प्रिय सखे....
तू हे वाचे पर्यंत प्रेमदिन सुरु झालेला असेल... ह्या प्रेमदिनी मी आज हे प्रेमपत्र लिहित आहे. खरे तर ह्या नंतर तुझी रिअॅक्शन काय असेल ह्या भीतीने लिहायला हात धजावतच नाहीय पण आता याचीहि सवय होत आहे असेच म्हणावेसे लागेल... गेल्या तीन वर्षा पासुन आपण एकमेकांना ओळखतो... ओळखतो म्हणजे काय? मागचे तीन महिने सोडले तर आपले बोलणे फार कमीच व्हायचे. अर्थात त्याला कारण मीच आहे हे मला मान्य आहेच.. वागलोच होतो मी तसा... त्याची शिक्षा करतोय ना सहन गेले तीन वर्ष.. आता अजुन किती सहन करणार???? माझ्या समोर अजुनही तीन वर्षापुर्वीचीच तू डोळ्या समोर आहेस...
आपला नोकरीचा पहिला दिवस होता... एका लहानशा शहरातून इंजिनीअरिंग करुन मी ह्या मोठ्या कंपनीत नोकरीला लागलो होतो... अर्थात कँपस मधूनच नोकरी मिळाल्यामुळे फारसा प्रश्न नव्हता आला... "पापा कहतें हैं" सारखी आयुष्यासाठी अनेक स्वप्नं डोळ्यांत घेऊन घरातून निघालो होतो... पहिल्यांदाच बाहेर राहणार होतो... त्यात कंपनीने ट्रेनिंगला भुवनेश्वरला पाठवले होते... आजही तो पहिला दिवस स्पष्ट आठवतो आहे.. कंपनीने दिलेल्या राह्यच्या जागेवरुन प्रशिक्षण केंद्रावर मी लवकरच पोहचलो होतो... साधारण नेहमीचेच सगळे सोपस्कार सुरवातीला झालेच.. तेच कंपनीची ओळख करुन देणारे प्रेझेंटेशन आणि भरमसाठ जाँईनिंग फॉर्म्स.. मग हळू हळू प्रत्येकाची बॅच सांगण्यात आली... त्यात आमच्या कॉलेजचे कोणीच माझ्या बॅच मधे नव्हते... त्यानंतर पुढे त्यांनी आपल्या बॅच साठी सी. आर. होण्यास कोण उत्सुक आहे विचारले.... आधी तर कोणाचाच हात वर झाला नाही. मग अचानक मुलींच्या बाजुला लक्ष गेले तर एक गोरासा हात वर झालेला दिसला... त्या गोर्या हाताला मग स्टेजवर बोलवण्यात आले....होय तुझाच तो हात.... आजही आठवतेयस मला तु त्याच रुपात... मोरपंखी रंगाचा तुझा तो पंजाबी ड्रेस... मानेवर रुळणारे केस... कसे विसरु तुझे ते रुप... लव्ह अॅट फर्स्ट साईट का काय असेच झाले होते... आणि तु अगदी बिनधास्त स्टेजवर जाउन स्वत:ची ओळख करुन देत होतीस...काही सेकंद माझ्यासाठी जगच थांबले होते की काय??? तु जागेवर जाऊन बसे पर्यंत मी तुझ्याच कडे बघत होतो..
कार्यक्रम संपताना आजच्या दिवशीची उपस्थिती प्रत्येकाने सी आर कडे नोंदवायची होती... माझी नजर तुलाच शोधत होती.. आणि मग मी तुझ्याकडे आलो.. तेव्हा पहिल्यांदा तुला जवळून बघितले.... तुझ्या घार्या डोळ्यांनी तर मला घायाळच केले म्हणावे!!! त्या मोरपंखी ड्रेस वर मोरापिसाचे कानातले...अगदी आ वासून मी तुझ्या कडे पहात होतो.. कदाचित ते तुझ्या लक्षात आलेही असावे...सगळ्यांची तुझ्याकडच्या कागदावर सही करुन झाली तरी मी तसाच उभा होतो.. शेवटी तूच माझ्या समोर आलीस आणि माझ्या हातात तो कागद दिला "Please sign this"... सही करत असतानाही माझे लक्ष तुझ्याकडेच होते म्हणा... सहीचा कागद तुझ्या हातात देताना आपली नजरा नजर झाली आणि तु माझ्या कडे बघुन गोड हसलीस... अगदी हृदयात कळ यावी असेच होते ते हसू.... आणि त्यानंतर "जोशी, माझ्या कडे बघणे झाले असेल तर वर्गा कडे चला!!!" हा टोला तर खासच होता...
त्यानंतरचे काही दिवस असेच गेले.. म्हणजे आपली ओळख तर झाली होती... आपण योगा योगाने एकाच ग्रुप मधे आलो होतो.. एकाच ग्रुप मधे असल्या मुळे रोज ट्रेनिंग संपल्या नंतर आपण एकत्र असायचो... हळु हळु बोलणेही वाढत होतेच.. ओळखीचे रुपांतर मैत्रीत होत होते... माझ्या प्रत्येक दिवसाची सुरवात तुला एस एम एस करुनच व्हायची आणि शेवट तुझ्याशी फोनवर बोलतच व्हायचा. आपल्या मैत्रीबद्दल आपल्याच ग्रुप मधे अनेक लोकांना आश्चर्य वाटायचे... तुझी तर अखंड बडबड चालू असायची... तुलाही माझ्यासोबत वेळ घालवणे आवडायचे असे वाटायला लागले होते.. त्यात रोज रात्रीच्या त्या कॉफीशॉप मधल्या गप्पा.. तू तुझ्या शेजारची जागा माझ्यासाठी वर्ग, कॉफीशॉप प्रत्येक ठिकाणी राखून ठेवणे.. ह्या सगळ्यांनी मी खरे तर सुखावतच होतो... साधारण महिना भर हे असेच चालले असेल, अगदी आपल्या चिल्का च्या ट्रिप पर्यंत....
