खरे तर 'अ' शी मैत्री व्हायचे काहीही कारण नव्हते.
एका अत्यंत जवळच्या मित्राने करुन दिली.
हळु हळु मैत्री वाढली.
एकत्र बसणे उठणे होउ लागले.
मैत्री घनिष्ठ झाली.
एकमेकांशी रोज बोलणे होउ लागले.
तसे 'अ' चे वर्तुळ फार मोठे.
त्या वर्तुळातले काही जण मित्र होउ लागले.
मैफिली जमु लागल्या.
अगदी वर्तुळातातले परदेशी असलेले सुद्धा भारत भेटीत न चुकता भेटु लागले.
एकंदरीत सगळे मजेत चालले होते.
काही कारणाने 'अ' चे वर्तुळातल्या 'ब' शी भांडण झाले.
सुरुवात अगदी छोटीशी झाली.
त्याचे वणव्यात रुपांतर झाले.
एकमेकांच्या पाठीवर थाप मारणारे पाठीवर वार करु लागले.
वर्तुळ गोंधळले.
काय करावे कळेना.
'अ' आणि 'ब' ची सार्वजनिक ठिकाणी एकमेकांची निर्भत्सना इतरांना त्रासदायक ठरु लागली.
मग त्यात दोन तट पडले.
कोण बरोबर कोण चुक ह्या बद्द्ल न्याय होउन हे तट वेगळे झाले.
पण काही जणाना हे मुळ स्वभावाने न्यायधिश होणे जमले नाही.
मग त्या सर्वांनी एकमेकांशी संपर्क साधुन एक निर्णय घेतला.
कोण चुक कोण बरोबर हा निर्णय आपण घ्यायचा नाही.
'अ' चे 'ब' शी शत्रुत्व हे वेगळे कंपार्ट्मेंट.
आपल्याला दोघेही सारखे.
इथे मैत्री करायला वेळ मिळत नाही.
दुष्मनीच्या पाट्या का उचलायच्या?
दोघांच्या बरोबर मैत्री तेवढीच निभवायची.
दोघांनाही एकच सांगायचे,
मी कुणाचीही बाजु घेणार नाही.
आपली मैत्री आणि तुम्हा दोघांची लढाई ही वेगवेगळी कंपार्ट्मेंट्स.
आणि ह्या मुद्द्यावर तुम्हा दोघांपैकी कुणाला आमची मैत्री सोडावीशी वाटली तर ती तुमची मर्जी.
काय म्हणता मंडळी तुम्हाला काय वाटते?
प्रकाटाआ
प्रकाटाआ
-निखिल
राज ठाकरे अन उद्धव ठाकरे
राज ठाकरे अन उद्धव ठाकरे यांच्या तंट्यात मराठी जन्तेंच काय होणार मास्तर? काँग्रेसचाच फायदा होणार अन विदर्भ महाराष्ट्रापासून तुटला जाणार किंवा मुंबई केंद्रशाषित प्रदेश होणार.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
हा हा हा
अहो तुम्ही प्रत्येक गोष्ट एवढी सिरियसली का घेता हो ?
सध्या विषय तो नाहीये.
बाकी मास्तरांचे क्रिप्टिक समजायला लै डोक्याला शॉट लागतो.
बाकी, मास्तर आम्ही तुम्च्या प्रश्नाचे उत्तर मुंबई भेटीत दिले होते.
तेच आता सांगतो.
अहो मला समजले होते सगळे तरीही
अहो मला समजले होते सगळे तरीही आम्हीही क्रिप्टिक लिहीले थोडे अन रिलेट केले या गोष्टीशी.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
हा हा हा सही आहे....
हा हा हा
सही आहे....
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मास्तर,
आम्ही लईच सावधानता पाळून एवढंच म्हंतो की, भापो!
खरं तर इथंच थांबायचं होतं. पण आत्ताच काही पाहिलं इतरत्र आणि ता. क. वाढवावा लागला -
ही भांडणं का करतात हे एकदा या 'अ' आणि 'ब' लाही विचारून घ्या हो. त्यांचे भांडणाचे मुद्देही टिकत नसावेत असे हे ताजं काही वाचल्यावर वाटू लागलंय. इथं इतरांचाच बळी जातो. तुम्ही धागा काढण्यामागं तो हेतू नसला तरी, आता तो चिकटू शकतो बरं...
