बुद्धाच्या डोक्यावर
गेल्या आठवड्यात पुण्याहून मुम्बईला येताना एक चित्रकार सहप्रवासी भेटले.
ते कोणाशीतरी फोनवर बोलत होते. बोलताना त्यानी पलीकडल्या माणसाला विचारले की गौतम बुद्धाच्या डोक्यावर जे दिसते ते त्यांचे केस आहेत( बुचडा बांधलेले) की डोक्यावरचा मुकुट आहे.
माझ्या मनात जे सहज आले ते म्हणजे बुद्धाच्या डोक्यावर जे आहे ते कुरळे केस आहेत.
त्या चित्रकारांचे म्हणणे की तो मुकूट नाही किंवा ते केस देखील नाहीत.
बुद्धा प्रमाणेच महावीराची मूर्तीदेखील त्या प्रमाणेच आहे. आणि महावीर आणी बुद्धा यांच्या कालावधीत फारसा फरक नाही.
त्या चित्रकाराचे म्हणणे की बुधाने सर्वसंगपरीत्याग केलेला होता. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर मुकूट असणे शक्य नाही. तसेच बौद्ध धर्माप्रमाणे भिक्षुंचे डोके पूर्णपणे भादरलेले असते.
त्यामुळे डोक्यावर केस असणे शक्य नाही.
तुम्हाला कय वाटते बुद्धाच्या डोक्यावर नक्की काय असेल?
त्या चित्रकारानी बुद्धाच्या डोक्यावर जे आहे त्या बद्दल विषद करून सांगितले.
उत्तर फारच समर्पक होते.
बुद्धाचे चित्र /पुतळे ज्याने सुरुवातीला केले त्याला अपेक्षीत असणारे प्रतीक आणि आपण त्याचा सध्या घेत असलेला अर्थ यात फारच तफावत आहे.
.jpg)
{चित्रकारांचे उत्तर..}
भगवान गौतम बुद्धाच्या मस्तकावर मुकुट की कुरळे केस? मला आजवर ते कुरळे केस आहेत असे वाटत होते.
दोन्ही नाही म्हणता तर चित्रकारांनी नेमके काय स्पष्टीकरण दिले ते जाणून घेण्याची उत्सुकता आहे. बाकी काही म्हणा, पत्थराच्या मूर्ती मधे भगवान बुध्दाच्या चेहर्या वर जे शांत भाव असतात ते कोरणार्या शिल्पकारांना सलाम करायलाच हवा !!
{>>मूर्ती मधे भगवान बुध्दाच्या}
>>मूर्ती मधे भगवान बुध्दाच्या चेहर्या वर जे शांत भाव असतात ते कोरणार्या शिल्पकारांना सलाम करायलाच हवा !!
+१
बाकी ते कुरळे केसच होते
संदर्भ शोधतो आहे, उगाच हाती संदर्भ नसताना, काहीतरी तर्क काढायचा व प्रतिसाद द्यायचा म्हणून दिला नव्हता..आज परत शोधतो. !
Hope is a good thing...
{उगाच गैरसमज का पसरविता}
कनिश्काच्या कालखदात त्या मुर्त्या तयार केल्या गेल्या आहेत. पुराव्याच्या आधारावर.
{त्यांनी कोणता गैरसमज व्/वा चांगला समज पसरविला ते सांगाल का}
सन्दीप नन्देश्वर साहेब,
पुन्हा एकदा प्रणाम.
विजुभाऊंनी प्रश्न विचारलेला आहे ...
त्यांनी कोणता गैरसमज व्/वा चांगला समज पसरविला ते सांगाल का ?
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{जो बाबासाहेब आणि बुद्धाच्या}
जो बाबासाहेब आणि बुद्धाच्या शिकवणीचा खरा उपासक/अनुयायी आहे, त्याने बुद्धाच्या डोक्यावर काय आहे?? यापेक्श्या बुद्धान्ची शिकवण काय आहे यावर अभ्यास करावा व पन्चशील आणि अष्टान्गिक मार्ग अनुसरन्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा...डोक्यावर काय आहे पेक्शा डोक्याच्या आत काय आहे हे अत्यन्त महत्वाचे आहे..
{पण मूळ प्रश्न }
सन्जय साहेब,
प्रणाम.
तुमच्या मुद्द्याचा गाभा (Central spirit) मान्य आहे.
