ज्ञान, संस्कृत, इतिहास, समज, जाण वगैरे वगैरे - भाग ३

0
0

दुसरा भाग

निवेदन - पहिल्या भागाप्रमाणेच.

***

आतापर्यंत आपण पाहिलेल्या इतिहासात केवळ धार्मिक बाबीच जास्त प्रकर्षाने समोर आल्या. ते साहजिकच आहे कारण आतापर्यंत जे काही साहित्य बनत होतं ते बरेचसं केवळ मौखिक रुपाने जतन करुन पिढ्यान पिढ्या संक्रमित होत होतं. कालाच्या ओघात ते जतन करुन ठेवणा-या घराण्याचा वंशच्छेद झाल्यास अगर पुढिल पिढीने ते जतन करणे नाकारल्यास किंवा काही अनाकलनीय कारणाने ते पूढे न सरकल्यामुळे ते साहित्य, ज्ञान आपल्यापर्यंत आलेले नाही.

मानवाची प्रगती होत होती. त्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे मानवाने भाषेला (भाष् - म्हणजे बोलणे) दिलेले लेखन स्वरुप म्हणजेच लिपी. लेखन कला अस्तित्वात आली आणि साहित्याचे स्वरुप बदलुन गेले. इथुन पुढे केवळ महत्वाच्या गोष्टींनाच मुखोद्गत करुन भागणार होते, जरुर पडेल तेव्हा लिखित स्वरुपातील साहित्य उपलब्ध होत होते. बघता बघता लिप्यांमधे विविध सुधारणा झाल्या, लिपीतली सुधारणा बोलीला सुधारत होती तर बोलीनुसार लिपी सुधारली जात होती. शारदा, ग्रंथ, खरोष्टी, अशा एक ना अनेक संक्रमणांमधुन जात जात ध्वनीनुसार लेखन करु शकणारी बाळबोध म्हणजेच देवनागरी लिपी अस्तित्वात आली. इथे ध्वनी म्हणजे केवळ भारतीय भाषांमधलेच ध्वनी अभिप्रेत आहेत. सुरवातीच्या काळात देवनागरी लिपीच्या अक्षरांवर आडवी रेघ मारली जात नसे.

संस्कृतच्याच बरोबर इतरही भाषांमधे निर्मिती सुरुच होती. पण सर्व भारतात समजायला सोपी तसेच मान्यता मिळण्याच्या दृष्टीने सोईस्कर संस्कृतच होती. काव्य, नाटके, भाष्ये, एक ना अनेक सकस साहित्य निर्मिती चालु असतांनाच अध्यात्मिक क्षेत्रातील दिग्गज आपापली मते खंडन मंडन करत चर्चा वाद करत होते. वेदांना अपौरुषेय मानले जावु लागले. शतपथ ब्राह्नण सांगते मनोरुपी समुद्रापासुन वाक् रुपी कुदळीने देवांनी वेदत्रयी खणुन काढली, ही वाणी ॠषींनी बराच काळ आपल्या स्मृती पटलावर कोरुन ठेवुन वंशपरंपरागत कायम राखली व लिपी अस्तित्वात येईस्तोवर तिचे रक्षण केले.

तत्वचर्चा चालुच होती. विविध मत मतांतरे यांचा गलबला वाढलाच होता. प्रत्येक जण आपलेच मत खरे हे ठासुन सांगत होता, परंतु पाश्चिमात्य विशेषतः सेमेटिक पंथीय संप्रदायांप्रमाणे आक्रस्ताळेपणा सहसा आढळत नाही. चर्चेपुर्वी नियम बनवुन हरणारा जिंकणा-याच्या पक्षात सामिल व्हायचा. तलवारीच्या जोरावर मतपरिवर्तन सहसा होत नसे. परंतु या गलबल्याला बराचसा पुर्णंविराम भगवद्गीता नामक ग्रंथाने मिळाला. हा ग्रंथ कुणी नक्की लिहिला माहित नाही. कदाचित व्यास किंवा सौती किंवा वैशंपायन अथवा कुणी तिसराच असावा. जो कुणी असेल तो बहुधा सांख्य मतानुयायी असावा असा अंदाज भगवद्गगीतेतील सांख्य मताला मिळालेल्या जास्तीच्या श्लोकांवरुन तसेच मुनींमधे कपिल श्रेष्ठ अशा अर्थाच्या श्लोकांवरुन लावता येतो. ते काहीही असले तरी सर्व पंथ एकाच मार्गाला जातात, सगळ्यांचे ध्येय एकच आहे असा विचार भारतीय मनामधे गीतेमुळे आला त्याचे काही फायदे झाले तसे काही तोटे पण झाले. पण तो आपला सध्या विषय नाही.

