का? चर्चा मात्र रोचक आहे.
{हॅ हॅ हॅ छान प्रतिसाद!!! या}
हॅ हॅ हॅ
छान प्रतिसाद!!!
या प्रतिसादातुन तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे?
-निखिल
{आईशप्पथ !!}
रंगाकाका ,अदिती आणी सहज
_/\_
डॉन्या ...जबरा..
ह.ह.पु.वा.
आता अजुन काही
काका : उघड आहे का ?
(खास विनंतीवरुन) निखील देशपांडे: वाक्य मोघम आहे मान्य पण शंका निर्माण करण्यालायक आहे म्हणुन प्रश्न उपस्थित झाला असावा...
बाकी आपल्याकडे ह्या विषयईची माहिती असल्यास आमच्या समोर उघडी करुन मांडावी असे वाटते... (अचानक व्यवस्थापक मोडमध्ये जाऊन,स्वगत) ईतक्या सुविधा देउन पण लोक विचारतात उघड आहे का?(पुन्हा निखील देशपांडे मोडमध्ये,स्वगत)ईथ वजन कमी करायचं ? काय करावे बरे ?
काका : ऊघड आहे का ?
पाषाणभेदः लेखकाचे बाह्यरुप....माफ करा.....दुकानाचे बाह्यरुप उघडे आहे म्हणजेच अंतरंग ऊघडे असणारच ना !! बाकी काका तुम्हाला मधुमेह अर्थातच डायबेटीस तर नाही ना
{(विषय दिलेला नाही)}
-निखिल
{(विषय दिलेला नाही)}
-Nile
{पुन्हा एकदा वाचलं आणि पुन्हा}
पुन्हा एकदा वाचलं आणि पुन्हा पुन्हा हसतोय......!!!
क.. ह .. र.
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)
{ह ह पुवा............}
ह ह पुवा.....
{हेच म्हणतो. जबरदस्त रे}
हेच म्हणतो.
जबरदस्त रे सुहासा! एक नंबर!
{खाणकाम}
आम्ही वाचनमात्र असलेल्या दिवसातील एक खल्लास धागा, खास नव्या - मीम - पिढीसाठी खणून काढला आहे.
(खाणकामगार) गमत्याराम
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{आम्ही वाचनमात्र असलेल्या}
आम्ही वाचनमात्र असलेल्या दिवसातील एक खल्लास धागा, खास नव्या - मीम - पिढीसाठी खणून काढला आहे.
(खाणकामगार) गमत्याराम++++++++++++++++!!!!!!
{_/\_ अजुन काय बोलू.... }
लौली धागा, गडबडा लोळतोय
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!
माझा ब्लॉग - मन उधाण वार्याचे…
{चला !! }
चला आता अनायासे धागा वरच आला आहे तर !
काका : उघडं आहे का ?
सौ.राजे : मालकांना विचारा
आम्ही त्यांना पुर्ण मुभा दिली आहे !!
(काका उड्या मारायला लागतात)
काका : उघडं आहे का ?
रमतारम : उघडं आहे का , उघडं आहे का उघडं आहे का, च्यायला दर वेळी काय उत्तर दक्षिण द्यायचे रे, बाकी आमच्या कारकिर्दीत आज वर आम्ही काही बंद ठेवल्याचे आम्हाला आठवत नाही, केवळ काही वेळा मदयरितेकामुले डोके बंद होते हा भाग वेगळा !!
(काकांनी तोंडात मारुन घेतली आहे )
काका : उघडं आहे का ?
विशाल कुलकर्णी : राजेंच्या बैलाला हो SSSSS ! यांच एक कुर्यात सदा दंगलम कधी होते कुणास ठावुक ..असो मी निघतो आता...आज घरी पाव-भाजी बनवायची आहे..
(काका विशल्याचा मागावर)
काका : उघड आहे का ?
विमो : तुमचा ड्राय - डे संपला वाटते. नसेल तर गेलात....असेल तर चला जरा वयोवृध्द माणासाबरोबर बसा थोडावेळ !!
{ठ्ठो !!}
ठ्ठो !!
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!
माझा ब्लॉग - मन उधाण वार्याचे…
{काकांसाठी : फ़ुकट पावभाजी}
काकांसाठी : फ़ुकट पावभाजी केंद्र बंद झालेले आहे.
कृपया काका कोण म्हणून विचारु नये
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{(विषय दिलेला नाही)}
********************************************************
"When you are just about to finish your journey, LIFE changes your destination."
{(विषय दिलेला नाही)}
{हा हा हा हा..लय}
हा हा हा हा..लय भारी...
