मृत्यु
मृत्यु.
जीवनातील एकमेव सत्य.
कधी हलक्या पावलांनी दबकत दबकत येत हलकेच झडप घालणार तर सुसाट वेगाने येऊन पाचोळ्यासारखा उडवुन लावणार. कधी तो यावासा वाटते तर कधी त्याने येऊ नये असे वाटते. पण तो येणार नक्की येणार हे प्रत्येकाला ठाऊक असते. प्रश्न असतो तो फक्त कधी येणार आणि कसा येणार? मृत्यु म्हटले की अनेक कल्पना मनात दाटुन येतात. जीवनाचा शेवट. जगाचा अंत. पण नक्की तो असत्तो का? आपण मेल्यावर जग चालूच रहाणार असते. अगदी मानव वंश निर्वंश होऊन गेला, मानव प्राण्याचा अंत झाला तरी जीवन चालूच राहील. कदाचित रुप बदलेल. पण आपल्या दृष्टीने जीवन संपले असेल. आपल्याला जाणीव सुद्धा होणार नाही. सर्व सुखाच्या, दु:खाच्या संवेदना संपून गेल्या असतील. मी मी म्हणत आज आपण मी माझे असे स्वतःला बजावत असतो पण हा मी च नंतर शिल्लक रहात नाही. सर्व जाणीवा संपून जातात. मग नंतर जग चालू राहिले काय किंवा न राहिले काय?
पण मग अशी जाणीव नाहीसे होणे झोपेत सुद्धा होते. गाढ झोप ही सुद्धा सर्व जाणीवांना स्वतःमधे विलीन करुन टाकते. कशाची सुद्धा शुद्ध रहात नाही. झोप ही एक प्रकारे मृत्युचेच रुप म्हणावे का? फक्त आपण झोपेतुन परत जागे होतो. जाणीव परत येते. मी माझे ही जाणीव परत डोके वर काढते आणि जी सुख दु:ख विहिन आनंदमयी अवस्था होती ती संपून जाते. मग मृत्यु ही झोपेची एक अवस्था म्हणावी का? आनंददायी अवस्था असावी का? सांगता येत नाही. की झोपेच्या पलीकडची अवस्था? जिचे भ्रष्ट रुप झोप आहे? मग झोप हवीसी वाटणारा जीव मृत्युच्या जाणीवेने का घाबरतो?
कधी कधी फावल्या वेळात मी स्वतःच्या मृत्युनंतर जग कसे असेल याचा विचार करतो. पण स्वतःच्या जाणीवांना वगळून विचार करणे का अवघड जाते हे समजत नाही. स्व ला वगळता जगाची कल्पना करणे अवघड जाते. स्व भोवतीच सर्व जग फिरते. नातलग, मित्र, शत्रु सर्व सर्व स्व भोवतीच गिरक्या मारते. स्व ला बाजुला काढता येतच नाही. काढले तरी तटस्थपणे विचार करताच येत नाही. लप्पकन काळीज हलते आणि घशाला कोरड पडते. पाणी पिण्यासाठी हात हलतो आणि पुन्हा वास्तवाच्या जाणीवेने स्व अस्तित्व आकारात येते. बरे वाटते.
मृत्युची कल्पना करणे फार अवघड आहे. त्यापासुन वाचणे फार अवघड आहे. तरी मन पुन्हा पुन्हा मृत्युचाच विचार करते. तो यावासा वाटतो की त्याने यावे असे वाटत नाही.. नक्की सांगताच येत नाही मला काय वाटते ते...

.jpg)
{!!!!!!!!!!!!}
!!!!!!!!!!!
विचारात पाडणारा विषय !!
माझ्या मते मृत्यु आणि झोप यामध्ये मुळ फरक तो म्हणजे जागृतावस्थेत असणार्या मेंदुचा
{"Death is prolonged form of}
"Death is prolonged form of sleep "असं कुणीसं म्हणलेलं आठवतंय. म्हणजे फारसा फरक नाहीच.
..............................................................
क्या फर्क पडता है?
{Death is prolonged form of}
Death is prolonged form of sleep >>>
What I am trying to remonstrare is the status of brain, once we sleep, we are imply to wake up, I dont think I will wake -up after Death (unless we believe in recarnation, or these baba's ) ..
{वा}
छान रे अवलिया. सुहासचंद्राने नेमका फरक सांगितला आहे.मलाही तो फरक पटला. झोपेत असताना मृत्यु येणे चांगले समजले जाते. अर्थात वय झाल्यानंतरच हो. मृत्युचा विचार अगदी साठीपर्यंत शिवतही नाही. नंतर हळुहळु आपल्यापेक्षा वयाने मोठे असणारे निरोप घेउ लागतात आणि मग समजते की... अपुनका भी टाईम आनेवाला है.
म्हातारी रमाबाई
{देर इज नो क्युअर फॉर डेथ अँड बर्थ.}
मृत्त्यू आणी जन्मावर कायमस्वरूपी इलाज नाही. आणी अर्थातच जर मी अस्तीत्वात नाही तर हे जगही अस्तीत्वात नाही
And then !
