आण्णांची माघार की नवा डाव?

0
0

आत्ताच आमचा आतला खबरी कळवतो आहे की अण्णांनी म्हणे किरण बेदी आणि केजरीवाल यांना बाजुला सारुन विलासरावांशी वाटाघाटी केल्या आहेत.
"संसदेत चर्चा सुरू करा, मी उपोषण मागे घेईन" - इती अण्णा.

{http://maharashtratimes.india}

1

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9735758.cms

आंदोलन एकदम वेगळ्यावळणावर पोहचले आहे.
ज्यांना उत्सुकता आहे त्यांनी आता लाईव्ह चालू असलेला सीएनएन आयबीएन वर चालू असलेली चर्चा पहा.
चर्चेमध्ये असलेले सहभागी व्यक्ती : निखिल वागळे, राजदिप, विनिता देखमुख, डॉ. धर्माअधिकारी, तुषार गांधी, अनुपम खेर, अमोल पालेकर, अजून एक आहे तीचे नाव माहिती नाही.. जस्ट वॉच.. पहिल्यांदा एवढी सुंदर चर्चा चालू आहे या विषयावरच... !!


Hope is a good thing...

{आण्णा हजारे यांनी आतापर्यंत}

2

आण्णा हजारे यांनी आतापर्यंत जी उपोषणे केली त्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे १२ दिवसांचे उपोषण होते, बहुतेक वेळा विलासरावांनी यशस्वी मध्यस्थी केलेली आहे. आताही आपण म्हणता त्याप्रमाणे आण्णांनी एकदम हटवाद सोडला असुन तुम्ही चर्चा सुरु करा मी उपोषण मागे घेतो असा पवित्रा घेतला असावा असे दिसते आहे, या चर्चेतुन काय निष्पन्न होईल हे कोणालाच माहीती नाही, संसदेत या विषयावर चर्चा सुरु झाली म्हणजे आण्णानाही आपण जिंकलो, आपले आंदोलन यशस्वी झाले असे वाटेल आणि त्या विधेयकाचे काय करायचे याचा सर्वस्वी अधिकार संसदेकडे जाईल, तोपर्यंत आण्णांनी उपोषण मागे घेतलेले असेल, चारपाच दिवसात आंदोलनाची धारही कमी झालेली असेल आणि ते विधेयक संसदेने फेटाळले तरी हे आंदोलनाचे वातावरण परत तयार होणार नाही, त्यामुळे नकळतच या प्रश्नी सरकार अंतिमतः जिंकलेले असेल...


"मराठी माणसा जागा हो, मी "मराठीचा" धागा हो"

{मुद्दा रास्त आहे. >>उपोषणे}

3

मुद्दा रास्त आहे.

>>उपोषणे केली त्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे १२ दिवसांचे उपोषण होते

१२ की १५ दिवस?
माझ्या माहिती प्रमाणे १५ दिवस


Hope is a good thing...

{आण्णा हजारे यांनी १९९६ मध्ये}

4

आण्णा हजारे यांनी १९९६ मध्ये महाराष्ट्र मंत्रीमंडळातील दोन मत्र्यांविरुध्द उपोषण केले होते ते तब्बल १४ दिवस चालले त्यावेळी त्यांचे वय ५९ वर्षांचे होते. तेच १४ दिवस न्हणजे सर्वाधीक दिवस चाललेले उपोषण.


"मराठी माणसा जागा हो, मी "मराठीचा" धागा हो"

{सरळ मुद्दा...}

5

अण्णा गेली २० वर्षे कार्य करत आहेत. त्यांनी डझनभर वेळा उपोषणे केलेली आहेत. त्यांचा अनुभव त्यांची समज दांडगी आहे.
ज्यांनी आयुष्यात एकदाही उपोषण केलेले नाही, जे अण्णांचे कार्य, त्यांची प्रतिमा, त्यांचा जनाधार यांच्या जीवावर स्वतःला अस्सर्ट करु इच्छितात ते मुळात अनभिज्ञ आहेत.
आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर अण्णा सहजपणे लोकांवर विश्वास ठेवतात पण तो अनाठाई आहे असे वाटले तर तेवढ्याच सहजपणे लोक बदलतात. ते अशा लोकांना पुरुन उरतात.
इंडिया अगेन्स्ट करप्शनला वाटले असावे की अण्णांना एकदा देव्हार्‍यात बसवले की दहा दिवसांनी अण्णांचे विसर्जन करुन पुढच्या अनेक पिढ्यांकरता पुजार्‍यांचे कोटकल्याण होईल. पण अण्णा अण्णाच आहेत. त्यांचा संपर्क तोडण्याचा कितीही प्रयत्न झाला तरी ते त्यांचा मार्ग स्वतः शोधु शकतात.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

