वाघोबा

0
0

काल रात्री टीव्ही वर "सेव्ह अवर टायगर" अशी काहीशी अ‍ॅड पाहिली तेव्हा पासून डोक्यात वाघोबाच होता... त्या जाहिरातीत नुसार फक्त १४११ वाघ उरलेत तुम्ही त्यांना वाचवू शकता असे काहीसे आवाहन होते. त्यात पुढे तो एअरसेल ह्या कंपनीने सुरू केलेले हे कँपेन आहे असे पण सांगितले... जाहिरातीत दाखवलेले वाघाचे पिलू मला आवडले.. तसे व्याघ्रदर्शन हा दुर्मिळच योग मानला जातो. म्हणजे पिंजऱ्यातले वाघ बघणे सोपे आहे हो. पण ह्या जंगलाच्या राजाला पाहायचे तर त्याच्याच जंगलात. पिंजऱ्यातले वाघाचे दर्शन अनेक वेळा अनेक प्राणी संग्रहालयातून घडत आलेले आहेच... त्यात आमच्या औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयातल्या पांढऱ्या वाघा पासून ते ओरिसा मधल्या नंदन कानन मधल्या खोट्या जंगल सफारी पर्यंत. नंदनकानन मध्ये एका मोठ्या भागाला तारांचे कुंपण घालून आत मध्ये वाघांना बंदिस्त केलेले आहे.. आणि ह्या भागाची बस मध्ये बसून सफर करून लुटुपुटुची जंगल सफारी अनुभवता येते. आता ह्याला लुटुपुटुची म्हणता येईल कारण पाच ते सहा वेगवेगळ्या वेळेस वाघ ह्या प्राण्याला जवळून पाहता आले आहे. अर्थात सगळे अनुभव बरेच जुने आहेत पण त्यातले काही आजही डोळ्या समोर आहेत.

अमरावतीला राहात असताना चिखलदऱ्याला जाणे वारंवार व्हायचे. चिखलदार हे परतवाड्या जवळचे हिलस्टेशन आणि मेळघाट टायगर प्रोजेक्टच्या जवळ आहेच. चिखलदऱ्याला जायला अमरावतीहून सकाळी निघायचे सुरवात भिमकुंड पासून करून शेवट सनसेट पाँईटला करायचा हा आमचा नेहमीचा कार्यक्रम. जर मुक्काम असेल तर मजा असायची. आमच्या ओळखीचा तिथला एक लोकल ड्रायव्हर होता त्याची खास ट्रॅक्स घेऊन तो आम्हाला जंगलात घेऊन जायचा. म्हणजे अगदी टायगर रिझर्व मध्ये नाही पण आजूबाजूला. आश्चर्य म्हणजे ह्या ड्रायव्हरला ऐकू कमी यायचे पण चिखलदरा घाटात गावात त्याचा गाडी चालवण्यात कुणीच हात धरू शकत नसे. असेच कधी तरी एकदिवसीय सहलीला अमरावतीला गेलो होतो. सोबत दर वेळेस गावाहून येणारे नवीन पाहुणे असत. तर असेच एकदा कमांडर किंवा ट्रॅक्स ज्याला फक्त साइडने ताडपत्री असायचे दार नाही अशी गाडी घेऊन प्रवास चालू होता... लहान असताना नेहमीचा हट्ट करून ड्रायव्हर शेजारची समोरची जागा मी पटकावली होतीच. परतीचा प्रवास चालू होता, गाडीत गाणी अंताक्षरी वैगेरे चालू होते... ड्रायव्हर ने जोरात ब्रेक दाबला... "साहेब वाघ" हे त्याचे उच्चार कानावर पडायच्या आधीच वाघ उजव्या बाजूला असलेल्या डोंगरावरून रस्ता ओलांडत होता. त्या लाइटच्या उजेडात पहिल्यांदाच बघितलेल्या मुक्त वाघाचे रूप म्हणजे काय वर्णावे.. आणि गाडी आणि माणसाची चाहूल लागूनही तो तसाच रस्त्याचा कडेला उभा होता. एकक्षण असाच गेला सगळे शांत त्याने आमच्या कडे वळून पाहिले आणि तो तसाच पुढे दरीत उतरून निघून गेला. हेच वाघाचे पहिले झालेले दर्शन.

