नैतिकता

0
0

नैतिकता.

स्वतःच्या वागण्यावर स्वतःच घालुन घेतलेले किंवा अमुक गोष्ट अशीच केली पाहीजे अशा अर्थाचा समाजाचा आग्रह.

सध्या आपण समाजाच्या आग्रहाचा विचार न करता फक्त स्वतःच स्वतःवर घालुन घेतलेल्या बंधनाबद्द्ल बोलु.

अमुक एक गोष्ट करणे अथवा न करणे माझ्या तत्वात बसते असे आपण सांगतो. हे नक्की काय असते? तर आपण आपल्या बुद्धीनुसार अमुक एक पद्धतीने वागण्याचे ठरवतो. तसे वागणे हे आपल्या दृष्टीने नैतिकतेने वागणे असते. त्या तत्वाविरुद्ध आचरण करण्याची कल्पना आपल्याला सहन होत नाही. तसे वागणे हे आपल्याला अनेकदा अनैतिक वाटते. कळत न कळत आपल्या नैतिकतेचा आग्रह इतका वाढतो की समोरच्याने सुद्धा तसेच वागावे असे आपण ठरवायला लागतो. तर कित्येकदा ज्यांना आपण आदर्श मानतो त्यांच्या नैतिकतेच्या कल्पना आपण अंगिकारतो. हे अंगिकारणे जर बुद्धीचा वापर करुन असेल तर त्यात गैर काही नाही परंतु कुठलाही विचार न करता केवळ ते तसे वागतात म्हणून आपण तसे वागावे ही आंधळा प्रवास होय. ज्यात कदाचित भविष्यात नैराश्य पदरी येण्याची शक्यता असते.

पण नैतिकतेने वागणे म्हणजे नक्की काय? कित्येकदा नैतिक वागणे हे कायदेशीर असेल असे नाही आणि कायदेशीर वागणे हे नैतिक असेल असे नाही. मग महत्व कशाला द्यायचे ? कायदेशीर वागण्याला की नैतिकतेने वागण्याला? कायद्याचे राज्य, कायदेशीर वर्तणुक याला लोकशाहीमधे महत्व आहेच त्याचबरोबर समाजासाठी ते आवश्यक आहे हे आपल्यावर बिंबवले आहे. त्यामुळे कित्येकदा आपण आपली वर्तणूक केवळ बेकायदेशीर होत नाही ना हे पहातो. त्या साठी मग नैतिकतेचा सुद्धा बळी जातो. पण आपण ही तडजोड सहज करतो. मात्र आपण अनैतिक वागत आहोत असे कधीच मान्य करत नाही. कारण बेकायदेशीर आणि अनैतिक यात प्रचंड फरक आहे हे आपण जाणतच नाही.

कायदा झाला की कायदेशीर काय आणि बेकायदेशीर काय यात फारसा संभ्रम रहात नाही. परंतु नैतिक काय आणि अनैतिक काय याचा क्षणोक्षणी संदर्भ बदलत असतो आणि आपण तेवढा विचार करण्याची तसदी घेत नाही. सोईस्कर रित्या कायदेशीर तेच नैतिक आणि बेकायदेशीर तेच अनैतिक अशी समजुत करुन घेत आपल्या दृष्टीने आपला तिढा सोडवतो. पण तो सुटलेला असतोच असे नाही.

{(विषय दिलेला नाही)}

1

हास्य

{नैतिकता (मोरॅलिटी) वर प्रचंड लिहिले गेले आहे}

2

नैतिकता (मोरॅलिटी) वर प्रचंड लिहिले गेले आहे...

नेमकेच बोलायचे झाले तर खालील प्रश्न आहेत -

१) नैतिकता का जन्माला येते (Why does morality exist ?).

२) विश्वात फक्त एकच व्यक्ती जिवंत असल्यास कोणते नैतिक नियम लागू करावेत ? त्यांची राबवणूक कोण व कशी करणार ? फक्त दोनच व्यक्ती (इथे मर्यादित पारस्परिकता आली) असल्यास कोणते ? त्यांची राबवणूक कोण व कशी करणार (enforcement mechanism) ? तीन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती (इथे मर्यादित पारस्परिकता वाढली व क्लिष्ट झाली) असल्यास कोणते ? त्यांची राबवणूक कोण व कशी करणार ?

३) नैतिकतेचे स्वरूप कसे असते ? (नैतिकतेची मूल्ये कोणती व कितपत असतात ... कोणाची असतात, कोणासंदर्भात, का असतात व मुख्य म्हंजे कोणती मूल्ये व्यक्तीसापेक्ष असतात व कोणती व्यक्तीसापेक्ष नसतात ? कोणती असावीत व नसावीत ?)

