असाच एका विकेंडला आपला चिल्का सरोवर बघायला जायचा प्लॅन होता.... सकाळी मला लवकर उठवायचे कठिण काम तूच फोन करुन केले होतेस. बस तुमच्या बिल्डिंग जवळून सुटणार होती. मी सगळे आवरुन धावत पळतच पोहचलो होतो... बस मधे चढलो तर नेहमी प्रमाणे तु तुझ्या बाजुच्या खुर्चीवरची बॅग उचलून घेतलीस.. नेहमी पेक्षा आज तू वेगळीच वाटत होतीस... बस सुरु झाली आणि एक एक करुन गाणे बजावणे सुरु झाले... बस मधे काय दंगा घातला होता आपण..!!! त्यात सगळ्यात पुढे आपणच दोघेजण होतो हा भाग वेगळा..... मी माझ्या भसाड्या आवजात "प्रथम तुज पाहता" गायला लागताच तुझे ते हसणे आणि नंतर ते लाजणे आजही मला चांगलेच आठवते.... ह्या गाण्याचा वेळेसच मी ठरवले आजच तुला विचारायचे... आपण चिल्काला पोहचलो तिथे मोठ्या बोटीत बसुन डॉल्फिन बघुन आलो.. आणि नंतर कुणीतरी पायडल बोटिंगला जायचे असे ओरडले आणि मग सगळेच तिकडे निघालो... आपण तिथे पोहचेपर्यंत तिथल्या चार माणसांच्या पॅडल बोटस् सगळ्यांनी ढापल्या.. नि आपल्यासाठी दोन लोकांचीच बोट शिल्लक राहिली... न ठरवताच बर्याच गोष्टी मला हव्या तशा घडत होत्या!!!
नेहमी प्रेमाणच तू तिथे खुललेली होतीस... आपण किनार्यापासून बरेच लांब आल्या नंतर अचानक मी बोट थांबवली... तुझ्याकडे बघुन हसलो... अभावितपणे तू पण हसलीस.. मग हळूच मी तुला म्हणालो.. मला तुला काही सांगायचे आहे.... तु अचानक शांत झालीस.. "मी तुझ्यावर प्रेम करतो"!!! तू आधी एक मंद स्मित केलेस आणि म्हणालीस,"चल रे जाउयात" तू उत्तर द्यायचे टाळलेस.. मी परत विचारले तरी उत्तर दिले नाहीस.. आपण तिथून परत निघुन बस मधे परतलो तरी तू शांतच होतीस... परतीच्या प्रवासात आपण एकदाही एकमेकांशी बोललो नाही.. दुसर्या दिवशी सकाळी ऑफिसला जाताना बस मधे चढलो पण तुझ्या बाजुला माझ्यासाठी जागा नव्हती... आपण ग्रुप मधे सोबत असायचो पण तू माझ्याशी बोलायचे टाळायचीस... आपल्या ट्रेनिंगच्या शेवटच्या दिवशी मात्र तू माझ्याशी बोलायला आलीस.. "माझे प्रेम म्हणजेच सगळे काही आहे असे समजु नकोस.. मला प्रेमात पडणे शक्यच नाही... मला माझ्या घरच्यांच्या मनाप्रमाणेच लग्न करायचे आहे" एवढे सांगून तू निघून गेलीस.
