बटन्ड


आज ऑफिस मधुन येताना खुपच उशिर झाला होता.
थकवा तर जाणवतच होता.
हात पाय धूउन तो जेवायला बसला.
....................................................

समोर वाफाळलेले जेवण.
पेंग घालवण्याकरता टीवी लावला.
कुठलासा सिनेमा.
नेहेमीचा नर्म श्रुंगाराचा सीन.
हीरो ऑफिसला निघालेला.
शर्ट चे बटन तुटलेले.
हीरॉइन सुई दोरा घेउन बटन शिवुन देते.
आणि मग........
तोच सीन डोक्यात घेउन तो झोपी गेला.
स्वप्नात सुद्धा त्याच सीन ची पारायणे.
...........................................
आज ऑफिसला लवकर जायची गरज नव्हती.
शर्ट चढवता चढवता त्याला कालचा सीन आठवला.
इथे तिथे बघत त्याने शर्टाचे बटन तोडले.
"अग शर्टाचे बटन नाहीये वरचे"
नाश्त्याची भांडी घासत असलेली सौ. दोन मिनिटानी बाहेर आली.
हातात दुसरा शर्ट होता.
"काढ तो. हा दुसरा घाल. वॉशिंग मशीन बिघडले आहे. कपड्याची रास पडली आहे. ऑफिसला गेल्यावर न विसरता सर्विस सेंटरला फोन कर. दुपारी बटन शिवुन ठेवते".
त्याने मुकाटपणे शर्ट हातात घेतला.
बुट घालता घालता त्याला पुट्पुटणे कानावर आले.
"तोडलेले बटन निदान खिडकी बाहेर तरी फेकायचे. नाहीतर सिनेमातल्यासारखे छोटे स्टुल तरी आणायचे. लग्नाला आता दहा वर्ष झाली, पैंतरे बाजी कशाला करायची. सरळ सांगायचे की".
आपले बटन्ड तोंड घेउन तो सरळ ऑफिसला चालता झाला.

No votes yet

नंदन's picture
मस्त

क्लासिक प्रभूसर लेख. बाकी बटन्ड-अनबटन्ड, उसवलेले धागेदोरे हे रुपक म्हणून क्लासच!


निखिल देशपांडे's picture
अगदी टिपीकल प्रभुमास्तर...

अगदी टिपीकल प्रभुमास्तर...


-निखिल

गणपा's picture
हा हा हा मास्तर आस आडुन आडुन

हा हा हा मास्तर आस आडुन आडुन लिहिता व्हय wink
अनुभव लै भारी
काकुंनी विकेट काढली म्हणायची Laughing out loud


सहज's picture
:-)

बटण लावले नाहीच पण टाचणी मात्र लावली हास्य


मस्त कलंदर's picture
अरेरे....

अरेरे....


विनायक प्रभू's picture
हो

टाचणी टोचली(णीट वाचा)


सुहास's picture
क्लीन बोल्ड !!

क्लीन बोल्ड !!


राजे's picture
लैभारीप्रभुसर

लैभारीप्रभुसर wink


धमाल मुलगा's picture
=)) =)) च्यामारी! आपली

Laughing out loud
=)) Laughing out loud
=)) Laughing out loud Laughing out loud

च्यामारी! आपली लोक पण काय येडे असतात...शिणुमातली हिरव्हिण ते तसं बटन लाऊन द्यायचे पैशे मोजुन घेते! त्यात ते दोघं तरणे....लग्नाला धा वर्षं उलटल्यावर कोणती हिरव्हिण असं बटन लाऊन देते का बघा बरं! wink

असोऽऽ.....
प्रभुबाबांची गोष्ट आहे, ती अशी फेसव्हॅल्युवर घेणे म्हणजे आपणच येडे ठरतो. मास्तुरे...गोष्टीमधला क्रिप्टीक नाय कळ्ळां wink

अवांतरः प्रभुबाबा, आजकाल मुनीवर्य आहेत कुठे? सन्यास घेतलाय की काय त्यांनी? (मुद्दामच इथं विचारतोय, म्हणजे त्यांनी पाहिलंच तर निदान कान उपटण्यासाठी तरी माझ्याशी बोलतील ते. हास्य )


परिकथेतील राजकुमार's picture
मास्तुरे स्वानुभव लैच भारी

मास्तुरे स्वानुभव लैच भारी wink


३_१४ अदिती's picture
काकूंचं मीमवर अकाउंट नाही का?

