इतरांनी बडेजाव करू नये हे तुम्ही का सांगताय ?

0
0

टाईम्स मधील ही बातमी -

http://timesofindia.indiatimes.com/india/Its-sad-Mukesh-Ambani-lives-in-...

सामनातली ही बातमी.

http://www.saamana.com/2011/May/23/Link/Main2.htm

देशात आपल्या सभोवताली दारिद्र्याचे साम्राज्य पसरलेले असताना एखाद्याला ऐश्‍वर्याचा बडेजाव करण्याची हौस कशी सुटते ?

काय सांगता काय ? (तुमच्या भाषण स्वातंत्र्याचा मान राखूनच बोलतो.) बडेजाव केला की खर्च होतो ना? की बडेजाव फुकट केला जातो ? तो वस्तू व/वा सेवा खरेदी करण्यातच होतो ना ? त्या वस्तू/सेवा ज्या व्यक्तीकडून विकत घेतल्या जातात तो उद्योजक/विक्रेता असतो. त्याच्याकडे कामाला कर्मचारी असतात. त्यांना पगार मिळतो - उत्पादन/वितरण केल्याबद्दल. ते कर्मचारी पगार खर्च करतात ... तो कुठे जातो ...कर्मचारी बस्तू/सेवा विकत घेतात ... दुसर्‍या उद्योजका/विक्रेत्याकडूनच ना ? तो त्याचा कर्मचार्‍यास पगार देतो की नाही ? हे चक्र चालू होते की नाही ? त्यातून गरीबी दूर होते की नाही ?

असे आहे ऍन्टीला -

२७ मजली टॉवर - क्षेत्रफळ ५ हजार चौ. फूट - टेरेसवर हेलिपॅड
१६८ गाड्यांचे पार्किंग - दरमहा ५ लाख लिटर पाण्याचा वापर - दरमहा
७२ लाखांचे विजबील

ती बिल्डिंग जी बांधली ती आकाशातून पडली का ? की गवंड्यांनी बांधली ? गवंड्यांना रोजगार मिळाला की नाही ? ती बांधणार्‍या इन्जनेरास पगार मिळाला की त्याच्या कडून फुकट काम करून/राबवून घेतले गेले ? प्लंबर च्या रोजगाराचे काय ? त्याला पगार मिळालाच ना ? इलेक्ट्रेशियन च्या पगाराचे काय ? त्याला मिळालाच ना ? मग अंबानी बडेजाव करत असतील तर ते चांगलेच आहे की ....
--------
७२ लाखांचे विजबील ? अहो ते भरले की नाही हा प्रश्न उचित. इथपर्यंत ठीक आहे. पण एवढी वीज का वापरली हा प्रश्न विचारायचा अधिकार परमेश्वरासही नाही ?
--------
"दरमहा ५ लाख लिटर पाण्याचा वापर" - पुन्हा तेच ... पाणी बिल वेळच्यावेळी व संपूर्ण भरले की नाही हा उचित प्रश्न आहे. एवढे पाणी का वापरले हे विचारण्याचा अधिकार संसद, विधिमंडळ, महापालिका, न्यायपालिका, सरकार, प्रेस व परमेश्वर यापैकी कोणासही नाही.

मध्यंतरी मनमोहन सिंग यांनी ही असेच बेअक्कल विधान केले होते. श्रीमंतांनी प्रदर्शन मांडू नये ... म्हणे त्यामुळे गरीबीचा अपमान होतो वगैरे बकवास.

श्रीमंतांच्या कृतींवर एवढा आक्षेप का असतो ? बडेजाव करणारी व्यक्ती जर चोरी करून्/लुबाडणूक करून/फसवणूक करून बडेजाव करेल तर ते चूक. पण इतरांनी बडेजाव करू नये हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ?

आता रतन टाटांचे घुमजाव : म्हणे माझे विधान आऊट ऑफ कंटेक्स्ट छापले गेले.
कोणत्याही कंटेक्स्ट मधे तुमचे विधान बकवासयुक्तच होते. उगीचच श्रीमंतांना गिल्टी कोंप्लेक्स देण्यात तुम्हाला काय धन्यता वाटते ?

आता तुम्ही म्हणाल रतन टाटांनी तरी आलिशान गाड्यांत का फिरावे ? नरीमन पॉईंट वरच्या फ्लॅट मधे का रहावे ? तर त्यास माझे उत्तर एकच - हा असा बकवास कोणीही केला तरी तो चूकच. माझी लाईफस्टाईल कशी असावी हे ठरवण्याचा अधिकार माझ्याशिवाय कोणालाच नाही (जोपर्यंत त्याचा दुसर्‍याला डायरेक्ट त्रास होत नाही तो पर्यंत)

-------------------------

शेवटी: - श्रीमंतीचे प्रदर्शन हे अनिष्ट नाहीच. परमेश्वरा या देशातील श्रीमंतांना प्रचंड बडेजाव करण्याची बुद्धी दे रे.

{काही मुद्दे पटले नाहीत..}

1

काही मुद्दे पटले नाहीत.. अधिकाराचा प्रशनच येत नाहिये.. चर्चा नैतीकतेवरून चाल्लीये असं वाटतं.. हक्क, अधिकार यावर नाही..

विज पाणी हे नैसर्गीक स्त्रोत असून, ते जपून वापरायला हवेत असा मुद्दा असावा बहुधा..

{>विज पाणी हे नैसर्गीक स्त्रोत}

2

>विज पाणी हे नैसर्गीक स्त्रोत असून, ते जपून वापरायला हवेत असा मुद्दा असावा बहुधा..

+ १


Hope is a good thing...

{नैतिकता... ?}

3

इतरांनी बडेजाव करू नये हे सांगणे उच्च नैतिकता दर्शवते असे या लोकांना म्हणायचे आहे की काय ?
तसे असल्यास नैतिकतेच्या कोणत्या तत्त्वाचे पालन / उल्लंघन बद्दल चर्चा चालु आहे या मंडळींची ?
(नैतिकता ही लिखीतच असावी असे नाही. पण ज्याच्याकडून पालनाची अपेक्षा आहे त्याला नैतीकता माहीत तरी असावी ही रास्त अपेक्षा)

--------
अगदी केनेशियन अर्थशास्त्री (उदा. मनमोहन सिंग) सुद्धा सारखे स्टिम्युलस/ अग्रीगेट स्पेंडिंग वरून सरकारने खर्च वाढवायची भाषा करत असतात. मग श्रीमंतांनी बडेजाव(खर्च) केला की अग्रीगेट स्पेंडिंग/डिमांड वाढतेच ना ? मग आक्षेप कशासाठी ?

http://articles.economictimes.indiatimes.com/2010-06-26/news/27617880_1_...

http://thuglak.com/thuglak/newscontent.php?newsid=11172

http://www.indianexpress.com/news/time-not-ripe-for-withdrawal-of-stimul...
----------

कुटुंबात चारच जण असतील तर ७२ लाख रुपये वीजबिल येईल का ? फक्त चार जणांसाठीच १६८ पार्किंग लॉट्स लागतील का ?
जो माणूस इतका नफेखोर धंदेवाईक (लोभी/लुच्चा व संपत्तीस हपापलेला) आहे तो वीजबिलावर/पाण्यावर एवढे पैसे विनालाभ वाया घालवील का ?