गीता साधारणतः इ पु २००० ते १५०० या काळात रचली गेली असावी असे काही जाणकार मानतात. याच काळातील बरेचसे साहित्य कालाच्या ओघात लिखित स्वरुपात असुनही नष्ट झाले आहे. यानंतर महत्वाची झालेली गोष्ट म्हणजे दोन संप्रदायांचा उगम. एक म्हणजे जैन आणि दुसरे बौध्द. या दोन्ही पंथांमधले सुरवातीचे साहित्य पाली आणी अर्धमागधीत झाले पण नंतर ते बरेचसे संस्कृतमधे पण झाले. सुरवातीच्या काळातला वाढत्या प्रसारानंतर जैन पंथ स्थिर होत पुन्हा वैदिक धर्माशी समांतर अंतर ठेवत मिसळुन गेला. वेगळे पणा आहे पण वेगळा नाही असे त्याचे स्वरुप आजही दिसुन येते. मात्र बौद्ध धर्माचे तसे झाले नाही. धर्मप्रसारासाठी अनेक केलेल्या युक्त्या प्रयुक्त्या यामुळे तो धर्म लवकरच जनमानसातुन उतरु लागला. राजाश्रयामुळे टिकुन राहिलेला धर्म राजाश्रय जाताच संपुन जातो, तसेच याचे पण झाले. आणि पूढे जवळपास भारतातुन तो नामशेष झाला. जो काही शिल्लक असेल तो वास्तुकला, शिल्पकला, मूर्ती तसेच स्तुप, विहार यांच्या रुपाने.

हे सगळे होत असतांना संस्कृत साहित्य त्याच्या सुवर्णयुगात होते असे म्हटले तर वावगे होणार नाही. काय काय निर्मिती नाही झाली? बघायला गेलो तर आश्चर्यमुग्ध होत जातो. तिकडे कणाद संसार दुःखमय आहे परंतु द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष आणि समवाय यांचे साधर्म्य आणि वैधर्म्य यांच्या ज्ञानाने दुःख निवृत्ती करता येते सांगत होता. तेच वैशेषिक. तर वैशेषिकांचा परमाणुवाद मान्य करत तर्कशास्त्राने दुःख निवृत्ती सांगणारा न्यायदर्शनाचा प्रवर्तक गौतम. हे होत असतांनाच जैमिनी कर्ममार्गाचे महत्व सांगत होता पूर्वमीमांसेतुन तर ज्ञान परम पुरषार्थ असुन संसार दुःखमय आहे हे कपिल सांख्य दर्शनातुन सांगत होता. योगाभ्यासाने यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारण, ध्यान, समाधी असा अष्टांगयोगाचा अवलंब करुन मुक्ती मिळते हे सांगणारा पतंजली. उपनिषदांतले विखुरलेले ज्ञानकण एकत्र करुन सुत्ररुपाने बद्ध झाले ते उत्तरमिमांसेत. हीच ती षड्दर्शने.

पण केवळ तत्वज्ञानाची निरस, रुक्ष चर्चा हेच साहित्याचे मापदंड का ? नाही. नाही. नाही. हे तर केवळ एक अंग आहे. तो बघा तिकडे कालिदास मेघाला पाहुन लिहित आहे मेघदुत, शाकुंतल. तर तिकडे पाणिनी जगातील सर्वोत्कृष्ट व्याकरण ग्रंथ लिहित आहे अष्टाध्यायी. तिकडे गणेश सहाय्याला आहे त्यामुळे निर्धास्तपणे कुरुवंशानी केलेले प्रताप व्यास सांगत आहे तर भावुक होत वाल्मिकी रामायण लिहित आहेत. तिकडे भरतमुनी नाट्यशास्त्राचे धडे देत आहेत तर भर्तृहारी नीतीशतक. तो बघा तिकडे एक विरक्त ब्राह्मण राज्य चालवण्यासाठी आवश्यक असलेले अर्थशास्त्र लिहित आहे. तर तिकडे बघा बघा.. ओळखलेत याला ? अहो हा तर वात्स्यायन. याच्याबद्दल काय जास्त बोलायचे !

