पुण्यात "जर्मन बेकरीत" स्पोट

0
0

आत्ताच टि व्ही वर पाहिलेल्या बातमी नुसार पुण्यात कोरेगाव पार्क मधे असलेल्या जर्मन बेकरी मधे स्पोट झालेला आहे. स्पोट घडण्याचे कारण अजुन कळालेले नाही. पण ग्रुहराज्यमंत्र्यांनुसार ३ लोक ठार व ४०-५० लोक जखमी झालेले आहेत. घातपाताची शक्यता पडताळण्यासाठी ए टी एस व बॉम्बशोधक पथक घटणास्थळी आहे.
अधिक माहिती
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5569806.cms
पुण्यात असलेले कोणी मीमकर ह्या भागात असण्याची शक्यता आहे का???

आठजणे मृत्युमुखी पडले आहेत

आठजणे मृत्युमुखी पडले आहेत Sad

खुपच वाईट प्रकार आहे, अनेक परदेशी नागरिक देखील जखमी आहेत जख्मींची संख्या ४० च्या वर आहे असे कळाले.

* संदर्भ - स्टार माझा / मटा.



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

कोरेगाव पार्क जवळच माझी कचेरी

कोरेगाव पार्क जवळच माझी कचेरी आहे.

बाँब स्फोट

सकाळमधे पण आधी सिलींडरचा स्फोट असे म्हणले होते. पण आता नक्की झाले आहे की हा बाँबस्फोटच आहे म्हणून. http://bit.ly/cEk02G
http://bit.ly/bPfboY

इंग्रजी माध्यमे अजुन तरी "सस्पेक्ट" असा शब्द वापरत आहेत. पण ती "पोपट मेला नाही" प्रमाणे, लिहायची पद्धत असावी.



विकास देशपांडे

आयबीएन लाईव्ह प्रमाणे...

Officials suspect the explosion to be a bomb blast because the bakery is close to a Jewish centre, Chabad House, in Koregaon area of Pune.

http://bit.ly/bYXL4r

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. हास्य



विकास देशपांडे

कोरेगाव पार्क भागात असलेल्या

कोरेगाव पार्क भागात असलेल्या जर्मन बेकरीमध्ये बॉम्ब स्फोट होऊन १० जण ठार तर ४० जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यामागे दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे गृह सचिव पिल्लई यांनी स्पष्ट केले आहे.

मटा न्युज.

इथे वाचा.

जहांगीर हॉस्पिटल मध्ये

जहांगीर हॉस्पिटल मध्ये एबी+व्ह आणि बी+व्ह रक्त पाहिजे आहे....१०६६ - फोन नंबर.

हम्म

बाबुराव बागुलांच्या एका शीर्षकाची आठवण : "मरण स्वस्त होत आहे."
मृतांच्या नातेवाईकाना मनःपूर्वक सहानुभूती. जखमींच्या प्रकृतीबद्दल प्रार्थना.

असेच म्हणतो.

मृतांच्या नातेवाईकाना मनःपूर्वक सहानुभूती. जखमींच्या प्रकृतीबद्दल प्रार्थना



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

:( :(

Sad Sad



-Nile

आता नेहमी प्रमाणे चिदंबरम,

आता नेहमी प्रमाणे चिदंबरम, मनमोहनसिंग पाकिस्थानला कडक शब्दात इशारा देतील. चिदंबरम परत इतर शहरात रेड अलर्ट देतील. शेपूटघालू.
बाकी आपले आबा काय म्हणतील कोणी सांगू शकेल काय?

मृतांच्या नातेवाईकाना मनःपूर्वक सहानुभूती. जखमींच्या प्रकृतीबद्दल प्रार्थना असेच म्हणतो.




मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

सहमत आहे, ह्यांनी देशाचे

सहमत आहे, ह्यांनी देशाचे वाटोळे करुन ठेवले आहे.