४) दोन नैतिक मुल्यांमध्ये असलेला संघर्ष कसा सोडवावा ? (उदा. दया विरुद्ध न्याय)

५) एकाच नैतिक मूल्याचा दोन वेगवेगळ्या बाबतीत संघर्ष निर्माण झाल्यास काय करायचे. (निष्ठा - संघनिष्ठा वि. देशनिष्ठा)

६) नैतिक द्वंद्व (उदा. कायदा वि. नैतिकता, व्यक्तिगत नैतिक मूल्ये वि. व्यावसायिक नैतिक मूल्ये) ला तोंड कसे द्यावे ?

७) नैतिकतेचा दुरुपयोग होतो का ?

८) नैतिकतेचे प्रकार - व्यक्तीगत, सामाजिक, सार्वजनिक, राष्ट्रीय, वैश्विक, व्यावसायिक, विशिष्ठ व्यावसायिक .....?

-----------------------------

कायदा झाला की कायदेशीर काय आणि बेकायदेशीर काय यात फारसा संभ्रम रहात नाही. परंतु नैतिक काय आणि अनैतिक काय याचा क्षणोक्षणी संदर्भ बदलत असतो आणि आपण तेवढा विचार करण्याची तसदी घेत नाही. सोईस्कर रित्या कायदेशीर तेच नैतिक आणि बेकायदेशीर तेच अनैतिक अशी समजुत करुन घेत आपल्या दृष्टीने आपला तिढा सोडवतो. पण तो सुटलेला असतोच असे नाही.

सहमत. कायदा व नैतिकता यात जे फरक आहेत त्यात एक महत्वाचा हा की कायद्याचे पालन होतेय की नाही याची देखरेख करणारी यंत्रणा (enforcement mechanism) उपलब्ध असते. नैतिकतेचे पालन बरेचसे व्यक्ती वर सोडून देण्यात येते. अपील टू ऑनर ऑफ द इंडिविज्युअल.

-----------------------------

नैतिकतेबाबत स्वारस्यजनक प्रश्न -

अ) नैतिकतेची तुलना अनेकदा पैश्याशी केली जाते हे खरे आहे की नाही ? खरे असल्यास योग्य आहे का ?

ब) सर्वसामान्यपणे अधिकारी/श्रीमंत्/शक्तीशाली/प्रथितयश व्यक्तीकडून आपली जास्त/उच्च/अतिरिक्त नैतिक वर्तणूकीची अपेक्षा असते की नाही ?

क) गट/संघ हा सर्वसाधारणपणे नैतिक दृष्ट्या (व्यक्तीपेक्षा) उच्च (जास्त महत्त्वाचा) असतो व असायला हवा असे गृहित असते.... नव्हे आग्रह असतो की नाही ? संघभावना ही स्पर्धाभावने पेक्षा उच्च मानली जाते की नाही ? (पण वस्तुस्थिती ही आहे की संघभावना ही स्पर्धा बळकटपणे करता यावी म्हणूनच जन्माला येते.)

ड) नैतिकतेच्या फुटपट्टीवर काही कृती ह्या जास्त वाईट असूनही ... काही ज्या कमी वाईट आहेत त्यांच्याबद्दल बोलणे/विचार करणे हे सुद्धा निशिद्ध मानले जाते की नाही ?

---------------

शेवटी -

समजा असे एक मशिन बनवले की ज्याच्यामध्ये व्यक्तीची कृती इनपुट केल्यास ती नैतिक की अनैतिक याचा झटपट निर्णय ते मशिन करते. व या मशिनची फॅक्टरी मधून अशी कोट्यावधी मशिन्स निर्माण केली व व्यक्तींना विकली तर -

i) त्या मशिन चे प्रोग्रॅमिंग कोण करणार ?
ii) त्यामध्ये कोणते नियम घालावेत (व कोणते घालु नयेत) की जेणे करून ते मशिन सर्वांना समान न्याय यानुसार कार्य करून झटपट निर्णय देईल ?
iii) या मशिन ने एखादी कृती अनैतिक असल्याचे निदान केल्यास काय करायचे ? अनैतिक कृती करणार्‍या व्यक्तीस शिक्षा करण्याचे (व काय व कोणती शिक्षा) निदान करण्याचा निर्णय मशिनने घ्यावा की इतर कोणी ?

प्रश्न - i, ii, iii यांची उत्तरे मिळाली तरीही त्यांवर एकमत होईल का ? व झाले तरी आदर्श नैतिक विचार व आचरण करणार्‍या व्यक्ती निर्माण होतील का ? (ही मशीन्स म्हंजे micro-judiciary आहे असे गृहित धरा.)


