अरेरे तुझे काय झाले हे जोश्या

0
0

हे आमचे मनाचे श्लोक. शेवटच्या कडव्यातल्या शेवटच्या वाक्याशी बायको सहमत आहे.

अरेरे तुझे काय झाले हे जोश्या,
खुला सांड होतास फसलास जोश्या.
कुर्‍हाडीवरी पाय मारोनी घेशी,
तरी दात वेंगाडुनी हसतोस जोश्या.

अशी बुद्धी तू टाकली का गहाण,
कपाळावरी मारुनी घे वहाण.
उपयोग त्याचा परी शुन्य जोश्या,
खुला सांड होतास फसलास जोश्या.

पाजी जगाला जो बुद्धीचे डोस,
करी देव पोपट त्याचाच खास.
स्वतःहून खड्ड्यात पडलास जोश्या,
खुला सांड होतास फसलास जोश्या.

सगे सोयरे मग्न पार्टीत खास,
मनी हासती ते तुझ्या धाडसास.
इथे वाट परतीची नसते रे जोश्या,
खुला सांड होतास फसलास जोश्या.

जरा आठवी तो दिवस तू भयाण,
जगाच्या समक्ष तुझे शीरकाण.
अजाच्या गळी माळ पडली रे जोश्या,
खुला सांड होतास फसलास जोश्या.

कशी घोडचूक ही केलीस छान,
स्वतः खाटीका हाती देतोस मान.
असा बुद्धीभेद तुझा होई जोश्या,
खुला सांड होतास फसलास जोश्या.

पुन्हा पारतंत्र्यात गेलास जोश्या,
विनाशर्त शरणागत झालास जोश्या,
तुझी लावली तू स्वतः वाट जोश्या,
कसा मूर्ख, बिंडोक आहेस जोश्या.

-------------------------------------------समाप्तच-------------------------------------------

{(विषय दिलेला नाही)}

1

Laughing out loud


Hope is a good thing...

{गेट वेल सून ....}

2

गेट वेल सून .... Big smile

Laughing out loud
Laughing out loud
Laughing out loud


*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!

माझा ब्लॉग - मन उधाण वार्‍याचे…

{अजून काय पाहिजे जोश्या? हँग}

3

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

अजून काय पाहिजे जोश्या? हँग ओव्हर उतरला का?

- पिंगू

{अरेरे}

4

वेदनेचं गाणं! जोश्या आम्ही फक्त सहानुभूती व्यक्त करू शकतो

(साठे - ए कुलकर्ण्या एक बिअर कमी सांग रे, जोश्या नाही येणार आता.
कुलकर्ण्या - कशाला, त्याच्या दु:खात सहभागी होण्यासाठी म्हणून आपणच घेऊ की ती. )

अवांतरः बघा मी म्हणत नव्हतो अनुभवातून आलेली कविता अधिक भिडते म्हणून. समस्त शब्दजुळार्‍यांनी नीट वाचून पहावी.

(खुला सांड) रमताराम


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{कुलकर्ण्या - कशाला, त्याच्या}

5

कुलकर्ण्या - कशाला, त्याच्या दु:खात सहभागी होण्यासाठी म्हणून आपणच घेऊ की ती.>>>

मी म्हणलं नव्हतं, म्हातारा पापात टाकणार आपल्याला. wink
बाकी जोश्या, आत्मचिंतन आवडलं....!


"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"

{हॅ हॅ हॅ}

6

समस्त कुलकर्ण्यांना आम्ही चांऽगलेच ओळखून आहोत.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{(विषय दिलेला नाही)}

7

Big smile Laughing out loud

{शेवटच्या कडव्याशी समस्त}

8

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud

शेवटच्या कडव्याशी समस्त स्त्री-वर्ग सहमत असण्याची दाट शक्यात आहे