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

जर्मन बेकरीतील स्फोटामागे

जर्मन बेकरीतील स्फोटामागे लष्कर-ए- तय्यबा या दहशतवादी संघटनेचा हात असण्याची शक्यता केंद्रीय गृह सचिव जी. के. पिल्ले यांनी व्यक्त केली आहे. पुण्यातील या दहशतवादी घटनेबाबतची पूर्वसूचना गेल्या १२ ऑक्टोबर २००९ रोजीच मिळाली होती. या स्फोटासाठी सुमारे सहा किलो वजनाची स्फोटके पाठविली होती, असेही त्यांनी आज पत्रकारांना माहिती देताना सांगितले.

येवढं सगळं माहित असताना देखील पुण्यात हाय अलर्ट का नव्हता ( पुण्यात हाय अलर्ट आहे असे कुठेच माझ्या तरि वाचनात / पाहण्यात आले नाही) Sad व जर समजा तुम्ही माहिति असून देखील हल्ला रोखु शकला नाही तर कमीत कमी ती माहिती आपल्या विभागा जवळच ठेवा ना का लोकांच्या जख्मेवर मीठ चोळतात असलि माहिती नंतर देऊन काय माहीत !



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

अहो हाय अ‍ॅलर्ट होता ना!

अहो हाय अ‍ॅलर्ट होता ना! म्हणून प्रत्येक चित्रपटगृहाबाहेर पोलिसांच्या बस च्या बस तैनात होत्या.



-पुण्याचे पेशवे

कृपया

हे 'हाय अ‍ॅलर्ट' म्हणजे काय असते ते समजाउन सांगेल का कुणी?

हॅ हॅ हॅ मास्तर काय हे!

हॅ हॅ हॅ मास्तर काय हे!




मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

ओह्ह वॉट द हेल दिस जमन बेकरी

ओह्ह वॉट द हेल दिस जमन बेकरी इज? ओह्ह हॅपी वॅलेंटाईन्स डे माय डिअर. लेट अस गो फॉर मूवी. माय नेम इज खान. इजन्ट दॅट गूड मूव्ही? अ‍ॅन्ड येस वुई हॅव फुल पुलिस प्रोटेक्शन देअर.



-पुण्याचे पेशवे

+१

यु सी! ओन्ली शाहरुक खान फॅन्स विल बी प्रोटेक्टेड.

स्फोटाचा निषेध आणि मृतांच्या

स्फोटाचा निषेध आणि मृतांच्या नातेवाईकांना सहानुभूती. जखमींनी लवकर बरे व्हावे अशी सदिच्छा.

>>आता नेहमी प्रमाणे चिदंबरम, मनमोहनसिंग पाकिस्थानला कडक शब्दात इशारा
आता नेहमी प्रमाणे चिदंबरम मनमोहनसिंग, सोनिया गांधी, आबा, अशोक चव्हाण यांना शिव्या घातल्या जातील. नेहमीचे प्रतिसाद येतील. wink

आता नेहमी प्रमाणे चिदंबरम

आता नेहमी प्रमाणे चिदंबरम मनमोहनसिंग, सोनिया गांधी, आबा, अशोक चव्हाण यांना शिव्या घातल्या जातील. नेहमीचे प्रतिसाद येतील

+१

आणि नेहमीप्रमाणे विचारवंत चुकलेल्या समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी हिरीरीने पुढे सरसावतील हास्य

+१, सहमत ...

>>नेहमीप्रमाणे विचारवंत चुकलेल्या समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी हिरीरीने पुढे सरसावतील
+१, नानाशी ह्या बाबतीत नेहमीप्रमाणे सहमत ...
त्यात आज व्हॅलेंटाईन डे होय, उगाच कशाला त्यांचा मुड घालवता हो ?

बाकी मिडियाचेही आम्हाला फार आश्चर्य वाटले.
काल "टीआरपी" साठी स्फोटाचे कंटिन्युयस कव्हरेज दाखवणार्‍या हरामखोर मिडियाला आज सकाळी जेव्हा टेस्ट मॅच सुरु झाली तेव्हा पुढच्या ५ दिवसाची सोय झाली म्हणुन काय आनंद झाला होता सांगु ?

