आहे का कोणी?

0
0

हजारो वर्षापुर्वी आपण झुंडीत राहात होतो. काही झुंडीत सशक्तांनी अशक्तांना आधार देणे हा नियम अगदी काटेकोरपणे पाळला जायचा.

सीईटी मधे कमीतकमी १६५ मार्क.
कुटूंब उत्पन्नः वार्षीक २,४००००/- वा कमी.
मेडीकल, इंजीनियरींग,डेंटल करीता शासकिय कॉलेजमधे प्रवेश मिळत असेल तर अशा विद्यार्थ्यांना चार वर्षाचा कॉलेज फी, पुस्तकांचा खर्च जो सुमारे वार्षिक ५०००० रुपये आहे त्याची जबाबदारी घेणार्‍या संस्थेला आपल्या मराठी मुलांची नावे सुचवाणारे ह्या संस्थळावर आहे का कोणी?
कुठल्याही आर्थिक मदतीची गरज नाही. कुणालाही पैसे द्यायचे नाही. वर्गणी नाही. फक्त नावे सुचवा. बा़की सगळे मी बघुन घेतो. गेल्या दोन दिवसात सुमारे सहा नावे आली आहेत. सँक्शन्स पण ४ दिवसात होतीलच. पण त्यातले एकही मराठी नाही हे खंत. ही शिष्यवॄत्ती फक्त मुंबई करता मर्यादित आहे.
दरवर्षी विद्यार्थ्यांची प्रगती पाहूनच पुढील शिष्यवृत्तीचा विचार होइल.
घरची परिस्थीती पडताळण्याकरता सोशल वर्कर घराची भेट देतील.
नुस्ता उत्पन्नाचा दाखला २,४००००/- घरी इटालियन मारबल आणि होम थिएटर असे प्रकार बघण्यात आले म्हणुन ही भेट.
आपल्यापैकी आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या आणि गुणवंत असलेल्या कुणाच्या घरात हे जवळ जवळ दोन लाख पोहोचवण्यासाठी थोडेसे आजुबाजुला बघाल का?

{अतिशय छान उपक्रम प्रभुदेवा}

1

अतिशय छान उपक्रम प्रभुदेवा !
नक्कीच आज पाहतो कोणी आहे का आसपास..


Hope is a good thing...

{सुचना}

2

पुन्हा एकदा नमुद करतो.
ही शिष्यवृत्ती मुंबई परीसरातील विद्यार्थ्यांकरीताच आहे.

{* संपादित *}

3

* संपादित *