ट्रेनिंग नंतर आपण सगळेच मुंबईत आलो... पहिल्याच दिवशी आपल्याला वेगवेगळे प्रोजेक्ट्स मिळाले... त्यामुळे आपला कॉन्टॅक्ट कमी झाला.. आधी तू माझ्या आसपास तर असायचीस पण आता आपले भेटणे केवळ एखाद्या विकेंडला जेव्हा सगळा ग्रुप जमायचा तेव्हाच.. त्यातही तुझा मला टाळण्याच प्रयत्न असायचा... कधीच तू मला बोलायची संधी दिली नाहीस.. तसे मला तुझ्या बद्दल इतरांकडून कळायचे.. पण अजुनही तुझ्या कडुन मला समाधानकारक उत्तर मिळालेच नाही. असेच दिवस जात होते आपल्या भेटी कमी होत होत्या... त्यातच आला तुझा वाढदिवस... खरे तर तुला भेटायची खुप इच्छा होती पण शक्य होईल असे मला वाटतच नव्ह्ते.. पण अजुन एक प्रयत्न म्हणुन मी तुला पुष्पगुच्छ पाठवायचे ठरवले... पुजाशी बोलुन मी एक बुके तुझ्या रुमवर पाठवला... तो पुजानेच रिसिव्ह केला.. तु घरी नव्हतीसच... संध्याकाळी घरी आल्या आल्या तुझा मला फोन!!! जाम चिडली होतीस... मी का बुके पाठवला??... तुला विसरुन जा वगेरे अनेक वेळा सांगितले... ह्या पुढे तुझ्याशी कोणताही संपर्क ठेवू नको असे पण सांगीतले... फार खचलो होतो गं मी...!!!
पुढे एक वर्ष आपला कोणताही कॉन्टॅक्ट नव्हता... खरे तर ठेवू नये अशी तुझीच इच्छा होती... तुझ्या पुढच्या वाढदिवसापर्यंत मी तुझ्याशी काहीच संपर्क ठेवला नव्हता... तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी पुजाचा मला फोन आला... "काय प्रेमवीर, आज पाठवणार का बुके???" असा खोचक प्रश्न विचारला.. खरे तर मला आता फारशी आशा उरलीच नव्हती.. पण पुजाच्या सांगण्यावरुन मी तुला बुके पाठवला... ह्यावेळेस दिवसभर फोन वर असल्यामुळे मी तुझा फोन नाही घेऊ शकलो... तु खुप चिडली असणार.. त्यांना कसे फेस करायचे हे मला कळत नव्हते.. शेवटी हिंमत करुन तुला फोन लावला... ह्या वेळेस तू खुप शांत असल्याचे तुझ्या पहिल्याच वाक्यात जाणवले... "मी का तुझ्यावर प्रेम करावे??? मी तर तुला नीट ओळखतही नाही... मग तुझ्याशी लग्न करायचा निर्णय कसा घेणार??? " असे काहीसे तुझे प्रश्न होते... माझ्या उत्तराने तुझे समाधान होत होते का हे मला कळत नव्हते... पण शेवटी आपण एकमेकांना जाणून घ्यायचे आणि त्यानंतरच तू माझ्यावर प्रेम करू शकतेस का नाही हे तू मला सांगणार असे आपले ठरले!!!
आज तुझा वाढदिवस होऊनही आता तीन महिने झाले आहेत... त्यादिवसा पासून आपण रोजच भेटत आहोत...रोज रात्री किती तास फोन वर बोलणे होतंय याचा हिशेबच नाही.. तुझ्या सोबत घालवलेला क्षणन् क्षण मला आठवतोय.. कुठे कुठे नाही फिरलो आपण मुंबई मधे... पुजाच्या मते आता तू परत पहिल्यासारखी खुलली आहेस... या तीन महिन्यात आपण एकमेकांना खुपच ओळखायला लागलो आहोत... आता एक क्षणही मला तुझ्या शिवाय घालवणे शक्य नाहीय... आणि आपण पुढचे आयुष्य एकमेकांसोबत छान व्यतित करू शकतो हा विश्वास आता मला नक्कीच आहे. म्हणूनच आज ह्या प्रेमदिनी मी तुला परत एकदा विचारतोय...
"माझ्याशी लग्न करशील??? तु माझी होशील का???"
तुझाच वेडा!!!
एवढे लिहुन झाले, लवकर पाठवायला हवे आता....
अरे,आता अशा अवेळी कुणी बेल वाजवली असेल???? बारा वाजायला पाचच मिनिटे बाकी आहेत ... मला बाराच्या ठोक्याला पाठवायचे होते!!!
थोड्याशा अनिच्छेनेच दार उघडले तर माझ्यासाठी एक धक्का होता... मिड-नाईट बुके डिलेव्हरी... आणि त्या सोबत एक नोट...
"माझ्याशी लग्न करशील????"
तुझीच वेडी!!! 
हाहाहा!!! वेडावेडीची कहाणी लै
हाहाहा!!! वेडावेडीची कहाणी लै भारी... पत्रिका जरूर पाठवा बरं का... सगळे मिळून एक छोटंस्स गिफ्ट नक्की देऊ.
+१
असेच म्हणतो.
छोटेखानी गोष्ट आवडली, मजेशीर आहे
कंपनीत जाण्यासाठी कराव्या लागणार्या रोजच्या प्रवासातल्या काही आठवणी, एखाद्या ऑफिशियल ट्रीपमधल्या अजुन काही आठवणी, आख्खा ग्रुप पिक्चर बघायला थेटरात गेल्यावर तिथल्या अजुन अशाच काही चोरट्या आठवणी, आख्खे जग झोपले असताना उद्याचे स्वप्न रंगवत आख्खी रात्र जागवणार्या अजुन काही आठवणी ...
असो .. असो .. असो .. !!!
डान्राव.. येऊंद्यात तुमच्यापण
डान्राव.. येऊंद्यात तुमच्यापण आठवणी पोतडीबाहेर.. हो म्हणाच... नाहीतरी वायदेआझम आहात.. कुणी कधी लिहिणार म्हणून डोक्यावर नाही बसायचं!!!!
हॅ हॅ हॅ ...
हॅ हॅ हॅ.
आमच्या कसल्या हो आठवणी, आमचा आहे तो शुद्ध "उच्छंलक"पणा ...
आम्ही शुद्ध संस्कॄतीबुडवे, भावनांचा उघड्यावर बाजार मांडणारे.
आमच्या कसले अनुभव हो, जाऊ द्यात !
जोक्स अपार्ट, मला नाही बॉ लिहता येत असले काही हळुवार वगैरे. ते प्रेमी वगैरे इमॅजीन करुन तिच्या डोळ्यात चंद्र वगैरे पहाणे तर मायला लै कठिण, अज्जाबात शक्य नाय आपल्याला. ते आपले क्षेत्रच नव्हे असे मानुन गप्प रहातो !
हॅ हॅ हॅ अवांतरः उच्छंलक हा
हॅ हॅ हॅ
अवांतरः उच्छंलक हा शब्द उच्छृंकल असा लिहितात!!!!
हॅलो... तो शब्द उच्छृंखल असा
हॅलो... तो शब्द उच्छृंखल असा लिहितात. प्लीज गेट युवर फॅक्ट्स राइट. असो. (प्लीज नोट.. मोठे व्हा असं लिहित नाहीये...)
आणि डॉन्या... तुला प्रेमी वगैरे इमॅजिन नाही करता येत तर दुसरं काही तरी इमॅजिन कर... डोळ्यात चंद्र वगैरे नाही बघता येत तर दुसरीकडे दुसरं काही बघ... शिंपल.. पण लिहीच यार...
ओके ...
योग्य शब्द लक्षात आणुन दिल्याबद्दल आभार
( आतल्या गोटातले : मला लिहतानाच शब्द सापडला नव्हता बरोबर, मोल्सवर्थवर शोधायचा प्रयत्न केला पण अपुर्या ज्ञानामुळे सापडला नाही. असो. )
>>... तुला प्रेमी वगैरे इमॅजिन नाही करता येत तर दुसरं काही तरी इमॅजिन कर
बास का ?
आता ह्या विषयात स्वतःला प्रेमी इमॅजीन नाय करायचे तर काय 'प्रमोद मुतालिक' इमॅजीन करायचे का ?
ते प्रेम वगैरे मलाही कळते ( शब्द नीट वाचा ) पण बर्याच लिखाणात आढणार्या "भावना" मला नाही इमॅजीन करता येत. पण मग ती आस, तडप, रुदन वगैरे प्रकरणे मला नाहीत झेपत. अर्थात त्यामुळे मी इतर चुकीचे मानत नाही.