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

{नैतिकता...}

3

नैतिकता हे एका अर्थे कायद्याचे उगमस्थानच म्हणता येईल. नैतिकतेला विधीचे विधान मिळाले की झाला कायदा.
नैतिकतेचा उगम बहुतेक व्यक्तिगत पातळीवर होत असावा. त्यानंतर ती वेगवेगळ्या पातळ्यांवर (कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, वैश्विक इत्यादी) पोहोचत असावी.
व्यक्तिगत पातळीवरील नैतिकतेची अंमलबजावणी संबंधित व्यक्ती स्वतःच करत असल्याने ती अधिक लवचिक असु शकेल. येथे आवा पंढरपुरा जातेची गोष्ट आठवते. अन्य पातळीवरील नैतिकतेची अंमलबजावणी समुह करत असल्याने तिच्यातली लवचिकता कमी होत जाऊ शकते.
नैतिकतामुल्य सापेक्ष तर असेलच पण परिवर्तनशील देखील असु शकेल. कायदा तेवढा सापेक्ष किंवा परिवर्तनशील असु शकणार नाही.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

{दुवे}

4

इथे प्रदीर्घ चर्चा आहे - मोरॅलिटी बकवास आहे काय ?

http://mises.org/Community/forums/t/19351.aspx

(यातली मी २०% च चर्चा वाचली ... नंतर झोप आली.)

--------

इथे edavismail या सभासदाने एथिक्स व मोरॅलिटीतील फरक विषद केलाय. एक टेबल / तक्ता वापरून. अर्थात हा एक दृष्टीकोन झाला.

http://mises.org/Community/forums/p/24249/416567.aspx

--------

लडविग वॉन मिझेस हा अर्थशास्त्री, राजकिय अर्थशास्त्री व तर्कशास्त्री (प्रॅक्सिऑलॉजिस्ट - Praxeologist) होता. त्याच्या नावाने मिझेस डॉट ऑर्ग हा ब्लॉग आहे. (http://en.wikipedia.org/wiki/Praxeology )


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

{चर्चा वाचत आहे.}

5

चर्चा वाचत आहे.

{थोडक्यात}

6

थोडक्यात लिहलस पण छान लिहलस!
हास्य

{नैतिकता.....}

7

<<सोईस्कर रित्या कायदेशीर तेच नैतिक आणि बेकायदेशीर तेच अनैतिक अशी समजुत करुन घेत आपल्या दृष्टीने आपला तिढा सोडवतो. पण तो सुटलेला असतोच असे नाह<<>>

जे लिहिलयत ते मनापासून पटलं. नैतिक-अनैतिक आणि कायदेशीर-बेकायदेशीर हा खुप मोठा विषय आहे चर्चेसाठी. हे विषय म्हणजे "एकासाठी पेला अर्धा भरलेला आहे, तर दुसर्यासाठी अर्धा रिकामा." यामुळे खुप भिन्न्-भिन्न प्रकारच्या प्रतिक्रिया आणि विचार वाचायला मिळतील.

गब्बर सिन्गने सुरुवातही फार छान केली आहे.......अशाच विचार करायला लावणार्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत........


परिजा
******

बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)

{To keep the comfort,surviving}

8

To keep the comfort,surviving or balance of life and situation in the interest of large number of people, according to demands and needs, do whatever you want ignoring the learned lessons of right or wrong and morality, जे पाहीजे ते करा. मग ते कायदेशीर असो वा नसो वा बेकायदेशीर व नैतीक असो कींव्हा अनैतीक. रीजल्ट महत्वाचा. बाकीचं सगळ फक्त समाज शांत ठेवायला व अनागोंदी माजू नये म्हणून घोकायचं व घोकायला लावायचं.


And then !

{नैतिकता मागील काही वर्षात..}

9

नैतिकता हास्य

मागील काही वर्षात.. महिन्यात नैतिकता म्हणजे काय हे नक्की शिकलो आहे मी महाजालामुळे Crying


Hope is a good thing...

{चांगला विषय आहे ...... यावर}

10

चांगला विषय आहे ...... यावर .... खूप चांगली चर्चा होऊ शकते....... अवलिया... ररा..... नचिकेत गद्रे......गब्बरसिंग..... प्रसन्नदा...... विशालदा.....आत्मशून्य...... अमित ( याचेही मुद्दे चांगले आणि विचार करायला लावणारे असतात ) एव्हढे " मीमवरील विचारवंत " मला ठाऊक आहेत...........

