चड्ड्या घ्या चड्ड्या ....
राम राम मंडळी
आर्थिक मंदीमुळे तंगी आली म्हणुन वेगळा धंदा काहीतरी सुरु करायचे आमच्या मनात होते.
आम्ही वेगवेगळ्या चड्डया आणि नाड्या विकण्याचा धंदा चालु केला आहे हे सांगतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
आमच्याकडे सर्व त-हेच्या, विविध मापाच्या, वाढत्या अंगाच्या, बदलत्या घेराच्या, फिट्ट बसणा-या, मोकळ्या चाकळ्या अशा विविध चड्ड्या नाड्यांसह रास्त दरात उपलब्ध आहेत. इच्छुकांनी या चड्यांचा लाभ घ्यावा ही णम्र इनंती!
आमच्याकडे असलेल्या विविध चड्डयांपैकी काही चड्ड्यांचे नमुने (फटु मागु नये, अपमान होईल)
वैचारीक चड्डी
ही चड्डी घातली की लांबलचक अगम्य लेख, प्रतिसाद लिहिता येतात. अक्षरे, अक्षराच्या मागोमाग लिहित गेले की शब्द तयार होतात. असे अनेक शब्द एकामागोमाग एक लिहिले आणि क्रियापदानंतर स्वल्पविराम, पुर्णविराम टाकला की वाक्य तयार होते. असे अनेक वाक्य तयार झाले की परिच्छेद तयार होतो. असे अनेक परिच्छेद लिहिले की लेख किंवा प्रतिसाद तयार होतो. कोणत्याही प्रकारची स्मायली न वापरता लिहिणे ही वैचारीक लेखाची पहिली आणि शेवटची अट असते. पहिले वाक्य वाचुन सहसा या लेखात काय लिहिले आहे हे समजते. शेवटचे वाक्य पहिल्या वाक्याच्या अर्थासमान असेल तर लेख दुजोरा देणारा आणि विरुद्ध असेल तर लेख खंडन करणारा आहे असे प्रतिपादन करता येते. अनेक मान्यवरांनी आमच्याकडुन ही चड्डी नेलेली आहे.
वैज्ञानिक चड्डी
ही चड्डी घातली की जगातील सर्व समस्या चुटकीसरशी विज्ञानाच्या सहाय्याने सोडवता येतील असा साक्षात्कार होतो. भावभावनांचे गाठोडे डस्टबीनमधे टाकुन, सर्व समस्यांचे मुळ मनामधे आहे असे भासवुन मनाला नाकारणे आणि बुद्धी अंतिम आहे असा पवित्रा घेणे ही पहीली अट ही चड्डी घालणा-याने पुर्ण करणे आवश्यक असते. बुद्धीवादी म्हणुन म्हटला जाणारा एक शिवीप्रकार या व्यक्तिंना सहन करावा लागतो. अतिशय उच्च अशी बुद्धी, तर्क आणि कुतर्क करण्याची आवड असलेल्यांनी या चड्डीचा वापर करावा. शिवण नाजुक असल्याने ही चड्डी चटकन फाटते. जास्त मागणी नसते म्हणुन ही चड्डी आम्ही बुकिंगशिवाय मागवत नाही, पैसे रोख आगावु द्यावे लागतील.
धार्मिक चड्डी
विशिष्ट धर्माचा अवलंब करुन जगणा-यांच्या वतीने सहानुभुती दाखवुन त्यांच्या वतीने वकिली करणा-या लोकांचा पोशाख म्हणुन ह्या चड्डीची योजना करण्यात आली आहे. ही विविध रंगात उपलब्ध असुन भगवा, हिरवा, लाल या रंगाना विशेष मागणी आहे. दोन्ही बाजुने वापरता येणारी आणि दोन्हीकडे वेगवेगळे रंग असलेली चड्डी सध्या जास्त खपत आहे. सर्व रंगाच्या चड्डया खरेदी करणा-याला काळ्या रंगाची चड्डी फुकट देण्यात येईल.
विनोदी चड्डी
ही चड्डी घालुन विनोदी लेखन, प्रतिसाद करता येतात. ही चड्डी फिट बसली नाही तर विनोद हिण किंवा हिणकस होतात. अशा वेळेस इतर लोक चड्डीत रहा ना भो... असे सांगुन चड्डी ढिली होत आहे असे सुचित करतात. अशा वेळेस आपला आकार वाढवणे किंवा चड्डी बदलणे हे प्रयोग करावे लागतात.