आनंदी आनंद गडे,
काल मुंबई तर आज पुण्यात घडे,
रोज मरे त्याला कोण रडे ?
अहो साहेब त्यात आज तर व्हॅलेंटाईन डे !

आनंदी आनंद गडे, काल मुंबई तर

आनंदी आनंद गडे,
काल मुंबई तर आज पुण्यात घडे,
रोज मरे त्याला कोण रडे ?
अहो साहेब त्यात आज तर व्हॅलेंटाईन डे !
Laughing out loud
हसून लोळणारा स्मायली टाकण्याचे कारण असे की रडण्याने हार्ट अ‍ॅटॅक नको यायला त्यापेक्षा हसून येऊदे आला तर. नाहीतर अजून एखादा स्फोट आहेच.



-पुण्याचे पेशवे

कार्याध्यक्षांनी चित्रपटाला

कार्याध्यक्षांनी चित्रपटाला बंदोबस्त पुरवण्यात पोलीस मग्न होते म्हणून बॉम्बस्फोट झाला असं म्हटलंय. ज्यांनी असा बंदोबस्त ठेवण्याची वेळ आणली ते स्फोटाला जबाबदार समजावेत काय?

वाटच पहात होतो ...

>>ज्यांनी असा बंदोबस्त ठेवण्याची वेळ आणली ते स्फोटाला जबाबदार समजावेत काय?

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
हा हा हा, चालु द्यात ...

आम्ही वाटच पहात होतो "व्हेअर वॉज राज ठाकरे ? " किंवा "पोलिसांना कामं वाढवुन ठेवल्याबद्दल शिवसेना जबाबदार" वगैरे अशा "सेक्युलर" प्रतिक्रियांची. अपेक्षेनुसार ती आली आणि बरे वाटले.
आम्ही कालच संध्याकाळी ह्याचे भविष्य ऑर्कुट, फेसबुक आणि बझ्झवर वर्तवले होते wink
असो, तुम्हाला शुभेच्छा !!!

हा हा हा अहो डानराव आजकाल तर

हा हा हा
अहो डानराव आजकाल तर असे भविष्य वर्तवण्याची पण गरज नसते.. हे बाय डिफाल्ट असतेच असते...

असो... चालु द्या...हास्य

असलेधागे आणि त्यात उधळलेली

असलेधागे आणि त्यात उधळलेली मुक्ताफळे हे पण बाय डिफॉल्ट असतेच.

असलेधागे? म्हणजे नक्की काय ?

असलेधागे? म्हणजे नक्की काय ?

आणि त्यात उधळलेली मुक्ताफळे हे पण बाय डिफॉल्ट असतेच.
Laughing out loud

चालु द्या हास्य

असलेधागे आणि त्यात उधळलेली

असलेधागे आणि त्यात उधळलेली मुक्ताफळे हे पण बाय डिफॉल्ट असतेच.

आपली काही तरी गल्लत होत आहे..
आपल्याला ह्या धाग्यात काय मुक्ताफळे उधळले आहत???
ह्यात फक्त काही माहिती व त्या अनुषंगाने मीमकरांची ख्याली खुशाली विचारली आहे..
आपल्याला काही चुक वाटले तर चुकीचे टाचण दिले का??
बाकी चालु द्या!!! ज्याही त्याची जाण समज ईत्यादी ईत्यादी



-निखिल

डॉन राव चुकताय तुम्ही

पोलिसांना कामं वाढवुन ठेवल्याबद्दल शिवसेना जबाबदार असे मी म्हटले नाही उद्धव ठाकरेच म्हणाले की पोलीस बंदोबस्तात व्यस्त असल्याने बाँबस्फोट झाले.

बरोबर

उद्धव ठाकरे म्हणाले ते चुकच आहे, पण अंशतः. पण ते १००% चुकही नाही.
काय म्हणता ?
अहो प्रत्येक थेटरामागे ३० पोलीस गुंतल्यावर उरलेल्या ठिकाणी किती आणि कसा बंदोबस्त पुरवणार ?