ह्या चिखलदऱ्या पासून साधारण १५-२० किमी अंतरावर थोडे जंगलात उतरून गेल्यावर सेमाडोह नावचे गाव लागते. ह्या गावापासूनच मेळघाट व्याघ्रप्रकल्पात बस द्वारे जंगल सफारी करवून आणण्यात येते, साधारण दहा वर्षापूर्वी पर्यंत येथून चार वाजता एक आणि पाच वाजता एक अश्या दोन बसेस जंगल सफारी साठी सोडण्यात येते, इथे माझ्या आठवणी नुसार जंगलात सरकारी रिसॉर्ट सारखे काही तरी आहे. त्या रिसॉर्टच्या आवारातूनच बसेस सुटतात. तसे हे रिसोर्ट सुद्धा एका नदीच्या किनारी आहे असे काहीसे आठवते. ही बसची जंगल सफारी मी आठ ते दहा वेळा केली असेल पण त्या सफरीत मला एकदाही वाघाचे दर्शन झालेले नाही. पण असेच एकदा आम्ही दुपारी साधारण तीन वाजता इथे पोहचलो तिथल्या फॉरेस्ट ऑफिसरने माहिती दिल्या प्रमाणे चारची बस आधी पासूनच फुल्ल होती मग काय करायचे. त्यादिवशी जादा बस सोडणे शक्य नव्हते कारण एका गावकऱ्यावर वाघाने हल्ला चढवला होता व त्या गावकऱ्यास हॉस्पिटलात घेऊन जाण्यासाठी एक बस वापरण्यात आलेली होती. आता पाच च्या बस चे बुकिंग करून पुढे काय करायचे तर कोलकास रेस्टहाऊसला कडे जायचे ठरवले. तसे ह्या कोलकास गेस्टहाउन हे सेमाडोह पासून जवळच पण जंगलात एका शांत जागी सिपना नदीच्या किनारी आहे. इथून नदीचा व्हयू खूपच छान आहे, आणि नदीत पाणी प्यायला येणारे वाघ ह्या जागेहून बघता येतात. ह्या गेस्टहाउस मध्ये इंदिरा गांधी सुद्धा थांबल्या होत्या हि माहिती इथल्याचं गार्डने दिलेली आहे. हा तर आम्हाला सेमाडोह इथून जंगल सफारी मध्ये जागा न मिळाल्यामुळे कोलकास कडे जाताना रस्त्यात एका डोंगरावर गव्याचा कळप लागला... आम्ही गाडी थांबवून साधारणता त्या कळपापासून सेफ अंतरावर राहून पाहत होतोच. जिथे गवा असतात त्याचा आसपास नेहमी वाघ असू शकतो अशी माहिती स्थानिकांनी आम्हाला दिलेली होती. नेहमी प्रमाणे वाघाचे दर्शन न झाल्यामुळे पुढे जाण्यासाठी आम्ही निघालो दोन वळणे पुढे गेलो तोच काहीतरी रस्त्यावर असल्याची जाणीव झाली. परत एकदा रस्त्यावर दर्शन देणारा तो एक वाघ होता. साधारण पाने रो वाघ तरून असावा... गाडीची चाहूल लागताच वाघाने पटकन दरी कडे धाव घेतली. हे सगळे घडले असेल साधारण अर्धा मिनिटभरता. पण ते दर्शनही सुखावणारे होते. सेमाडोह ला परत आल्या आल्या आम्ही त्या फॉरेस्ट ऑफिसरचे आभार मानले.