हलकट चड्डी
ही चड्डी घालुन तिरकस प्रतिसाद देता येतात. ह्या चड्डीची अट म्हणजे ही चड्डी घालुन लेख टाकु नये. खास तिरकस, हलकट, कुचकट, वाद वाढवणा-या प्रतिसादांसाठी ही चड्डी राखीव आहे.
खरकटी चड्डी
वेगवेगळ्या पाककृती करुन पहाण्यासाठी ही चड्डी वापरली जाते. ही चड्डी घातली की स्वयंपाकघरात लुडबुड करावीशी वाटते. अशा लुडबुडीनंतर केलेले प्रताप टंकुन लोकांना सांगावेसे वाटतात. ही चड्डी खास पाकृ लेखासाठी उपयुक्त आहे. सतत तिखट, मीठ, वगैरे सांडल्यामुळे हिला खरकटी चड्डी म्हणतात.
क्रिप्टीक चड्डी
ही चड्डी घातल्यानंतर सरळ सोट वाक्यांमधुन काहीतरी गुढ अर्थ काढता येतात. द्वैयर्थी लेखन, पहिल्यांदा वाचल्यावर सोपे वाटणारे पण पुन्हा पुन्हा वाचल्यावर वेगवेगळे अर्थ समोर येणारे लेखन करण्यासाठी ही चड्डी वापरावी. ही घट्ट झाल्यास बदामाचा शिरा खावा आणि सैल झाल्यास काही दिवस चड्डीविना रहावे लागते. ही दिवसातुन थोडाच वेळ घालावी, जास्त वेळ घातली तर (पाठीवर) वळ उमटतात.
काव्य चड्डी
ही चड्डी घातली की कविता सुचतात, चारोळ्या सुचतात. साधे सरळ गद्य सुद्धा पद्यातुन लिहावेसे वाटते. खास करुन नवीनच कविता करु इच्छिणा-या मंडळींसाठी ही चड्डी आहे.
घट्ट चड्डी
ही भलतीच डेंजर चड्डी आहे. ही घातली की चेहरा गंभीर होतो. पोट दाबले जावुन हसावेसे वाटत नाही की रडावेसे वाटत नाही. कुणाशी बोलावेसे वाटत नाही की काहीच करावेसे वाटत नाही. किबोर्ड जवळ असेल तर सारखा सारखा डिलीट बटणाला त्रास द्यावासा वाटतो. लेख प्रतिसाद आटुन जातात आणि खरडी वांझ होतात. ही घालावीशी वाटणारी पण घातली की कधी एकदा काढु असे वाटणारी ही घट्ट चड्डी. सध्या आठदहा लोक ही वापरत आहेत असे कळते. आम्ही ही चड्डी स्टॉकमधे ठेवत नाही, कारण मापानुसारच घट्ट शिवावी लागते. ही आम्ही फुकट देतो, कारण एकच गि-हाईक आहे तेच आमच्याकडुन घेवुन मधुन मधून वाटत असते. आणि त्या गि-हाइकाच्या एकाच चड्डीत आम्हाला चार चड्ड्यांचा नफा होतो. असो.
अजुनही अनेक अशाच चड्ड्या आहेत. तसेच आवश्यकतेनुसार तुम्हाला हवी तशी चड्डी बनवुन देवु.
तुमचे समाधान हेच आमचे ध्येय !
सुचना -
१) चड्ड्या आम्ही घरी बनवत नाही, सबब चड्डीची कोणतीही खात्री देवु शकत नाही.
२) ग्राहकांनी दुकानातच चड्डी नीट बसते की नाही हे पहावे, मागाहुन तक्रार चालणार नाही.
३) दुकानात आरसा नाही, आरशात चड्डी कशी दिसते हे पहाण्यासाठी आपला आरसा बरोबर आणावा.
३) रंग उडाला, रंग गेला, कापड आटले, कापड पघळले या सबबीवर चड्डी बदलुन मिळणार नाही.
४) चड्डीला दोन भाग असतात, दोन्ही पाय वेगवेगळ्या भागात घातल्यास चड्डी जास्त दिवस टिकते.