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं !!!!!
_/\_
मोडक मोडक....उगाच नाय आम्ही तुमचे फ्यान!
च्यायला, आत्ता आमची सरकारी ट्युबलाईट पेटली.

हे 'विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती' वालं थोरलीसेना-धाकटीसेना प्रकरण नाहीय्ये तर, डायरेक्ट समाजवादी कॉंग्रेस आणी त्या संदर्भातलं आहे होय?
बाकी, समाजवादी काँग्रेसमधुन पवारांसह निष्ठावंत कार्यकर्ते बाहेर पडल्यानंतर, थोड्याच काळात ज्यांना आपण जीवापाड भिडलो..शह-काटशह खेळलो त्यांच्याच मांडीला मांडी लाऊन बसलेले आपले श्रेष्ठी पाहुन त्या सामान्य कार्यकर्त्यांची इतक्यावर्षांनंतर काय अवस्था झाली असेल ते 'कोणता झेंडा घेऊ हाती' ह्या गाण्यातुनही स्पष्टपणे व्यक्त नाही करता यायची. नाही का?
मास्तुरे भावना फोचल्या.
मास्तुरे भावना फोचल्या.
(पाटीधारी) पेशवे
-पुण्याचे पेशवे
ह्म्म्म !
ह्म्म्म !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
भापो आणि सहमतीही!
भापो आणि सहमतीही!
ह्म्म्म...चालू द्या मास्तर
ह्म्म्म...चालू द्या मास्तर
विचारवंत बनलास की रे
विचारवंत बनलास की रे मास्तरा....
बर मला एक सांग हा फक्त अ आणि ब चाच विषय होता का रे ?
क ख ग पासुन ज्ञ पर्यत काय चुत्ये होते का ?
पण नाही असा विचार मास्तर करणारच नाही...
कारण ? .... कारण सरळ आहे...
विचारवंत व्हायचे डोहाळे लागले ना ?
मग हा फक्त अ किंवा ब चा विषय आहे असे समजुन वाळुत तोंड खुपसुन मेल्याप्रमाणे पडुन राह्यचे ...
नाही का ? चालु द्या ... शुभेच्छा!
नाना नाना... शांत शांत
नाना नाना... शांत शांत !!
मास्तर आपलाच माणूस आहे, थोडा ब च्या जास्त जवळ आहे एवढंच
तु शांत हो पाहू आधी.. तो बिपी .. बिका नव्हे.. बिपी वाढेल तुझा.. शांत घे !
ही लै मोठी माणसं बा.. लै विचार करत्यात एकाच बाजूनं ... चालायचं...
एका सामाजिक लढ्याला अ व ब ची लढाई म्हणून गप्प बसतील ते... तुला कय पडली रे उगाच मध्ये मध्ये...
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
हा
एका बाजुचा विचार आहे राजे?
तसे असेल तर मला काहीच म्हणायचे नाही.
तसे असेल तर नानाने म्हटल्याप्रमाणे क,ख्,ग्,ते ज्ञ पर्यंत्त आपोआप च्युत्ये बनतात.
>>>'अ' आणि 'ब' ची सार्वजनिक
>>>'अ' आणि 'ब' ची सार्वजनिक ठिकाणी एकमेकांची निर्भत्सना इतरांना त्रासदायक ठरु लागली.
'ब' ने असे कधी केले आहे ?
तुमचेच वाक्य आहे.
म्हणून तर म्हणतो आहे 'अ' आधी पासुन जवळचा व समवयस्कर .. जानो दो सर !
कोण 'अ' कोण 'ब' त्यांचा पाई आपण का किबोर्ड बडवायचा
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
अ
अ आधीपासुन जवळचा व समवयस्क?
काही विसरता आहात राजे?
आठवा.
कसली
वाळू?
कसले तोंड?