तेव्हा असो.
>>... डोळ्यात चंद्र वगैरे नाही बघता येत तर दुसरीकडे दुसरं काही बघ... शिंपल.. पण लिहीच यार...
हॅ हॅ हॅ.
ते तर लै भयंकर प्रकरण झाले.
काही उदाहरणे सांगतो :
समजा तुम्हाला 'ती'ची कातील नजर आवडत असेल तर ते इमॅजीन करताना तुम्ही काय "तुझी नजर सॅकियो रॅमोसच्या स्लायडिंग टॅकलसारखी कातील आहे असे म्हणणार आहात काय ? "
किंवा तुझे हात खुप मुलायम आहेत हे सांगताना " ओहोहो, काय मुलायम हात आहेत हे, असे फिनिश जर क्रँकशाफ्ट बेअरिंगला दिले तर इंजिन शप्पथ काय स्मुथ चालेल ना ?" असे आमच्या डोक्यात जरी आले असले तरी ते तसे लिहणे शक्य आहे का ?
किंवा आम्हाला एखादीची लटपट / तुरुतुरु चाल आवडते म्हणुन आम्ही तिला "तुझ्या चालीत इनियेस्टा / फॅब्रिगॅसच्या ड्रिब्लिंगची नजाकत आहे" असे म्हणण्यास ती आम्हाला लाथ नाही का घालणार.
चारचौघात एखाद्या विषयावर बोलताना ती जेव्हा हळुवार असेच नजरेनेच शांत बसवते तेव्हा तिच्या पापण्याच्या हालचालीत मला शप्पथ 'पिट्र चेक्'च्या रिफेक्सेस दिसतात, पण हे तिला कसे सांगणार ?
कधी एखादीने घातलेल्या टॉपचा गडद ब्ल्यु रंग आवडतो पण म्हणुन काय "मायला, ह्याच रंगाची कार जर मार्केटमध्ये आणली तर काय मार्केट खाईल" हे आमच्या मनातले प्रामाणिक विचार असले तरी असे सांगणे शक्य आहे का ?
किंवा वर्स्ट केस पहा, समजा एखाद्या दिवशी उगाच आळसाने एकदम धांदरटासारखे कसेबसे केस बांधुन जर ती आली असेल तर तिला म्हणणार काय " काय ही हेअर स्टाईल, निदान माझी तरी बघ!", तिथे म्हणावेच लागते ना कौतुकाचे काहितरी गोडगोड ...
अर्थात आम्ही जरी स्तुतीच करत असलो तरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जी 'पद्धत' आहे त्याबाबत आमचे गाढ अज्ञान आहे.
असे आहे ते, प्रत्येकालाच जमते असे नाही. आम्हला अजिबात जमत नाही हे आम्ही १००० वेळा मान्य करतो.
बाकी आम्ही असा एक लेख लिहायचा प्रयत्न करु असे तुर्तास म्हणतो.
( कधी ते सांगायचा गाडावपणा ह्यावेळी अजिबात करणार नाही, पण लिहु असे सांगतो )
ओ मालक, प्रतिसादाची वाचनखुण
ओ मालक, प्रतिसादाची वाचनखुण साठवता येत्ये का हो????
+१ मायला एवढे कष्ट घेऊन एखादा
+१
मायला एवढे कष्ट घेऊन एखादा लेखच लिहायचा ना राव... आता लेख लिहायला वेळ नाही म्हणुन फिराल गावभर...
हा हा हा ! सहमत आहे...
हा हा हा !
सहमत आहे...
निख्या लै भारी रे....
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
:)
छान आहे!
काय ?
काय ?
अंमळ बिझी आहे
कृपा करुन स्वत:च स्वत:ला फाट्यावर मारुन घेणे!
मस्त
मस्त
:-)
बिकाशी सहमत!
१+
बिकाशी आणि म्हणुन सहजशी सहमत
मस्त!
आवडले रे निखल्या निवेदन.