आज पर्यंत व्याघ्रदर्शनाचा सगळ्यात चांगला आलेला अनुभव हा कान्हा नॅशनल पार्क (मध्य प्रदेश) मधला. आम्ही ज्यावेळेस गेलो होतो तेव्हाच ह्या टायगर प्रोजेक्ट मधल्या वाघांची संख्या १००+ होती. इथे जाऊन व्याघ्र दर्शन न घेता परत येणे म्हणजे दुर्दैवच. ह्या जंगलात तिथेच कुठे तरी एक म्युझियम आहे. सफारीला जाण्याआधी ह्या म्युझियम ला भेट दिली होती. त्यात एक आवाजासहित वाघाच्या शिकारीचे मॉडेल होते. अतिशय व्यवस्थित रित्या वाघाच्या शिकारीच्या वेळेस कसे बदल घडतात हे दाखवून दिलेले होते. तर ह्या जंगलात आमची सफर झाली ते एका ओपन रुफ जिप्सी मधून. जाळी नाही काही नाही तसेच तुम्ही जंगलाचा आनंद घेऊ शकता. जंगलातून जाणारी फक्त एक जीपवाट. आमच्या सफारीत आम्हाला बिबट्याचे पिले आधी दिसले होते पण बिबट्या किंवा वाघाचे दर्शन नव्हतेच. त्यातच समोरून येणाऱ्या जीपच्या ड्रायव्हरने आमच्या ड्रायव्हरला ह्या भागात वाघ दिसल्याची बातमी सांगितली. खरे तर त्या जीपच्या मागे मागे वाघ पाच दहा मिनिटे जीप वाटेवरून चालला असे काहीसे त्या जीप मधल्या लोकांनी सांगितले. आमची तर सफारी संपत आलेली पण आमच्या जीप ड्रायव्हरने आम्हाला वाघ दाखवायचे ठरवलेलेच होते. तडक जिप्सी वाघ दिसलेल्या भागा कडे वळवली. साधारणता एका जागी आल्यानंतर त्याने सगळ्यांना शांत राहिला सांगितले आणि उभे राहून तो इकडे तिकडे पाहू लागला. उजव्या बाजूला एक काळविटाचा कळप दिसत होता. त्यामुळे वाघ तिकडेच असण्याची शक्यता होती. सगळी कडे एक वेगळ्याच प्रकारची शांतता होती. अगदी त्या मॉडेल मध्ये दाखवल्या प्रमाणे माकडे झाडावर चढून एक वेगळाच आवाज काढून इतर प्राण्यांना सावध करत होती. आणि त्या काळविटाच्या कळपा मध्ये तर हलकल्लोळ माजला होता... कोण कुठे पळतंय कळत नव्हते. हे सगळे घडत होते ते आमच्या पासून १०० फुटावर. अगदी कातरवेळ का काय तसे वातावरण.. त्यातच गवतामागून काही तरी हालचाल जाणवली.. काळविटाचा कळप आधीच पांगायला लागला होता.. आणि अचानक त्याने मागे राहिलेल्या काळविटावर झडप मारली. आजही तो सीन डोळ्यापुढे घडला असेच वाटते. काही क्षणाचा रोमांच पण वाघाची शिकार अनुभवायला मिळाली. त्यानंतर बराच वेळ आम्ही तिथेच थांबलो गवतातून तो बाहेर पडेल म्हणून. अगदी काळविटाचा कळप परत त्या जागी आला जणू पंचनामा करण्यासाठीच. पण तो काही दिसला नाही. शेवटी वाघाच्या शिकारीचा अनुभव घेऊन आम्ही परतलो.

जाता जाता वाघाला वाचवणे गरजेचे आहे हे पटते पण त्यासाठी कोणता मार्ग योग्य ते कळत नाही. सुरवातीला लिहिलेल्या प्रोजेक्ट बद्दल अधिक माहिती इथे मिळेल. पण ह्यात वाघांची भारतातील संख्या १४११ सांगण्यात आलेली आहे. पण त्यासाठी जो माहितीचा स्रोत म्हणून देण्यात आला आहे.

ह्यानुसार भारतात २००० साली वाघांची संख्या ३६४२ होती. जर १० वर्ष ती अर्ध्यावर आली असेल तर व्याघ्र प्रकल्पांचा उपयोग काय??? ह्यावर त्या प्रोजेक्ट वाल्यांकडून अधिक माहिती मागवली आहे. पण ह्या प्राण्याला माझ्या पुढच्या पिंढ्यांनाही।यांनाही जंगलात पाहता यावे ही इच्छा आहेच.