{कोरड}
उशाशी कॉटर ठेवत चला अवलियाजी.
कोरड पडली की पाण्याऐवजी नीट मारा.
{नाव}
नाव व आडनाव ह्या दोहोंमध्येही ईश्वराचे अस्तित्व असणार्यांनी अशी प्रतिक्रिया द्यावी?
{देवही सोमरस घ्यायचे}
देवही सोमरस घ्यायचे
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{छान. एकच इच्छा इतकी आहे की}
छान. एकच इच्छा इतकी आहे की मृत्यूला घाबरत घाबरत सामोरे न जाता बेडरपणाने सामोरे जावे. मृत्यूने येण्याआधी फार तळमळवले तरी केविलवाणे न होता आत्मविश्वासाने त्याला सामोरे जावे. अरे ये रे कधीही मी तुला नाही घाबरत.
-पुण्याचे पेशवे
{यंव रे पठ्ये! पु.पे.}
यंव रे पठ्ये!
पु.पे. साहेब,आवडलं
..............................................................
क्या फर्क पडता है?
{+१००० साधनेची व्याख्या करताना}
+१०००
साधनेची व्याख्या करताना डॉ. देशमुख या 'सिद्ध' व्यक्तिने म्हटलेले आठवते. 'पावशेराचं सव्वाशेर होणं म्हणजे साधना.'
आपल्या दृष्टीनं मृत्यू जणू शेर असतो आणि आपण निम/पावशेर.
आपण म्हणतो देणार नाही, तो म्हणतो नेल्याशिवाय राहणार नाही.
संत मृत्यूला म्हणतात, नेऊन नेऊन तू काय नेणार? शरीरच ना? खुशाल ने...!!!
'मृत्योSर्मामृतं गमय' झाल्यावर कसलं आलं घाबरणं?
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)
{डॉ. देशमुख }
प्यारेमामा,
>> डॉ. देशमुख या 'सिद्ध' व्यक्तिने .....
डॉ. देशमुख म्हणजे मुरगुड चे (डॉक्टरकाका) की आणखी कोणी वेगळे आहेत?
मुक्तसंग: अनहंवादि
{मामा कोण???????? बरोबर.}
मामा कोण????????
बरोबर. डॉक्टरकाकाच.
डॉ. श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख. सव्यसाचि, नेहरु पथ, मुरगुड, ता. कागल जि. कोल्हापूर
ही लिंक. http://www.vedantbhaskar.org/
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)
{मस्त}
मस्त लिहलस....विचार करायला लावणारं!
{कुठेतरी डोंगरमाथ्यावर बसून}
कुठेतरी डोंगरमाथ्यावर बसून शेवटची सिगरेट अर्धीच प्यावी व मग हिशोब करावा जगण्याचा, काही राहीले तर नाही ना ? पण हिशोब सगळेच अर्धवट असतात नेहमी प्रमाणेच, इच्छा देखील अर्धवटच पण त्यामुळे काही थांबावे असे नाही ना, सर्वच काही हवे असते पण तसे घडत नाहीच ना ? मग हलकेच आपणच आपल्या जगण्याला चियर्स करावे व मागे वळून पहावे तर उंच उंच डोंगरमाथा सोडला व समोर मस्त पसरलेले आकाश व खाली चित्रवत वाटणारे वास्तव, काहीच नाही दिसत मग तेव्हा व फक्त रम्य अशी खोलवर दरी, त्या दरी मध्ये, स्वतःला झोकून द्यावे मनसोक्तपणे ! कसली ही काळजी, कसलेली बंध मागे न ठेवता... मुक्त व्हावे !
मृत्युचा हा आगळा वेगळा एकट्यानेच केलेला समारंभ किती विलक्षण असेल ना ! कितीतरी वेळा आपण असे विचार करतो की मला मुक्त व्हायचे आहे, मला मोकळीक हवी अगदी सगळ्यातून. मग आपण आपल्याला गुंतवू पाहतो विविध प्रकारच्या कार्यामध्ये, विचारामध्ये, व्यसनामध्ये. आपले वेद पण सांगतात की मृत्यु हेच सत्य. पुन्हा नवजन्म होईल एक मेला असेल व दुसरा जिवंत होईल. कपडे बदलावे तसे शरीर बदलेल व पुन्हा नवीन जीवन खळखळून वाहू लागेल.. चेहरा तोच असेल शक्यतो पण आपलं मन बदललेलं असेल.. काही क्षणामध्ये नकळत, सगळी बंधनं, मोह, माया मागे राहीली असेल व पुन्हा नवीन उषःकाल झाला असेल... पुर्वेकडून तो हसत मुखाने पुन्हा आपल्या सहस्त्र किरणाच्या रथावर आरुढ होऊन येईल व त्याच्या बरोबर पुन्हा नवजीवन खळखळून हसू लागेल.. सगळी दुखद स्वप्ने हवेत विरुन गेली असतील व डोळ्यात फक्त नव भविष्याचे तेज चमकत असेल..!