आवडले रे निखल्या निवेदन.
अवांतरः इतके सोप्पे असताना लोक या विषयावर टनावारी कागदे का ल्हितात कोण जाणे.
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
हम्म्म्म छान.
निख्या बेस्ट ऑफ लक रे.
-पुण्याचे पेशवे
छान आहे कथा.. पुलेशु!!!!
छान आहे कथा..
पुलेशु!!!!
सही रे भावड्या...
सही रे भावड्या... मस्त !!!
शुभेच्छा !!
शुभेच्छा !!
मस्तच ........
दोन्ही भाग आवडले
बरं
मग कथा इथं संपलीये म्हणायची का? नाही, म्हणजे इथे लिहिलेली संपलीये का? प्रत्यक्षातली कथा आत्ता सुरू झाली आहे हा भाग वेगळा.
सराईतासारखी लिहिली आहेस!!!
प्रत्यक्षातली कथा आत्ता सुरू
प्रत्यक्षातली कथा आत्ता सुरू झाली आहे हा भाग वेगळा.
येस त्या बद्दल नंतर कधीतरी..
सराईतासारखी लिहिली आहेस!!!
खुद के साथ बाता :- ह्यात काही खोच तर नाहि ना????
-निखिल
खुद के साथ बाता :- ह्यात काही
खुद के साथ बाता :- ह्यात काही खोच तर नाहि ना????
मोठा झालास की कळेल.
छ्या...
छ्या हो बिका. ही पोरं आजकालची लई चालू. गैरसमज करून घेऊ नका त्यांच्याविषयी. ती ऑलरेडी मोठी आहेत!
डायरेक्ट मोड्कांकडुन मोठे
डायरेक्ट मोड्कांकडुन मोठे असल्याचे सर्टीफिकेट...
धन्य धन्य झाले
-निखिल
हे असं होतं...
लई आनंद झाला की हे असं होतं...
धन्य धन्य झाले
आता काय करायचं?
धन्य धन्य झाले हा हा
धन्य धन्य झाले
हा हा हा..
करु का संपादीत
-निखिल
ऑं
ऑं?
मालकाला संपादीत करायला सांगु
मालकाला संपादीत करायला सांगु का??? असे म्हणायचे होते हो
छे !!!
-निखिल
तरीही
तरीही...
वरच्या प्रत्येक प्रतिसादात
वरच्या प्रत्येक प्रतिसादात मोडकांशी सहमत!!!!
मकेशी बाडिस.
मकेशी बाडिस.
-पुण्याचे पेशवे
मके & पुपे शी बाडिस.
मके & पुपे शी बाडिस.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
+१
श्रामोंशी सहमत आहे. पुढचेही भाग येऊ द्या.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मस्त रे....
मस्त रे....
सर्व प्रतिसाद देणार्या न
सर्व प्रतिसाद देणार्या न देणार्यांचे धन्यवाद
-निखिल
मस्त लिहीले आहे.
मस्त लिहीले आहे.
अभिन॑दन!!!!!!!!!!! शेवट गोड
अभिन॑दन!!!!!!!!!!!
शेवट गोड झाला............
मस्त आहे....प्रेमकथा.........
हुश्श्य!
चला..शेवट गोड झाला ना? बास्स!
उगंच बायांच्या आड्यन्सला रडवायला कुणाला मारलं बिरलं नाही ते नश्शीब की होऽऽ.
बाकी,
)
निख्या, मोडक म्हणताहेत त्याकडे नीट लक्ष दे. सराईतपणा जाणवतोय. (मी, मोडकांनी तुझ्या लेखनशैलीबद्दल विधान केलं आहे असं बाळबोधपणे गृहित धरुन बोलतोय
आणि बेट्या, गोष्ट संपते कसली? आत्ता कुठे गोग्गोड स्वप्नं संपायची वेळ आलीये...जरा दोघांना भटकुन बिटकुन घेऊ दे...दोन चार वर्षांनी लग्न झाल्यानंतर पुढची फेज लिहीच तू!
