व्यवस्थापक मंडळ, मदत - मीमसाठी...!
नमस्कार,
मी मराठीचा व्याप वाढत आहे, नवनवीन लेखक मीमवर येत आहेतच, तसेच अनेक प्रस्थापित लेखक मीमवर आपले लेख देत आहेत.
पुढील योजना व कार्य स्वरूप पाहता काही स्वयंसेवकांची / संपादकांची / मीम मित्रांची गरज आपल्या मी मराठीला लागणार आहे.
त्यासाठी भारतातील तसेच भारता बाहेरील सदस्य ज्यांना थोडाफार वेळ मिळू शकतो, व जे मी मराठी ला त्याच्या नियमानूसार चालवण्यास हातभार लावू ईच्छित आहेत त्यांनी पुढाकार घ्यावा. अनेक मित्र, सदस्य मीमच्या मागे उभे राहून नियमीत मदत करत आहेतच, तरी ही एक कार्यरत टीम असावी जी नवीन लेखकांना, सदस्यांना मीम वापरण्या संदर्भात योग्य ती मदत करू शकेल व तसेच मीमचे वातावरण जसे आता मैत्रीपुर्ण आहे तसे ठेवण्यात हातभार लावेल.
अधिकारांची व्याख्या व अधिकार या विषयी वेगळी चर्चा आपण व्यक्तीगत स्वरूपात नावे नक्की झाल्यावर करू.
ईच्छुकांनी व्यनी द्वारे "राजे" या आयडीला संपर्क साधावा.
व्यनी मध्ये उपलब्ध वेळ व स्थानिक देश ( भारत / भारताबाहेर ) हे कळवावे, तसेच वेळ कळवताना भारतातील वेळ ग्राह्य धरून माहिती कळवावी.
तुमच्या काही सूचना व मत असतील तर निसंकोच पणे मला कळावे ही देखील नम्र विनंती.
आपलाच,
सहकार्य अभिलाषी,
राज जैन,
व्यवस्थापक,
मी मराठी.नेट.

.jpg)