जबरा ..

ती जाहिरात पाहिल्यापासून असचं काहीसं मनात येत होतं रे ....
खूप छान वर्णन ... अगदी व्याघ्रदर्शन घडवलस !!!
सिंह पाहिलाय तो पण सांगलीच्या प्रतापसिंह उद्यानात .. पिंजर्‍यात ... अजुन तरी वाघोबा नाही पाहिला Sad पण वाघोबाची मावशी तरी नेहमीच दर्शन देते Big smile
बघुया व्याघ्रदर्शन कधी घडतं ते ....
अवांतर :- सिंह किती राहिले आहेत ?

सिंह पाहिलाय तो पण सांगलीच्या

सिंह पाहिलाय तो पण सांगलीच्या प्रतापसिंह उद्यानात ..

अरे पण ते बिचारे पोट खपाटीला गेलेले वाघ-सिंह पाहताना कीव येते.. सिंह फक्त प्रतापसिंहाच्या नावातच शिल्लक राहिलाय..
आता तिथे जाते ते फक्त तिथली भेळ खायला.. इथल्या मुंबईच्या भेळेला तिथल्या चिंचेचे पाणी नि चटकदार मिरची घातलेल्या भेळेची चव नाही!!!!

अरे पण ते बिचारे पोट खपाटीला

अरे पण ते बिचारे पोट खपाटीला गेलेले वाघ-सिंह पाहताना कीव येते

तुम्हाला कसं कळलं की त्यांचं पोट खपाटीला गेलं आहे ते? सिंहकटी हा शब्द महित आहे का?

उग्गाच्च क्कायप्पण ब्बोलू न्नका...

कसली जळ्ळी मेली सिंहकटी???

कसली जळ्ळी मेली सिंहकटी??? अहो त्या बिचार्‍यांच्या बरगड्यान् बरगड्या दिसतात.. सिंहकटी असलेली सिंहिण रूबाबदार असते, तिच्या नजरेत तेज असते.. अशी उपाशीपोटी विझलेली नजर नसते.. हे प्राणीसंग्रहालय सांगली मनपाच्या अगदी कुशीत आहे पण त्याची कुणी काळजी घेते असं कधीच वाटत नाही...

०१. सिंहकटी फक्त सिंहिणीला

०१. सिंहकटी फक्त सिंहिणीला असते हे कुणी सांगितले तुम्हाला?
०२. बरगड्या दिसत होत्या कारण समस्त स्त्रीजातीला असते तसे डाएटिंगचे खुळ त्या सिंहिणीला नसेल हे कशावरून?
०३. नजरेत तेज नव्हते हे कदाचित तुमच्या नजरेवर चष्मा नसल्याने वाटले असेल...

बाय द वे... सिंहांच्यात पण सिंह जास्त रूबाबदार असतात.

०१. सिंहकटी फक्त सिंहिणीला

०१. सिंहकटी फक्त सिंहिणीला असते हे कुणी सांगितले तुम्हाला?

हम्म... तरी सांगत होतो वाळवंटात मृगजळापासुन सावध रहा.

कोल्ह्याला द्राक्षं आंबट.

कोल्ह्याला द्राक्षं आंबट.

मोठे व्हा ....

Big smile मोठे व्हा ....

असो

असो

अपेक्षित... मुद्दे संपले

अपेक्षित... मुद्दे संपले ना...

तुमचा व्याघ्र भेटीचा अनुभव

तुमचा व्याघ्र भेटीचा अनुभव आठवला... हास्य

छान. छान. चर्चेला वेगळे फाटे

छान. छान. चर्चेला वेगळे फाटे फोडू नका.

अजिबात नाही.... अवांतर नको

अजिबात नाही.... अवांतर नको म्हणुन थांबलो... बाकी चर्चा जीमेल्ला करु Big smile

अवांतरबंदी?

अवांतरबंदी?

अहो संग्राम.. प्रतापसिंह

अहो संग्राम.. प्रतापसिंह उद्यानातल्या शिव्ह-शिव्हिणींचे फोटू आणून दाखवा हो बिकाकाकांना!!!

