आय पील सिझन ३ (अर्थात खाल्ले शामुने, बील भरले रामुने)

0
0

शिवरात्रीचा दिवस.
सुट्टीमुळे लोकलला गर्दी नव्हती.
घाटकोपरला एक जोडी डब्यात चढली.
एकाच वर्गातली असावी.
पाठीवरच्या बॅग वरुन १२ वी सायन्स ची हे कळत होते.
जागा असुन सुद्धा पॅसेज मधे उभी राहीली.
मुलगा टी शर्ट मधे. चांगलाच पिळदार.
मुलगी जरा हवादार टॉप मधे.
दोघांचे आजुबाजुच्या जगाला विसरुन गुटर्रग्गुं सुरु झाले.
तो तिच्या गळ्यावरुन हाथ फिरवत होता.
ती त्याचे मसल चाचपत होती.
बसलेली मंडळी कासाविस.
थोड्या वेळाने सलगी जरा जास्त वाढली.
बसलेल्या पैकी ४० वर्षाचे बुढ्ढे परेशान.
इतक्यात त्या मुलीने मुलाच्या बायसेप चा एक प्रेमळ चावा घेतला.
तेंव्हा मात्र बाजुच्या परेशान अली ला राहावले नाही.
त्याने खिशातुन एक कागद काढला.
त्या वर काहीतरी लिहुन मुलाकडे दिले.
ते त्या मुलाने वाचले.
"cool it dude" असे म्हणत तो कागद भिरकावुन दिला.
ती जोडी पुढ्च्या स्टेशन वर उतरुन गेली.
आणि चर्चेला सुरुवात झाली.
आजकाल च्या पिढीला झाले तरी काय? हे सर्व मिडीयामुळे. भारतिय संस्कृती वरचे आक्रमण वगैर वगैरे.
त्याने भिरकावलेला कागद उचलला.
त्यावर लिहिले होते,
Please refrain from public display of affection.
तो हसला.
"आजकाल हे जरा जास्तच व्ह्यायला लागले असे तुम्हाला वाटत नाही का?" परेशान अली
काल ही होते आज ही आहे. वेगळे काहीच नाही.
"म्हणजे"
समुद्र किनार्‍यावरच्या कॉलेजला जा. असले अर्ली मॉर्निंग, मॉर्निंग्,मॅटीनी एक्स्टेंडेड पीडीए रोज बघायला मिळतील. तिथे तर ह्या डब्यापेक्षा कितीतरी जास्त लोक असतात.आणि ही फक्त आजची गोष्ट नाही. अगदी ३० वर्षापुर्वी सुद्धा होती.
"पण ह्या विरुद्ध कायदा आहे. पोलीसांनी जागृत राहीले पाहीजे."
अहो पोलीस तरी काय काय करतील. द्या सोडुन. तुम्ही कुठल्या एनजीओ शी बांधील आहात का?
"हो.फाइट अगेन्स्ट एचआयव्ही"
अच्छा. म्हणजे त्या मुलाच्या टी शर्ट च्या बाही वरची स्लोगन तुमचा ट्रीगर होता तर.
"I hate condom स्लोगन वाल्या मुलाबरोबर त्या मुलीचे काय होणार कुणास ठाउक?"
तुम्ही कशाला काळजी करताय. ती घेईल. आय पील. अगदी लिमलेट च्या गोळ्यासारखी. प्रत्येक वेळी.
"अहो पण अशा इन्डीस्क्रिमिनेट वापराने संपुर्ण रीप्रॉडक्टीव सिस्टीम ची वाट लागेल ना"
आताशा गर्भ सल्ला सेवा केंद्रांचा धंदा कमी झाला आहे ह्या गोळ्यांमुळे. दोन वर्षात ह्या क्षेत्रात डायवर्सिफिकेशन करुन परत उर्जितावस्थेत येतील. ते सोडा. ही मुलगी त्या मुलाबरोबरच लग्न करेल असे तुम्हाला वाटते का?
"नाय बॉ"
मग अशा परिस्थितीला तुम्ही काय म्हणाल?
"??"
अहो सोप्पे आहे. खाल्ले शामुने (डॉक्टरचे) बील भरले रामुने

हा हा हा अहो मास्तर कशाला

हा हा हा

अहो मास्तर कशाला तुम्ही टेंशन घेता ... या वयात त्रास होईल

बाकी जास्त काही बोलत नाही व्यक्तिस्वातंत्र्य का काही असते त्याचे काय असा विचारवंत प्रश्न करतील... पुन्हा तेच दगड, बटाटे, पुस्तके ईत्यादी.. असो.

प्रश्न

नाना तुम्ही सारखे समुद्र किनार्‍यावर का असता?
अवांतरः मी कशाला टेन्शन घेउ? माझे कॉलेज समुद्रकिनार्‍यावरचे हो. आम्ही दोन पाच सोडले तर सर्व मित्र मंडळी लाईव शो ला हाजीरी लावत.(३० वर्षापुर्वी)

नाना तुम्ही सारखे समुद्र

नाना तुम्ही सारखे समुद्र किनार्‍यावर का असता?

हॅ हॅ हॅ
वैयक्तिक प्रश्न. पास. हास्य

अवांतरः मी कशाला टेन्शन घेउ? माझे कॉलेज समुद्रकिनार्‍यावरचे हो. आम्ही दोन पाच सोडले तर सर्व मित्र मंडळी लाईव शो ला हाजीरी लावत.(३० वर्षापुर्वी)

अरेच्या ! तुमच्या वेळेस मैत्रिणी नाही यायच्या तुमच्या बरोबर... फक्त मित्रच ? मजा आहे बुवा.
असो.

आताच जुहूवरुन जावुन आलो.. मस्त जत्रा आहे.. मजा आहे...

हा हा हा ! मास्तर चे डोके

हा हा हा !

मास्तर चे डोके कुठे चालेल काही सांगता येत नाही.



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

हॅहॅहॅ ... अंमळ मजेशीर

हॅहॅहॅ ... अंमळ मजेशीर हास्य
आम्हाला च्यायला पब्लिक प्लेस मधे टच बी करायला भेटत नाय हास्य इकडं डायरेक्ट दंड चावणे वगैरे हास्य
अंमळ एग्झॉटीक वगैरे लिहीलाय हो मास्तर हास्य

ते लाईव्ह शो चा एखाद एपिसोड प्रसवेल काय ? Laughing out loud

हॅ हॅ हॅ. ही आली खरी व्यथा

हॅ हॅ हॅ. ही आली खरी व्यथा बाहेर. असो.



-पुण्याचे पेशवे

ह्म्म अनादर वन फ्राँम

ह्म्म अनादर वन फ्राँम मास्तर...



-निखिल

मास्तर !! खरय !!.....

मास्तर !! खरय !!.....