पण ह्यात १००% चुक शिवसेनेची आहे का हो ?
एवढी शाहरुखली पिक्चर रिलीज करायची मस्ती असल्यास त्याने प्रायव्हेट सिक्युरिटी का हायर केली नाही, हे सरकार आणि शासनयंत्रणा काय त्याच्या पेरोलवर आहे काय त्यांना राबवायला ?
विचारवंताच्या भाषेत सांगायचे म्हणल्यास "करदात्यांच्या पैशातुन पगार घेणार्‍या पोलिसांनी एखाद्याच्या वैयक्तिक फायद्यासाठी निघणार्‍या एखाद्या चित्रपटाचे की ज्याचा देशाला मिळणारा कर सोडला तर इतर काही फायदा नाही त्याचे संरक्षण करण्याची काय आवश्यकता ? ". शिवाय तो पिक्चर जर एखाद्याची अस्मिता ललकारणार असेल आणि काही अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले लोक पोलिस संरक्षणात पिक्चर पाहुन "जिंकल्याचा आवेश" दाखवणार असतील तर ?

१००% कोनच बरोबर अथवा चुक नाही पण तारतम्य असावे की नाही ?
उगाच वडाची साल पिंपळाला लावण्यात काय हाशील ?

सगळे सारखेचं

इथून तिथून सगळे सारखेचं...
तरीही ...
काल रात्री टी.व्ही. वर प्रेसवाल्यांशी बोलताना आपले थोर सी.एम. साहेब बोलत होते की ... हेडली जिथे जिथे गेले होते त्या ठिकाणांची तपासणी सुरू आहे ... काय हा आदर !!!
अवांतर : काही दिवसांपुर्वी एन्.डी.टी.व्ही. च्या एका टॉक शो मध्ये गायक अभिजीत बोलत होता .. आपल्या देशात ही परिस्थिती आहे की जर कोणी पाकिस्तान/त्यांचे खेळाडू/गायक विरुद्ध बोलले तर इतर सगळे पाकिस्तानच्या बाजूने बोलतात Sad
तो पुढे असही बोलला की जर २६/११ वेळी ताज वगैरे हॉटेल मध्ये एक ही नेता वगैरे मंडळी कसे काय नव्हते ? जर एखादा अतिरेक्यांकडून मारला गेला असता तर या लोकांना [पाकिस्तानच्या बाजूने बोलणार्‍यांना ]कळालं असतं

ह्म्म्म...

परमेश्वर मृतात्म्यांस शांती देवो!
हे परत म्हणण्याची वेळ कोणावरही न येवो!

असो, आता जरा घटनाक्रमाकडे बघूया;

अतिरेक्यांना समर्थन देणार्‍या पाकिस्तानशी खेळू नका - शिवसेना
अतिरेक्यांना समर्थन देणार्‍या पाकिस्तानशी खेळा - शाहरुख
अतिरेक्यांना समर्थन देणार्‍या पाकिस्तानशी खेळा म्हणणार्‍या शाहरुखच्या चित्रपटावर बहिष्कार टाका - शिवसेना
(झेंडा, राणे वगैरे सगळे विसरुन) शाहरुखच्या चित्रपटांना संरक्षण देणार (अभिव्यक्ती स्वातंत्र्य ?) - सरकार (अशोक चव्हाण, वगैरे)

सरकारने चित्रपटाला संरक्षण दिले (मुंबई, औरंगाबाद आणि कुठे कुठे)

पुण्यात स्फोट

निष्कर्ष : शिवसेनेने शाहरुखचा चित्रपटांना विरोध केल्यामुळे पुण्यात पोलिस कमी पडल्यामुळे स्फोट झाला.

आहे की नाही गम्मत.

आता अजून एक गम्मतः
पाकिस्तानी खेळाडूंना घ्या म्हणणार्‍या शाहरुखचा स्वतःचा एक संघ आहे, जिथे तो पाकिस्तानी खेळाडू घेउ शकत होता. पण त्यान ते न करता नुसतीच तोंडाची हवा केली.



