सही रे सही

0
0

आज चॅनेल सर्फिंग करताना एका न्यूज चॅनेलवरील बातमीने लक्ष वेधून घेतले ...
भारत आणि नेपाळ यांनी काही करारांवर "सह्या" केल्या ...

वाटलं की सह्या केल्या असं का म्हटलं ... फक्त करार केले, कागदपत्र केले असं म्हटल असत तर काय बिघडल असतं ? सही या एका शब्दाने काय फरक पडला ... असाच विचार करता करता "सही" किती महत्वाची आहे यावर जे काही सुचलं .. ते लगेच टंकल .... हास्य

बेसिक प्रश्न ... सही म्हणजे नक्की काय ? उत्तरासाठी नेहमीप्रमाणे गुगल देवांची आराधना करायला सुरवात केली ... देव लगेच प्रसन्न झाले ..
"It is a handwritten (and sometimes stylized) depiction of someone's name, nickname or even a simple "X" that a person writes on documents as a proof of identity and intent."

सही म्हणजे नुसतं हस्तलिखित नावं वगैरे नाही तर सही सांगते की सही करणारा त्या कागदाच्या तुकड्याची [ज्या कागदावर सही केली आहे]जबाबदारी घेतो आहे. त्याच्या सत्यतेला तोच जबाबदार आहे ...
खरचं किती महत्त्व आहे ना सही ला ?

अगदी शाळेमधलं "प्रगतीपुस्तक" आठवा ... आपल्या दिवट्याने काय दिवे लावलेत ते पाहून सही करणारे पप्पा दिसताहेत ना ...
किंवा शाळेला दांडी मारली असेल .. मास्तर काय म्हणाले ते आठवा ..
वडिलांची सही आणल्याशिवाय वर्गात बसू देणार नाही असे म्हणणारे मास्तर सही नसती तर काय म्हणाले असते ?

जरा मोठे व्हा ... कॉलेजमधली प्रॉक्सी अटेंडन्स आठवा ? wink
आमच्या कॉलेजमध्ये मास्तर प्रत्येक विषयाच्या तासाला अटेंडन्स शीट द्यायचे ... माझ्या एका मित्राने त्याच्या [मानलेल्या] गर्लफ्रेंडची एकदा सही केली ..ती वर्गात नसताना .. आणि नेमकं त्याच दिवशी मास्तर नी चेक केलं की खरचं एवढे लोक आलेत का ते .... जे प्रत्यक्षात नव्ह्ते पण पेपर वर होते त्यांची मस्त बिनपाण्यानं केली पुढ्च्या तासाला + ज्यांनी प्रॉक्सी केली होती त्यांची पण ... असो अवांतर झालं ... तर मग सांगा सही नसती तर काय केलं असतं ?

असच विचार करा .... लिहलं असेल तर wink प्रेमपत्र आठवा .. तुझाच असं लिहून नावचं नसेल लिहिलं तर तिला कळणार कसं की मागे मागे फिरणार्‍यांपैकी नक्की कुणी लिहिलं ? नाव ही पण एक प्रकारची सहीच झाली ना मग ?

आंतरजालावर भटकताना मी बर्‍याच वेगवेगळ्या सह्या पाहतो .. काही मजेदार तर काही विचित्र ... तर काही क्षणाक्षणाला बदलणार्‍या .. ह्या सह्यांवरून झालेली वादावादी पण चांगलीच लक्षात आहे wink .... सही वरून स्वभाव, आचार्-विचार समजतात हेही ऐकलं आहे .. असो ... हास्य

शिनेमातल्या लोकांच्या , लेखकांच्या सह्या एकदम स्टायलीश असतात .. आणि किमती सुध्दा 8) ... बर्‍याच जणांना छंद असतो अशा मान्यवरांच्या सह्या गोळा करायचा .... सह्या केलेल्या वस्तू खरेदी करायचा ... मुझे कुछ कहना है मध्ये करीनाला असाच काहीसा छंद असतो पण मदत करणार्‍या लोकांच्या सह्या घेण्याचा ... मला तर वाटतं "आदिदास" सचिनला सांगत असेल ह्या १०० चेंडूफळ्या घे सह्या करुन दे ... मग त्याचा लिलाव करत असतील [फक्त उदाहरण दिलय बरं ... आम्ही पण "देवां"चे पंखे आहोत Evil ]

तर आता जरा पुराणात / इतिहासात डोकवा ... रामायणात सीतेने कसं ओळ्खल की हनुमान रामाचा दूत आहे ? त्या प्रसंगात "अंगठी" ने सहीची भुमिका केली ...