हे सर्व चालु असतांनाच एक महत्वाची घडामोड होत होती. यज्ञसंस्कृती मागे पडत जावुन भागवत व भक्तिसुत्रांवर आधारीत भक्तीमार्ग वाढत होता. पुर्वी होवुन गेलेल्या राजांना देवतास्वरुप प्राप्त होत होते. लोककथांमधले पात्र विविध कथामाध्यमातुन लोकांचे मनोरंजन करत होते. त्यावर आधारीत असलेल्या कथा म्हणजेच आपली पुराणे. शेकडो पुराणांची रचना झाली. लोकांने जे आवडते ते ते सर्व अशा पुराणांमधे ठासुन भरलेले आहे. आजही मनोरंजनाच्या पातळीवर उत्कृष्ट ठरणारी पुराणे तत्कालीन समाजाने फारच उचलुन धरली. लोकांमधले रिवाज स्मृतीरुपाने बद्ध झाले. मनुस्मृतीचा दर्जा असलेल्या जवळपास ७० ते ७२ विविध स्मृती वेगवेगळ्या कालात रचल्या गेल्या. परंतु केवळ त्या स्मृतीनुसारच राज्यकारभार चालु आहे असे फारसे आढळत नाही. कारणपरत्वे गरज पडल्यास स्मृतींचा संदर्भ घेतला जाई, अन्यथा लोकाचार हाच निर्णयास कारणीभुत असे.

असा हा संस्कृत साहित्याचा सुवर्ण काल. एका पेक्षा एक सकस आणि मनोरंजक साहित्य. जीवनाचे कोणतेही क्षेत्र वर्ज्य नाही. साहित्य रचना करणारा अमुकच जातीचा असावा असे बंधन नाही. असे असतांना अचानक काही कारणाने संस्कृतमधली साहित्य रचना थंडावली. अक्षरशः शेकड्याने तयार होणारे ग्रंथ अवघे बोटावर मोजावे इतक्या कमी प्रमाणात व्हायला लागले. नवीन रचना थांबली. जुन्या रचनांवरच भाष्ये, वार्तिके तयार व्हायला लागली. नवी रचना झालीच तर जुन्याचीच आवृत्ती असल्याप्रमाणे !

असे का झाले ? कशामुळे झाले?
सकस साहित्यनिर्मितीचा ओघ अचानक का थांबला ?
लेखक इतर भाषांकडे का वळाले ?

तर त्याचे उत्तर - देववाणी.

कसे ते पुढील भागात.

{खुप सुंदर लेखमाला चालू आहे }

1

खुप सुंदर लेखमाला चालू आहे नाना !

खुप वाचनीय व जपुन ठेवावी अशी माहीती तु देत आहेस....


Hope is a good thing...

{सकस साहित्यनिर्मितीचा ओघ}

2

सकस साहित्यनिर्मितीचा ओघ अचानक का थांबला ?
लेखक इतर भाषांकडे का वळाले ?

वाचतोय नाना..
हा इतिहास मस्त चालु आहे..
पुढच्या भागाची उत्सुकता


-निखिल

{+१}

3

अगदी हेच म्हणतो.

{एक शंका लेख वाचुन कुठेतरी}

4

एक शंका
लेख वाचुन कुठेतरी मनात आलेली
लेखात बौद्ध धर्माचा लय का झाला ह्याचे दिलेले कारण एकमेव होते का???


-निखिल

{ले़खातले वाक्य खुप मोघम}

5

ले़खातले वाक्य खुप मोघम आहे.
विस्तृत लिहायचे तर लेखमाला (चार पाच भागांची कमीतकमी) लागेल.
असो.

