ती

0
0

अजून अंधार पडायला खूपच वेळ होता पण उन्हं कलायला लागली होतीच. तशात थंडीचे दिवस म्हणजे अंधार लवकर आणि हवेतला गारठा वाढत जाणारा... टेकून बसल्यामुळं आणि हवेतल्या गारव्यामुळं तिला हलकीशी डुलकी लागलीच.

तेवढ्यात हळूवार पण अगदी ताकदीने मारलेल्या दोन तीन लाथा तिच्या पोटात बसल्या. दुर्लक्ष करावं असं वाटता वाटता अजून एक लाथ बसली आणि आता हे टाळणे शक्य नाही हे समजून तिने डोळे उघडले. समोरच, तो हसत हसत मस्त पहुडला होता मांडीत. तिला एकदम हसूच आलं. एवढंसं कार्टं पण बरोब्बर सगळं मनासारखं करून घेतं... एकदम लबाड पण गोड आहे. कायम हिच्याच कडेवर. तिने सारखं याच्याशी खेळायचं. मस्ती करायची... तिलाही ते खेळणं आवडलंच होतं.

तो यायच्या आधी तिला एकटीला खूप कंटाळा यायचा.

आत्ता सुद्धा जवळ एक चांदी पडली होती... तीच पकडायचा प्रयत्न चालला होता त्याचा. ते जमत नव्हतं... म्हणूनच मग त्या लाथा आणि ढुशा. मस्त वार्‍याच्या झुळकीमुळे छान वाटत होतं. तिने त्याला थोडं घट्ट जवळ ओढून घेतलं. टोपडं नीट केलं. पण सराईतासारखी तिची नजर आजूबाजूला भिरभिरतच होती. वेळ चुकवून चालत नाही हे तिला माहित होतं... शिवाय आत्ताशी कुठे चालू होत होता तिचा दिवस. अजून आख्खी संध्याकाळ जायची आहे.

तशात, एकदम बाजूला वेगाने पळणार्‍या गाड्या मंदावल्या... त्यासरशी ती उठलीच... सिग्नल पिवळा... ती भक्ष्यावर झडप घालताना शेवटच्या क्षणी संपूर्ण अंग ताठ करणार्‍या वाघासारखी पूर्ण फोकस्ड... पुढच्या सगळ्या अ‍ॅक्शन्स ठरलेल्या... किती वेळात सिग्नल लाल होणार... गाड्या थांबे थांबे पर्यंत किती सेकंद लागणार... सगळं सरावाचं...

सिग्नल लाल... तिने पूर्ण ताकदीने त्याच्या ढुंगणावर चिमटा काढला... तो कळवळला... आकांत सुरू...

त्याला काखेला मारून ती पहिल्याच गाडीसमोर तोंड वेंगाडून हात पसरून उभी राहिली...

मी हे वाचुन अजिबात रडलो नाही

1

मी हे वाचुन अजिबात रडलो नाही

........

2

चौका चौकातल्या सिग्नलर घडणार वास्तव. Sad


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

वा, सुंदर लिहलंय!

3

वा, सुंदर लिहलंय!


-Nile

लिखाण

4

लिखाणात चांगल्या दर्जाची झलक आहे. झलकच.

+१

5

मीमवर स्वागत. पहिला प्रयत्न छान आहे हो!

असेच लिहते जा, झलक सुंदर आहे पुढे मागे उत्तम लेखन करु शकाल असे दिसते आहे.

काय राव कंजूष बिका? घाईघाईत एक सबमीशन करायचे तशी कथा लिहली असे वाटले. ये दिल मांगे मोअर!

+२

6

ये दिल मांगे मोअर!

+३

7

हास्य

ती आणि अतिरंजितता

8

बिपिन, हा खरा अनुभव असल्यास हा प्रतिसाद अप्रस्तुत समजावा.

'तो यायच्या आधी तिला एकटीला खूप कंटाळा यायचा.' मग ती कुठल्या वेदनेचे प्रदर्शन करून भीक मागत असे? तुमच्या कल्पनेची भरारी 'माती'शी निगडीत वाटली नाही.

हम्म ! वर सहज राव म्हणत आहेत

9

हम्म !

वर सहज राव म्हणत आहेत तसेच ... ये दिल मांगे मोर.. !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

हम्म

10

हम्म

+१

11

हम्म

वाचुन चुटपुट लागली...

12

यातच लेखन किती प्रभावी झाले ते आले.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

अर्रे

13

लघुत्तम लिहिलंस! प्रभावी.

लघुत्तम नि प्रभावी

14

लघुत्तम नि प्रभावी लेखन!!!
सहजराव म्हणत आहेत तसे 'ये दिल मांगे मोर' तर आहेच...

बाकी, 'ट्रॅफिक सिग्नल' पाहिल्यानंतर या लोकांबद्दल वाटणारी कणव थोडी कमी झाली आहे, तरीदेखील इवल्या इवल्या मुलांचा मांडलेला बाजार पाहताना वाईट वाटतंच!!!

लघुत्तम

15

पण अगदी योग्य चित्रण

थोडक्यात आणी महत्वाचे.

16

थोडक्यात आणी महत्वाचे.

ह्म्म. आधी वाटले अंमळ हळवे

17

ह्म्म. आधी वाटले अंमळ हळवे करणारे स्त्री मासिकातले लेखन आहे का काय? पण वाचल्यावर कळले पोलिस टाईम्सची रीयल स्टोरी आहे ही तर.


-पुण्याचे पेशवे

प्रभावी

18

गोळीबंद. वेगवान. प्रभावी.

छोटेसे.. पण प्रभावी... असे

19

छोटेसे.. पण प्रभावी...
असे अनुभव रोजचेच....


-निखिल

रियल लाईफ एक्सपिरियन्स

20

रियल लाईफ एक्सपिरियन्स



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

बिका, तू चांगलं लिहीतोस हे

21

बिका, तू चांगलं लिहीतोस हे काही वेगळं सांगायला नकोच ... पण त्रास होतो रे! तरीही तू लिहीच...