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

{लिहितो........}

4

लिहितो........


..............................................................

क्या फर्क पडता है?

{हेच मत माझेही.}

5

पाण्याचा मुद्दा सोडून लेखकाशी प्रचंड सहमत. पूर्वी अन्यत्र लिहिलेले एक दोन पॅरे पुन्हा खाली डकवत आहे :
----------------
कोणीतरी श्रीमंत नट किंवा उद्योगपती पोरीचं भपकायुक्त लग्न काढून त्यात कित्येक कोटींचा चुराडा करतो. खूप विचारवंत पेपरमधे वगैरे मनापासून शिव्या घालतात अशा “उधळपट्टी”ला. देशात अर्धपोटी गरीब आहेत. नव्हे तेच जास्त आहेत. आणि उघडे नागडेसुद्धा खूप खूप. आणि त्याचवेळी कोणाच्या तरी लग्नात कोटींचा “चुराडा”. हजारांची पत्रिका. लाखांची फुलं. कोटींचा वेडिंग ड्रेस.

पण शांतपणे विचार केला तर लक्षात यायला काही हरकत नाही की या शेठजीकडचा माल एरव्ही खालच्या थरात वाटला गेला नसता. केवळ या “अनावश्यक” लग्नानं मांडववाले, फुलवाले, आचारी, वाढपी, मजूर, सराफ, दागिन्यांचे कारागीर, भांडी घासणार्‍या बायका, हजाराची पत्रिका छापणारा प्रिंटर, हातकागद बनवणारा कोणी लघुउद्योजक, कुरियरवाला या सर्वांना शेठ्जीचा पैसा झिरपून झिरपून मिळाला.

हो प्रत्येक भुकेल्या गरीबाला, प्रत्येक आदिवासी कुपोषित मुलाला थेट घास नाही मिळाला. वाईट झालं. लग्नात अन्न वाया गेलं असेल. वाईट झालं.

पण काही थरांपर्यंत तरी पैसा उतरून खाली आला. याहून जास्त चांगलं काही झालं नसतं. शेठजींनी साधेपणानं पोरीचं लग्न करून बाकी सारं दान करावं हा भाबडा आदर्शवाद झाला. ते होणे नाही.

{नाही साहेब तुम्ही सरंजामी}

6

नाही साहेब
तुम्ही सरंजामी व्यवस्थेची सांगड उत्पादनशील व्यवस्थेशी घालत आहात.असल्या प्रकारात लोकांचे श्रम फ़क्त फ़ुकट जातात ! कूणाची तरी हौस कूणाच्या तरी अगतिकतेतून भागवली जाते. .......निव्वळ शोषण…..


..............................................................

क्या फर्क पडता है?

{कारण हिच शोषकांची अपेक्षा!}

7

"हा भाबडा आदर्शवाद झाला. ते होणे नाही."
कारण आमच्या गलित गात्रावरच तुमची भुक भागवा हिच शोषकांची अपेक्षा!

"कूणाची तरी हौस कूणाच्या तरी अगतिकतेतून भागवली जाते. .......निव्वळ शोषण….."
सहमत!

{२जी स्कॅम मध्ये सक्रिय फायदा}

8

२जी स्कॅम मध्ये सक्रिय फायदा ऊठवताना, नैतिकता आठवली नाही. आता जेल मध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाल्यावर विषमता आदि गोष्टी दिसु लागल्या आहेत...............

{या}

9

नेहमीप्रमाणे 'गावाचे एक नि गावड्याचे दुसरेच'.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{इश तूम्ही एकदम बरोबर बोललात}

10

पण टाटा तरी सभ्यच कारण त्यांना प्रदर्शनावर टीका करायची आहे. श्रीमंत बनण्यावर नाही. हास्य Evil


And then !

{वाचतोय...........}

11

वाचतोय...........


"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"

{गब्बरसिग जी मी सकाळी}

12

गब्बरसिग जी मी सकाळी वर्तमानपत्र हातात घेतले, रतन टाटांनी मुकेश अंबानी वर टिका केल्याचे वाचले, आणि त्याचवेळी मनात विचार आले की ऑफीसात गेल्यावर पहील्यांदा यावर सडकुन लिहायचे, मीम वर आलो आणि काय आपल्या घाग्याचे दर्शन झाले. मनातुन आनंद झाला. आपल्याकडे हे आपणच खरे गरीबांचे कनवाळु आहोत असे म्हणनारांचे उदंड पिक आलेले आहे.(आपल्यापेक्षा) श्रीमंताना नावे ठेवायची आणि त्यांची प्रत्येक कृती कशी चुक आहे हे दाखवायचे, आणि गरीबांचे तारणहार असल्याचा टेंभा मिरवायचा हे चालुच आहे. त्यांनी अलिशान घर बांधताना हजारो लोकांना रोजगार मिळवुन दिलेला आहे, आजही त्या हवेलीत ६००० कर्मचारी पुर्ण पगार घेवुन काम करतात. त्यांना त्या घरामुळेच पगार मिळतो आहे.आणि आहे त्यांच्याकडे पैसा ते खर्च करतात आपल्या पोटात का दुखते ? आणि देशातील गरीबी दुर करण्याची जबाबदारी जितकी उद्योगपतींची आहे त्याहीपेक्षा जास्त सरकारची अहे. उद्योगपती टॅक्स भरतात आणि पैसा कमावताना तो कामगारांच्या आणि कर्मचा-यांना त्यांचा रोजगार, विवीध प्रकारचे कर भरुनच कमावलेला असतो त्यामुळे त्याच्यावर असा आक्षेप कसा घेता येईल. बर गरीबांना नुसता पैसा वाटता येईल का ?

आपल्या देशात नेहेमीच ओरड चालु असते की श्रीमंत वरचेवर श्रीमंत होत आहेत आणि गरीब गरीबच राहात आहेत पण याला उद्योगपतीच जबाबदार आहेत का ? सरकार काय करते ?

टाटांनी असा टाहो फोडु नये.


"मराठी माणसा जागा हो, मी "मराठीचा" धागा हो"

{थोडे करेक्शन}

13

आणि देशातील गरीबी दुर करण्याची जबाबदारी जितकी उद्योगपतींची आहे त्याहीपेक्षा जास्त सरकारची अहे.

सरकारने (नेते मंडळींनी) आपला असा समज करून दिलेला आहे की देशातील गरीबी दूर करणे हे सरकारचे (थोडेफार तरी) कर्तव्य आहे.

पण हे चूक आहे. याचे मुख्य कारण हे - की बहुसंख्य मतदार हे गरीब आहेत. ते याच आशेने मतदान करतात की एक नवीन सरकार येईल व आपल्याला नवीन संधी निर्माण करेल. सरकार संधी निर्माण करण्याची (निवडणूकीपूर्वी) वचने देते. पण या संधी निर्माण करण्यासाठी जो खर्च होतो (पायाभूत सोयी) तो करदात्यांच्या खिश्यातून येतो. करदाते अल्पसंख्य आहेत. म्हंजे अल्पसंख्य लोकांकडून कररूपात पैसा घेऊन तो बहुसंख्य लोकांसाठी खर्च करण्याचा अधिकार नेत्यांना मिळतो. कर न भरणारे गरीब हा अधिकार अप्रत्यक्षपणे नेत्यांकरवी राबवतात. यालाच मोरल हझार्ड म्हणतात. म्हंजे सरकारी सेवा पुरवण्यासाठी खर्च X करणार व त्याचे फायदे Y ला मिळणार (X ला मिळणार पण कराच्या योगदानाच्या मानाने व Y च्या योगदानाच्या तुलनेत खूप कमी). व हे फायदे काय असावेत हे ठरवण्याचा अधिकार Z ला. कोणतीही व्यक्ती सर्वसामान्यपणे दुसर्‍याचा पैसा काळजीपूर्वक खर्च करत नाही. स्वतः चा पैसा मात्र अत्यंत जपून खर्च करते.

म्हणून श्रीमंत हे गरीबांपेक्षा जास्त शोषित आहेत असे मी मानतो. उद्योगपती तर सर्वात जास्त शोषित. ते जबाबदारी घेतात, व्यवसाय सुरु करतात, इतरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतात.

जे गरीब स्वतःची सुद्धा जबाबदारी घेत नाहीत ते नैतिक दृष्ट्या उच्च होऊन बसलेत.

स्वतःची गरीबी दूर करणे हे फक्त व्यक्तीचे कर्तव्य असते व असायला हवे. सरकारने ही जबाबदारी घ्यायला हरकत नाही पण जबरदस्तीने वसूल केलेल्या करदात्यांच्या पैश्यातून नाही (अगदी हजारो/लक्षावधी/करोडो गरीब भुकेलेले असतील तरीही).

सरकार संपत्ती निर्माण करत नाही. सरकार (जबरदस्ती) कर वसूल करते व त्या कराचा दारिद्र्यनिर्मूलनासाठी वापर करते. एकाचे (जबरदस्तीने) घेऊन दुसर्‍याला देणे हा अधिकार परमेश्वराला सुद्धा नसायला हवा. सरकारची गोष्ट दूरच.

दारिद्र्यनिर्मूलनासाठी चा निधी हा नागरिकांनी ऐच्छिक योगदानातून मिळालेल्या फंडातूनच खर्च करायला हवा.


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

{सडेतोड..}

14

सडेतोड, निरुत्तर करणारे..योग्य्..किंवा योग्य पेक्षा सत्य म्हणणे करेक्ट आहे..

.. मात्र पचायला कठीण ..

पचवतोय.. हास्य

{बहुतांश}

15

बहुतांश सहमत.....................
जेथे अत्यंत विषमता असते, तेथे विषमता कायमस्वरुपी करण्यासाठी साम्यवाद फोफावतो... व एकदा तो फोफावला तर विषमता कमी करणे मार्क्सच्या बापाला सुध्दा जमणे नाही............ नेहरुंच्या महान नेतृत्वाने भारताच्या नशीबी ही महान विषमता कायमची कोरली आहे...

अवांतरः- वि.स.वाळिंबेनी आपल्या रायबरेली आणि नंतर ह्या पुस्तकात, गरीब देशात डावे असणे राजकीय दृष्ट्याकसे फायद्याचे असते हे सुंदर दाखवले आहे. भारताचा ६० वर्षाचा राजकीय इतिहास तोच दर्शवतो. काँग्रेस तर ८०% व भाजपा ७० % डावेच आहेत, हे दुदैवाने अनेकांना माहिती नाही.................

{श्रीमंत हे गरीबांपेक्षा जास्त}

16

श्रीमंत हे गरीबांपेक्षा जास्त शोषित आहेत असे मी मानतो

"कॅपटिलझम" आणि "क्लासिकल लिबरेझिअम" तुम्ही एका चौकटीत कसा बसवता हा मला फ़ार पूर्वी पडलेला प्रश्न होता
आता त्याचे उत्तर मिळाले असे मी समजावे काय?


..............................................................

क्या फर्क पडता है?

{कॅपटिलझम}

17

कॅपटिलझम चे मूळ खाजगी मालमत्तेच्या अधिकारात आहे. म्हंजे सरकारने सर्व नागरीकाच्या परवानगीनेच मालमत्तेवर कर लावायचे.
खाजगी मालमत्तेचा अधिकार म्हंजे तुम्हाला तुमची मालमत्ता विकण्याचा अधिकार आहे. कोणालाही व्/वा कितीही/कोणत्याही मोबदल्यात. तसेच तुमच्या मालमत्तेचा वापर कोणी, किती, कसा, कितीकालपर्यंत, कोणत्या गोष्टीसाठी वगैरे करायचा याचे करार करण्याचे स्वातंत्र्य. एकदा करार केला की त्याचे पालन तुम्ही करत असाल व दुसरी पार्टी करत नसेल तर न्याय मागण्याचा अधिकार. व सरकारचे न्याय मिळवून देण्याचे कर्तव्य. हे सर्व पहिल्या (सर्वोच्च) पातळीवरील नियमात (राज्यघटनेत) सांगून ठेवलेले. व न्यायदानास लागणारा खर्च भरून काढणे गरजेचे ... म्हणून मालमत्तेवरील कर उचित.

कॅपटिलझम ची दोन मूलभूत तत्त्वे - १) खाजगी मालमत्ता, २) Voluntary exchange.