_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी

मस्त रे ...

छान आढावा घेतला आहे मित्रा.
उत्तम प्रतिसाद ...

पाकिस्तानी खेळाडूंना घ्या म्हणणार्‍या शाहरुखचा स्वतःचा एक संघ आहे, जिथे तो पाकिस्तानी खेळाडू घेउ शकत होता. पण त्यान ते न करता नुसतीच तोंडाची हवा केली.

हा हा हा, हीच तर गोम कळत नाय.
शाहरुखला वाटते की शिवाजी जरुर जन्माला यावेत, पण आपल्या घरी नको.
असे कसे चालायचे ?

निखील , सर्वात पहिले जर्मन

निखील ,

सर्वात पहिले जर्मन बेकरी ...कोरेगाव पार्कच्या उच्चभ्रु वस्तीतल सर्वात जुन आणी प्रतिष्टीत फास्ट फुड ...मुळा-मुठा नदीकिनारी वसलेल्या के.पी एरिया ...ईथे आधी केवळ दोनच हॉटेल्स होती ....एक ए.बी.सी. फार्मस आणी दुसरे जर्मन बेकरी .....ताज ब्लु डायमंड ,सेन्ट्रल मॉल ,गोदरेज मिलेनियम, एन्.आय.आय्.टी,टाटा रिसर्च सेंटर, अंधशाळा,मौलाना आझाद सांस्कृतीक हॉल ,आय.सी.आय.सी.आय. च पुणे हेड-ऑफीस ,येरवडा-हडपसर पी.डब्ल्यु.डी ऑफीस,बंडगार्डन,एतिहासिक येरवडा ब्रिज, नवीन ब्रिज, जे.एन्.पेटीट शाळेच बॅक ग्राऊंड,गेले कित्येक वर्षे अस्तित्वासाठी झगडणार जय-हिंद नगर,अर्थातच जय-हिंद नगर झोपडपट्टी,ओशो आश्रम........अगदी हाकेच्या अंतरावर

जर्मन बेकरी...साधारण ३०-४० चा एरिया....एकुण १२ टेबल्स....एकावेळेस एका टेबलवर सहा जण बसतील अशी.पण ते पाळल्या जात नाही.....सहसा सेल्फ सर्वीस....एखादा दुसरा वेटर....त्याच ईमारतीत,एक सायबर कॅफे ,मनी टान्सफर्स.ट्रॅव्हल एजंट्...आणी ओशो संबधित वस्तु,कपडे,ईतर साहित्य मिळण्याची छोटी-छोटी दुकाने...समोर नव्याने झालेल पंचतारांकित हॉटेल,त्याच हॉटेलबाहेर रिक्षा स्थानक,रस्त्याच्या अपोझिट साईडला फुटपाथ विक्रेत्यांची रांग,त्या ज्या चटईच्या चपळा मिळण्याचे हमखास स्थान.....उजव्या बाजुच्या ईमारतीत सिटीबॅकेंच ए.टी.एम्.,सब-वे आणी दोनचार ईतर तत्सम खाद्य-गृहे....ज्या चौकापासुन जर्मन बेकरीपर्यंत जावे लागते त्याच चौकाच्या दोन्ही बाजुला पेट्रोल पंप...ह्या रस्त्याने सरळ गेले की डाव्या बाजुला कल्याणी नगर(आता सध्या पुण्यातील सर्वात उच्चभ्रु वस्ती) ला जोडणारा पुल ....आणी सरळ गेले की हडपसर.....त्या रस्त्यावर साधारण १५ - २० पब्ज आहेत ....एबीसी फार्म्स आणी कार्निव्हल सारखी....

ही माहीती केवळ वर्दळ दाखविण्यासाठी....त्यात शनीवार ....तुर्तास जरा गडबडीत आहे ..त्या दिवशीचा घटनाक्रम थोड्याच वेळात सविस्तर खरडतो....