"राजे" लोक राजमुद्रा का वापरायचे ? ती पण एक सहीच ना ....

आनंदीबाईने ध चा मा [धमु नव्हे] केला पण त्यावर राघोबादादांची सही होती म्हणूनच गारद्यांनी ती आज्ञा पाळली ना ...

वेडात मराठे वीर दौडले सात ... का ? प्रतापराव गुजरांनी महाराजांची सही असलेलं पत्र पाहिलं/वाचलं म्हणूनच ना ... तेच जर अष्टप्रधानांपैकी कुणाच्या सहीचं पत्र असतं तर दौडले असते का ?
...अंमळ जड होतयं Crazy ... वर्तमानात येवू ...

बँकेच्या व्यवहारात तर सही म्हणजे काय सांगू ... मी स्वतः बर्‍याच वेळा अनुभव घेतला आहे ... बँकवाले तर सह्या साठवून ठेवतात [scan] ... पण सही जरा जुळली नाही तर फार त्रास .. माझ्या पप्पांची एका बँकेत मराठी सही होती आणि एका बँकेत इंग्रजी ... बर्‍याच वेळा गफलत झाली आहे.. ह्याच बँकवाल्यांनी मला डिमांड ड्राफ्ट सहीशिवाय दिला होता ... अस्मादिकांनी पण तसच फॉर्म सोबत पाठवून दिला होता ... फॉर्म परत आला ... तेव्हापासून मी चार चार वेळ चेक करतो की चेक , डि.डि.वर नक्की सही आहे की नाही ते हास्य

आता जरा शिनेमाकडे वळू ...

बच्चनरावांचा सहीविषयीचा डायलॉग तर प्रसिद्ध आहे .. "जाओ पहले उस आदमी के साइन लेके आओ , जिसने मेरे हाथ पे ये लिख दिया ....."

तसच बर्‍याच शिनेमांमध्ये ... मराठी,हिंदी दोन्ही ...एक सीन असतोचं असतो ... व्हीलन नी हिरो,त्याची आई वगैरेना बांधून ठेवल आहे आणि हिरोच्या बापाला व्हिलन म्हणतो की इन सब की जिंदगी चाहते तो इन कागजातों पे जहां जहां फुली मारली है , वहां वहां साईन करो ... ..

आता जरा सिरिअसली सह्या बघू .... कोणतेही ऑफिशियल पत्र असेल, राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पातळीवरचे करार दस्तावेज असतील तर वेगळा भाग लक्षात येतो .. .. इथे कुणी एकटा जबाबदार नसतो
उदाहरणार्थ ऑफर लेटर .. एखादी कंपनी जेव्हा तुम्हाला पत्र देते त्यावर कोणा एच्.आर. ची सही असते .. ते तो कंपनीतर्फे करतो ... ती व्यक्ती नाही तर कंपनीने तुम्हाला नोकरी दिलेली असते ..
तसचं काहीस राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पातळीवरचे करार, दस्तावेज असतात ... अटलबिहारी वाजपेयींनी ज्या करारांवर सह्या केल्या. ते करार अटलबिहारी पंतप्रधान नसतानाही भारत सरकारला बंधनकारक ठरतात ...
तसचं जे जास्त महत्वाचे नसतात पण संख्येने जास्त असतात अशा कागदपत्रांसाठी सहीचे शिक्के बनवून घेतात ..
आजकाल तर कंटेंट सीक्युअर ठेवण्यासाठी डिजिटल सह्या, बायोमॅट्रिक सह्या, क्रिप्टोग्राफिक सह्या वगैरे वापरतात

तर मित्रहो ... झोप फार येते आहे ..... हे सहीपुराण इथेच थांबवतो ....