५) कोणत्याही चड्डीचे बील मिळणार नाही.
६) चड्डी घालुन पैसे दिल्याशिवाय दुकानाबाहेर जावु नये.
७) चड्डी विजारीच्या आतुन घालतात.
८) एका चड्डीला फक्त दिड मीटर नाडी मिळेल. जास्त हवी असल्यास वेगळे पैसे पडतील. नाडी नको असल्यास किंमत कमी होणार नाही.

.jpg)
{त्या सुपरमॅनला त्याच्या आईनं}
त्या सुपरमॅनला त्याच्या आईनं हे शिकवलं नाही का??
बाकी पहिला कश्टमर गावला का??
{शिळ्या कढीला उकळी का रे}
शिळ्या कढीला उकळी का रे नान्या?
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{हॅ हॅ हॅ}
हॅ हॅ हॅ
Hope is a good thing...
{छ्या!}
छ्या! मला वाटला नवा स्टॉक आलाय
-ऋ
{+१}
मलाही!
असो! ह्या चड्ड्या..हे आपलं...हा चड्ड्यांचा लेख अजुनही चपखल बसतो आहे हे पाहुन अंमळ हळवा झालो
कढी शिळी असेल भले, पण अजुनही चव जश्शीच्या तश्शी आहे हेवेसांनल
{धत तेरी की.... फेल गेला धागा}
धत तेरी की.... फेल गेला धागा
{पोझीशन}
को ईफिशियंट ऑफ लिनीयर इज जस्ट ए पोझीशन नाना
{मराठीत लिहा.}
मराठीत लिहा.
{हे}
मराठीत कसे लिहावे बॉ?
{ही माझी समस्या नाही.}
ही माझी समस्या नाही.
{मराठीत कसे लिहावं? उत्तरः}
मराठीत कसे लिहावं?
उत्तरः हाताचा वापर करावा.
-पुण्याचे पेशवे
{को ईफिशियंट ऑफ लिनीयर इज जस्ट}
को ईफिशियंट ऑफ लिनीयर इज जस्ट ए पोझीशन नाना
एकरेशीय सहकुशाग्रता ही नानाची बैठक आहे हे झाले सूद्द म्हराटी.
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
{सावकाश! टोचेल.}
सावकाश! टोचेल.
{बरं}
वा!! फक्त एक दिगंबरपंथीयच ह्या विषयावर एवढ्या अधिकाराने बोलू शकतो!!!
समांतर - टिंग्याचे मत / विवेचन वाचण्यास उत्सुक!
{नाडी}
चड्डी कंची बी असुंद्या हो पन नाडी नको. आदुगरच ज्योतिषात लईच नाडि ग्रंथ जालेत॑. आता विल्याष्टिकच हवे. यक दुसरी आयडीया सुचलीय पघा वेलक्रो काय म्हंत्यात त्याची. किंमत नको बाबा कमी करु! तुपली नाडी तुपल्यापाशीच र्हाउं दे. आयत्या टायमाला निगत नाई मंग काय उपेग त्येचा. जास्ती ठेवली त लोंबतीया कमी ठेवावी तर टोक आत जातय . परत धुंडाळत बसाया लागतय. मंग परत ते शेफ्टी पिन घेउन ववायला लागतीय आक्खी नाडी. म्हजी आला का कुटाना
कालच समाजल कि वेल क्रो ला पेटंट नाही.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
{रस्त्यावर चड्ड्या विकायला}
रस्त्यावर चड्ड्या विकायला ठेवणे हे अश्लील आहे का?
काही चड्डी हा शब्द अश्लील आहे का?
घरातील स्त्रीया, बायको ,आई. मुलगी यांच्या समोर तुम्ही चड्ड्या घाला असे कोणी म्हणेल का.
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
{विजूभौ, तुमच्या सहीच्या वरती}
विजूभौ, तुमच्या सहीच्या वरती एखादी लाईन मारा राव. मुख्य संवादात एकत्र होते ती.
बाकी अवलिया आजकाल दिसत नाही. संन्यास घेतलेला दिसतोय. नाहीतरी मागे त्यांनी त्यांचे हिमालयातले साधू वेषातले फोटो दिलेले होतेच.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही