घोषणा: मीमराठी.नेट आता नोंदणीकृत...
वेलु तयाचा जाई गगनावरी !!

ही उक्ती आठवावी अशीच प्रगती गेल्या अडीच वर्षात मी मराठीने केलेली आहे. नवनवीन तंत्रज्ञान वापरण्याचा अनुभव मिळावा, त्याद्वारे मित्रमंडळींना शिळोप्याच्या गप्पा मारण्यास, झालेच तर मनाजोगते लिखाण करण्यास एक माध्यम निर्माण करावे या उद्देषाने निर्मिलेल्या मी मराठी या छोट्याशा संस्थळाचे आज संस्थळ सदस्य आणि प्रतिथयश नामवंत लेखक-कलाकारांच्या ७००० लेख, कथा, कविता, भटकंती, पाककृती, छायाचित्रे अशा भरगच्च साहित्याचा संग्रह, या साहित्यावर सदस्यांनी दिलेले ७० हजाराहुन अधिक प्रतिसाद, १५,००० पुस्तकांची सूची असलेले पुस्तकविक्रिचे ई-दालन, ४०००+ पुस्तकांची विक्री, एका महिन्यात ५० संकेतस्थळांना वेब होस्टिंग सेवेचा पुरवठा असा पसारा आता पर्यंत झाला आहे. १९ लेखन विभाग असलेले, सर्वरवरील ८ जीबी डाटा स्टोरेज वापरणारे आणि दिवसाला ५,००० पेक्षा जास्त पानांचे वाचन होणारे मी मराठी संकेतस्थळ अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करुन गेली अडीच वर्षे अखंडित सेवा देत आहे. या सेवेसाठी महिन्याला ६० जीबी ते १०० जीबी एवढी बँडविडथ नियमित वापरली जात आहे.
लेखन स्पर्धा, काव्य स्पर्धा, भेटीगाठी यातून लेखकांना, वाचकांना एक नवीन व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न मीमराठी नियमीत करत आहेच अश्याच प्रकारच्या अनेक योजना पुढील काळात राबवण्यात येतील. वाचकांपर्यंत पोहचण्यासाठी आपण सध्या शक्य असलेले सर्व अद्यावत तंत्रज्ञान वापरत आहोत, ज्यामध्ये सोशल नेटवर्किंग पासून एसएमएस सुविधा, टूलबार, आरएसएस फिड्स, कंटेन्ट शेअरिंग इत्यादीचा समावेश आहे.
मी मराठीच्या या यशामध्ये सर्व सदस्यांचा व अनेक मित्रांचा सक्रिय हातभार आहे. या सर्व सुहृदांची आठवुन आठवुन नावे घेणे अगदीच अवघड असले तरीही काही मीमकर आणि मी मराठी परिवाराला सातत्याने पाठिंबा देणार्यांचा नामनिर्देश येथे करणे अनाठाई ठरणार नाही. या लोकांच्या सक्रिय मदतीमुळेच मी मराठी परिवार एवढी मजल मारु शकलेला असल्याने त्यांची किमान मी मराठीवरील टोपणनावे घेऊन तरी ऋणनिर्देष करणे अपरिहार्य आहे..
मराठी संकेतस्थळे ज्या तंत्रज्ञानामुळे उभी राहीली त्या गमभनचे निर्माते ओंकार जोशी, भोचक, प्रकाश घाटपांडे, गंगाधर मुटे, अर्धवट, रमताराम, इस्किलार, डॉ. अशोक कुलकर्णी, सातारकर, पाषाणभेद, बेफिकीर, छोटा डॉन, ३_१४ अदिती, सागर, ब्रिटिश टिंग्या, अवलिया, चुचु, योगेश नाईक, दिशा नाईक, दत्ता काळे, पक्का भटक्या, मस्त कलंदर, परिकथेतील राजकुमार, रामदास, प्रसन्न केसकर, दिंडोरकर, निखिल देशपांडे, सुहास, पुण्याचे पेशवे, प्राजु, स्वाती दिनेश, जयपाल, झकासराव, विवेक मोडक, अनामिका१, निवांत पोपट, श्रीकांत१९, गब्बरसिन्ग, विशाल कुलकर्णी, बिपिन कार्यकर्ते, सहज, विसोबा खेचर, महेंद्र, कांचन कराई, धुंद रवी, नचिकेत गद्रे, सहज, मितान, नीता, निर्मयी, पुष्करणी, विजुभाऊ, विकास, प्रा. डॉ. दिलिप बिरुटे, सुधीर काळे, अरूण मनोहर, विसुनाना, टारझन, विसुनाना, आदीजोशी, गणपा, दीपाली, परिजा, दीप्ती जोशी, सुहास झेले, हेरंब ओक, योगेश मुंढे, अमित, Unique Poet, आत्मशुन्य, चिंतातुर जंतु, विनायक प्रभु, डॉ. श्रीराम दिवटे, मराठमोळा, मेघवेडा, नीता, प्रीतमोहर, निरंजन, शशिकांत ओक, मिंटी, शरद कोर्डे, मधुकर, विमुक्त, निल्या, निमिष सोनार, रणजीत चितळे, सर्वसाक्षी, सुनिल पाटकर, अमोल देशमुख, अरुण कोर्डे, ईश आपटे,मिलिंद, उमेश कोठीकर, आदित्य चंद्रशेखर, प्रकाश१११, रश्मि दाते, चेतना, संजय क्षीरसागर, प्रथमेश शिरसाट, मणिकर्णिका,खैरनारम, दवबिंदू, सिम्स, कल्पी जोशी, अजानूबाहू यांच्यासारख्या जालीय लेखक आणि ब्लॉगर्सनी मी मराठीच्या वाटचालीत भरघोस योगदान दिलेले आहे. याखेरीज अनेकजणांचा नामनिर्देश करणे राहुन गेलेले असणे शक्य आहे तरीही त्यांचे योगदान मी मराठीसाठी अमुल्य आहेच.
मित्रमंडळींच्या शिळोपाच्या गप्पांचा अड्डा म्हणुन सुरु झालेले हे संकेतस्थळ थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने व मित्रांच्या सहकार्यामुळे तसेच मी मराठीचे सर्व सदस्य, असंख्य वाचक यांच्या सदिच्छांमुळे मी मराठी (mimarathi.net) ३ ऑगस्ट २०११ पासुन नोंदणीकृत व्यवसाय (फर्म) संस्था म्हणुन अस्तित्वात आली. हे करत असताना मी मराठीची कार्यपद्धती, ध्येये, धोरणे व उद्दीष्टे यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यामुळे mimarathi.net च्या व्यवहारात अधिक पारदर्शकता येणे तर अपेक्षित आहेच पण ते फक्त आभासी जगातील संस्थळ न रहाता वास्तव दुनियेत देखील आपली वेगळी ओळख निर्माण करु शकेल. मराठीचा प्रसार व प्रचार करणे, सदस्यांना अभिव्यक्ती करता व्यासपीठ मिळवून देणे व सदस्यांना आपापसात संवाद साधण्याची सुविधा पुरवणे या मी मराठीच्या अंगीकृत ध्येयांचा यायोगे अधिक जोमाने पाठपुरावा करणे शक्य होईल. हे साध्य करण्यासाठी मी मराठी परिवारातील सर्व सदस्यांच्या व वाचकांच्या भरघोस पाठिंब्याची, शुभेच्छांची व सहकार्याची गरज तर आहेच आणि ही अपेक्षा सतत पुर्ण होत राहील याची खात्री देखील आहे.
आपलेच सर्वांचे,
मी मराठीं.नेट

.jpg)
{अभिनंदन }
अभिनंदन
बन्सी को लकडी सदा समझा किये तुम पर उसके नग्मो कि धुन कहाँ सुन सके तुम!
{लई भारी...!!! >>>अपेक्षा}
लई भारी...!!!
>>>अपेक्षा सतत पुर्ण होत राहील याची खात्री देखील आहे.
+१ ही खात्री आम्हालाही पटली आहे...
मी मराठीच्या "भेदीले शून्यमंडळा" कडे चालू असलेल्या प्रवासास अनंत शुभेच्छा.
मीऽच तो...
{धन्यवाद मित्रा....}
धन्यवाद मित्रा....
Hope is a good thing...
{अभिनंदन राजे!}
मालक , अभिनंदन!
मीमराठी उत्तरोत्तर अशीच प्रगती करत राहो हीच प्रभुचरणी प्रार्थना!
माझी अनुदिनी....
{आभार मालक}
आभार मालक
Hope is a good thing...
{मी मराठीच्या पुढिल वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.}
मी मराठीच्या पुढिल वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.
-मंगेश खैरनार
मंगेश खैरनार
http://mangeshkhairnar.com
{धन्यु !}
धन्यु !
Hope is a good thing...
{हाबिणंदण}
मालक शेवटी एकदाचा मुहूर्त लागला मीमराठी नोंदणीकृत व्हायला
झकास बातमी. आता मीमराठीच्या सदस्यांना नवनवीन गोष्टी नित्यनेमाने पहावयास मिळतील याची खात्री आहे
मीमराठीच्या पुढील वाटचालीस भरघोस शुभेच्छा
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{हॅ हॅ हॅ}
हॅ हॅ हॅ
Hope is a good thing...
{प्रो.प्रा. राजे,}
अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा.
{लै आभारी आहे साहेबा....}
लै आभारी आहे साहेबा....
Hope is a good thing...
{हार्दिक अभिनंदन ....! अशाच}
मीमराठीची पुढील सर्व वाटचाल भरभराटीची.... समृध्दीची व्हावी.... अशा अनेको सदीच्छा + शुभेच्छा !
Ignited Mind ! हा माझा , माझ्या कवितांचा ब्लॉग आहे बरं का !
{नक्की रे... तुम्ही सगळे}
नक्की रे... तुम्ही सगळे आहात... तर, फेसबुक क्या चिज है
Hope is a good thing...
{संपुर्ण मीम परिवाराचे}
संपुर्ण मीम परिवाराचे अभिनंदन.
हा उधळलेला वारु यशाची शिखरं अशीच पादाक्रांत करीत राहो ह्या सदिच्छा !!!
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{तुम्हा मित्रांचीच साथ म्हणून}
तुम्हा मित्रांचीच साथ म्हणून घडले... धन्यु रे!
Hope is a good thing...
{अभिनंदन - राजे - अभिनंदन}
काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम्।
व्यसनेन तु मूर्खाणां निद्रया कलहेन वा ॥
{अर्थ पण सांगा साहेब...}
अर्थ पण सांगा साहेब...
Hope is a good thing...
{काव्य शास्त्र विनोद या मधे काळ हळूहळू निघुन जातो. }
काव्य शास्त्र विनोद या मधे काळ धीमे धीमे (हळूहळू) निघुन जातो.
------
धीमत - बुद्धीजीवी, बुद्धीवान
धीमताम - बुद्धिवंतांचा
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{+१}
@ मिलींद +१
@ राजे .... हा अर्थ .... - बुद्धिमान लोकांचा वेळ काव्याचा [आस्वाद घेण्यात] शास्त्राच्या [चर्चेत] आणि करमणूकी मध्ये जातो. मूर्ख लोकांचा वेळ मात्र व्यसन [ करणे ] झोपत [ आळसात ] आणि भांडणात जातो.
Ignited Mind ! हा माझा , माझ्या कवितांचा ब्लॉग आहे बरं का !
{अच्छा!}
म्हणजे आम्ही बहुतेकदा (अपवाद वगळता) दुसर्या गटात मोडतो तर.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
{अभिनंदन!}
अभिनंदन!
{छान अभिनंदन!}
छान अभिनंदन!
{अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा}
अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा
{देशपांडे सर, पक पक पकाक व}
देशपांडे सर, पक पक पकाक व सविता आभारी आहे
Hope is a good thing...
{हेय्य्य्य्य्य}
पार्टी हवीच!
{हे छान केलंत राजे!}
खुप दिवस फक्त फोनवर बोलल्यावर आज पहिल्यांदाच लॉग इन केलं अन समोर पहिले पोस्ट हेच आले. उगीचच माझा पायगुण वगैरे विचार डोक्यात तरळुन गेले.
अशीच भरभराट सुरु राहु दे. माझ्यातर्फे तुम्हाला ही पार्टी.
{अरे वा! स्वागत आहे मीमवर}
अरे वा!
स्वागत आहे मीमवर वैनी...
Hope is a good thing...
{welcome vahini}
welcome vahini mimavar swagat
Baki paygun ekdum jabara gheun alat ha
Raje party dya atta
*******************************************
Attitude is little thing which makes big difference
{कंपनी स्थापन केली हे उत्तम झाले...}
आम्हाला कंपनी लॉ शिकवणार्या सरांनी खुप सविस्तर सांगीतले होते अश्या इस्टॅब्लिशमेंट बनवण्याचे फायदे.
सर्वात महत्वाचे म्हणजे त्यामुळे कामकाजात सुसुत्रता येते. कारभार नीट चालण्याला मदत होते.
कंपनी स्थापन करायची म्हणजे बर्याच फॉर्मॅलिटीज पुर्ण कराव्या लागतील ना?
या सगळ्या प्रयत्नांचे फळ मिळेल यात शंकाच नाही.
अवांतरः ई-खरेदी करण्याची लिंक फॉलो करुन शॉपवर गेले. ऑनलाईन पुस्तके खरेदी करण्याची ती सुविधा आवडली. पण तिथे अभ्यासासाठी रेफरन्स बुक्स मिळत नाहीत का?
{अरे वा}
अखेर मालकांनी आपली जिद्द तडीस नेली तर. जियो. जोर्दार हाबिणंदण सायबा. आता व्यावसायिक दृष्टीने अनेक फायदेशीर मार्ग उपलब्ध होतील नि मीमराठी इतर काही क्षेत्रातही पाऊल टाकेल याची खात्री आहे.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{दोन्ही गोष्टीसाठी अभिनंदन.}
दोन्ही गोष्टीसाठी अभिनंदन.
{त्या म्हातार्याला कुठे सोडून}
त्या म्हातार्याला कुठे सोडून आलीस आँ
Hope is a good thing...
{अभिनंदन मालक...}
अभिनंदन मालक...
{जोरदार अभिनंदन}
जोरदार अभिनंदन
And then !
{व्वा!}
मस्त झाले हे. खुप दिवस पेंडिंग होते हे काम.
अभिनंदन राजे! अशीच प्रगती करत रहा.
पण ते पार्टीचे बघ रे.
तोवर माझ्याकडुन तुला आणि सगळ्या मीमराठी सदस्यांना व्हर्च्युअल पार्टी घ्या:
{अभिनंदन राजे...}
अशीच प्रगती सुरु राहु दे. यशाचे कळस गाठालच.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
{हाबिणंदण मालक....!! इतर}
हाबिणंदण मालक....!!
इतर अनेक उपलब्ध मराठी संकेतस्थळांपेक्षा, मी मराठी ने केलेली प्रगती नक्कीच कौतुकास्पद आहे. इथलं वातावरण एका कुटुंबासारख आहे. उग्गाच कुणाची खेचाखेची नाही, मुद्दाम केलेली वाद निर्मीती नाही. वाद झालेच तर खेळीमेळीने सोडवले जातात. नवीन लेखकांना लेखन करायला कुठलही दडपण नाही.
मी मराठी उत्तरोत्तर अशीच प्रगती करत रहो, ही ईश्वर चरणी प्रार्थना....
अरे एक राहिलं... पार्टी भावा !!!
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!
माझा ब्लॉग - मन उधाण वार्याचे…
{पार्टी नक्की भावा}
पार्टी नक्की भावा
Hope is a good thing...
{मी मराठीचे}
मी मराठीचे अभिनंदन..............
आणि सुहास ह्यांच्याशी सहमत
{शुभेच्छा. }
मालक अभिनंदन..........! आणि आमच्या शुभेच्छा आहेतच.
लगे रहो.
-दिलीप बिरुटे
{धन्यवाद सर.. तुमचा आर्शिवाद}
धन्यवाद सर.. तुमचा आर्शिवाद हवाच.
Hope is a good thing...
{झक्कास बातमी !! सदैव सहकार्य}
झक्कास बातमी !!
सदैव सहकार्य राहील !!
{पाहिजेच}
पाहिजेच
Hope is a good thing...
{अभिनंदन ...... मी मराठी ही}
अभिनंदन ......
मी मराठी ही एका मोठ्या कुटुंबा सारखीच वाटते. हे पाऊल आपल्या प्रगतीतल एक महत्वाच ठरणार आहे.
परत अभिनंदन
{हो नक्कीच.. ! धन्यवाद साहेबा!}
हो नक्कीच.. !
धन्यवाद साहेबा!
Hope is a good thing...
{जोरदार अभिनंदन !!}
अभिनंदन आणि शुभेच्छा राजे !!!
पार्टी बनती है भावा !! मगात दूध ओत माझ्यासाठी , मलईदार !
---------------------------------------------------------------
स्पंदने माझ्या मनाची >>
मन वढाय वढाय
{नक्की रे.... !}
नक्की रे.... !
Hope is a good thing...
{अभिनंदन राजे !!!}
आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!
मीमराठी हे एका मोठया कुटुंबासारखेच वाटते!!
दिप्ती जोशी
{अरे वा रे वा! उत्तरोत्तर अशीच}
अरे वा रे वा! उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो! मनःपूर्वक शुभेच्छा!
{वाह}
वाह वा.
अभिनंदन.
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{जोरदार अभिनंदन !}
जोरदार अभिनंदन !
-----
काहीबाही http://kaaheebaahee.blogspot.com/
{अभिनंदन}
उत्तम बातमी!! मनःपूर्वक अभिनंदन!!
{मीमराठीच्या पुढील वाटचालीस भरघोस शुभेच्छा............}
सुरु केलं तेव्हा होतं
इवलसं कुटुंब चार माणसांचं
दार सताड उघडल्यावर
एक्-एक जण येऊन
सहज डोकावून जावं
म्हणून आले अन्
इथले वैविद्ध्य पाहून
इथेच रमले, इथेच रुजले
आणि स्वतःबरोबर इतरांनाही समृद्ध केले
परतीची वाट जणू विसरुनच गेले
राजेंच्या कुटुंबाचाच एक भाग बनून गेले
आमच्यासारखे........
परिजा
******
बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)
{मस्त कविता....}
मस्त आहे ही कविता!
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
{अभिनंदन, मीमराठी.नेट!}
अभिनंदन, मीमराठी.नेट!
{अभिनंदन}
अभिनंदन
{हार्दिक अभिनंदन मालक ! मी}
हार्दिक अभिनंदन मालक !
मी मराठीचा वारु असाच साहित्य विश्व पादाक्रांत करत राहो हिच सदिच्छा !
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{कोठून आणलास रे हा गुच्छ}
कोठून आणलास रे हा गुच्छ
Hope is a good thing...
{गुगलबाबा फ़्लोरिस्ट ! आमच्या}
गुगलबाबा फ़्लोरिस्ट !
आमच्या लॅपटॉपच्या कोपर्यावरच हाये बगा त्याचं दुकान
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{जबरदस्त आनंदाची बातमी. अशीच}
जबरदस्त आनंदाची बातमी.
अशीच यशाची कमान चढती राहो..
आम्ही आहोतच..लेखनकामाठी आणि शॉपिंग चालू राहीलच.
{हार्दिक अभिनंदन मालक}
हार्दिक अभिनंदन मालक
{संपुर्ण मीम परिवाराचे}
संपुर्ण मीम परिवाराचे अभिनंदन.!
{छान.. बाकी सगळं तर झालं}
छान..
बाकी सगळं तर झालं व्यवस्थीत..
आता एकदा राजाचं लग्न झालं की आम्ही डोळे मिटायला मोकळे..
{कुणाचे?}
आता एकदा राजाचं लग्न झालं की आम्ही डोळे मिटायला मोकळे..
कुणाचे?
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
{आता एकदा राजाचं लग्न झालं की}
आता एकदा राजाचं लग्न झालं की आम्ही डोळे मिटायला मोकळे >>>
चुकुन डोळे च्या एवजी डोहाळे वाचले आणि डोहाळे. मोकळे वाचुन .. हॅ हॅ हॅ
{एक सूचना}
मला माफ करा मंडळी, पण जालीय दुनियेत तसा मी अजून "अप्रेन्टिस" असल्याने हे एक छान संस्थळ "नोंदणीकृत" झाले म्हणजे नेमकी त्याची व्यापक व्याख्या आपणापैकी कुणी करेल का ? अर्थात व्यवस्थापनाकडून हे स्थळ "३ ऑगस्ट २०११ पासुन नोंदणीकृत व्यवसाय (फर्म) संस्था म्हणुन अस्तित्वात आली." असा उल्लेख घोषणापत्रात वाचला, म्हणजेच त्यांच्यासमवेत सदस्यांचीही काही Accountability असणे क्रमप्राप्त आहे का ? या निमित्ताने इथल्या सदस्यांचीही त्या अनुषंगाने काही Moral Responsibility असेल तर व्यवस्थापनाने ती निदर्शनास आणणे आवश्यक आहे असे मला वाटते.