{लिहावे अशी अवलियांना विनंती.}

6

लिहावे अशी अवलियांना विनंती.


Hope is a good thing...

{वाक्य मोघम आहे मान्य पण शंका}

7

वाक्य मोघम आहे मान्य पण शंका निर्माण करण्यालायक आहे म्हणुन प्रश्न उपस्थित झाला...
बाकी आपल्याकडे ह्या विषयईची माहिती असल्यास आमच्या समोर मांडावी असे वाटते...


-निखिल

{जरुर}

8

जरुर हास्य

{सावरकरांचे वाङमय वाचा बरीचशी}

9

सावरकरांचे वाङमय वाचा बरीचशी कारणे मिळतील बौद्ध धर्म नष्ट होण्याची.


-पुण्याचे पेशवे

{जर आपण ईथे थोडक्यात संगु शकत}

10

जर आपण ईथे थोडक्यात संगु शकत असाल तर ठीक...
काहिसे माहित आहेत... पण ईथे ह्या ईतिहासात लिहिलेले मोघम वाक्य ह्या लेखाला वेगळा अर्थ देउन जाउ शकते हे वाटले म्हणुन विचारले...
बाकी समग्र सावरकर दहाही खंड वाचलेले आहेत
त्याशिवाय अजुन काय काय वाचावे हे सांगा


-निखिल

{"भारतिय इतिहासातील सहा सोनेरी}

11

"भारतिय इतिहासातील सहा सोनेरी पाने" वाचले आहे??
जास्त माहिती त्यात मिळेल.

{मग सहा सोनेरी पानांत तुम्हाला}

12

मग सहा सोनेरी पानांत तुम्हाला कारण मिळाले असेल अशी आशा करतो. त्यात अनेक कारणे दिली आहेत बौद्ध धर्म लोकांच्या मनातून उतरण्याची. बौद्ध धर्माचा राजाश्रय जाण्याची. ती तुम्ही वाचलीत असतील अशी आशा करतो.
पंथसाठी केलेल्या युक्त्या प्रयुक्त्यांमुळे महानुभाव नावाचा असाच एक पंथ महाराष्ट्रातील लोकांच्या मनातून उतरला होता.


-पुण्याचे पेशवे

{माझ्या म्हणण्याचा रोख हा}

13

माझ्या म्हणण्याचा रोख हा प्रस्तुत लेखात लिहिलेले वाक्य हे संभ्रम निर्माण करु शकतो ह्या कडे होता.. त्या पुढे प्रस्थुत लेखाच्या लेखकाने हे एक मोघम वाक्य असल्याचे मान्य केलेले आहे. त्यापुढे जाउन लेखकाने बौद्ध धर्माच्या लयाची कारणे स्पष्ट करणारी एक लेखमाला लिहिण्याची मनिषा जाहिर केली. मी त्याला अनुमोदन दिले.. आता ह्यात माझे चुकले कुठे???


-निखिल

{आता ह्यात माझे चुकले}

14

आता ह्यात माझे चुकले कुठे???
लेखाचा अवाका लक्षात घेता बौद्ध धर्माचा र्‍हास हा लेखाचा विषय नाही हे लक्षात येईल. ते केवळ काळाचा आढावा घेता घेता योग्य ठिकाणी केलेले एक फारच साधे विधान आहे. त्यातही लेखक ३ वेगवेगळी कारणे उधृत करतो. असे असताना केवळ एकच कारण असे म्हणून (कदाचित ते आपण नजरचुकीनही म्हटले असेल) आक्षेप का घेत आहात हे कळले नाही. त्यामुळे आपला प्रतिसाद भरकटवणारा, मूळ मुद्याला उगाचच फाटा फोडणारा वाटला. म्हणून हा उपप्रतिसाद प्रपंच. असो.


-पुण्याचे पेशवे

{केवळ काळाचा आढावा घेता घेता}

15

केवळ काळाचा आढावा घेता घेता योग्य ठिकाणी केलेले एक फारच साधे विधान आहे.