मृत्यु : विस्कळीतपण माझे विचार
Hope is a good thing...
{+१}
+१
परिजा
******
बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)
{आभार !}
आभार !
{आधी जाल संन्यास मग आता}
आधी जाल संन्यास मग आता मृत्यु.. पुढे गाडी अध्यात्माकडे वळणार. होय ना रे नाना ?
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{नाना, 'ब्रह्मानंद सहोदर' }
नाना,
'ब्रह्मानंद सहोदर' संकल्पना केंद्रवर्ती ठेवून झोप - मृत्यू - मोक्ष यांचे विवरण केल्यास वाचायला आवडेल.
मुक्तसंग: अनहंवादि
{मृत्यूविषयी सर्वजण भरभरुन}
मृत्यूविषयी सर्वजण भरभरुन थियरी मांडतात आणि मतं व्यक्त करतात. त्यात मृत्यूला जिंकणे, न भिणे, शरीरच जाणार, आत्मा नव्हे.. वगैरे वगैरे अनेक शब्द येतात. हे सर्व बुडबुडे.. मी आत्ता म्हणतोय त्याला जितका अर्थ नाही तितकाच या सर्व शब्दांनाही अर्थ नाही.
प्रत्यक्ष मृत्यू कधी येईल सांगता येत नाही. त्यावेळी काय वाटेल याच्या हजारो कल्पना लढवूनही प्रत्यक्ष येईल तेव्हा फाटेल की आणि काय होईल सांगता येत नाही.
मरण आल्यानंतरचे सर्वकाही कधीही न समजणारं आहे. एकदम ब्लॅकबॉक्स.
तेव्हा आपण आहोत तोपर्यंत मरणाचा फारसा विचार न करता जगावं हे बरं. किंवा मग मरणाच्या हजारो रोमँटिक थियरी मांडाव्यात.
माझ्या समोर मृत्यूची जी दर्शनं झाली आहेत त्यापैकी कोणतंही उदात्त, तत्वज्ञान सुचेल असं नव्हतं. ते सर्व भयंकर वेदनादायक आणि प्रसंगी हिडीस आहे. त्याला मग शरीर गेलं,आत्मा राहिला असल्या फालतू मलमपट्ट्यांनी काही फरक पडत नाही.
{+१}
योद्धा रणात आणि योगी मरणात ओळखावा असे म्हणतात ते उगाच नाही.
(युद्धाबद्दलच्या राणा भीमदेवी गर्जना 'बालिश बहू बायकात बडबडला' या प्रकारच्या आणि मरणाबद्दलचे कवित्व 'उधार ज्ञानी चाहत्यात लडबडला' अशा स्वरूपाचेच असते.)
{+ २}
+२
{+१}
सहमत.........
परिजा
******
बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)
{तुम्ही तुमचे म्हणणे संपूर्ण मांडले नाहीत... }
नचिकेतदा,
तुम्ही तुमचे म्हणणे संपूर्ण मांडले नाहीत...
प्रथम जे लिहिलेत ते नंतर संकलित्/संपादित केलेत ... कात्री लावलीत असे वाटते.
लिहा ना राव. पूर्ण. तुमच्यातल्या Self-Monitor/संपादकास जरा विश्रांती देऊन भरभरून लिहा...
काय मंडली ... काय म्हंतो मी ... बराबर हाय नाय ?
--------------------
Suicide is man's way of telling God, "You can't fire me - I quit."
Bill Maher
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{व्हय्.....बरोबर हाय तुमचं.......}
<> +१
मृत्यू........... ही तुमच्या आयुष्यातील एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही जन्माला येता तेव्हाच निश्चित झालेली असते आणि ती अटळ असते. पण तिचं येणं मात्र तुमच्या ईच्छेवर अवलंबून नसतं. मृत्यू तेव्हाच येतो जेव्हा त्याचं येणं निश्चित केलेलं असतं तुमच्या नशिबाने. कारण असं नसतं तर आपल्या आजूबाजूला आज कितीतरी आजारी, म्हातारी-कोतरी, मरणासन्न, जराजर्जर झालेली लोकं नसती दिसली आपल्याला. अशी लोकं क्षणाक्षणाला देवाकडे मृत्यूची याचना करत असतात, पण मृत्यू त्यांच्या आसपासही फिरकत नाही. का? ते त्यांचे भोग असतात म्हणून?? की "You can't fire me - I quit." असं म्हणून आत्महत्या करण्याची हिम्मत नसते म्हणून??
पण काही लोकं मात्र मृत्यूच्या बाबतीत खुप सुखी असतात. त्यांना कळत देखिल नाही की मृत्यूने कधी येऊन त्यांना मिठी मारली आहे अन् स्वतःबरोबर तो त्यांना घेऊनही गेलाय ते.
मग ये-ये म्हणूनही न येणारा अन् आपल्याला खुरडत जगायला लावणारा मृत्यू चांगला की बेसावधपणे गाठणारा मृत्यू चांगला?
परिजा
******
बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)