अराउंड पुणे ... अलाँग NH4

0
0

टंकायला अंमळ उशीरच केलाय .... पण असो .. दुर्घटना से देर भली हास्य

पुण्यात आल्यापासून बर्‍याच दिवसापासून बाइकवरून भटकंतीचा प्लॅन केला होता ... पण साला मुहुर्तच लागत नव्हता
आमचं असचं होतं.... प्लॅन ..प्लॅन ..प्लॅन .. पण अ‍ॅक्शन नाही ... कारण काय ..तर कधी सुट्टी नाही तर कधी कुठे दुसरीकडे जायचं ....
फायनली ठरवल की बेत बीत काही नाही हास्य ..सरळ गाडी घ्यायची की निघायचं ... ख्रिसमसची सलग ३ दिवस सुट्टी मिळाली होती ... २ दिवस हुंदडायचं...१ दिवस आराम ... wink पण यक्ष प्रश्न होता की जाणार कुठे ? असचं हापिसातल्या एक दोघांना विचारून ठरवलं की हुंदडायचं ते ... "अराउंड पुणे ... अलाँग NH4" ...एक दिवस सातारा साइड ला ..एक दिवस लोणावळा साइड ....

ही आमची बाइक ..

तर पहिल्या दिवशी सातारा साइडला जेवढ जाउ तेवढ असं म्हणून निघालो ... म्हटल direct बालाजी चं दर्शन करू ....
चलो नारायणपूर ...
नारायणपूर फाट्यावरून आत वळालं की दुरुन दिसणारा सह्यकडा ...

प्रति बालाजी मंदिर

सकाळची वेळ असल्यानं दर्शनाला फार वेळ लागला नाही ... व्यवस्था फार चोख ठेवली आहे ...
दर्शन घेवून महाप्रसादासाठी मंदिराच्या मागे आलो तेथून दिसणारा मंदिराचा परिसर ...

तिथे समोरचं क्रिकेटचा सामनाही चालू होता. सामना बघणार्‍यांना अडथळा करून कसातरी फोटो काढला ..

प्रति बालाजी ते थेट बनेश्वर ...

मित्राने बनेश्वर बद्द्ल सांगितले होते .... म्हणून मोर्चा आता बनेश्वरकडे वळवला ... डोंगराच्या कुशीत , दाट वनात लपलेल फार शांत आणि सुंदर ठिकाण आहे हे.... जाण्याचा रस्ता मात्र खराब Sad

मंदिरासमोरचं हे त्रिशूळ ...

मंदिर ...

समोरच्या कुंडात मासे, कासवं सोडली आहेत ...

जवळच वनोद्यान आहे ... फेरफटका मारत मागच्या नदीजवळ आलो ..

खूप खूप छान आहे ... हिवाळ्यात ही तर्‍हा तर पावसाळ्यात काय मजा असेल नाही !!!

जरा वेळ तिथे बसून परत निघालो ... मित्राने सांगितलं होत की नारायणपूरहून जवळच तोरणा आहे ... पण वाट चुकलो Shy .. तोरणा शोधता शोधता ... खेड-शिवापूर - कोंढाणापूर मार्गे "सिंहगडावर" पोहोचलो Puzzled
अगेन रस्ता फार फार खराब ....

माझी बाइक गडावर कशी काय चढली कुणास ठावूक thinking मध्ये २/३ वेळा बंद पडली ...रडत्-रखडत कसा तरी पोहोचलो ... पाहतो तर काय "ट्रॅफीक जाम" ... सुट्टी मुळे बरेच लोक वन डे ट्रिप साठी आले होते ... बाइक रस्त्याकडेला व्यवस्थित (टाकून असचं म्हणायला हवं) लावून गडावर गेलो ...नुकताच "राजेंचा" सिंहगडावरचा लेख वाचला होता .... त्याची प्रचिती लगेच आली .... Sad

एका ग्रूपबरोबर गाइड होता ... थोडीफार माहिती ऐकत थोडा वे़ळ भटकलो ... काही फोटो काढले ...

संधिकाळी या अशा

नंतर मस्त पिठलं भाकरी खाउन परतीच्या वाटेला लागलो ... [माझा एक मित्र ... फक्त पिठलं भाकरी खायला बर्‍याचदा गडावर जातो हास्य ] ...
गड उतरताना "सुर्यास्त" टिपायचा मोह आवरला नाही

आलो होतो खेड शिवापूर मार्गे ..... त्यामुळे जाताना रस्ता विचारत ... कसा तरी पुण्याच्या मार्गाला लागलो ... जाम घाबरलो होतो ... एक तर रस्ता माहित नाही ... अंधार पडला होता ...त्यातचं की काय पेट्रोलचा काटा पण पार डावीकडे
झुकला होता ... तरी बरं पेट्रोल संपल नाही .... कसातरी घरी पोहोचलो ....

दुसर्‍या दिवशी सकाळी लवकरच निघालो ... पहिल्यांदा पेट्रोल टाकी फुल्ल केली ... आता प्रवास होता तो towards लोणावळा ...

हायवे वर आलो .. जुन्या पुणे-मुंबई हायवे वर , टोल नाक्या़जवळ गणपतीची सुमारे ७२ फूटी उंच मूर्ती आहे ...
हायवेवरून अशी दिसते ..

जवळून घेतलेला फोटो

गणपतीचं दर्शन घेतलं ... तिथं लहान मुलांची सहल आली होती ...