प्रतापसिंह उद्यानातल्या

प्रतापसिंह उद्यानातल्या शिव्ह-शिव्हिणींचे फोटू आणून दाखवा हो बिकाकाकांना

आता प्रतापसिंह उद्यान फक्त नावालाच आहे.. ते कधी बीओटी करून विकायला मिळेल याचीच वाटच सांगली-मिरजेचे राजकारणी पाहतायत म्हणे.. पण काहीही म्हणा प्रतापसिंह उद्यान आणि सांगली भेळ म्हण्जे मजा होती आम्ही लहान असताना..

तेच म्हणलं, मध्ये एकदा

तेच म्हणलं, मध्ये एकदा दुर्घट्ना (सिंहाने का वाघाने कर्मचार्‍यावर हल्ला केला होता?) झाल्यांनतर तिथे आता वाघ सिंह नाहीत. लहान असताना लै वेळा जायतो तिथे!

पण मकी म्हणते तसंच सिंह अगदीच काटकुळे होते, नंतर एकदा दक्षिणेत सफारीवर गेलो होतो तेव्हा ५ फुटावरन बघीतले, मस्त होते तरुण सिंह!



-Nile

हो ना ..

आता प्रतापसिंह उद्यानात सिंह नाहीत Sad

खुलाश्याबद्दल धन्यवाद संग्राम

खुलाश्याबद्दल धन्यवाद संग्राम सिंह



-निखिल

कटी=कंबर! ती पोटं खपाटीला

कटी=कंबर!

ती पोटं खपाटीला गेलीयेत असं म्हणाली ना..की कंबर?

कंबर खपाटीला गेल्यावर शिंव्ह फेंगडा नाय चालनार काय?

कंदी पाह्यलं नाय.. बगावं तवा

कंदी पाह्यलं नाय.. बगावं तवा निस्ती बसून असतेत ती...

वो... तुमी ह्यातनं भाईत

वो... तुमी ह्यातनं भाईत र्‍हावा...

आनि... सिंहाची कंबार आनि प्वॉट येकच आस्तं.

!

असो!
इथे माझ्यातर्फे फार विषयांतर नको म्हणुन सदर प्रतिसाद खरडफळ्यावर घेऊन जात आहे. wink

फार विषयांतर नको म्हणुन सदर

फार विषयांतर नको म्हणुन सदर प्रतिसाद खरडफळ्यावर घेऊन जात आहे.
धन्यवाद धमालराव



-निखिल

सही

वाघ हा प्राणी आपल्याला लै आवडतो. काय ते रुप, खल्लास!!!

दूरदर्शनच्या जमान्यात, "प्रोजेक्ट टायगर" नावाची एक सिरीयल होती, नसीरुद्दीन शहा संचालन करायचा. वेगवेगळ्या वाघांकरता संरक्षीत अभयारण्यातील माहिती, व्याघ्रदर्शन फार मजा यायची बघायला. ह्या लेखावरुन आठवले.

एक अवांतर माहिती : हे वर्ष

एक अवांतर माहिती :

हे वर्ष "चिनी कँलेडरात" खाकरुन "वाघाचे वर्ष" म्हणुन ओळखले जाणार आहे.
ज्या प्राण्याचे वर्ष असते त्याची काहितरी खुण बाळगण्याची चिनी नागरिकात श्रद्धा आहे, म्हणुन ह्या निमित्ताने ह्यावर्षी वाघनखे आणि व्याघ्रचर्म ह्यासाठी किती वाघ बळी पडणार अशी चिंता "डब्यु डब्यु एफ" ला आहे अशी बातमी वाचली होती काही दिवसापुर्वी.
दुवा देतोच लवकरच

वाघ..

हा निसर्गाच्या जैविक उतरंडीच्या अत्युच्च स्थानी असलेला प्राणी. तो जेव्हा धोक्यात येतो तेव्हा सगळी जैविक उतरंड धोक्यात आलेली असते. अन हे होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे माणसांची वाढती संख्या आणी हाव. रणथंबोरच्या परिसरात फॅमिली प्लॅनिंगचा प्रसार याच कारणाने जोरात सुरु आहे असे ऐकतो.



