आता वेबहोस्टिंग करा आपल्या मीमराठीद्वारे...

0
0

आपल्या होस्टिंग.मीमराठी.नेट या सेवेद्वारे आता आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मी मराठीने डोमेन विक्री व वेबहोस्टिंग क्षेत्रात पदार्पण केलेले आहे. ही सेवा मीमराठी.नेट आणि वर्थ कम्युनिकेशन्स यांचा संयुक्त उपक्रम आहे. अश्या सर्व प्रकारच्या सुविधा एकत्रितरित्या पुरविणारी मीमराठी.नेट हे एकमेव संकेतस्थळ आहे.

या उपक्रमाअंतर्गत .in, .com, .net, .org, .co.in, .mobi, .info इत्यादी एकूण २९ प्रकारच्या डोमेन नेमची विक्री करण्यात येईल. याखेरीज लायनेक्स व विन्डोंज प्रकारचे होस्टिंग; गरजेनुसार १ जीबी, ५ जीबी, १० जीबी तसेच अमर्यादीत होस्टिंग स्पेस; त्यासाठी आवश्यक ती बॅडविडथ; १० इमेल आयडी; पीएचपी; मायएसक्युअल; वर्डप्रेस, जुमला, ड्रुपल, फोटोगॅलरी यासारखी २५ हुन अधिक वन क्लिक गो वेब अॅप्लिकेशन्स अश्या प्रकारचे सध्या उपलब्ध असलेले अद्ययावत तंत्रज्ञान व विविध अत्याधुनिक प्रणाली पुरवण्यात येतील. या उपक्रमाअंतर्गत SSL 256Bit सर्टिफिकेट्स, वेबसर्व्हर सर्टिफिकेट्स, ईमेल होस्टिंग इत्यादीं सेवा देखील देण्यात येतील. त्याखेरीज साईट चे डिझाईन / सेट-अप / वर्क अपडेशन इत्यादी कामेदेखील करण्यात येतील.

या सेवा सवलतीच्या दरात पुरविण्यात येणार असुन त्यांचे शुल्क ऑनलाईन तसेच ऑफलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येणार आहे, डोमेन च्या किमती प्रकारानूसार ९९ रु. पासून ४९९ रु. पर्यंत आहेत तर होस्टिंगसाठीचे कमाल शुल्क महिना २६५ रु आहे.

अधिक माहिती करता http://hosting.mimarathi.net संकेतस्थळास भेट द्यावी अथवा admin@mimarathi.net वर संपर्क साधावा किंवा +९१-७७९८४०९४९६ या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा.

{वाह वाह.. भले शाब्बास !!}

1

वाह वाह.. भले शाब्बास !!


*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!

माझा ब्लॉग - मन उधाण वार्‍याचे…

{लय भारी}

2

हेच हवे होते भाऊ.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

{नवीन उपक्रमास माझ्या सक्रिय}

3

नवीन उपक्रमास माझ्या सक्रिय शुभेच्छा. हास्य


बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

{मालकांचा प्रचंड विजय असो!!!}

4

मालकांचा प्रचंड विजय असो!!!

{याचीच वाट बघत होतो...}

5

धन्यवाद मालक...
या उपक्रमाचीच वाट बघत होतो....
थोड्या शन्का आहेत... व्य. नि. पाठवतो....

{अभिनंदन आणि शुभेच्छा !}

6

अभिनंदन आणि शुभेच्छा !


"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"

{उपक्रमास शुभेच्छा}

7

छान उपक्रम

भरपूर यश मिळो अशा मनापासून शुभेच्छा हास्य


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{राजै अभिनंदन...}

8

राजै अभिनंदन ..

{अभिनंदन आणि मनापासुन शुभेच्छा}

9

अभिनंदन आणि मनापासुन शुभेच्छा !


"मराठी माणसा जागा हो, मी "मराठीचा" धागा हो"

{शुभेछा }

10

हार्दिक शुभेछा.


- मोहन

{भले शाब्बास.... चला आता एक}

11

भले शाब्बास....

चला आता एक मराठी संकेतस्थळच काढावे म्हणतो...

{उत्तम सेवा ..........आणि दर}

12

उत्तम सेवा ..........आणि दर ही परवडतील असे आहेत...................................

{अभिनंदन. १० डोमेन बुक}

13

अभिनंदन. १० डोमेन बुक करण्याबाबतचा अन त्यातील सातांसाठी (छोटीका होईना) वेबस्पेसबाबत पेस्ताव व्यनी केला आहे.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

{मालक}

14

मालक तुमाला आमची डीग्री प्रदान करण्यात येनार आहे. आमचा सारखा पद्वीधारकाना सुधा हे जमत नाही ते तुमी करता.