{बडवे वि. विठ्ठल..}

6

प्रसन्नदा, तिथे बडवे वि. विठ्ठल.. अशी परिस्थिती आहे असे तुम्हाला वाटते का हो ?

(इंडिया अगेन्स्ट करप्शन मधे/ टिम अण्णा मधे) ???


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

{दिसतय तरी तसेच.}

7

दिसतय तरी तसेच.


Hope is a good thing...

{प्रताप आसबे यांचा लेख - मटा मधे - }

8

प्रताप आसबे यांचा लेख - मटा मधे -

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10302329.cms

हा लेख काही पटला नाही.

हजारे यांनी गांधी आचरणे सोडा पण किमान वाचलेत की नाही , अशी शंका येते . परवाच्या उपोषणाने त्यांचे नाव जगभर झाले . पण तेवढ्याने मोठेपण येत नाही . त्यांचे जसजसे नाव होत गेले तसतसा अहंकार वाढला . नम्रता उणावली . मग्रुरी वाढली . ज्यांच्यावर संस्कार असतात ते यशापुढे विनम्र होतात . दुर्दैवाने हजारेंबाबत याची प्रचीती आली नाही . जंतरमंतर आणि रामलीला मैदानावर त्यांना , त्यांच्या आंदोलनाला यश लाभले . पण यशामुळे त्यांच्या वागण्याबोलण्यात अहंकाराचा दर्प वाढत गेला.

राळेगणसिद्धीने तर सगळ्यांपुढे मजल मारून त्यांना ' महात्मा ' ही उपाधी दिली . त्यावर मानभावीपणे हजारे म्हणतात , ' गांधीजींच्या पायाशी बसण्याची माझी पात्रता नाही .

अण्णांच्या नम्रतेला मानभावीपणा म्हणणे म्हंजे फारच झाले.

नम्रता हे over-rated and under-valued मूल्य आहे .... असे मी मानतो ... पण अण्णांची नम्रता मानभावीपणा व बाळासाहेबांची अरेरावी म्हंजे परखडपणा/स्पष्टवक्तेपणा ?

---

खरेतर , हजारे यांची गांधींच्या नखाशीही तुलना होऊ शकत नाही . गांधीजींनी कायद्याचे उच्च शिक्षण घेतले . अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते . विविध धर्मशास्त्रे , नीतिशास्त्रे , तत्त्वज्ञाने , राजकीय विचारधारा यांचा त्यांचा अभ्यास होता . मानवी जीवनाकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी होती . स्वावलंबन हे मूल्य म्हणून प्रस्थापित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला . श्रमाधारित पर्यायी अर्थव्यवस्थेचा मार्ग त्यांनी दाखवला. सत्य आणि अहिंसा या मूल्यांवर प्रगाढ निष्ठा होती . त्याच माध्यमातून ते ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात लढले .

अण्णांची गांधींशी तुलना करण्याचा प्रयत्न बिनडोक तर आहेच पण तोकडा ही आहे.

एक तर अण्णांनी बुद्धिमत्तेचा/विद्वत्तेचा आव कधीही आणला नाही. दुसरे अण्णांनी हिंसात्मक आर्ग अवलंबल्याचे आठवत नाही. व भ्रष्टाचाराविरुद्ध त्यांचा लढा प्रामाणिक आहे.

गांधींची मानवी जीवनाकडे पाहण्याची दृष्टी व्यापक असेलही ... त्यांचा अभ्यास गाढ असेलही.... पण केवळ अण्णा हे गांधींइतके intellectual नाहीत म्हणून त्यांना कमी लेखणे हे अरुण शौरी यांच्या पुढे प्रताप आसबेंना फडतूस समजण्यासारखेच चूक आहे. (गृहितक - शौरी हे intellectual आहेत.)

