काळु-बाळुची जोडी मोडली....

0
0

ज्येष्ठ लोककला कलावंत, काळु-बाळु तमाशा मंडळीचे श्री लहु खाडे ऊर्फ काळु यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले असल्याचे वृत्त आत्ताच कळले आहे. काळु-बाळुच्या जोडीतील हे रत्न गळुन पडल्याने लोककला क्षेत्राची मोठी हानी झालेली आहे.
लहु खाडे ऊर्फ काळु आणि अंकुश खाडे ऊर्फ अंकुश हे दोघे जुळे भाऊ. त्यांच्या वडिलांचे नांव संभाजी खाडे तर आई शेवंताबाई. हे मुळचे सांगली जिल्ह्यातील कैलापुरचे. त्यांचा जन्म १६ मे १९३४ रोजीचा. यांची पिढी ही त्या कुटुंबातील तमाशा माध्यमातुन लोककलेची उपासना करणारी तिसरी पिढी. त्यांना तमाशाचा फड चालवुन शिक्षणसंस्था उभारल्या. काळु-बाळु यांनी निवृत्ती स्वीकारल्यानंतर या कुटुंबाची पाचवी पिढी सध्या लोककलेची उपासना करत आहे.
जहरी प्याला या वगातील काळु-बाळु या शिपायांच्या भुमिका करत असल्याने खाडे बंधुंना काळु-बाळू अशी नावे पडली. हा वग बापुराव पुणेकर या शाहिराने रचलेला आहे.
काळु बाळु या एकसारख्या दिसणार्‍या जुळ्यांनी वयाच्या दहाव्या वर्षी चौथ्या वर्गात असताना शाळा सोडुन लोककला क्षेत्रात प्रवेश केला. खाडे कुटुंब कलगी आणि तुरा या पैकी तुरा या लोककला घराण्याच्या परंपरेतील. लहु आणि अंकुश हे दोघेही सोंगाड्याच्या भुमिकेत प्रचंड लोकप्रिय झाले. त्यांचे बंधु श्यामराव, भीमराव, घनश्याम आणि त्यांच्यानंतरच्या पिढीतील अरुण आणि गौतम हे सर्वजण लोकनाट्य क्षेत्रात कार्यरत आहेत. लोकनाट्याला पडत्या काळात सावरुन मार्गावर आणण्यात मोठी कामगिरी बजावलेल्या काळु-बाळु यांना भारत सरकारने संगीत नाटक अकादमी पुरस्काराने भुषविलेले आहे.
लोकनाट्याच्या माध्यमातुन मनोरंजन करण्याबरोबरच दारुबंदी, लोकसंख्या नियंत्रण, शिक्षणप्रसार यासारखी लोकोपयोगी कार्ये करणार्‍या काळु यांना चिरशांती लाभो ही प्रार्थना.

{लोकनाट्याच्या माध्यमातुन}

1

लोकनाट्याच्या माध्यमातुन मनोरंजन करण्याबरोबरच दारुबंदी, लोकसंख्या नियंत्रण, शिक्षणप्रसार यासारखी लोकोपयोगी कार्ये करणार्‍या काळु यांना चिरशांती लाभो ही प्रार्थना.

+१


Hope is a good thing...

{असेच म्हणतो}

2

असेच म्हणतो Sad


"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"

{अरे रे ! पोस्टर बघायचो ..ते}

3

अरे रे ! पोस्टर बघायचो ..ते पोलीस वेषातले काळु-बाळु !! पण कधी बघु शकलो नाही ..पण खुप गाजलेले वगनाट्य असायचे म्हणतात ..

भावपुर्ण श्रध्दांजली !

{खरे आहे... तीच त्यांची ओळख होती}

4

एकदम खरे बोललास रे सुहास...

पोलिस वेशातले काळू-बाळू स्टेज वर आले की शिट्ट्यांचा पाऊस पडायचा.
तीच त्यांची ओळख होती

From General

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{काळू बाळू}

5

काळु बाळू यांचे खरे नाव माहित नव्हते. तमाशात काळू बाळूची जोडी गाजली.माहितीपुर्ण प्रासंगिक.


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

{लहू उर्फ काळु यांना भावपुर्ण}

6

लहू उर्फ काळु यांना भावपुर्ण श्रध्दांजली !



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

{लहू उर्फ काळूभाऊंना भावपूर्ण}

7

लहू उर्फ काळूभाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली.


-पुण्याचे पेशवे

{कालच रात्री रसिका ताईंची}

8

कालच रात्री रसिका ताईंची बातमी समजली आणि आज सकाळी सकाळी ही. Sad
दोघांनाही भावपुर्वक आदरांजली.


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

{भावपुर्ण श्रद्धांजली}

9

भावपुर्ण श्रद्धांजली

{भावपुर्ण श्रद्धांजली}

10

भावपुर्ण श्रद्धांजली

{लोकोपयोगी कार्य करणा-या}

11

काळु यांना भावपुर्ण श्रद्धांजली.


दिप्ती जोशी

{काळू बाळू यांची जोडी... कायम}

12

काळू बाळू यांची जोडी... कायम लक्षात राहील...!

ॐ पुर्णमदः पुर्णमिदं पुर्णात्पूर्णमुदच्यते,
पुर्णस्य पुर्णमादाय पुर्णमेवावशिष्यते ॥
||हरि ॐ ||

काळू उर्फ लहू खाडे यांना ईश्वर सदगती देवो....


Ignited Mind ! हा माझा , माझ्या कवितांचा ब्लॉग आहे बरं का ! हास्य