भ्रष्टाचाराची पाळेमूळे
भ्रष्टाचाराची पाळेमूळे आपल्या देशात आपल्या संस्कृती इतकी खोल रुजली गेली आहेत असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे.गल्ली पासून दिल्ली पर्यंत पसरलेल्या या समाजव्यवस्थेतील किडीला ‘ चलता है ’ म्हणत आपण अधिकच खतपाणी घालतो.भ्रष्टाचार करणार्यांची ही अफाट बुध्दिमत्ता त्यांनी योग्य कामी वापरली तर भारत महासत्ताक होण्यास फार वेळ लागणार नाही. काही भ्रष्टाचाराचे किस्से मला दिसलेले आपणा समोर ठेवतोय .....कृपया हे वाचून ‘ चलता है ’ म्हणू नका.
भारत निर्माण
भारत सरकारची एक अभिनव योजना आहे भारत निर्माण .! टि.व्हि वर वृत्तपत्रात या योजनेच्या अनेक जाहीराती झळकतात.पाणीपुरवठा हा यातील एक मुख्य भाग. ज्या गावांना कमी पाणीपुरवठा होतो. टंचाईमुळे टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो, प्रदुषणामुळे पाणीपुरवठा खराब झालेली गावे अशा गावांना मुबलक पाणी मिळावे यासाठी आखलेली ही योजना. केन्द्र सरकारचा भरपूर पैसा असल्याने तो संपवण्याकडे राज्याचा कल असतो त्यामुळे नियमात नसलेल्या गावांचाही या योजनेत समावेश केला जातो. पुरेसे पाणी व अगोदरच एक पाणीपुरवठा योजना असतांनाही गावांसाठी दुसरी योजना ही घेतली जाते. योजनेसाठी अगाऊ निधी ग्रामपंचायत अथवा पाणीपुरवठा समीतीकडे जातो.हा पैसा खात्यातून काढला जातो, स्वत:साठी वापरला जातो आणि योजना अपूर्ण रहाते.या योजनेसाठी लोकसंख्या मुख्य अट आहे .गावाची सध्याची लोकसंख्या यात पुढील ३० वर्षाची लोकसंख्या गृहीत धरली जाते. माणशी २३६०/- रुपये या प्रमाणे योजनेचे अंदाजपत्रक तयार होते. एखाद्या गावाची लोकसंख्या १०० असल्यास १०० x २३६० =२३६०००/- रुपये एवढी योजनेची किंमत होते.
भ्रष्टाचाराचा किस्सा --
ही योजना राबविणार्या एका गावाची लोकसंख्या ३०० आहे. परंतु गावातील पुढारी ,ठेकेदार .सरकारी अधिकारी हुशार ! त्यांनी लोकसंख्या वाढविली शिवाय गावात पहाण्यासाठी दगडगोटे या शिवाय काहिही नसतांना गावात हजारो पर्यटक येतात असे दाखवून लोकसंख्या अजून वाढविली आणि योजनेची किंमत १ कोटी १२ लाख रुपये इतकी केली.जी योजना २०-२५ लाखात झाली असती तिला तब्बल १ कोटी १२ लाख रुपये खर्च दाखवला.सरकारी अधिकारी व नेते यांच्या संगनमताने योजनेला मंजूरी मिळाली.पण हे गौडबंगाल काही जागरूक नागरीक ,प्रसारमाध्यम यांच्या मुळे उजेडात आले .मित्रानो अशा अनेक प्रकारामूळे ही योजना बारगळत चाललेली आहे.केन्द्राचा पैसा वाया जात आहे .योजनेचे पैसे खात्यातून काढून संपले पण योजना पूर्ण नाही अशी अनेक प्रकरणे पोलिस ठाण्यात दाखल आहेत.या योजनेतून कोट्यावधी रुपये पाणीपुरवठ्यासाठी खर्च झाले पण आजही अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो .
भ्रष्टाचाराचे अजूनही काही किस्से गुलदस्त्यात......
बाप रे ! भयानक आहे हे सगळे
बाप रे !
भयानक आहे हे सगळे !
देशाची प्रगती का होत नाही त्याचे मुळ येथे आहे भ्रष्टाचार.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
‘ चलता है ’ असेच म्हणावेसे
‘ चलता है ’
असेच म्हणावेसे वाटते...
बाकी ह्याव्र उपाय काय???
-निखिल
तुम्ही ह्यावर काय उपाय केलात
तुम्ही ह्यावर काय उपाय केलात ?
हम्म. भयानक प्रकार आहे खरा...
हम्म. भयानक प्रकार आहे खरा...
च्या ऐवजी
असे वाक्य जास्त योग्य... भ्रष्टाचार सार्वत्रिक आहे देश काल सीमेचे बंधन नाही
भ्रष्टाचार सार्वत्रिक आहे देश
भ्रष्टाचार सार्वत्रिक आहे देश काल सीमेचे बंधन नाही
असेच वाटते
कुठले गाव ? किस्से लिहीत
कुठले गाव ?
किस्से लिहीत रहा,सुनील
जोपर्यंत आपल्यातली चिरीमिरी
जोपर्यंत आपल्यातली चिरीमिरी देऊन काम करून घेण्याची सवय जात नाही.. तोवर भ्रष्टाचाराला मरण नाही.. चवल्यापावल्यांच्या आचमनापासून ते करोडो रूपयांचा भ्रष्टाचार असाच चालू राहतोय...
सहमत आहे. ठोस अश्या योजनेची
सहमत आहे.
ठोस अश्या योजनेची कमतरता व समाजाची नैतिक जबाबदारी झटकण्याची वृती ह्यामुळे देखील भ्रष्टाचार फोफावत आहे.
काही संस्था थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत पण पुन्हा तेच योग्य दिश्या नसल्यामुळे त्याचा परिणाम दिसून येत नाही आहे अथवा होत नाही आहे.
जेव्हा दहशतवादी पथकाचा एक आधिकारी लाच घेताना सापडतो, एका सरकारी अधिकार्याच्या घरातून करोडो रुपये मिळतात अथवा मोठ मोठे नेते भ्रष्टाचारात अडकतात, सापडतात पण त्यानां योग्य अशी शिक्षा देण्याच्या पध्दतीचा अभाव देखील तेवढाच कारणीभूत आहे ह्या भ्रष्टाचाराला.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."