मूलभूत स्वातंत्र्यात फक्त विकल्प असतात. हे विकल्प म्हंजे डिक्शनरीतील सर्व क्रीयापदांचा संच. त्यातील प्रत्येक क्रीयापद हे एक विकल्प दर्शवते. विकल्पात ३ गोष्टी येतात - अधिकार, कर्तव्ये व बाकीची क्रियापदे मिळून विकल्पसंच होतो. आता तुम्ही म्हणाल कर्तव्य हा विकल्प नव्हे. मी म्हणेन अगदी बरोबर - पण कर्तव्य हा घटनात्मक contractual clause आहे ... अधिकाराच्या बदल्यात मान्य केलेला. अर्थात व्यक्तीने तो implicitly मान्य केलेला असतो. यात काही विकल्प अधिकाराच्या स्वरूपात मिळवण्यासाठी काही विकल्प त्याग केले जातात.

-------------------------------

आता क्लासिकल लिबरलिझम -

क्लासिकल लिबरलिझम चा एक भाग म्हंजे कॅपटिलझम. मालमत्तेच्या अधिकार व्यक्तीरिक्त भाषण स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य, आचार्/विचार स्वातंत्र्य, स्थलांतर (देशातल्यादेशात), संघटन स्वातंत्र्य वगैरे मिळून स्वातंत्र्ये. पण महत्त्वाचे म्हंजे सरकारने कमीतकमी ढवळाढवळ करायची.

म्हंजे उदा. -

१) मी दारू प्यायची की नाही हे सरकारने ठरवायचे नाही.
२) मी कोणाशी लग्न करायचे हे सरकारने ठरवायचे नाही.
३) मी कोणाची/कधी/किती पूजा करायची हे सरकारने ठरवायचे नाही.
४) मी कोणते मूल्य जास्त मानायचे हे सरकारने ठरवायचे नाही. उदा. मी देशभक्तीपेक्षा दातृत्वाला जास्त महत्व देतो की भटकंतीला. मी माझा वेळ कोणत्या मूल्यावर खर्च करायचा हे मी ठरवणार. हे सरकारने ठरवायचे नाही. माझा वेळ व माझे शरीर ही माझी मालमत्ता आहे.

मुख्य म्हंजे -
१) मी माझ्या खाजगी मालमत्तेत कोणाशीही भेदभाव करू शकतो पण सरकारने भेदभाव कमीतकमी करायचा. व मला नागरिक म्हणूनच वागवायचे. नागरिक म्हंजे एक व्यक्ती की जिचा धर्म्/लिंग्/जात्/त्वचेचा रंग्/वय हे व अश्या बाबी दुर्लक्ष करून केवळ एक अधिकृत जिवंत व्यक्ती. कारण सरकार माझा नोकर आहे व सरकारला असे करण्यासाठी मी पगार (कर) देतो. मी सरकारचा नोकर नाही. मी सरकारमध्ये समान भागधारक आहे त्यामुळे दुसर्‍या नागरीकाला विनाकारण प्राध्यान्यपूर्ण वागणूक द्यायची नाही.

२) सरकारने कोणतेही प्रॉडक्ट्स माझ्यावर लादायचे नाहीत. सरकारने माझ्याकडून घेतलेल्या कराचा वापर करताना कॉस्ट्-बेनेफिट अ‍ॅनॅलिसिस करूनच करायचा. माझे विकल्प कसे जास्तीतजास्त होतील याकडे लक्ष द्यायचे.

निपो साहेब, कॅपिटलिझम हा क्लासिकल लिबरलिझम चा हिस्सा/घटक आहे. तुम्ही मला त्यांमध्ये inconsistency दाखवून द्या ... मी निराकरण करेन.


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

{(विषय दिलेला नाही)}

18

{बहुदा टेरेसवर हेलीपॅडला}

19

बहुदा टेरेसवर हेलीपॅडला सरकारने सुरक्षीततेच्या कारणास्तव परावानगी नाकारलेली आहे.


"मराठी माणसा जागा हो, मी "मराठीचा" धागा हो"

{मध्यंतरे एके ठिकाणी एक वाक्य}

20

मध्यंतरे एके ठिकाणी एक वाक्य वाचले होते
Money may belong to individuals, but resources belong to the society.

तुम्ही तुमच्या पैशाने काय वाट्टेल ते करा. १ कोटीचा रुमाल वापरा, १० कोटीचे टाय लाऊन फिरा. पण पाणी आणि वीज अशा गोष्टींची बिभित्स उधळपट्टी करण्याचा अधिकार कुणालाच नाही.

{पण पाणी आणि वीज अशा गोष्टींची}

21

पण पाणी आणि वीज अशा गोष्टींची बिभित्स उधळपट्टी करण्याचा अधिकार कुणालाच नाही.

उधळपट्टी कसली ???? वीजेचे पुरेसे उत्पादन, व पाण्याची साठवणूक करणे हे शासनाचे काम आहे. ते काम करण्यासच इथले गरीब व ढोंगी शेतकरी विरोध करतात. उदा: जैतापुर व इतर धरण प्रकल्प. आणि पुन्हा उधळपट्टी म्हणून ओरडतात..........

{Money may belong to individuals, but resources belong to the soc}

22

प्रणाम.

Money may belong to individuals, but resources belong to the society.

हे वाक्य थोडेसे अंतर्विरोध असलेले आहे.

पहिले - Isn't money a resource ? In several situations it is a resource.
If money is a resource then why can't I use to acquire other resources ?
In fact money is the most convenient/most frequently used resource that can be used to acquire other resources.

पैसा (करन्सी/नोटा/नाणी) हा समाजात ३ भूमिका पार पाडतो -

1) Storage of value - संपत्ती साठवून ठेवणे (इथे संपत्ती व value एकाच अर्थाने ). जसे आपण सोने वापरतो संपत्ती साठवायला. काही वेळा सोने हा resource आहे (उदा. दागिने) व काही वेळा Storage of value साठी वापरलेला अ‍ॅसेट.
2) Measure of Value - मोजण्याचे एकक.
3) Medium of Exchange - देवाणघेवाणीचे माध्यम. इथे पैसा हा resource आहे... वर म्हंटल्याप्रमाणे.


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

{टेक्निकली बरोबर उत्तर पण नाही}

23

टेक्निकली बरोबर उत्तर पण नाही पटले.

पैसा हाही एक रिसोर्स आहे हे खरे पण ते अगदी तांत्रिक विधान झालं. त्यामुळे

Money may belong to individuals, but resources belong to the society.

हे मूळ विधान फारतर "इनकरेक्टली फ्रेम्ड" किंवा "चुकीची शब्दयोजना" असलेले म्हणता येईल. पण ते चुकीचे नव्हे.

{ते विधान}

24

Money may belong to individuals, but resources belong to the society.