सुहाश्या... जबराट हसतोय बे
और आने दो
अभी के अभी
एकत्र टोळी बनवून लचके तोडणार्या लांडग्यांपेक्षा.......एकटा वाघ नेहमीच श्रेष्ठ
http://coolprasann.blogspot.com/
{एकदम झकास.......... हसता-हसता}
परिजा
******
बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)
{काका : उघडं आहे का ? राजे :}
काका : उघडं आहे का ?
राजे : हो हो.. एवढी लांबउडी स्पर्धा होउन जाउद्यात मग उघडंच आहे.
( काका राजेंच्या पायाकडे हळूच बघत सटकतात)
काका : उघडं आहे का ?
गब्बरसिंगः काका, मार्केटमधे जेवढं जास्त उघडं असेल तेवढा लोकांना निवडीला वाव मिळणार, आणि तुम्ही उघडं आहे का असं विचारताय म्हणजे बाजारात अन्य पर्याय उपलब्ध नाहीत असा अर्थ निघू शकतो. पण मुळात प्राईस सिस्टीम मधे असे तुमच्यासारखे प्रश्न विचारणारे खूप लोक उभे राहिल्यानंतर मार्केट प्रेशरच्या रेट्याखाली उघडावंच लागेल.
(काका उंची सूट, टाय, तोंडात सिगार घालून मर्सीडीजमधे बसून बाहेरच्या जगाकडे तुच्छतेने बघतायत)
काका : उघडं आहे का ?
रमतारामः इथंच तुपले मपले मतभेद सुरू होतात, ह्या सिस्टीममधे उघडं किंवा बंद ठेवायचे अधिकार फक्त काही ठरावीक मोजक्या लोकांच्या हातात आहेत ना. मग तुम्ही प्रश्न विचारून काय उपयोग.
(काका शर्टाच्या बाह्या फोल्ड करून घोषणा देण्याच्या आवेषात आहेत)
काका : उघडं आहे का ?
ते आपले ते सत्यवाले: मला प्रश्न विचारून काय उपयोग, सत्य तुमच्या आत आहे, उघडं असेल तर ओशोनं सांगितल्यानुसार आत्म्यासाठी त्याचा काहि उपयोग नाही. आणी असेल तर तुम्ही आधी मान्य करा मि जे म्हणतोय ते म्हणजे असले प्रश्न तुम्हाला पडणार नाहीत, सत्य गवसेल.
(काका कधिच निर्वाणात पोचलेत)
काका : उघडं आहे का ?
धुंद रवी: समजा तुमचं उघडं असेल तर...
(काका बुचकळ्यात)
काका : उघडं आहे का ?
नाडिकांत ओकः विज्ञानवाद्यांनी असं अनेक वेळेला विचारलं आहे पण हे काही मी सांगण्याची गोष्ट नाही, महर्शींनी जे लिहून ठेवलं ते तर आहेच. तुम्हा स्वत: अनुभव घेउन बघा.
(काका स्वता:च्या लेंग्याची नाडी घट्ट पकडून धूम)
काका : उघडं आहे का ?
गंगाधर मुटे: शेतकर्याला सर्व बाजूने कायमचा आसूड उगारलेलाच आहे. तुम्ही असं विचारून अजून मीठ चोळताय जखमेवर. सगळे राजकारणी शेतकर्याचा तोंडचा घास बंद करायचा प्रयत्न करत असताना, तुम्ही विचारताय उघडं आहे का म्हणून.
(काका गयावया करतायत. मी तो नव्हेच म्हणत)
केवळ गंमत करण्याच्या उद्देश आहे दुखावण्याचा नाही हे ज्यांना कळले नसेल, त्यांच्या ई. मॄ. शा. दे.
{(विषय दिलेला नाही)}
..............................................................
क्या फर्क पडता है?
{खपलो !! }
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!
माझा ब्लॉग - मन उधाण वार्याचे…
{(विषय दिलेला नाही)}
Hope is a good thing...
{आयच्या गावात...}
थांबा जरा, बघतोच आता... काही नेहमीचे सदस्य राहून गेले आहेत त्यांचे म्हणणे सुद्धा ऐकू या.
काका: उघडं आहे का?
अर्धवटः नक्की कुठल्या गावात उघडं आहे विचारताय ते सांगा आधी. आयच्या गावात... म्हणत किती गावं फिरलो हिशोब करायला बसलो तर एक टंकनिका ठेवायची वेळ आलीये इथे. विएतनामला गेलो तिकडे हा प्रश्न विचारला तर त्यांनी उघडून दिलं, आफ्रिकेत गेलो तिकडे उघडलेलं बंद केलं, आमच्या दिल्लीला 'उघडं किस्को बोलताय बे' म्हणून उडवून लावतात, बंगळुरात गेलो तर 'कट्ट कडकट्ट...' वगैरे काय उत्तर दिलं त्याने डोक्याला शॉट लागला, मलेशियाला गेलो.........