अवलियांनी विषय सुरू केला आहे..... आणि यातील दोन तीन जणांनी प्रतिसादही दिला आहे......... उर्वरितांनीही आपले मुद्दे मांडले तर मजा येईल ... आणि वैचारिक पातळीतही थोडीफार भर पडेल आमच्या ! thinking


Ignited Mind ! हा माझा , माझ्या कवितांचा ब्लॉग आहे बरं का ! हास्य

{अरे राजेंना विसरलास}

11

अरे राजेंना विसरलास ना............त्यांच्याशिवाय तुझी विचारवंतांची यादी पूर्ण कशी झाली.... Cool


परिजा
******

बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)

{राजे आणि विचारवंत?}

12

तो अविचारवंत आहे असे बर्‍याच जणांचे मत आहे.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

{प्रसन्नदा... एका ? मध्ये}

13

प्रसन्नदा... एका ? मध्ये किती तरी बाबी साधता येतात .... नाही का ..????? wink


Ignited Mind ! हा माझा , माझ्या कवितांचा ब्लॉग आहे बरं का ! हास्य

{त्याक्षणी.... जे जे आठवले}

14

परीजा.... त्याक्षणी.... जे जे आठवले ...त्यांची त्यांची नावे घेतली........Oups

नाही घेतले तरी फार काही फरक पडेल असे वाटत नाही............काय ? Big smile ( राजे हलके घ्या.. )


Ignited Mind ! हा माझा , माझ्या कवितांचा ब्लॉग आहे बरं का ! हास्य

{समजून घेण्याचा प्रयत्न करतो}

15

समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे.

{नैतिक - अनैतिक }

16

व्यक्तिस्वातंत्र्याच्या या काळात नैतिकतेच्या अनेक रूढ कल्पनांना आव्हान दिलं जात आहे. कशाला नैतिक म्हणावं नी कशाला अनैतिक याबद्दल कमालीची मतभिन्नता आढळून येते. अशा परिस्थितीत खालील व्याख्या सर्वमान्य व्हायला हरकत नसावी.

"स्वार्थ साधण्याच्या हेतूनी, जाणून बुजून दुसर्‍याच्या कुठल्याही प्रकारच्या (शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आर्थिक, इ.इ.) दौर्बल्याचा / अगतिकतेचा गैरफायदा घेणं हे अनैतिक".

{स्तुत्य}

17

स्तुत्य उपक्रम रे अवलिया.
मी जुन्या काळातली. तेव्हा नैतिकतेचे हे वस्तुपाठ स्त्रियांनाच जास्त घालून दिले जातात असे आतापुरते म्हणेन.

{नैतिकतेचे हे वस्तुपाठ स्त्रियांनाच जास्त घालून दिले जातात असे आत}

18

नैतिकतेचे हे वस्तुपाठ स्त्रियांनाच जास्त घालून दिले जातात असे आतापुरते म्हणेन.

सहमत

Women are forced to be custodians of ethics, morality, sanctity and civilizational values.


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

{धर्म व कायदा}

19

धर्माने जी नैतिकता सुचवली त्याचे मूळ षड्रिपुंमध्ये असावे असे वाटते. स्वार्थ, लोभ, मत्सर, मोह वगैरे.
ख्रिस्ती धर्मातही ६ की ७ पापे सांगितली आहेतच.

कायद्यानुसार (खरंतर राज्यघटनेनुसार) धर्म ही वैयक्तीक बाब असल्याने धर्माने सुचवलेली नैतिकतेची चौकट व्यक्तीगतच ठरते त्यात कायदा हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे "स्वार्थ साधण्याच्या हेतूनी ..." अशी सुरुवात केल्यास ती कितपत मान्यताप्राप्त होईल यावर शंका आहे.

शरद कोर्डॅ साहेब, चर्चा या उपधाग्यावर/उपविषयावर पुढे नेऊया का ?

---

आमच्या ग्रुप मध्ये अमेरिकेतील सब प्राईम क्रायसिस ची कारणे सांगताना एकजण म्हणाला की - कॉर्पोरेट greed (अतिलोभ) हे या क्रायसिस चे एक कारण आहे. त्यावर अनेक मतभेद झाले होते - कोणी किती greed बाळगायची हे ज्याचे त्याने ठरवावे हा मूळ युक्तीवाद. सब प्राईम क्रायसिस चे विश्लेषण करताना धर्म हे अपुरे व तोकडे Framework आहे ... धर्म ही गोष्ट जुनाट व अपरिवर्तनशील आहे म्हणून संयुक्तीक Framework नाही असा एक युक्तीवाद.

तसेच कोणी किती स्वार्थ बाळगायचा हे ज्याचे त्याने ठरवावे. व प्रश्न contracts & agreements मध्ये कोणी चापलुसी केली व त्याचे काय हा उपस्थित करायचा हा दुसरा युक्तीवाद.

अर्थात Formal Analysis हा कायदेशीरतेचा भाग झाला ... नैतिकतेपेक्षा.

------

म्हणून आपण Expectations च्या अनुषंगाने विचार करावा असा मुद्दा मांडतो.

(पुढे प्रतिसादावर अवलंबुन...)


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.