ते विधान चुकीचे आहे याचे कारण -

resources belong to the society चा अर्थ असा होतो की कोणतीही एक व्यक्ती कोणतीही साधनसंपत्तीची मालक असू शकत नाही. सर्व साधनसंपत्तीची मालकी कलेक्टिव्ह (समाजाची) व सरकार व्यक्तीच्या वतीने त्या मालकीचे विश्वस्त.

पण हे असत्य आहे. कारण माझा संगणक माझ्या मालकीचा आहे. माझे घर माझ्या मालकीचे. माझे लेथ मशीन माझ्या मालकीचे ...
म्हंजे माझ्या मंजूरीविना दुसरा कोणीही माझा संगणक, माझे घर, माझे लेथ मशीन वापरू शकत नाही. व माझी मंजूरी हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला मला मोबदला द्यावा लागेल. कदाचित मी तुम्हाला काही कालासाठी मोफतही देईन ... पण कायमस्वरूपी देईनच असे नाही. आता मग How do any of these resources (computer, home, lathe machine) belong to the society ?


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

{तेच तर}

25

तेच तर म्हणतोय. रिसोर्सेस हा शब्द चुकीचा आहे.
घर तुमचे असले तरी त्याखालची जमीन ही अगदी कायद्यानेही कोणाच्या मालकीची नसते. ज्याचे नाव सातबार्‍यावर आहे तो फक्त "भोगवटादार" म्हणूनच ओळखला जातो. सरकार ती जमीन कधीही अ‍ॅक्वायर करू शकते.

पी.सी., घर, लेथ मशीन हे रिसोर्सेसच आहेत. रिसोर्स ही संज्ञा बरीच विस्तृत आहे. इथे आपण त्याला काही वेगळा शब्द वापरुन नेमके विधान करण्याचा प्रयत्न करु.

-सर्व रिसोर्सेस अगदी तांत्रिक बोलायचं तर मर्यादितच आहेत. कारण पृथ्वी मर्यादित आहे.
-त्यातील काही रिसोर्सेस अत्यंत मर्यादित आहेत. उदा. पेट्रोल, पाणी, जमीन वगैरे. यांना आपण वेगळा शब्द बनवू. लिसोर्स (अत्यंत "लिमिटेड रिसोर्स")
-लेथ मशीन, पीसी वगैरे सध्या तरी लिसोर्सेस नाहीत. म्हणून त्याची खाजगी मालकी शक्य आहे.

-पाणवठा (उदा. वाळवंटी गावातील)
-जमिनीखाली असलेले खनिजतेल (मर्यादित आणि अत्यंत अवलंबित्व असलेले..)
-पाणी (गोड्या पाण्याचे प्रमाण एकूण पाण्यात १ टक्क्याहूनही कमी)

अशा काही सिलेक्ट "लिसोर्सेस"ची मालकी एका व्यक्तीकडे असणे आणि ती व्यक्तीही तिच्या पैसे टाकण्याच्या क्षमतेवर ठरणे हे सर्वांनाच श्रेयस्कर नाही.

अन्नधान्यही एका वर्षी एका विशिष्ट प्रमाणातच पिकत असल्याने त्याचाही समावेश लिसोर्समधे केला जाऊ शकतो. (भले ते रिप्रोड्यूसिबल असले तरी)

मी खरेदी करु शकतो म्हणून मी चार टन तूप जाळेन. किंवा १० टन तांदूळ लग्नाच्या वरातीत रस्त्यावर उडवेन..

मी १०० रुपये लीटरने सुद्धा दूध घेऊ शकतो म्हणून मी ते पूल भरून विकत घेऊन आंघोळीला वापरेन आणि नंतर गटारात सोडेन.

माझी मर्जी..

अशा सरधोपट लॉजिकने जगातले एकूणएक रिसोर्स नाही वापरता येणार. काही रिसोर्स उधळण्याचे आणि काही जपण्याचे राहणारच.

माझा आत्यंतिक पाठिंबा तुमच्या "पैसे" हा रिसोर्स खर्च करुन तो इतर समाजघटकांपर्यंत सर्क्युलेट होण्याविषयीच्या भूमिकेला होता. कोणतेही रिसोर्सेस केवळ "रिसोर्स" च्या व्याख्येत बसतात म्हणून एकाच मापाने उधळावे हे नाही पटत.

{अशा सरधोपट लॉजिकने जगातले एकूणएक रिसोर्स नाही वापरता येणार. काही}

26

अशा सरधोपट लॉजिकने जगातले एकूणएक रिसोर्स नाही वापरता येणार. काही रिसोर्स उधळण्याचे आणि काही जपण्याचे राहणारच.

मजेशीर गोष्ट ही की रिसोर्स उधळण्याचे परिणाम हे होतात की त्या रिसोर्स/लिसोर्स ची किंमत वाढते. किंमत वाढली की त्याच्या नवीन प्रॉडक्शन साठी किंवा सब्स्टिट्युट (substitute ) निर्माण करण्यासाठी इन्सेंटिव्हज निर्माण होतात. व नवीन तंत्रज्ञान निर्माण होते.

खनिज तेलाचे असेच झाले. त्याची किंमत वाढत गेली तशी क्रुड तेल एक्स्प्लोरेशन साठी जास्त इन्सेंटिव्हज निर्माण झाले. व आणखी खनिज तेलसाठे शोढण्याचे प्रयत्न झाले व नवीन तेलसाठे सापडले.

आता तर बॅटरीवर चालणार्‍या कार निर्माण झाल्यात व वापरल्या जातात. कदाचित काही वर्षांनी त्या सर्वत्र असतील.

पाण्याचेही असेच होईल. जर त्याचा अमर्याद वापर झाला व तुटवडा भासू लागला तर समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करून घेण्याचे तंत्रज्ञान कमर्शियलाईझ करावे लागेल व कोणीतरी उद्योजक पुढे येईल. हे तंत्रज्ञान उपलब्ध आहेच (विमानवाहु युद्धनौका) पण कमर्शियलाईझ करावे लागेल जेणेकरून ते स्वस्तात पाणी उपलब्ध करून देईल.


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

{+१}

27

आदिशेट कळीचं बोललात. पण भौ आता सम्रुद्धी येणार समृद्धी येणार या कल्पनेने आपण एवढे झपाटलेले आहोत की त्या समृद्धीचे अध्वर्यू (मी इथे ते नैतिक/अनैतिक कि योग्य/अयोग्य म्हणत नाही, हे निव्वळ प्लेन स्टेटमेंट आहे) कधी चुकूच शकत नाहीत किंवा त्यांच्यावर कोणी टीका केली की हे भावी समृद्धीचे प्रवासी/भागधारक (गंमत म्हणजे इथे नेहमी मला भावी वर्गविग्रह वाले स्वप्नाळू कम्युनिस्ट आठवतात, डावे-उजवे शेवटी वृत्तीने सारखेच, झेंडा वेगळा इतकेच हास्य ) आपल्या भावी नुकसानीच्या भीतीने त्यांचे समर्थन करण्यास धावून येतात. मुळात खाजगी मत्ता अयोग्य नाही पण जसे कम्युनिस्टांनी एकाधिकारशाहीचा, सरकारीकरणाचा अतिरेक केला तसे नव्या जगाच्या हिरोंचा खाजगी मत्तेचा अतिरेक आहे. कम्युनिस्टांनी केलेल्या अतिरेकी सरकारीकरणाचा जर आपण निषेध करत असू तर इतक्या टोकाच्या खाजगी संपत्तीचा कुणी केला तर ते गैर कसे. आरशात पाहिले तर आपला उजवा हात डावा दिसतो. माझ्या मते आपली परिस्थिती अशीच आहे. काल डावे जे करत होते ते आज उजवे करत आहे. त्यांचे अनुयायी वा सहचर जसे अभिनिवेशाने नि हिरिरीने त्या व्यवस्थेचे आंधळे समर्थन करीत तसेच नव्या व्यवस्थेचे अनुयायी करत आहेत. लाभार्थी नेहमीच्य व्यवस्थेच्या बाजूने असतात, नीरक्षीरविवेक हा नेहमीच अल्पसंख्य असतो. मुळात एका खंडप्राय देशात एकच व्यक्ती सुमारे २०% मालमत्तेची अधिकारी असते नि जिचे उत्पन्न १२१ कोटींच्य देशाच्या जीडीपीपेक्षाही जास्त असते (नि याचा गौरवपूर्ण उल्लेख या व्यवस्थेला फूलप्रूफ मानणार्‍या नि जगाला साम-दाम-दंड-भेद या मार्गाने ती अंगीकारण्यास भाग पाडणार्‍या आम्रिकेतील स्वतंत्र म्हणवणारी भाडोत्री मासिके करतात.) अशा व्यवस्थेला मी न्याय्य मानू शकत नाही. मला खाजगी मालमत्ता निर्माण करण्याचा हक्क आहे हे मी मानतो, परंतु महत्त्वाकांक्षा आणि लालसा, हपापलेपण यात मी फरक करतो.

काय सांगता काय ? (तुमच्या भाषण स्वातंत्र्याचा मान राखूनच बोलतो.) बडेजाव केला की खर्च होतो ना? की बडेजाव फुकट केला जातो ? तो वस्तू व/वा सेवा खरेदी करण्यातच होतो ना ? त्या वस्तू/सेवा ज्या व्यक्तीकडून विकत घेतल्या जातात तो उद्योजक/विक्रेता असतो. त्याच्याकडे कामाला कर्मचारी असतात. त्यांना पगार मिळतो - उत्पादन/वितरण केल्याबद्दल. ते कर्मचारी पगार खर्च करतात ... तो कुठे जातो ...कर्मचारी बस्तू/सेवा विकत घेतात ... दुसर्‍या उद्योजका/विक्रेत्याकडूनच ना ? तो त्याचा कर्मचार्‍यास पगार देतो की नाही ? हे चक्र चालू होते की नाही ? त्यातून गरीबी दूर होते की नाही ?
हा हा हा. काय गंमत आहे पहा. परंपराद्यांशी वाद घालताना जसे त्याच त्याच मुद्यांचा पण वेगवेगळ्या लोकांशी प्रतिवाद करावा लागतो तसेच या नव्या मन्वंतराच्या शिलेदारांच्याही बाबत आहे. हे 'कॅपिटॅलिस्ट र्‍हेटॉरिक' मी इतक्या वेळा ऐकले आहे की हल्ली एखाद्याने तोंड उघडले की मीच पुढचे खाड खाड म्हणून टाकतो.

गब्बरशेट, सहज गंमत म्हणून हिशोब करून पहा. आम्ही करून पाहिला होता. आमची कंपनी सुमारे शंभर माणसांची, मी स्वतः पहिला कर्मचारी (ई: कर्मचारी काय, एम्प्लॉई म्हणा, आम्ही काय कम्युनिस्ट आहोत कर्मचारी म्हणायाला.) त्यामुळे १ ते १०० हा प्रवास माझ्या नजरेसमोर झालेला. आजच्या तारखेला यात सुमारे ८५-९० आयटी प्रोफेशनल्स अथवा 'ब्लू कॉलर' कर्मचारी आहेत नि उरलेले १०-१५ इतर. हे इतर प्रामुख्याने अ‍ॅडमिन, एच. आर. आणि फिनान्सचे. याशिवाय कंत्राटी असे सफाई कर्मचारी, ऑफिसबॉईज् हे ही आहेत (यांच्यावरील खर्च अर्थातच नगण्य आहे). आता 'अन्य' सर्व' मिळून कंपनीच्या एकुण वेतनावरील खर्चाच्या अर्धा टक्का सुद्धा वेतन घेत नाहीत. म्हणजे बहुतेक पैसा हा प्रामुख्याने ब्लू कॉलर मंडळी घेऊन जातात. यात गरिबी कोणाची हटली साहेब?

वेतनापलिकडेही अन्य काही मागणी, उत्पादनांची गरज निर्माण होते हे मला मान्य आहे. यात संगणक, त्यासंबंधीची सेवा (एएमसी अर्थात वार्षिक देखभाल खर्च) , सॉफ्टवेअर, स्टेशनरी, कुरियर सेवा, हॉस्पिटॅलिटी (गोर्‍या सायबाला म्होट्या हाटिलात ठेवायला नको?) इ. सेकंडरी अथवा दुसर्‍या पातळीवरील खर्च आहेत. यात मुख्य खर्च असलेले संगणक हे मुख्यतः आयात होतात, त्यामुळे त्यावर या देशात फक्त वितरण व्यवस्थेला पैसे मिळतात. हॉस्पिटॅलिटीचा खर्च देखील कंपनीच्या एकुण खर्चाचा नगण्य हिस्सा (आमच्या कंपनीत साधारणपणे एका वर्षातील खर्च हा साधारण पणे एका नव्या एम्प्लॉईच्या वेतनाइतका होता, अन्य ठिकाणी वॉल्युम अधिक मानला तरी एका रेशो साधारण इतकाच मानायला हरकत नसावी) असतो.

तिसर्‍या पातळीवर असलेले खर्च म्हणजे मुळात ज्या इमारतीमधे (ई: सो मिड्ल क्लास, बिल्डींग म्हणा हो) कंपनी होती त्या कंपनीच्य बांधकामावर येणारा खर्च, ज्यात गरीब बिचार्‍या मजुरांची गरिबी हटते असे म्हणू या का? यांची दिवसाची मजुरी ही ब्लू कॉलर मंडळी एका बिअरच्या बाटलीवर खर्च करतात. या खर्चाची सर्व भागधारकांमधे समान वाटणी केल्यावर जो हिस्सा कंपनीचा म्हणून आपण धरू शकतो तो तिसरा भाग. (माझ्या अंदाजानुसार हा एकवेळ खर्च साधारणपणे दोन ते तीन एम्प्लॉईजच्या वेतनाइतका असावा).

या तीन पातळ्यावरील खर्चाचा हिशोब पाहता ८०-८५ ब्लू कॉलर लोक हे साधारणपणे ९० पैशाचे धनी असतात. उरलेले सर्व मिळून १० टक्के वाटून घेतात. हटली गरिबी?

या दहा टक्क्यात मोजा किती लोक आपले जगणे संभाळतात ते. यात निदान १०-२० बांधकाम मजूर आहे, सिमेंट उत्पादक कारखान्यातले ८-१० मजूर आले, होटेल मधील ८-१० कर्मचारी धरा, पाच-सहा सिक्युरिटीवाले, कुरियरवाले, एएमसी घेणार्‍या कंपनीचे दोन ते तीन कर्मचारी, ऑफिस असिस्टंट्स, वीज कर्मचारी, फर्निचर करणारे कर्मचारी, किरकोळ सामान - डेकोरेटिव मटेरिअल, अन्य उत्पादने वगैरे - उत्पादक वगैरे..... यादी खूप मोठी आहे. ही वाचून खुश व्हाल ना? म्हणाल आम्ही हेच तर म्हणत होतो! पण थांबा. हे सारे आमच्या कंपनीमुळे निर्माण झाले असे नाही किंवा या सर्वांना आमच्या कंपनीमुळे. रोजगार मिळाला असे नाही. उलट यांच्याशिवाय ८०-८५ ब्लू कॉलर जगू शकत नाहीत (हा मुद्दा फारच मोठा, कभी फुरसतसे लिखेंगे. साधारणतः झोपडपट्टी ही शहरी जीवनाचा अविभाज्य भाग बनते तसे...) यांच्या रोजगाराचे श्रेय तुम्ही घेऊ पहात आहात नी हे ही - गरिबी हटते वा रोजगार मिळतो या दाव्यासकट - आम्हाला साफ अमान्य आहे.
पुन्हा हेच ८०-८५ लोक मिळवलेला बक्कळ पैसा 'इन्वेस्टमेंट' या नावाखाली घरे घेण्यात गुंतवतात, अनावश्यक मागणी वाढल्याने किंमती आकाशाला भिडतात नि शहरात घर घेण्याची ऐपत असलेले लोक पाच टक्के सुद्धा नसतात. उरलेले दूर उपनगरात राहतात, येण्याजाण्यात दीड्-दोन तास खर्च करतात नि त्यानंतर कामात उत्साह दाखवत नसल्याबद्दल या ८०-८५ वाल्यांच्या शिव्या खातात. हे चित्र अन्यायकारक आहे असं वाटंत नाही का?

याशिवाय, इतर अनेकांचे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष नुकसान हे उद्योगधंदे, नवी व्यवस्था करते ते हिशोबात धराल की नाही. अनेक पिढ्या शेती करणार्‍या चाळीशीतल्या गणपाची जमीन आयटी पार्कसाठी गेली आणि त्याच्या हातावर पैसे टिकवले की झाले? त्याने आपले मूळ ठिकाण सोडून नव्या गावी मुळे रुजवायची? आता समृद्धी हा एकमेव निकष मानून देश सोडणार्‍यांना गाव सोडण्यात काय मोठे असा प्रश्न पडेल. ज्याला बांधिलकी नि आतड्याचे नाते समजते त्यालाच ते समजू शकेल. पुन्हा हाती आलेल्या पैशाने त्याने काय करायचे, त्याला शेतीच तर जमते दुसरा रोजगार करून नुकसानीत जायचे धंदे (तसे करावे असे म्हणणार्‍यांनी स्वतः आपली नोकरी सोडून सर्वस्वी नव्या क्षेत्रात पाउल टाकायची आपली हिंमत आहे का असा प्रश्न स्वतःलाच विचारावा) नवी शेती घ्यायची म्हणजे बाजारात पैसे टाकून किलोभर तांदूळ घ्यायचे इतके सोपे असते का? यावर नेहमीचे 'प्रगतीसाठी थोडे कष्ट तर सहन करावेच लागतात' हे उत्तर येऊ शकेल. पण प्रगती कुणाचे नि कष्ट कोणाला हो!

प्रतिसादाच्या मर्यादेमुळे अधिक लिहित नाही वरील लिखाणावर आणखी प्रश्न आहेत हे मला ठाऊक आहे त्याची उत्तरे अन्यत्र देऊच.

माफ करा पण हे 'इतरांनाही रोजगार मिळतो' हा तर्क मला अतिशय उद्दाम नि नृशंस वाटत आलेला आहे.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{गब्बरशेट, सहज गंमत म्हणून हिशोब करून पहा. आम्ही करून पाहिला होता}

28

गब्बरशेट, सहज गंमत म्हणून हिशोब करून पहा. आम्ही करून पाहिला होता. आमची कंपनी सुमारे शंभर माणसांची, मी स्वतः पहिला कर्मचारी (ई: कर्मचारी काय, एम्प्लॉई म्हणा, आम्ही काय कम्युनिस्ट आहोत कर्मचारी म्हणायाला.) त्यामुळे १ ते १०० हा प्रवास माझ्या नजरेसमोर झालेला. आजच्या तारखेला यात सुमारे ८५-९० आयटी प्रोफेशनल्स अथवा 'ब्लू कॉलर' कर्मचारी आहेत नि उरलेले १०-१५ इतर. हे इतर प्रामुख्याने अ‍ॅडमिन, एच. आर. आणि फिनान्सचे. याशिवाय कंत्राटी असे सफाई कर्मचारी, ऑफिसबॉईज् हे ही आहेत (यांच्यावरील खर्च अर्थातच नगण्य आहे). आता 'अन्य' सर्व' मिळून कंपनीच्या एकुण वेतनावरील खर्चाच्या अर्धा टक्का सुद्धा वेतन घेत नाहीत. म्हणजे बहुतेक पैसा हा प्रामुख्याने ब्लू कॉलर मंडळी घेऊन जातात. यात गरिबी कोणाची हटली साहेब?