बाकी....घोषणेतील ".... पण ते फक्त आभासी जगातील संस्थळ न रहाता वास्तव दुनियेत देखील आपली वेगळी ओळख निर्माण करु शकेल." हे आवडले. त्यासाठी शुभेच्छा.
सर्वच प्रतिक्रीया या घोषणेबद्दल आनंद व्यक्त करीत आहेत, त्यात मीदेखील आहेच.
{मी मराठी व सदस्यांचे संबंध...}
मी मराठी व सदस्यांचे संबंध कोणत्याही प्रकारे बदललेले नाहीत.
आपण पुरवित असलेल्या सेवा-सुविधा आणि सदस्यांच्या वर्तनाबाबत निसंदिग्ध व स्पष्ट नियमावली करुन त्याची अंमलबजावणी करणारे, आपली ध्येये, धोरणे आणि उद्दिष्टे संपुर्ण पारदर्शकतेने सदस्यांना स्पष्ट करणारे मी मराठी हे मराठी आंतरजालावरील पहिले संकेतस्थळ आहे. या पारदर्शितेमुळे मी मराठी आणि त्याचे सदस्य यांच्यामधील तसेच सदस्यांमधील आपापसातील संबंध नेहमीच सौहार्दाचे, परस्पर सामंजस्याचे राहिलेले आहेत. मी मराठीची ध्येये, धोरणे, उद्दिष्टे आणि नियमावली येथे आहेत. त्यांच्यामधे कोणताही बदल झालेला नाही अथवा तसा मोठा बदल करावा लागेल अशी नवी परिस्थिती उद्भवलेली नाही.
{अभिनंदन!!}
अभिनंदन!!
{अभिनंदन आणि शुभेच्छा !!!!!!}
अभिनंदन आणि शुभेच्छा !!!!!!
आपला स्नेहांकित...
-अशोक
{अतिशय आनंदाची बातमी. मीमची}
अतिशय आनंदाची बातमी.
मीमची अशीच उत्तरोत्तर प्रगतीपथावर वाटचाल होत रहावी, यासाठी भरघोस शुभेच्छा.
(मात्र नामावलीत माझे नाव बघून उडालोच. अनपेक्षित धक्का आहे माझ्यासाठी.
)
बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
{हार्दिक अभिनंदन ....! खुप}
हार्दिक अभिनंदन ....! खुप आनंदाची बातमी आहे.
रश्मि
{अभिनन्दन}
अभिनन्दन
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
{झक्कास बातमी}
राजेचे आणि आपल्या सगळ्यांचेच अभिनंदन.
{अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा}
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा !!
{मीमराठी परिवार तुम्हां}
मीमराठी परिवार तुम्हां सर्वांचा खूप खूप आभारी आहे, असाच लोभ राहू द्या ही प्रार्थना!
Hope is a good thing...
{>>मीमराठी परिवार तुम्हां}
>>मीमराठी परिवार तुम्हां सर्वांचा खूप खूप आभारी आहे
आम्ही त्याचा भाग आहोत असे उगाच वाटलेले...........
{अभिनंदन}
अभिनंदन मालक...
This is imperfect universe
{अभिनंदन! आता पार्टी}
अभिनंदन!
आता पार्टी कधि??
{अभिनंदन}
राजे, आपली संस्था उतरोत्तर प्रगती करत जावो आणि नेटकरी मराठी बांधवांची सेवा अधिकाधिक घडो अशी मनापासून सदिच्छा.
(आवाण्तर : आम्चे नाव यादीत दोनवेळा दिल्याबद्दल विशेष आभार!)
{हा हा हा ! चुकून झाले असेल}
हा हा हा !
चुकून झाले असेल
Hope is a good thing...
{सौ. राजे }
सौ. राजे आल्यापासून राजेंच कशाकडे नीट लक्षच नसत
बन्सी को लकडी सदा समझा किये तुम पर उसके नग्मो कि धुन कहाँ सुन सके तुम!
{हो हो}
हो हो
Hope is a good thing...