-संग्राम

सही रे सही लेखामध्ये

सही रे सही लेखामध्ये सह्यांविषयीचे सही सही वर्णन आलेले आहे.
मीम वरच्या लेखांच्या सह्या गोळा केल्या असत्या तर लेख आणखी वजनदार झाला असता.

आता हीच सही बघा ना:

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)
(वरची माझी सही आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)

अन ही पण सही बघा:




मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

अरे वा ! सही विषयी खुप रोचक

अरे वा !

सही विषयी खुप रोचक माहीती मिळाली हास्य

मस्त लिहले आहेस जसे गप्पा मरतो तसे.



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

सही.

सही.हास्य

सही.....

मस्तच लिहले आहे. वाचताना कधी संपले ते कळालेच नाही,एकदम खुसखुशीत लेख.
आनंदीबाईने ध चा मा [धमु नव्हे] केला पण त्यावर राघोबादादांची सही होती म्हणूनच गारद्यांनी ती आज्ञा पाळली ना ...
मस्त्च Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

राघोबादादान्ची सही होती की

राघोबादादान्ची सही होती की राजमुद्रा होती?



पुष्करिणी

राजमुद्रा असेल हो

राजमुद्रा असेल हो .. पण मला अस म्हणायचं आहे की त्यावरूनच गारद्यांना आज्ञा कुणाची आहे हे समजलं ... मग ती एक प्रकारची सहीच नाही का हास्य

येगझ्यागटली!

सही म्हणजे काय? एकप्रकारची संमती... विंग्रजीत म्हणाल तर अ‍ॅप्रुव्हल. आता डिजिटल सिग्नेचर म्हणजे काय असतं? एक एन्क्रिप्टेड कोड... मग तीही सहीच की...तशीच राजमुद्राही. हास्य

अवांतरः मॅक्डॉवेल सिग्नेचर नक्की कोणत्या क्याटेगरीत येईल बरं? Steve

एक शन्का : या केसेस मध्ये

एक शन्का : या केसेस मध्ये व्यक्तीपेक्षा ( सही) हुद्द्याला (शिक्का) जास्त महत्व नाही का?



पुष्करिणी

अलबत! नक्कीच!!

पण म्हणुनच तर प्रत्येक व्यक्तीचा शिक्का निरनिराळा होता ना.
म्हणजे एका अर्थानं पाहिलं तर व्यक्तीपेक्षा शिक्का महत्वाचा...पण शिक्का देणारी व्यक्तीही तितकीच महत्वाची ही दुसरी बाजु झाली!
जसं, तुमची डिजिटल सिग्नेचर मी वापरु शकत नाही...जरी ते हस्तलिखीत नसलं तरी! तसंच.
किंवा, मी बँकेत गेलो, आणि पैसे काढण्याच्या स्लिपवरची माझी सही चुकली असेल/सहीऐवजी अंगठा दिला असेल तर मला पैसे कुठे मिळतात? (नेहमीच्या बँकेत जिथे कॅशियर, मॅनेजर आपल्याला ओळखतात तिथे थोडसं शिथिल असू शकतात नियम..पण थोडेच.)

अर्थात, जसं खोट्या सह्या करुन बँकेतुन पैसे पळवता येतात, तसंच हे शिक्के चोरुन/अनैतिक मार्गाने वापरुन कागदपत्रं प्रमाणित करणे/संमती/नकार ह्या गोष्टी होतच होत्या की!

धन्यवाद धमु

धन्यवाद धमु

छान लेख !

छान लेख !

+१

असेच म्हणतो.

लिहीत रहा.

अहो संग्रामसिंह हे सही पुराण

अहो संग्रामसिंह
हे सही पुराण जोरदार झाले आहे की..
अबे आता असेच लिहित रहा...
नाही तर एक प्रतिसादातली सही फेकुन हाणेल



-निखिल

झोप आली नसती तर अजुन वाचायला

झोप आली नसती तर अजुन वाचायला मिळाल असत असो..........

सहीविषयीची बरीच माहिती मिळाली .................

लेख एकदम मस्त झाला आहे.....



हास्य

झोप आली नसती तर अजुन वाचायला

झोप आली नसती तर अजुन वाचायला मिळाल असत असो..........