---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

वाघाला वाचवणे म्हणजे वाघ

वाघाला वाचवणे म्हणजे वाघ असलेल्या भागाच्या जवळ विकासाच्या नावाखाली आदिवासींना हाकलणे आणि तिथे हाटिल काढणे असा कार्यक्रम सरकारचा आहे की काय अशी शंका येते.

हज्जारदा सहमत. मग असेच वनवासी

हज्जारदा सहमत. मग असेच वनवासी (आदिवासी हा शब्द मुद्दाम लिहीला नाहीये) नक्शलवादी किंवा माओवादी होतात.



-पुण्याचे पेशवे

सही रे! वाघानं केलेली शिकार

सही रे!

वाघानं केलेली शिकार अशी समोर पहाणं म्हणजे काय नशीब असतं रे! मस्तच.
बाकी, हल्लीच्या काळात नुसता वाघच पहायला मिळणं तेही अभयारण्यातसुध्दा हा देखील मोठ्या नशीबाचा भाग झालाय.

तु म्हणतोस तसं ठरवुन जनावरांचं दर्शन घडवुन आणणं हा अनुभव पुर्वी बोरिवलीच्या नॅशनल पार्कात घेतलाय Lion Safari मध्ये.

बाकी, त्या जाहिरातीतलं ते वाघाचं पिल्लु मलाही खुप आवडतं. पाहिल्यापाहिल्या त्याला उचलुन घरी घेऊन यावंसं वाटतं. हास्य

आणि अभयारण्यं, तिथल्या 'व्यवस्था', सरकारी अधिकार्‍यांची 'आस्था' आणि वाघांची घटती संख्या ह्याबद्दल काय बोलावं? बर्‍याचदा असं ऐकुन आहे की कुंपणच शेत खातं!

बाकी, त्या जाहिरातीतलं ते

बाकी, त्या जाहिरातीतलं ते वाघाचं पिल्लु मलाही खुप आवडतं. पाहिल्यापाहिल्या त्याला उचलुन घरी घेऊन यावंसं वाटतं.

तथास्तु. इन्शाल्लाह, जल्द-अज-जल्द.

wink

आमेऽन!

आमेऽन!

वाघानं केलेली शिकार अशी समोर

वाघानं केलेली शिकार अशी समोर पहाणं म्हणजे खरंच नशीब असतं.. बोरीवलीतल्या नॅशनल पार्कातली लायन-सफारी मी ही अनुभवलीय.. तिथे तिकिट काऊंटरलाच लिहिलेय..

"सफारीत वाघ-सिंह पहायाला मिळतीलच याची गॅरंटी नाही.. त्यांची इच्छा.. तुमचे नशीब!!!!" आम्ही सगळ्याजणी हे वाक्य वाचून मस्त खिदळलो होतो.. नि तो तिकिट देणारा आमच्याकडे अर्थातच रागारागाने पाहात होता.. पण खरंच त्यांची इच्छा म्हणा अथवा आमचे नशीब.. पण त्या सफारीत भरपूर वाघ-सिंह पाहिले... एक तर अगदी गाडीच्या जवळ येऊन गुरगुरत होता... तेव्हा वाटलं की नशीब, दारे-खिडक्यांना जाळ्या आहेत... बाकी.. ती जाहिरात माझीही आवडती आहे.. नि ते बछडं तर एकदम क्यूट्च आहे!!! :)

वाघ नाही.. पण एकदा

वाघ नाही.. पण एकदा दाजीपूरच्या गवा अभयाण्यात गेलो होतो ट्रेकिंगला... आयुष्यात केलेला तो एकमेव ट्रेक!!! मस्त टाईमपास करत तो भला मोठा डोंगर चढून गेलो... नि वनखात्याने लिहिलेल्या सूचनेनुसार बायसन टॉवर वर गवे यायच्या अपेक्षित वेळेवर जाऊन बसलो... सगळ्या मुलीच होतो.. पण तरी गवा दिसेल या आशेने बडबडणारी तोंडंही बंद केली होती.. पण कुठलं काय... कदाचित आमच्या येण्याचा बहुधा आधीच गवगवा(सौजन्यः कोके) झाला असल्याने एकही मेला तिकडे फिरकला नाही.. Sad

हांगाअशी... याला म्हणतात

हांगाअशी... याला म्हणतात रेप्युटेशन.... Big smile

निखिल छान लिहिले आहे...

