इगतपुरीचा पाउस म्हणजे धोधो कोसळणारा.
पंधरा पंधरा दिवस सूर्याचे दर्शन घडू न देणारा.
सर्वांगात मुरणारा पाउस.
घाट चढून येणाऱ्या ढगांनी वेढलेल्या इगतपुरीत इतका मिट्ट काळोख
कि कुणी डोळ्यात बोट घातले तरी कळणार नाही.
वार्यावर स्वार होऊन येणाऱ्या ढगांशी लपंडाव खेळण्यातली गम्मत काही न्यारीच आणि तासान तास न संपणारी.
त्या इगतपुरीच्या पावसाचा आवेग , ती अंग भिजवणारी ओल, भिजलेलं रान
आणि काळ्या कुट्ट ढगांच्या मध्येच डोकावणारे करड्या रंगाचे प्रकाश झोत
पकडण्याचा एक प्रयत्न " इगतपुरी रेन्स" या पेंटिंग मध्ये केला आहे.
बऱ्याच वर्षापूर्वी काढलेलं हे पेंटिंग आर्टीस्ट सेंटर इथे भरवलेल्या प्रदर्शनात
लोकांपुढे आले आणि खूप जणांना ते आवडले .
साईट वर टाकल्यावर बर्याच चांगल्या प्रतिक्रिया सुद्धा आल्या आणि हे पेंटिंग
Contemporary Masters' 2009 या कलाविष यातील पुस्तकात जाऊन पोहोचले
{व्वा !}
व्वा !
{"वार्यावर स्वार होऊन}
"वार्यावर स्वार होऊन येणाऱ्या ढगांशी लपंडाव खेळण्यातली गम्मत काही न्यारीच आणि तासान तास न संपणारी."
+ १
Hope is a good thing...
{वा अप्रतिम... सुंदर पेंटींग आहे}
प्रकाशजी मी इगतपुरीचा पाऊस पाहिला आहे.
एकदम सुंदर आणि जसाच्या तसा चितारलेला आहे
भारी आहे पेंटींग
अभिनंदन
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{मस्त...}
हिरवट शेवाळी रंगाचा वापर, टेक्चर यामुळे भरपावसाळ्यात इगतपुरीत पोहोचल्यासारखं वाटलं.
जोशींसारख्या मान्यवर चित्रकारांच्या कलाकृतीचा आस्वाद घेऊन त्यांना थेट प्रतिक्रिया देण्याची संधी दिल्याबद्दल मालकांना धन्यवाद.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
{सहमत.}
सहमत.
{वाह.. क्या बात है. अप्रतिम.}
वाह.. क्या बात है.
अप्रतिम.
{सुंदर पेंटिंग!!!!}
थेट पावसाचा अनुभव देणारं!!!
अप्रतिम!!!
दिप्ती जोशी
{धन्यवाद }
इगतपुरीचा पाउस या पेन्टिन्ग बद्दल आपण अभिप्रय दिल्या बद्दल आपला सगल्यानचा आभारी आहे .
{अप्रतिम}
अप्रतिम
बन्सी को लकडी सदा समझा किये तुम पर उसके नग्मो कि धुन कहाँ सुन सके तुम!
{मला एकदम मी इगतपुरीच्या}
मला एकदम मी इगतपुरीच्या पावसात आहे असं वाटलं तुमच पेंटिंग पाहताना ..अप्रतिम आहे!!
{चिंब भिजवून जाणारा इगतपुरीचा}
चिंब भिजवून जाणारा इगतपुरीचा पाऊस! अप्रतिम पेंटिंग.
{मस्त! पेंटींग बघतांनासुद्धा}
मस्त! पेंटींग बघतांनासुद्धा प्रत्यक्ष पावसाचा फील घेत असल्यासारखं वाटतंय.
नीलपक्षी
{यांची बाकीची पेटींग देखील}
यांची बाकीची पेटींग देखील पाहण्यासारखी आहेत.
त्यांना विनंती केली आहे, अजून काही पेटींग येथे प्रकाशीत करण्यासाठी...!
Hope is a good thing...
{सुंदर..... अप्रतिमच आहे}
सुंदर..... अप्रतिमच आहे
Ignited Mind ! हा माझा , माझ्या कवितांचा ब्लॉग आहे बरं का !