असे तुम्हाला वाटतय... प्रत्येकाला वाटायला पाहिजेच असे आहे का???
त्यातही लेखक ३ वेगवेगळी कारणे उधृत करतो
एकुणच लेखमालेचा आढावा घेताना मला तो भाग अनावश्यक वाटला म्हणुन आक्षेप घेतला... लेखाकाने त्याबद्दल दिलेले स्पष्टीकरण मला पटलेही होते. पण ह्या उपर जो आपण सावरकरांचे वाङमय वाचा बरीचशी कारणे मिळतील बौद्ध धर्म नष्ट होण्याची. हा सल्ला दिला त्याची गरज मला समजलीच नाही. आणी तेथुनच पुढे मुळ विषय भरकटायला लागला. असो.


-निखिल

{आपली पहीली शंका रास्त होती.}

16

आपली पहीली शंका रास्त होती. पण,
वाक्य मोघम आहे मान्य पण शंका निर्माण करण्यालायक आहे म्हणुन प्रश्न उपस्थित झाला...
बाकी आपल्याकडे ह्या विषयईची माहिती असल्यास आमच्या समोर मांडावी असे वाटते...

परंतु वरील वाक्यांपासून विषय भरकटायला लागला असे वाटते. लेखकाने वाक्य मोघम आहे हे मान्य केल्यावरही आपण "पण शंका निर्माण करण्यालायक आहे म्हणुन प्रश्न उपस्थित झाला.." असे म्हणालात. बाकी आपल्याकडे ह्या विषयईची माहिती असल्यास आमच्या समोर मांडावी असे वाटते... हे वाक्य तर केवळ विषय भरकटवण्यासाठी आले आहे असे वाटले.
एकुणच लेखमालेचा आढावा घेताना मला तो भाग अनावश्यक वाटला म्हणुन आक्षेप घेतला...
आम्हाला वाटला नाही. आम्हाला लेखाचा अत्यावश्यक भाग वाटला. कारण शंकराचार्यांच्या नंतरच्या काळात काही बौद्ध लोकांनीही संस्कृतात लेखन केले आहे. त्यामुळे त्या साहित्याचा किंवा एकूण साहित्याचा आढावा घेताना त्याचा उल्लेख आवश्यक वाटतो.
आपल्याला बौद्ध धर्माच्या र्‍हासाबद्दल शंका आहे असे वाटले. त्याबद्दल खात्रीशीर माहीती मिळण्यासाठी सावरकरांचे वाङमय हा उत्तम मार्ग आहे. आपल्याला सल्ला पटला नाही तर दुर्लक्ष करायचे होते.
"बाकी समग्र सावरकर दहाही खंड वाचलेले आहेत
त्याशिवाय अजुन काय काय वाचावे हे सांगा" हि वाक्ये लिहीण्याचे कारण आम्हालाही समजले नाही. असो.


-पुण्याचे पेशवे

{कूल}

17

कूल डाऊन. कूल डाऊन. wink

{कूल्ड डाऊन अ‍ॅक्चुअली. अंमळ}

18

कूल्ड डाऊन अ‍ॅक्चुअली. अंमळ हिट्स वाढवतो आहे.


-पुण्याचे पेशवे

{हो}

19

हो.

{लिहा....}

20

वाचतेय....लिहित रहा.

{सुंदर इतिहास. पुढील भाग}

21

सुंदर इतिहास. पुढील भाग वाचण्यास उस्तूक आहे.

बाकी मागे वाचले होते की संस्कृत ही मुळ/नैसर्गिक भाषा नसून भारतातील विविध भाषांमधे सुसुत्रता यावी म्हणून विविध भाषांच्या पंडीतांनी एकत्र येऊन एक व्याकरणाच्या नियमांनी घट्ट बांधलेली भाषा निर्माण केली. उद्देश हा की वेगवेगळ्या बोली बोलणार्‍या लोकांना एकत्र आल्यावर काव्यशास्त्रवविनोद, वाद आदींसाठी एक समान भाषा असावी. इतक्या वर्षात ही भाषा फारशी बदलली नाहि हे बघता हा तर्क एका दृष्टीकोनातून बरोबरही वाटतो. आआहे?मत जाणून घ्यायला आवडेल


-ऋ

{दुस-या भागातील परिच्छेद. भाषा}

22

दुस-या भागातील परिच्छेद.