निखिल छान लिहिले आहे... आवडले. वाघ खूप आवडतो. कधी तरी तुला दिसला तसा दिसावा अशी खूप इच्छा आहे.

निखिल भौ लेख आवडला.जाता

निखिल भौ लेख आवडला.

जाता जाता : अरे नेटावर कुठे त्या अ‍ॅडची लिंक असेल तर टाका रे कुणी तरी

आवांतर : वर सिंहांचा ही उल्लेख आला आहे . तर दोघांत जास्त बलवान कोण वाघ कि शिंव्ह ? तुनळीवर काही इडियो पाहीलेत त्यात सायबेरियन आनी बंगालचा ढाण्या वाघ वरचढ ठरला.



*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

वाघानं केलेली शिकार अशी समोर

वाघानं केलेली शिकार अशी समोर पहाणं म्हणजे खरंच नशीब असतं..

मीही वाघ सिंह पाहिले हैद्राबाद आणी नॅशनल पार्क च्या सफारीत...पण त्यात तो ओपन जिप्सीचा काय अनुभव नाय बॉ....

लेख आवडला...

+१

लेख आवडला .
असेच म्हणतो.

वाघाचे / जंगलाचे आकर्षण मला

वाघाचे / जंगलाचे आकर्षण मला लहानपणापासून जरा जास्तच आहे...

व माझ्या नशीबाने म्हणा मला ह्या रुबाबदार प्राण्याचे दर्शन खुप वेळा झाले..

कधी तादुळवाडीत तर कधी जिम कॉर्बोट च्या जंगलात तर कधी दाजीपुरला व आता आता मागेच बेंगलोर ला प्राणी संग्रहालयात.

त्यावर असे येथे लिहीत नाही एक लेखच लिहतो... wink

बाकी निख्या लेख उत्तमच रे.

बाकी वाघासारख्या लुप्तप्राय विषयावर तु लिहलेस हे पाहून आनंद झाला.



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

वा!

मस्त लेख. वाघाची शिकार प्रत्यक्ष पहायला मिळाली म्हणजे नशीब खरंच जोरावर असलं पाहिजे.

हॅ हॅ हॅ शिकार प्रत्यक्ष

हॅ हॅ हॅ
शिकार प्रत्यक्ष पहायला मिळाली
पुरावा???

हो ना तेव्हा कॅमेरा असता

हास्य
हो ना तेव्हा कॅमेरा असता माझ्याकडे तर छान फोटो घेता आले असते



-निखिल

एकदम मस्त लेख निखील

एकदम मस्त लेख निखील ....

आपल्या गौताळ्याला एकदा वाघ बघीतला आहे ...अर्थात वाघाने मला बघीतले नाही हे माझे नशीब

सहमत आहे. पुरावा ???? पण

सहमत आहे.

पुरावा ????

पण कोणाला wink



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

निखिल, चांगलं लिहीलं आहेस. मी

निखिल, चांगलं लिहीलं आहेस. मी वाघाला बघायला कधी बाहेर जाणार हा प्रश्न आता मलाच पडला आहे.

मस्त शेवटचा अनुभव तर खासच.

मस्त शेवटचा अनुभव तर खासच. इकडे इंदूरच्या उद्यानात तर 'शेळी' झालेले वाघ बघायला मिळतात. त्यांच्या नजरा पाहूनच त्यांची दया येते. बाकी जंगलात प्रत्यक्ष वाघ बघायचाय. बघूया कधी योग येतो तो.

दुवा आताच ही बातमी वाचली

दुवा आताच ही बातमी वाचली !

खरोखर आनंदाची बातमी... सरकार कमीत कमी काही पाऊले तरी उचलत आहेच ह्या कामासाठी.



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."