(क्रमशः)
अबे पुढे ???????? गेला..
अबे पुढे ????????
गेला.. गेला... क्रमशः कप्पाळावर मारुन गेला लेखकु
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
निख्या ...
तेरी तो ...
आता काय पुढच्या प्रेमदिनाची वाट पाहायला लावणार आहेस काय ? लवकर टंक बे
कल्पना
विलास मस्त
पूढला भाग कधी ? बालदिनाच्या
पूढला भाग कधी ? बालदिनाच्या दिवशी का ?
१४ फेब - १४ नोव्हे = ९ महीने
सुरेख लिहले आहेस रे निख्या
सुरेख लिहले आहेस रे निख्या !!
पहिल्यांदा शंकेची पाल चुकचुकली .. मग ३ वर्षे वैगेरे वाचुन हुश्श झाले.
जियो !!
+१
उ त्त म ..
छान चाललंय... पुढे सरका
छान चाललंय... पुढे सरका लवकर...
कोणाची रे ही गोष्ट??? हे
कोणाची रे ही गोष्ट??? हे प्रकरण कधी सांगितले नाहीस!!!!!
काय पण प्रश्न आहे?
काय पण प्रश्न आहे? म्हणजे, मी सहमत आहे या प्रश्नाशी!
हा हा हा.. उत्तर नाही द्यायचा
हा हा हा.. उत्तर नाही द्यायचा तो.. चालू आहे एकदम!!!
पुनश्च
पुनश्च एकदा सहमत!
पुनश्च
पुनश्च एकदा सहमत. शेवटच्या विधानाशी अगदी मनापासून सहमत!
मी पण सहमत आहे... आता मोठे
मी पण सहमत आहे...
आता मोठे मोडक ( मोमो ) सहमत आहेत तर आम्हि पण सहमतच.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
लवकर लिहा
लवकर लिहा
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
काय रे निख्या, तुला काय झालं
काय रे निख्या, तुला काय झालं अचानक? आणि माझं आडनाव का रे चोरलंस?? ;-)
(उगाचच दर्डावत) अदिती
तू गंडलीयस अदिती.. हा नेहमीच
तू गंडलीयस अदिती.. हा नेहमीच जोशांनाच टारगेट करतो.. आठव बरं "एक प्रवास"!!!
प्रतिसाद देणार्या न
प्रतिसाद देणार्या न देणार्या सर्वांचे आभार...
आज संध्याकाळ पर्यंत दुसरा भाग टाकतो
-निखिल
लेख पूर्ण न लिहीणार्या
लेख पूर्ण न लिहीणार्या निखीलरावांचा निषेध. असो लेख छान. निख्या मी बघ कसा लेख पाडतो तेव्हा ४-५ परिच्छेद तरी नक्कीच असतात. नायतर तू.
-पुण्याचे पेशवे
पुढचा भाग लवकर टाका
पुढचा भाग लवकर टाका
?? लिहा पुढे.
??
लिहा पुढे.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
छान जमला रे !!
छान जमला रे !!
जोशी की देशपांडे ??
>>"जोशी, माझ्या कडे बघणे झाले असेल तर वर्गा कडे चला!!!" हा टोला तर खासच होता...
चुकुन जोशी लिहिले की, मुद्दाम ?
हॅ हॅ हॅ ...
>>चुकुन जोशी लिहिले की, मुद्दाम ?
असो, अधिक उहापोह व्हावा ही विनंती
- कांदापोहेप्रेमी ( डॉन्या जोशी )
+१
+१ सहमत...
-अंमळगंमतपाहूप्रेमी(मस्त कलंदर-जोशी)
+२
सहमत
(निख्याला धमकी देऊ-प्रेमी) अदिती जोशी (डब्बल ब्यारल)
कसचा उहापोह.. आमच्या सगळ्या
कसचा उहापोह.. आमच्या सगळ्या कथांच्या हिरोचे नाव जोशीच असते.निरंजन जोशी..
काही हरकत...
-(जोशी आडनाव प्रेमी) निख्या जोशी
-निखिल
हॅ हॅ हॅ आतापर्यंत फक्त
हॅ हॅ हॅ
आतापर्यंत फक्त मुलींची आडनावे बदलतात हा भ्रम होता!!
प्रेमात, युद्धात आणि
प्रेमात, युद्धात आणि प्रोजेक्टमधे सगळे काही क्षम्य असते.
+ १ उंट कधी .... क्षमा...
+ १
उंट कधी .... क्षमा... बिका कधीच चुकिचे बोलत नाहीत
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
आयला!! निर्या जोश्याची गोष्ट
आयला!!
निर्या जोश्याची गोष्ट सांगतोयस होय बेट्या?
आधी कळालंच नाही, हा कोणाची गोष्ट सांगतोय की मनोगत व्यक्त करतोय ते.
छान छान...चांगलं लिहिलंयस रे. मस्तच.
अवांतरः त्या निर्या जोश्याचं पुढं काय झालं रे? राजकारणात पडणार होता ना तो?
सटकलास की कय रे
सटकलास की कय रे
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
राजे तो बरोबर आहे... तुच
राजे तो बरोबर आहे... तुच सटकलाएस...
-निखिल
माझ्या गुडघ्याला जास्तच मार
माझ्या गुडघ्याला जास्तच मार बसला वाटतं मग
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."