मेदुवडा
हल्ली किचन मध्ये जाउन काही खास बनवण्याचा उत्साह नसतो. पण दुपारी एका मित्राने फोन केला. फोनवर माझ्या ब्लॉगच बरच कौतुक केल. (आमच विमान लगेच हवेत.) मग त्याने हळुच पिल्लु सोडलं की तो संध्याकाळी घरी येतोय. (हवेतल्या विमानाच क्रॅश लँडिंग.)
आता आयत्या वेळी काय करावं बरं? थोडा वेळ डोक खाजवल्यावर संध्याकाळच्या खादाडीसाठी मेदुवडे करायच ठरवलं.
लंच टाईम मध्ये घरी जाउन डाळ भिजत घातली. बाकी कस काय ते पुढे .....
साहित्य :
२ वाट्या उडदाची डाळ.
१ वाटी बारीक चिरलेला कोबी.
१ मध्यम कांदा (बारीक चिरलेला).
२-३ मिरच्या (बारीक चिरलेल्या).
१ इंच आलं (लहान तुकडे करुन).
थोडीशी कोथिंबीर.
२ कडिपत्त्याची पाने.
चवी नुसार मीठ.
तळण्यासाठी तेल.
कृती :
२-४ तास भिजत ठेवलेली उडदाची डाळ पाणी काढुन टाकुन थोडी भरड वाटुन घेतली.
वाटलेल्या पिठात कांदा, कोबी, आलं, मिरची, कडिपत्ता, कोथिंबीर आणि मीठ टाकुन एकत्र करुन घेतले.
एकीकडे कढईत तळण्यासाठी तेल तापत ठेवल.
एका स्वछ झिपलॉक /प्लॅस्टिकच्या पिशवीवर पीठाचा गोळा घेउन, हलक्या हाताने दाब देत वडा थापला. मधोमध एक छोटस भोक पाडल.
वडा अलगद हाताने उचलुन तेलात सोडला. (हे सगळं लिहायला/वाचायला कित्ती सोप्पय नाही?
)
पण शेवटी पोपट झालाच. पिशवी वरुन उचलत वडा तेलात सोडतानाच त्याने असा काही आकार घेतला की ज्याच नाव ते. मित्राला आणि मलाही भुक सपाटुन लागली होती. शेवटी मेदुवड्याच्या आकाराच नाद सोडुन सरळ गोळाभजीच्या आकाराचे वडे केले.

चार पाच भज्या सदृश्य वडे पोटातल्या कावळ्यांना अर्पण केले. ते शांत झाल्यावर माझ्यातला 'कलाकर'(?) हट्ट सोडायला तयार होईना.
म्हणुन यावेळी हातावरच मेदुवड्याचा आकार देउन वडे सरळ तेलात सोडले.
वेडे वाकडे का होईनात पण या वेळेस मेदुवड्या सदृश्य लुक आला खरा.
नारळाच्या चटणी सोबत कुरकुरीत मेदुवडे.
.jpg)
{खल्लास. मेल्यानंतर गणपाच्या}
खल्लास. मेल्यानंतर गणपाच्या पाकृतीनेच मुक्ती मिळेल.
अवांतरः चांगले चांगले शिकले सवरलेले लोकही या मेदूवड्यास मेंदूवडा का म्हणतात ते कळत नाही. कंन्स्ट्रक्शन हा शब्दही त्याच फिल्डमधले लोक कंट्रक्शन असा उच्चारून त्यांच्या ज्ञानाची पातळी दाखवतात.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
{+१}
अवांतरः चांगले चांगले शिकले सवरलेले लोकही या मेदूवड्यास मेंदूवडा का म्हणतात ते कळत नाही.
{(विषय दिलेला नाही)}
Hope is a good thing...
{सहीच}
सहीच
{मस्त..}
गणपा नेहेमीप्रमाणं फुल्ल फॉर्मात.
@ राजे,
गणपा यांच्या पाकृं साठी विशेषणे अशी काही सोय करता येईल का ?
कारण फोटो आणि वर्णन पाहून लाळेने तोंड आणि ' हे आपल्याला कधी चापायला मिळेल' या विचारांनी डोकं
भरलेले असताना प्रतिसाद काय द्यायचा हे सुचत नाहिय्ये.
{+ १ ' हे आपल्याला कधी}
+ १
' हे आपल्याला कधी चापायला मिळेल' या विचारांनी डोकं
भरलेले असताना प्रतिसाद काय द्यायचा हे सुचत नाहिय्ये.
{मानले बुवा... तुम्हला...}
मानले बुवा... तुम्हला...
{भुक चाळवली मेल्याने}
भुक चाळवली मेल्याने
{उत्तम}
उत्तम
{तुमच्याशी मैत्री करायला आवडेल}
तुमच्याशी मैत्री करायला आवडेल आपल्याला ...
मेदुवडा
Ignited Mind ! हा माझा , माझ्या कवितांचा ब्लॉग आहे बरं का !
{चांगली आयडिया आहे}
चांगली आयडिया आहे
Hope is a good thing...
{(विषय दिलेला नाही)}
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!
माझा ब्लॉग - मन उधाण वार्याचे…
{मस्त रे}
मस्त रे
मी जाह्नवी. एका कल्पनेचं वास्तव
{शेवटचा फोटो खूप छान आला आहे.}
शेवटचा फोटो खूप छान आला आहे.
{सर्व रसिक खवय्यांचे अनेक}
सर्व रसिक खवय्यांचे अनेक आभार.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा