गाडीत तशी फारशी गर्दी नव्हती.
भांडूपला उतरायचे म्हणुन दरवाजातच उभा होता तो.
मे च्या उकाड्यावर उपाय.
गाडीने मुलुंड सोडले.
इतक्यात डब्याच्या पुढच्या दरवाजातुन एका डोनरची मान बगळ्यासारखी बाहेर आली.
तो लगेच आत आला.
वाचला.
पण त्याच्या समोरचा सावध नव्हता.
ऐसी मारो ना पिचकारी चे काही शिंतोडे शर्टावर उमटले.
*&^&**(#@$%^&.
रसिपियंटने डोनर चा उद्धार केला.
काय करणार?
चरफडत राहीला.
त्याचे चरफडणे बघुन त्याला राग आला.
एक वेळ वाटले जाउन डोनरच्या एक कानफटात मारावी.
पण नको.
कशाला दुसर्यांच्या भानगडीत पडावे.
त्याने आपले 'अस्मानी' आवरले.
तरीसुद्धा एक 'सुलेमानी' वळवळलाच.
त्याने मान बाहेर काढली आणि म्हणाला, "का रे बाबा थुकलास का ओकलास"?
बस्स. कुठेतरी ट्रिगर दाबला गेला.
रिसिपियंट ने दरवाजा सोडला.
पॅसेंजर्स ओलांडुन डोनरच्या दरवाजात पोचला.
खाड्..खाड्..खाड
डोनरचे कानफट रंगले.
किडा शांत झाला.
{प्रभु इष्टाईल.... लै}
प्रभु इष्टाईल....
लै दिवसानंतर वाचायला मिळालं मास्तर
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"