नाना तुम्हाला मी इतिहास शिकवु काय?
जरुर समजावुन सांगा... कदाचित
जरुर समजावुन सांगा...
कदाचित माझे आकलन तोकडे असेल
माझी बुद्धी अल्प असेल
तर तुम्ही नीट समजावुन सांगितल्यावर माझी चुक कदाचित मला उमगेल..
पण.... हा पण फार मोठा आहे मास्तर...
करा जरुर प्रयत्न करा..
पण
हा पण फार मोठा आहे.
१+ सहमत
विठ्ठलाऽऽ कोनता झेंडा घेऊ
विठ्ठलाऽऽ कोनता झेंडा घेऊ हाती!!
-ऋ
मी
मी कुणाचीही बाजु घेणार नाही.
व्वा मास्तर...! सहमत आहे.
-दिलीप बिरुटे
काही प्रश्न!
अ आणि ब ह्यांचे वैयक्तिक हेवेदावे असतील वाद असतील तर त्यांनी खुशाल एकमेकांच्या बोकांडी बसावं, टक्कुरी फोडावीत, जीव घ्यावेत; त्यामध्ये पडणारे इतर कोण आणि त्यांचा संबंधच काय? त्यामुळे तशी परिस्थिती असल्यास कंपार्टमेम्ट करावे की नाही हा मुद्दाच गैरलागु.
अ आणि ब चे वैयक्तिक हेवेदावे जर अ किंवा ब ने सामाजिक्/चारचौघात आणले आणि स्वतःच्या अधिकारांचा गैरवापर केला तर ते कंपार्टमेंट करावे असे मला वाटते.
अ किंवा ब जर 'जगमोहन दालमिया' क्रायसिसग्रस्त असेल तर काय करावे? जसे जगमोहन डॉलरमियांना मी म्हणजे भारतीय क्रिकेट आणि भारतीय क्रिकेट म्हणजेच मी असे वाटु लागल्यानंतर लहान मोठ्या खेळाडुंना आणि पदाधिकार्यांना डॉलरमियांनी मनमानी करुन स्वतःच्या मर्जीप्रमाणॅ नाचवले-वागवले, अपमानित केले म्हणुन टीममधल्या बहुतांशांचा रोष असेल तर काय करावे? त्यासाठी कोणते कंपार्टमेंट आहे?
तस्मात,
सदर लेख मलातरी कळाला नाही. ह्यात दिसणार्या उदाहरणात वस्तुस्थितीचा विपर्यास आहे की दृष्टीभ्रम?
कारण अ आणि ब चे वैयक्तिक रोष निराळे आणि अ किंवा ब ने आपण हीच एक संस्था किंवा समुह आणि ती संस्था/समुह म्हणजेच आपण असा दुर्दैवी प्रकार पाहण्यात आला म्हणुन प्रश्न पडले आहेत.
सदर लेख मलातरी कळाला नाही.
सदर लेख मलातरी कळाला नाही. ह्यात दिसणार्या उदाहरणात वस्तुस्थितीचा विपर्यास आहे की दृष्टीभ्रम?
कारण अ आणि ब चे वैयक्तिक रोष निराळे आणि अ किंवा ब ने आपण हीच एक संस्था किंवा समुह आणि ती संस्था/समुह म्हणजेच आपण असा दुर्दैवी प्रकार पाहण्यात आला म्हणुन प्रश्न पडले आहेत.>>>
सहमत !! ठळक केलेल्या वाक्याप्रमाणे माझाही लेखकाला प्रश्न..
सदर लेख मलातरी कळाला नाही.
सदर लेख मलातरी कळाला नाही. ह्यात दिसणार्या उदाहरणात वस्तुस्थितीचा विपर्यास आहे की दृष्टीभ्रम?
कारण अ आणि ब चे वैयक्तिक रोष निराळे आणि अ किंवा ब ने आपण हीच एक संस्था किंवा समुह आणि ती संस्था/समुह म्हणजेच आपण असा दुर्दैवी प्रकार पाहण्यात आला म्हणुन प्रश्न पडले आहेत.
+ १