(सगळ्या गावांची, शहरांची, देशांची नावे ऐकता ऐकता काकांचा आ वासतो नि एक चिमणी त्यात घरटं बांधायला सुरवात करते.)
काका: उघडं आहे का?
सागरः लेखक कोण आहेत नि प्रकाशक कोण आहेत ते सांगा. राजे माझ्यासाठी एक ऑर्डर दे.
(काकांची आवृत्ती संपण्याच्या बेतात येते.)
काका: उघडं आहे का?
पाषाणभेदः (आपली लेटेष्ट कविता ऐकवतात)
नक्षीदार कुयरी पदरावरची.........
हळद कुंकवानं भरलेली
सोळा सिनगाराचा साज लेवूनी...
ऐन्यापुढे उभी मी राहीली
(काका 'तो मी नव्हेच' म्हणत विश्वामित्री - मान डावीकडे हात उजवीकडे असा - पवित्रा घेत जुन्या काळच्या हिरविणी 'नहींऽऽऽ' असे बोंबलत घ्यायच्या तशी एग्झिट घेतात.)
काका: उघडं आहे का?
विशाल कुलकर्णी: (शून्यात बघत)
आज मी उघडित नाही
मी कुणाला भीत नाही
का काका थांबला रे
हे तुझ्या नियतीत नाही
(काका आपल्या नियतीला बोल लावित, यापेक्षा पाषाणभेदाच्या कविता परवडल्या असे पुटपुटत काढता पाय घेतात.)
(ह. घ्या रे बाबांनो.)
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{(विषय दिलेला नाही)}
..............................................................
क्या फर्क पडता है?
{च्यायला अर्धेश्वर महाराजकी जय}
च्यायला अर्धेश्वर महाराजकी जय म्हणायला आलो होतो पण इथे तर ऑलरेडी टाय झालेला आहे. अर्धेश्वर आणि म्हातारेश्वरांमध्ये
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{काका : उघडे आहे का? अर्धवट :}
काका : उघडे आहे का?
अर्धवट : हो. आहे ना. कोणत्या बाजूने उघडे हवे आहे तुम्हाला? आणि कोणत्या वेळेला हवे आहे?
ती काउन्टरवर बसलेली बाइ दिसतेय ना तिच्याकडून बोर्डिंग पास घ्या. चेक इन करून घ्या.
थोडा डीले होणार आहे त्यामुळे शेजारच्या गाड्यावर कटिंग चहा तुम्हाला आमच्या तर्फे.
काका : अहो पण.......
अर्धवटः काका तुम्ही चहा घेत नसाल तर मी त्याना कपातुन एक कटिंग गरम पाणी द्यायला सांगतो
काका: आश्चर्याने चष्मा हवेत.........
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
{हान तेजायला}
हान तेजायला ... जबरदस्त.
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{हास्य पताका फुटेश !!!! }
{हसून पुरेवाट लागली हसणे}
हसून पुरेवाट लागली हसणे कंट्रोल होत नसल्याने सी. ई. ओ. चिडून बघू लागली
बन्सी को लकडी सदा समझा किये तुम पर उसके नग्मो कि धुन कहाँ सुन सके तुम!
{आजवरचा हा सर्वात उत्तम धागा}
आजवरचा हा सर्वात उत्तम धागा आहे......जेव्हा कधी तुमचा मुड खराब असेल किंवा कोणावर तरी तुम्ही प्रचंड रागावलेला असाल पण मनातल्या मनात दात्-ओठ खाण्यापलीकडे काहीच करु शकत नसाल ना.....तेव्हा हा धागा उघडा.... हमखास तुमचा मुड ठिक होईल.
खुप छान चाललय.......अशीच सढळ हस्ते भर घालत रहा सारे........
परिजा
******
बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)
{+१}
अनुमोदन.
मस्त धागा.
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{चालू आहेत सगळे}
चालू आहेत सगळे
Hope is a good thing...
{जसा राजा....तशीच त्याची प्रजा......}
जसा राजा....तशीच त्याची प्रजा......
परिजा
******
बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)
{+ रजनी.... !!}
+ रजनी.... !!
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!
माझा ब्लॉग - मन उधाण वार्याचे…
{सकाळ सकाळीच}
सकाळ सकाळीच
Hope is a good thing...
{काय उघडं असण्यावर ही गहन}
काय उघडं असण्यावर ही गहन चर्चा चालली आहे बरे??
{स्वामींचे उत्तर काय असेल ?}
स्वामींचे उत्तर काय असेल ?
---------------------------------------------------------------
स्पंदने माझ्या मनाची >>
मन वढाय वढाय
{मस्त!}
ररा लाखो धन्यवात!
-----------------------------------------------------------------------------------------------------------
चिंगी