काकूंचं मीमवर अकाउंट नाही का?


विनायक प्रभू's picture
अहो

हा काय स्वानुभव नाहीये.
एका मित्राने सांगितलेला किस्सा.
दहा वर्षात थकलेल्या.
माझ्या लग्नाला २५ पुर्ण होत आहेत.
अवांतरः माझ्याकडे छोटे स्टुल आहे.


३_१४ अदिती's picture
छ्या, मी सरळ प्रश्न विचारला

छ्या, मी सरळ प्रश्न विचारला तरी तुम्ही त्यातून क्रिप्टीकच शोधता! ;-)


विनायक प्रभू's picture
हो

म्हणुनच सरळ उत्तर दिले.
अवांतरः माझी बटणे सारखी तुटतात.


टारझन's picture
गरीबांचा मास्तर : शर्टाराम

गरीबांचा मास्तर : शर्टाराम बटणे


अवलिया's picture
अंमळ येडझवाच आहे मास्तर आणि

अंमळ येडझवाच आहे मास्तर आणि मास्तरचा मित्र.. केव्हाही काहीही लावायला हाक मारतात

असो


विनायक प्रभू's picture
१+

सहमत


परिकथेतील राजकुमार's picture
पुरुषोत्तम अवलिया ह्यांचा

पुरुषोत्तम अवलिया ह्यांचा प्रतिसाद मत्सराने भरलेला वाटला.


अवलिया's picture
ज्याची त्याची समज जाण वगैरे

ज्याची त्याची समज जाण वगैरे वगैरे... असो.


राजे's picture
हा हा हा ! जबरा मास्तर..

Laughing out loud

हा हा हा !

जबरा मास्तर.. कखुकग ची आठवण झाली wink


बिपिन कार्यकर्ते's picture
सब के साथ बातां: हा मास्तर पण

सब के साथ बातां: हा मास्तर पण अंमळ उतावीळच हां... जर्रा धीर नाही... तुटलं की नाही बटण? आणि वर परत हातात काहीच नाही. काय?

wink


सुहास's picture
सब के साथ बातां: >>.

सब के साथ बातां: >>.

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud


प्रभो's picture
जबहरा मास्तर...... लग्नानंतर

जबहरा मास्तर......

लग्नानंतर बटन तोडू म्हणणारा - प्रभो


चतुरंग's picture
कं लिवलंय, कं लिवलंय!

बटणं वाईच तुटाया लागलित मास्तर?
आन छोटं स्टूल बी हाय म्हंता, आरारारा काय खरं नाय बा!
हाफिसात निघता निघताच 'समुपदेशन' करून निघाचं! wink


श्रावण मोडक's picture
ठार

ठार बिघडेल आहे हा मास्तर!!! हास्य


राजे's picture
म्हणजे काय ? त्याना अनुभव

म्हणजे काय ?

त्याना अनुभव आहे....... बरोबर की नाही मास्तर wink


विनायक प्रभू's picture
ठार

चढेल सुद्धा


Nile's picture
कुठे, स्टुलावर का?

कुठे, स्टुलावर का? wink


-Nile

विनायक प्रभू's picture
अनेक

अनेक वस्तुमधील एक स्टुल


राजे's picture
ह्य वयात सटकला म्हणजे पाय

ह्य वयात thinking

सटकला म्हणजे पाय स्टुलावरुन कळेल Laughing out loud


विनायक प्रभू's picture
जेवण

असा कसा सटकेल?
जेवताना घास नाकात जात नाही राजे.


राजे's picture
सहमत. शेवटी तुम्ही अनुभवी !

सहमत.

शेवटी तुम्ही अनुभवी !


Nile's picture
अच्छा! म्हणजे बटण तुटण्याच्या

अच्छा! म्हणजे बटण तुटण्याच्या वेळी स्टुल, तसेच इतर गोष्टी वाटतं?

चला म्हणजे मास्तरांची 'ओपन्ड' अशी लेखमाला येणार तर. wink


-Nile