त्यांना पाहून माझी शाळेची सहल आठवली ..

काय दंगा करायचो.... सहलीला जाताना ... एस्.टी. मध्ये .. घोषणाबाजी चालायची

१..२..३..४ .... ड्रायव्हर मामा लै हुशार
आली रे आली ..... सहल आली
कोणत्या गावची .....

वगैरे वगैरे हास्य

तिथून हायवे असा दिसतो

तिथला दिशादर्शक पाहून कळालं की जवळच प्रति शिर्डी आहे ... मग काय .... चलो शिर्डी ...

मारली किक आणि निघालो ...

सकाळची वेळ होती , गर्दी अजिबात नव्हती .. त्यामुळे दर्शन फारच छान झाले ..

मंदिराचा कळस

सभामंडपातून ...

श्री साई

कुंपणावरचा गरूड

बागेतला कलश

अन्नछत्र राजवाडा

...

तिथून परत लोणावळ्याला निघालो ...

वाटेत कार्ला लागतं ... जय हो एकवीरा देवी ... गाडी वळवली देवीच्या दर्शनासाठी ...
इथ मात्र फार गर्दी होती ... रांगेतून देवीच दर्शन घ्यायला जवळजवळ तास लागला ....

दर्शन घेतल्यावर मात्र मोर्चा वळवला तो लेण्यांकडे .....

तिथल्या माणसाने दिलेल्या माहीती नुसार जपान सरकारच्या मदतीनं डागडूजी करण्यात आली आहे ...अशीच लेणी लेण्याद्री [अष्टविनाय़क] इथे सुद्धा आहेत ...

जसं आज घराचा किंवा बिल्डींगचं छोट मॉडेल बनवतात तसं त्या काळी लेण्याचं छोटं मॉडेल सुद्धा बनवलं आहे

मग डोंगर उतरून लोणावळ्याकडे प्रस्थान केलं ...

लोणावळयात जावून जेवलो.. मग १/२ स्पॉट पाहीले .. भुशी डॅम वगैरे .. फोटो काढले ...

खरी मजा लोणावळ्याला पावसाळ्यात जाण्यातच आहे हास्य ...

"चिक्की" घेवून परत पुण्याला परतलो ...

ऐकिव आणि देखीव [गावांचे दिशादर्शक] वगैरे माहितीच्या जोरावर २ दिवस "अराउंड पुणे ... अलाँग NH४" भटकलो ...

मस्त रे!

1

छान फेरफटका घडवलास रे संग्राम!!

सही भटकंती आहे रे.. फोटो

2

सही भटकंती आहे रे..
फोटो आवडले रे... खास करून सूर्यास्ताचे..!!!!

पुभशु!!!

अग्गाग्ग्गा ! लै भारी रे

3

अग्गाग्ग्गा !
लै भारी रे मित्रा...

श्या... आताच उठून जावे असे वाटत आहे Sad

पण पुढील ट्रिप नक्की झाली माझि ह्या धाग्यामुळे अल्टिमेट फोटो !

लै भारी बॉ !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्वा

4

व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्वा

--आण्ण्ण्ण्ण्ण्णा

ग्ग ग्ग ग्ग!!!

5

ग्ग ग्ग ग्ग!!!

मस्त भटकंती

6

फोटो खूप आवडले.. या सुट्टीत एकविरा-कार्ला नक्की...

झबरदस्त फटू रे संग्राम्या!

7

झबरदस्त फटू रे संग्राम्या!



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

अबे संग्राम मला खरच माहित

8

अबे संग्राम
मला खरच माहित नव्हते तु तर लै भारी फोटोग्राफर निघालास..
फोटो आ़णी भटकंती मस्तच...
आता पुढची भटकंती कधी ते कळव रे.. मी पण येईन म्हणतो...
संध्याकाळचे फोटो तर लै भारी आलेत


-निखिल

मस्त रे

9

मस्त रे

सह्ही रे भटकंतीप्रेमी.

10

सह्ही रे भटकंतीप्रेमी. हास्य


-पुण्याचे पेशवे

सूंदर फोटो ....

11

मस्तच भट्कंती....!

मस्त भटकंती

12

मस्त भटकंती

वाचताना पुन्हा भटकंती करुन

13

वाचताना पुन्हा भटकंती करुन आले अस वाटल.
मस्त भटकंती वर्नन झाल आहे .


हास्य

मित्राला बदनाम केलं :(

14

एकदम छान वर्णन....
पुन्हा जाउन आल्यासारखं वाटलं....
मजा आली.

धन्यवाद मित्रहो ...

15

सर्वांचे खूप खूप धन्यवाद ...

जबरा

16

जबरा

मस्त भटकंती

17

मस्त भटकंती !!.....बनेश्वर,चेलाडी आपला लई आवडता स्पॉट्....शिवापुरच्या दर्ग्यावर नाही गेलास ?......लोणावळ्याला मात्र मी कोणी पैसै दिले तरी जाणार नाही ....एकविराआईचे दर्शन घडविल्याबद्दल धन्यवाद...पण अपोझिट साईडला मळवलीला भाज्याच्या लेणीवर गेला असतास तर समोरच लोहगड-विसापुर ही दिसला असता...असो....भटकंती आवडली....

जास्त माहिती नव्हती

18

माहिती नव्हती हो ज्यादा ... असचं भटकत भटकत गेलो होतो हास्य

मस्त मस्त मस्त

19

एकदम छान संग्राम!!!