पालक गोश्त

0
0

साहित्यः

२ मध्यम कांदे बारीक चिरलेले.
२ जुड्या पालक बारीक चिरुन घेतलेला.

५०० ग्रॅम. मटण.
२ चमचे दही + १ मोठा चमचा आल-लसुण वाटण + १ लहान चमचा हळद + १ चमचा मसाला एकत्र करुन मटणाला लावुन १-२ तास मुरत ठेवाव.

खडा मसाला : २-३ वेलच्या , ३-४ लवंगा, १०-१२ काळीमीरी, १ इंच दालचीनी, तमाल पत्र.
१ चमचा आल-लसुण वाटण.
१ मोठा चमचा लाल तिखट.
१ मोठा चमचा गरम मसाला.
१ मोठा चमचा टॉमेटो पेस्ट.
२ मोठे चमचे लिंबाचा रस.
तेल, मीठ चवी नुसार.

कृती :

एका कढईत थोडं तेल तापवुन त्यात खडा मसाला परतुन घ्यावा. मग त्यात कांदा टाकुन तो पारदर्शक होई पर्यंत परतुन घ्यावा. त्यात आल-लसणाच वाटण टाकुन कांदा गळे पर्यंत शिजवुन घ्यावा.

नंतर त्यात मुरवलेल मटण टाकुन मोठ्या आचेवर ५-१० मिनिटं झाकण न ठेवता परताव.

मग त्यात लाल तिखट आणि गरम मसाला टाकुन मटण चांगल एकत्र कराव. ५ मिनीटांनी त्यात टॉमेटोची पेस्ट टाकावी.

त्यात चिरलेला पालक टाकुन, एकत्र करुन घ्याव. लिंबाचा रस टाकावा. १/२ कप पाणी टाकुन वरुन झाकण ठेवुन मध्यम आचेवर शिजत ठेवाव. अधुन मधुन ढवळावं. पाणी आटल्यास थोडं थोडं गरम पाणी टाकत जाव.

मटण शिजले की चवी नुसार मीठ टाकुन, झाकण काढुन मध्यम आचेवर पाणी आटे पर्यंत शिजवावे.

नान, तुंदुरी रोटी, भाकरी, वा वाफाळत्या भाता सोबत हाणावे.

{मस्तच.........}

1

पण आम्हाला श्रावण संपेपर्यंत धीर धरावा लागणार..... Sad


परिजा
******

बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)

{गणपा भाऊजी }

2

गणपा भाऊजी खायला कधी घालताय ते सांगा हास्य


********************************************************
"When you are just about to finish your journey, LIFE changes your destination."

{मस्तच}

3

मस्तच!

लवकर बनवून पहावी लागेल...

गणपाभौ एक पुस्तक लिहा

{कधी येतो आहेस बे ?}

4

Crying कधी येतो आहेस बे ?


Hope is a good thing...

{भूक लागली}

5

भूक लागली हास्य

{नो श्रावण पाळणे}

6

खेकड्याच्या वेळेलाच गणपा याना सांगितले होते की आम्ही श्रावणब्रिवण वगैरे काही पाळत नाही, त्यामुळे या पालक गोश्तचे नेत्रसुख घेता घेताच या एक दोन दिवसात आमच्या नामदेवरावाच्या मदतीने ही डिश 'ट्राय' करणार घरी.

[मागील खेपेस - खेकडे - असेच कौतुक केले आणि दुसर्‍याच दिवशी इथे काहीतरी तांत्रिक गडबड होऊन खेकड्यावरील रंगीतदार प्रतिसादच खेकड्याच्या बिळातच गायब झाले.... तसे आत्ता होऊ नये ही प्रार्थना !]

{उप्प्स !!! एका कोबडी /}

7

उप्प्स !!!
एका कोबडी / कोंबड्याचा बळी गेला आज आमच्यामुळे Big smile
टेस्टी होतं एकदम गावराण जेवण... अब् !!!


Hope is a good thing...

{(विषय दिलेला नाही)}

8

Angry


********************************************************
"When you are just about to finish your journey, LIFE changes your destination."

{किती रागावताहो तुम्ही वहिनी?}

9

किती रागावताहो तुम्ही वहिनी? नका चिडू इतक्या. गणपा अश्या छान-छान रेसिपी नेहमीच टाकत असतो. राजे घालतील तुम्हाला स्वहस्ते बनवून खायला..... हास्य


परिजा
******

बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)

{राजे घालतील तुम्हाला स्वहस्ते}

10

राजे घालतील तुम्हाला स्वहस्ते बनवून खायला..... हास्य
राजेवर रागावल्या बद्दल एवढी कठोर शिक्षा?


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

{नाही !!}

11

नाही !! नाही रागावणार राजेंवर पण त्यांच्या हातचे बनवलेले पदार्थ खायची शिक्षा देऊ नका


********************************************************
"When you are just about to finish your journey, LIFE changes your destination."

{नक्की शिक्षा कोणाला? हे}

12

नक्की शिक्षा कोणाला? हे राजेंच्या हातचं खाऊन वहिनींची reaction काय आहे ह्यावरुन ठरवावे लागेल......


परिजा
******

बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)

{परिजा तु अजुन हे वाचलेलं दिसत}

13

परिजा तु अजुन हे वाचलेलं दिसत नाही.


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

{अरे हा धागा कसा काय सुटला}

14

अरे हा धागा कसा काय सुटला होता माझ्या नजरेतून???

बहुतेक सहानुभुतीचं पारडं वहिनींकडेच झुकणार असं दिसतय......


परिजा
******

बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)

{काय बोलु यार... प्रत्येकवेळी}

15

काय बोलु यार... प्रत्येकवेळी बोलती बंद करतोस... Grade Grade Grade


*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!

माझा ब्लॉग - मन उधाण वार्‍याचे…

{मस्त एकदम }

16

ट्राय केले पाहिजे हास्य


बन्सी को लकडी सदा समझा किये तुम पर उसके नग्मो कि धुन कहाँ सुन सके तुम!