हास्य

बाकी लेख चांगला झाला आहे ह्या बद्दल दुमत नाही.



-निखिल

या निमित्तानं

या निमित्तानं काल-परवाच उडालेल्या एका सहीची आठवण झाली. अशा इतरही काही प्रसिद्ध सह्या आठवल्या. अर्थात, या सगळ्या आंतरजालीय सह्या आहेत. त्यावरही लिहा एकदा...

मोमो

मोमो Grade



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

एकदम सही जमलं

या सही वरुन मला ओळखपत्रं आठवलं.
वपुंनी एका कथाकथनात तर असं सांगितलं आहे की,
ओळखपत्रासारखी विनोदी वस्तु दुसरी कुठली नाही. कारण समोर खुद्द तुम्ही उभे असाल तरिही तुम्हाला
ओळखपत्रं विचारतात. समोरच्या मनुष्यावर विश्वास न ठेवता त्या छोट्या कागदाच्या तुकड्यावर विश्वास जास्त
ठेवला जातो.

असो. खुप छान जमलाय लेख. मजा आली वाचुन....

संदिपराव ह्याबद्दल लिहुन

संदिपराव ह्याबद्दल लिहुन आपणही लेखनाचा शुभारंभ करावा..
जरा विसॄत लिहा की राव



-निखिल

नक्की प्रयत्न करेन

नक्की प्रयत्न करेन ...

जीवनाच्या अविभाज्य अंग

जीवनाच्या अविभाज्य अंग असलेल्या छोट्याश्या सही बद्दल सही लिहिलय हास्य



*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

झकास जमुन आलाय लेख.

झकास जमुन आलाय लेख.

सही लेख.. मला पण वाचता वाचता

सही लेख..
मला पण वाचता वाचता अशाच सह्यांच्या आठवणी आठवल्या...
कॉलेजमध्ये शिकत असताना केलेली एकमेव प्रॉक्सी!!!आता वर्गाच्या बाहेर मस्टर ठेवलेलं असतं...कधी जाऊन सही करायचा कंटाळा येतो तेव्हाही पर्याय नसतो कारण बाकीच्या मैत्रिणी एकमेकींच्या सह्या करू शकतात.. नि त्यांच्या मते माझी सही करायला अवघड आहे!!! Sad

नि डी.डी. वर मॅनेजर ने सही न करता देणे नि तो आपण न चेक करता पाठवणे हा किस्सा माझ्याही बाबतीत घडलाय... त्यामुळे मीही आता खबरदारी घेतेच!!!!

पु ले शु!!! हास्य

सही

झालाय लेख.

सही रे !!

सही रे !!

सही रे!!!

संग्राम,
सहीपुराण मस्तच. चला सही रे सहीच्या निमित्तानं का होईना, गलगले निघाऽऽले.... हास्य

माझ्या सहीबद्दल काय सांगावं? एकाच वेळी दोन सह्या केल्या तरी दोन्ही सही-सही जुळतच नाहीत. Crazy
जिथं स्वतःचीच सही धड जमत नाही, तिथं प्रगतीपुस्तकावर तिर्थरुपांची सही करण्याचा प्रश्नच येत नाही...म्हणजे, करुन पाहिलं एकदा...शाळेत मास्तरांनी आणि घरी हिटलरनं बडव बडव बडवल्यावर तो नादच सोडला Sick

बरं, इंग्रजीत सही करावी म्हणलं तर लोक म्हणतात, काय सही आहे का ईसीजी रिपोर्ट Sad
मराठीत सही करावी म्हणलं तर मोठ्ठी बोंब...आद्याक्षरं घ्यायची म्हणजे सहीच्या सुरुवातीलाच 'कै' लागतं...झालं? स्वतःच स्वतःच्या फोटोला चंदनाचा हार घातल्याची भावना होते...