------------

परवा काही कारण नसताना बाळासाहेब ठाकरे आणि हजारे यांच्यात एकदम हमरीतुमरी झाली . त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत ठाकरे यांनी अशाने भ्रष्टाचार नष्ट होणार नाही , इतकेच म्हणाले . यात मनाला लागण्यासारखे फारसे नव्हते . पण हजारे यांनी त्यांचे वय काढले . काहीही बरळताहेत , असा टोला हाणाला . जरा वेगळे मत कोणी व्यत्त केले तरी ते संतापून उठतात . खरे म्हणजे , ठाकरे हे लोकशाही मानत नाहीत . हुकूमशाहीचे त्यांना अप्रूप आहे . अनेकांचे त्यांच्याशी मतभेद आहेत . पण आपली मते त्यांनी कधी लपवून ठेवली नाहीत . हजारे लोकशाहीची आणि साधन शूचितेची भाषा करतात . पण प्रत्यक्षात त्यांचा व्यवहार हुकूमशाहीचा आहे . त्यामुळे परवा दोघांमधील हुकूमशहांच्या इगोची चकमक झाली , एवढाच त्याचा अर्थ .

एकाचे लेखात अण्णांची तुलना बाळासाहेब व गांधींशी ?

अण्णांची नम्रता हा मानभावीपणा व बाळासाहेबांची अरेरावी म्हंजे परखडपणा ?

अण्णांवर दिवस रात्र प्रहार करणारे दिग्विजय, मनिष तिवारी, सिब्बल दिसले नाहीत ... त्यांचे अण्णांनी शांतपणे झेललेले वार दिसले नाहीत ...
पण फक्त अण्णांची बाळासाहेबांशी झालेली चकमक दिसली.

आणि आसबे साहेबांचा "सडेतोड" युक्तीवाद काय तर म्हणे - वारेमाप कौतुक . भरभरून प्रसिद्धी . आणि दैवी स्पर्श झालाय म्हणून एखाद्यापुढे घडघडा घातलेली लोटांगणे . यांचे शेवटी काय होते याचे उत्तम उदाहारण म्हणजे ......

दुसरा युक्तीवाद काय तर म्हणे - काही जाणकार आणि डॉक्टरांचे उपोषणाबद्दल आक्षेप आहेत . काहींनी मागेही ते उघड व्यक्त केले . त्यांच्या प्रत्येक उपोषणात स्टीलचा पेला सोबत असतो . त्यातून ते पाण्याबरोबर इलेक्ट्रॉल आणि ग्लुकोज पावडर घेतात , असे म्हणतात . यात जराही तथ्य असेल तर कोट्यवधी लोकांनी ठेवलेल्या विश्वासाचा घातच म्हणावा लागेल ...

आसबे साहेब - किती क्षुल्लक व फुटकळ युक्तीवाद करताय राव ? तुमची पत्रकारितेची कारकीर्द संपत आली तरी तुमचे युक्तीवाद अ‍ॅड्व्हान्स्ड कधीच झाले नाहीत. तुम्ही सुमार दर्जाचे पत्रकार राहिलात.

(मी मान्य करतो की मी ad-hominism वापरला आहे पण... आसबे साहेबांच्या लेखाचा मूळ गाभा अण्णांवर टीका करण्याचा आहे व तो काही प्रमाणावर तरी ad-hominism च आहे.)


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

{मटा तुम्ही वाचता ??? असो}

9

मटा तुम्ही वाचता ???

असो ,

wink

बाकी वर सगळा समाचार तुम्ही घेतला आहेच..


Hope is a good thing...

{ad-hominism }

10

ad-hominism बाबत माहीती नाही. पण लेखाच्या तुम्ही दिलेल्या लिंकवरील प्रतिक्रिया आवर्जुन वाचल्या अन वेगवेगळ्या मनस्थितींचा अनुभव आला. आधी हसु आले, त्यानंतर हतबुद्धता वाटली अन आता कीव येते या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

{+१ असेच म्हणतो.}

11

+१ असेच म्हणतो.


Hope is a good thing...