ही अश्शी: -
.........."अगंऽऽ...शर्टाचं बटण तुटलंय.."
"दुसरा शर्ट घाल रे! बरी तुझ्या शर्टाची बटनं सकाळच्या गडबडीत तुटतात.." उजव्या हातात लाटणं आणि डावा हात पिठानं डवरलेला अशी ती किचनच्या दारातुन धुसफुसली. सकाळच्या धावपळीत कपाळाशी चमकणारे घामाचे थेंब, मुळचा गोरा रंग कामं निपटण्याच्या गडबडीत तांबुस झालेला अन, घाईच्या वेळेत कामं उरकण्यात होणार्या चिडचिडीनं आणखीच रंगलेले गाल..
ऑफिसला होणारा उशीर विसरुन तो ओट्याशी येऊन पाठमोरा तिच्यासमोर उभा राहिला. एका हातानं तिच्या कपाळावर आलेले केस मागे सारत तिच्या घार्या डोळ्यात रोखुन पाहु लागला. त्याच्या चेहर्यावरचं खट्याळ हसु पाहुन तिला पुढची कल्पना आलीच..लाटणं तसंच उगारुन त्याला किचनबाहेर ढकलुन देत म्हणाली, "आचरटपणा नकोय आत्ता! मला आज मॉड्युल रिलिजची मिटिंग आहे.. तू आवर पटकन!"
तो बिचारा तोंड पाडुन शर्ट बदलायला आत निघुन गेला....
खीखीखीखी
मोडकांनी तुझ्या लेखनशैलीबद्दल विधान केलं आहे असं बाळबोधपणे गृहित धरुन बोलतोय
अर्थात, मी त्याविषयीच विधान केलंय. आणखी कशाविषयी करणार राव?
तो ओट्याशी येऊन पाठमोरा तिच्यासमोर उभा राहिला. एका हातानं तिच्या कपाळावर आलेले केस मागे सारत तिच्या घार्या डोळ्यात रोखुन पाहु लागला.
हे कुठलं योगासन आहे राव? पाठमोरा उभा राहतो काय आणि डोळ्यांत रोखून पाहतो काय!!! आमचं काही चुकत असल्यास माफी असावी.
योगासन नाय हो.... टंकासन
योगासन नाय हो.... टंकासन चुकलं. ओट्याशी पाठमोरा असं हवं होतं ते...किंवा पाठमोरा हा शब्दच काढून टाकायचा होता...गडबडीत(की रंजनात
) ते राहिलं....
तुम्ही फार मोर्ह गेला.. ईथुन
तुम्ही फार मोर्ह गेला..
ईथुन लग्नाच्या काळामधे सुद्धा एक कथा आहे..
अर्थात ती ह्या जोश्याची नाय आहे....
लग्न ठरविणे....
-निखिल
आस्सं आहे होय? चालु द्या!!
आस्सं आहे होय? चालु द्या!!
लै भारी!
लै लै लै लै भारी!
-ऋ
लेख छान उतरलाय.
लेख छान उतरलाय.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
वाह ! मस्त रे निख्या, आज
वाह !
मस्त रे निख्या, आज तुझे लेखन वाचुन जुना निख्या भेटल्याचा आनंद झाला. एकदम फर्मास लेखन.
आता पुन्हा त्या विचारजंती लेखनाच्या वाटेला न जाता असे मस्त मस्त हलके फुलके लेखन करत रहा.
पन्नासावा प्रतिसाद!!!
पन्नासावा प्रतिसाद!!!
पुढे काय झाले मग ???? @ मके =
पुढे काय झाले मग ????
@ मके = ५१
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
चागल प्रयत्न आहे
माझा मराठी मधली पहिली प्रतिसाद आहे. कोणी मला अनुस्वार कसा द्यायचा सान्गल का? बाकि कथा बरी आहे. मराठी टायपिन्ग शिकले की मोठी प्रतिक्रिया देइन.
मी मरठीवर स्वागत ..
कॅपिटल "M" ने अनुस्वार देता येतो ...