भाषा ही सतत बदलती असते. जसे वापरायला सोपे पडेल तसे शब्द बदलले जातात. नवे शब्द केले जातात. भाषेत नवे शब्द तयार होवु शकत नसतील तर ते दुस-या भाषेतुन जसेच्या तसे उचलले जातात. भाषा कधीही मृत होत नाही, तिचे स्वरुप बदलते. अश्मक प्रांतातील भाषा महाराष्ट्री प्राकृत बदलत बदलत अर्वाचीन मराठी होते तर शौरसेनी मागधी भाषा बदलत जावुन हिंदी होते. वेगवेगळ्या भागात वेगवेगळी बोली असतेच असते. अशा वेळेस ज्ञानाची देवाण घेवाण करण्यासाठी तसेच ते ज्ञान टिकवुन धरण्यासाठी, जे काही सांगायचे आहे ते जसेच्या तसेच समोरच्याकडे पोहोचण्यासाठी एका प्रमाण परिभाषेची, संकेतांची आवश्यकता असते. अन्यथा विपरित अर्थ घेतला जावु शकतो. आणि या समस्येवर मात करण्यासाठी एक भाषा तयार केली गेली, परिभाषा तयार केली गेली. ज्यामुळे ज्ञानाचे संरक्षण सुलभ झाले. जे काही सांगायचे ते जसेच्या तसे समोरच्याला कळु लागले. वेगवेगळी बोली असलेल्या केरळापासुन काश्मिरापर्यत सर्वाना एकाच भाषेमुळे एकमेकांशी संपर्क ठेवणे सुलभ झाले. काय झाले नक्की ? तर ज्या विशिष्ठ काळात हे झाले तेव्हा बोलल्या जाणा-या प्राकृत म्हणजे नैसर्गिक (प्रकृतीतुन उत्पन्न झालेल्या) भाषांवर संस्करण करुन एक भाषा तयार झाली ती म्हणजेच संस्कृत.. (संस्करण करुन तयार केलेली कृत).

हास्य

{लेखमाला छान सुरु आहे.}

23

लेखमाला छान सुरु आहे. विस्ताराने लिहावे अशी विनंती.

{नाना सहज आणी सोप्या साध्या}

24

नाना सहज आणी सोप्या साध्या शब्दातील विवेचन आवडले. पुढे वाचायची उस्तुकता आहेच.

गीता साधारणतः इ पु २००० ते १५०० या काळात रचली गेली असावी असे काही जाणकार मानतात. याच काळातील बरेचसे साहित्य कालाच्या ओघात लिखित स्वरुपात असुनही नष्ट झाले आहे.

गीतेतील मुळ अध्याय / श्लोक आणी त्यात नंतर घातली गेलेली भर ह्यावर थोडे विस्तृत लिखाण आले असते तर अजुन वाचायला आनंद झाला असता व ज्ञानात भर देखील पडली असती.

{बौद्ध आणि जैन धर्माचा उदय / विकास}

25

बौद्ध आणि जैन धर्माचा उदय / विकास होण्यास काही प्रमाणात हे साहित्य प्रत्यक्ष किन्वा अप्रत्यक्ष रित्या कारणीभूत असावे असे वाटते...म्हणजे यजुर्वेदा किन्वा अथर्ववेदा( तन्त्र-मन्त्र ) सारख्या ग्रन्थान्मुळे सामान्य लोक हिन्दू विचारसरणी प्रती अनाकर्षित झाले असावेत का?


पुष्करिणी

{तोटे}

26

गितेमुळे झालेले तोटे ह्यावर विस्तृत लेख वाचायला आवडेल.

{मास्तर!!!!!!!}

27

मास्तर!!!!!!!

{नानाश्री ,,,आपण लिहीत रहा...}

28

नानाश्री ,,,आपण लिहीत रहा...

{वाचतोय...}

29

वाचतोय...

{वाचतोय...}

30

वाचतोय...

{सुंदर इतिहास, व माहितीपुर्ण}

31

सुंदर इतिहास, व माहितीपुर्ण लेखमाला.
सर्व भाग आवडले.