आता मी मोडीमधुन सही करायला शिकणार आहे. पाहुया त्यात तरी काही खुसपट नाही ना निघणार Big smile

(विषय दिलेला नाही)

Laughing out loud Laughing out loud

खी खी खी!! याबाबतीत मी

खी खी खी!!
याबाबतीत मी हुश्शार आहे बरं!! बाबांची सही जमत नाही म्हणून त्यांच्या आद्याक्षरांची सही करून हीच त्यांची सही आहे असं आधीच शाळेत सांगितलं होतं.. त्यामुळे खुद्द तीर्थरूप जरी स्वतःची सही घेऊन गेले असते तर त्यांचीच सही तिथं कुणी खरी मानली नसती... wink

आई म्हणत असेल ..

आई म्हणत असेल .. शहाणी माझी बाई ती .. Crazy [हा स्मायली चेहर्‍यावर हात फिरवून, डोक्यावर बोटे मोडते असा बघा ]

_/\_ माई...आपण धन्य आहात!

_/\_

माई...आपण धन्य आहात! आम्ही पामर आपल्यापुढे काय बोलणार?

बाबांची सही जमत नाही म्हणून त्यांच्या आद्याक्षरांची सही करून हीच त्यांची सही आहे असं आधीच शाळेत सांगितलं होतं.. त्यामुळे खुद्द तीर्थरूप जरी स्वतःची सही घेऊन गेले असते तर त्यांचीच सही तिथं कुणी खरी मानली नसती...

Grade
आमच्याकडे मोठ्ठा वांधा! आमचे तात ज्या शाळेत शिकवायचे त्याच शाळेत आम्ही शिकत होतो. आम्ही पहायच्या आधीच आमचं प्रगतीपुस्तक आमचे तात ह्यांनी वाचुन काढलेलं असायचं... Sad

आमच्याकडे मोठ्ठा वांधा! आमचे

आमच्याकडे मोठ्ठा वांधा! आमचे तात ज्या शाळेत शिकवायचे त्याच शाळेत आम्ही शिकत होतो. आम्ही पहायच्या आधीच आमचं प्रगतीपुस्तक आमचे तात ह्यांनी वाचुन काढलेलं असायचं... >>
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud

नशीब म्हणतात ते ह्याला !!

+१

>>नशीब म्हणतात ते ह्याला !!
आणि पांडू म्हणतात ते मला.

अरे प्रगती पुस्तक त्यांनी बघू

अरे प्रगती पुस्तक त्यांनी बघू नये असं नसायचंच मुळी..!!
नि त्यांना अस्मादिकांची प्रगतीही चांगलीच ठाऊक असायची... पण घोळ असा होता, की शाळा आज प्रगतीपुस्तक द्यायची नि लगेच उद्या आणा म्हणून सांगायची... आम्ही शाळा सुटली रे सुटली हुर्रे करून कानात वारं शिरलेल्या वासरासारखे!!! शाळेतच कसातरी गृहपाठ पूर्ण करायचा नि एकदा घरी आल्यावर दप्तर एकदा कोपर्‍यात भिरकावलं की दुसर्‍या दिवशी शाळेत जातानाच उचलायचं!!! शुद्ध असायचीच कोणाला सही घ्यायची?? मग हे असले उद्योग!!! Big smile

हा हा हा.... सही आहे!

हा हा हा....
सही आहे! म्हणजे....हा प्रकार 'सह्ही' आहे....तुझ्या बाबांची सही नव्हे.

मग हे असले उद्योग >>> हा हा

मग हे असले उद्योग >>>

हा हा हा ...उद्योग-भुषण आहात..

काय काय लोक

काय काय लोक आहेत..
दुसर्‍यांचा सह्या करणारे...
असो



-निखिल

सहमत.

सहमत.



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मी माझ्या बाबान्ची सही अतिशय

मी माझ्या बाबान्ची सही अतिशय उत्तम प्रकारे करत असे ..माझ्या आणि भावाच्या प्रगतीपुस्तकावर नेहमी मीच करत असे सही
पुष्करिणी



पुष्करिणी

छान!

लेख आवडला, सही आहे! हास्य
स्वाती

सुरेख

एखाद्या वृत्तपत्राला द्या पाठवून. गेलाबाजार 'सकाळ' च्या 'प्रतिबिंब' ला द्या. नक्की छापतील. झकास.

मस्त

मस्त.. सहि आहे लेख



-ऋ