भगवान बुद्धांचे तत्त्वज्ञान समजणे व आचरणात आणणे लोकांना जमले नसेलही ... आज मानवाची उत्क्रांती तेवढ्या प्रमाणावर कदाचित झालेली नसेलही व कदाचित विश्वातील जनतेस बुद्धांचे तत्त्वज्ञान पचवता आलेले नसेलही.
पण इथे प्रश्न कुतुहलापोटी आलेला आहे. तसेच विजुभाऊंनी दिलेला तर्क पूर्णपणे गैरवाजवी नाही.
तेव्हा त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा गैरलागु कसा ते ही लिहा.
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{बुद्धाना ज्ञान मिळाले होते.}
बुद्धाना ज्ञान मिळाले होते. त्यांची प्रज्ञ आनि ज्ञान चक्षू जागृत झाले होते.
बुद्धांचे मस्तकावरील सहस्त्राधार आज्ञाचक्र जागृत झाले होते.
तत्कालीन चित्रकाराने हजारो फुललेली फुले आणि डोक्यात असलेली प्रज्ञा यांचे प्रतीक दाखवले. आपण त्याला कुरळे केस समजतो.
बुद्धाच्या डोक्यावर काय आहे?? यापेक्श्या बुद्धान्ची शिकवण काय आहे यावर अभ्यास करावा
हा शिल्पकलेतील /चित्रकलेतील प्रतिकात्मतेचा अभ्यास आहे
बुद्धाची शिकवण काय आहे हे समजावून सांगाल का? माझा खरोखरीच अभ्यास नाहिय्ये.
पन्चशील आणि अष्टांगीक मार्ग म्हणजे काय? अष्टावक्राने जे सांगितले ते म्हणजे अष्टांग मार्ग काय?
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
{विजुभाऊंनी सांगितलेली ही}
विजुभाऊंनी सांगितलेली ही माहिती पुर्णपणे पटते. मला गुगलताना एक चित्र सापडले.

तसेही सर्वसाधारण माहितीप्रमाणे 'बुद्ध' हे परिपुर्ण ज्ञानाचे प्रतिक मानले जाते.
अवांतर : माणसाचा मेंदु पुर्णपणे प्रगत झाल्यावर त्याचे मस्तिष्क कसे दिसेल? हा विचार मनात आला. त्यावेळी एक जुने कॉमीक्स आठवले. 'महामानव' या कथेचा खलनायक महामानव याच्या मेंदुची पुर्ण वाढ झालेली असते. त्यामुळे त्याच्या मस्तकाचा आकारच बदललेला असतो. शास्त्रज्ञांनी त्याच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करुन त्यावर एक काचेचे कवच बसवलेले असते. कारण मेंदु पुर्णपणे विकसीत झाल्याने मस्तकावरील कवच (कवटीचा भाग) पुर्णपणे मेंदुत मिक्स होवून गेलेला असतो. या महामानवाचे डोके (मेंदुचे बाह्य स्वरुप) आणि भगवान बुद्धाचे मस्तक ( यावरची ती फुले किंवा वलये देखील मेंदुवर असलेल्या वलयांप्रमाणे, वळ्यांप्रमाणेच दिसतात) यात कुठेतरी किंचीत का होइना पण साम्य जाणवते. मग वर विजुभाऊ म्हणतात त्याप्रमाणे बुद्धाला संपुर्ण ज्ञानप्राप्ती झालेली असल्याने त्याच्या मस्तकावरील कुरळे केस हे मेंदुचे देखील प्रतिक असु शकेल.
महामानव
इथे महामानव या पात्राचे उदाहरण फक्त मुद्दा स्पष्ट करण्यासाठी वापरले आहे. भगवान बुद्धाशी त्याची तुलना करण्याचा मुर्ख विचार चुकूनही नाही.
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{प्रश्न}
धर्माप्रमाणे भिक्षुंचे डोके पूर्णपणे भादरलेले असते. त्यामुळे डोक्यावर केस असणे शक्य नाही.
यातील "धर्माप्रमाणे भिक्षुंचे डोके पूर्णपणे भादरलेले असते " हा भाग पूर्णसत्य आहे का ?
मी जालावर अनेक भिक्षुंचे फोटो पाहिले ... व त्यातील सर्वांचे डोके पूर्ण पणे केश-वपन केलेले नव्हते. काही जण असे ही होते ज्यांच्या डोक्यावर केस आहेत.
अर्थात हा परंपरांचा फरक असू शकतो. एक School of thought संपूर्ण पणे केशविरहित असेल तर दुसर्या मध्ये बारीक केस ठेवणे निषिद्ध नसेल.
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{अनुयायी आणि भिक्षू यांत फरक आहे }
बौद्ध धम्माचे अनुसरण करणारे अनुयायी आणि तथागत बुद्धांची शिकवण तंतोतंत अनुसरुन सन्यासी जीवन व्यतीत करणारे बौद्ध भिक्कू यांत मूलभूत फरक आहे
किमान मी तरी अशी उदाहरणे पाहिलेली नाहियेत.
असे फोटो उपलब्ध करुन दिलेत तर मलाही आवडेल बघायला गब्बरसिंगजी.
तथागत बुद्धांनी दिलेली शिकवण ज्या देशात जन्माला आली ती आपल्या देशातील किती जणांना कळाली? हा खरे तर कळीचा प्रश्न आहे.
उलटपक्षी सम्राट अशोकाने बुद्ध धम्माचा प्रसार केला त्याचा चीनसारख्या विशाल लोकसंख्येच्या देशात महाकाय वृक्ष झाला आहे.
तिबेट तर मौर्यकालापासून बुद्ध धम्माच्या प्रभावाखाली आहे.
आपल्या देशात राजकारण करण्याव्यतिरिक्त बुद्ध धम्माचा कधी योग्य वापर झाल्याचे आठवत नाही.
अपवाद केवळ बाबासाहेब आंबेडकर यांचा. आंबेडकरांनी जीवनात आधी बुद्ध धम्माची शिकवण आधी आचरणात आणली मग अंत्यसमयी बुद्ध धर्माचा (खरे तर धम्म) स्वीकार केला.
तथागतांनी बुद्ध धम्माची शिकवण दिली त्यावेळी त्यांना केवळ एक वेगळ्या धर्माची निर्मिती नक्कीच अपेक्षित नव्हती. त्यांना समाजोपयोगी एक वेगळी विचारधारा आणि एक वेगळी शिकवण अभिप्रेत होती.
असो तो वेगळा विषय आहे.
फोटू द्या हो गब्बरसिंग.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{फोटु}
http://www.google.com/imgres?imgurl=http://www.chinadaily.com.cn/photo/2...
http://www.google.com/imgres?imgurl=http://polizeros.com/wp-content/uplo...
http://www.google.com/imgres?imgurl=http://img.wikinut.com/img/ffp0988d6...
http://www.google.com/imgres?imgurl=http://www.videocameraschool.com/wp-...
बौद्ध धम्माचे अनुसरण करणारे अनुयायी आणि तथागत बुद्धांची शिकवण तंतोतंत अनुसरुन सन्यासी जीवन व्यतीत करणारे बौद्ध भिक्कू यांत मूलभूत फरक आहे
हे पटले. ही मान्य.
खालील २ वाक्ये -
आपल्या देशात राजकारण करण्याव्यतिरिक्त बुद्ध धम्माचा कधी योग्य वापर झाल्याचे आठवत नाही.
तथागत बुद्धांनी दिलेली शिकवण ज्या देशात जन्माला आली ती आपल्या देशातील किती जणांना कळाली
इथे मात्र असहमत.
माझ्या मते जर बुद्ध धम्माचा योग्य वापर हा व्यक्तींनी/नागरीकांनी करायचा आहे व ज्या नागरिकांना करावासा वाटतो ते करत असतीलही. तसेच योग्य वापर झाल्यास ते जनतेला कळण्यासाठी कोणती यंत्रणा आहे उपलब्ध ? योग्य वापर झाल्याचे निदान करण्यापूर्वी त्याचे निकष ठरवावे लागतील - किती वापर व कुठल्या बाबतीत झाला की त्याला योग्य म्हणायचे ते.
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{बरोबर आहे}
पण मला येथे सामाजिकदृष्ट्या असा अर्थ अभिप्रेत होता.
शेवटी कोणत्याही धर्माचा योग्य उपयोग वा वापर झाला का नाही याचे अनुभव व्यक्तीसापेक्षच असतात
व्यक्तीसापेक्ष अनुभवांचे मोजमाप करण्याची यंत्रणा तर नाहीये हे मात्र खरे.
फोटो पाहून असा अंदाज आहे की हे सर्व मुमुक्षू असावेत.
अभ्यास पूर्ण झाल्या नंतर कदाचित ते तथागतांसारखे वागतील.
फोटो पाहून मात्र माझी थोडीशी करम़णूक झाली. त्याबद्दल धन्यवाद. (वाईट अर्थाने नव्हे..चांगल्याच अर्थाने
)
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/