यात गरिबी कोणाची हटली साहेब?
ज्याला नोकरीच नव्हती त्याची. ज्याला मागील नोकरीत कमी पगार होता त्याला नवीन नोकरीत जास्त मिळाला.

तुम्ही १) equlity of outcome and २) equality of opportunity एकच मानत आहात का ?

equality of opportunity - जे "अन्य" आहेत त्यांना आयटी प्रोफेशनल बनण्याची संधी होती का ? त्या संधी चे ज्ञान त्यांना प्राईस सिस्टीम मुळे मिळाले असेलच ना (जेव्हा मिळायला हवे होते तेव्हा) ? जर नसेल मिळाले तर ते त्या ८५ आयटी प्रोफेशनल लोकांना कसे मिळाले व या "अन्य" १५ मंडळींना कसे नाही मिळाले ?

आता equlity of outcome - जर सर्वांचा शेवटी पगार एकत्र केलात व समसमान वितरण केलेत तर काय होईल ? You will destroy incentives to those 85 IT professionals to work in your firm. They will be dis-incentivized and may quit.
ते सोडून जातील कारण त्यांना इतरत्र जास्त पगार मिळेल. You will also destroy incentives for the "others" to work hard and attempt to make a transition. (पण हा युक्तीवाद तुम्हाला माहिती आहे ... त्यात मी नवीन काहीच सांगत नाहिये)

कदाचित तुम्ही लेबर थेअरी ऑफ व्हॅल्यु चा युक्तीवाद करत आहात. की कर्मचार्‍यास त्याच्या योगदानाच्या प्रमाणात वेतन मिळावे. पण तसे केल्यास जर कर्मचार्‍याचा पगार कौशल्याच्या मागणी व पुरवठापेक्षा जास्त असेल तर प्राईस सिस्टिम मधूनच सिग्नल्स जातात व पगार जास्त मिळत असल्याने त्याकडे कर्मचार्‍यांचा ओघ वाढतो व पुरवठा वाढतो. (पण हाही युक्तीवाद तुम्हाला माहिती आहे ... त्यात मी नवीन काहीच सांगत नाहिये)

आता माझा महत्त्वाचा मुद्दा - केंद्रीभूत resource allocation mechanism (e.g. Govt.) पेक्षा जास्त एफिशियंट व वापरायला सोपी सिस्टिम म्हंजे प्राईस सिस्टिम. It is an information system which everyone has access to and everyone uses. प्रत्येक जण ती रोज २४*७ वापरतो व त्यातून सिग्नल्स घेतो व त्यात सिग्नल्स पाठवतो. आयटी प्रोफेशनल्स चा पगार जास्त आहे हे त्यातूनच कळते व त्यातून incentives संक्रमित केले जातात. Govt. does not have the ability to match the speed and ease of access offered by price system. म्हणून प्राईस सिस्टीम हा सर्वात विश्वातला शक्तीशाली व उपयुक्त गव्हर्नर आहे.

प्राईस सिस्टिम मध्ये काय येते - वेगवेगळ्या व्यवसायिकांचे पगार, व्याजाचे दर, शेअर्स चे दर, करन्सीचे दर, वस्तूंच्या किंमती, घरभाडी, सोन्याचा भाव .... लिस्ट लांबलचक आहे.


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

{ज्याला नोकरीच नव्हती त्याची.}

29

ज्याला नोकरीच नव्हती त्याची. ज्याला मागील नोकरीत कमी पगार होता त्याला नवीन नोकरीत जास्त मिळाला.

हे साफ अमान्य. हा मुद्दा कोणत्याही आस्थापनाबद्दल खरे आहे केवळ खाजगी आस्थापनांनाच हे श्रेय का द्यावे? सहकारी तत्त्वावर चालणारे साखर कारखानेही या श्रेयाला पात्र होतील, सरकारी उपक्रम तर नक्कीच. मग खाजगी आस्थापनांचे काय विशेष. आणि आमचा मुद्दा हा होता की मुळात एकुण संपत्तीच्या अक्षरश: नगण्य हिस्सा या ग्रे कॉलर मंडळीच्या वाट्याला येतो. पैसा निर्माण होत असेल नि मूठभर लोक त्याचा ९० टक्के हिस्सा मिळवत असतील तर ही सरंजामशाहीच आहे. तुमच्या नियमात बसत असली तरी कल्याणकारी व्यवस्था नक्कीच नाही.

तुम्ही १) equlity of outcome and २) equality of opportunity एकच मानत आहात का ?

अर्थातच नाही!

equality of opportunity - जे "अन्य" आहेत त्यांना आयटी प्रोफेशनल बनण्याची संधी होती का ? त्या संधी चे ज्ञान त्यांना प्राईस सिस्टीम मुळे मिळाले असेलच ना (जेव्हा मिळायला हवे होते तेव्हा) ? जर नसेल मिळाले तर ते त्या ८५ आयटी प्रोफेशनल लोकांना कसे मिळाले व या "अन्य" १५ मंडळींना कसे नाही मिळाले ?

संधीचे ज्ञान आणि प्रत्यक्ष संधी या फार वेगळ्या गोष्टी आहेत साहेब. आय टी एंजिनियर होण्यासाठी पतंगराव, डी वाय पाटलाच्या शैक्षणिक दुकानात जे अवाच्या सवा पैसे द्यावे लागतात ते कितीही हुशार असला तरी दोन एकर कोरडवाहू शेतीवर कुटुंब पोसणार्‍या बापाच्या पोराने कुठून आणायचे हो? त्याहिपुढे जाऊन गावाकडनं शेरगावात येऊन खाण्यापाण्याची सोय कोण करणार? अंबानीनी कधी विद्यार्शी सहायक समितीसारख्या संस्थेला मदत केल्याचे ऐकिवात आहे का? व्यवसाय हा सर्वस्वी स्वार्थावर आधारलेला असतो साहेब. सरकार जसे दुबळ्या पण होतकरू घटकांना हात देऊन संधीपर्यंत पोचवते तसे खासगी उद्योग करतात का? त्यांच्या समाजसेवेची उदाहरणे ऐकून आमचे नेहमीच झाकण उडते. एखादा कम्युनिटी हॉल बांधणे, रुग्णालयातील/वृद्धाश्रमातील रुग्णांना फळे वाटणे, त्यांच्यासाठी एखादा 'सांस्कृतिक' कार्यक्रम या नावाखाली करमणुकीचा कार्यक्रम आयोजित करणे, वृक्षारोपण करणे, असे एकवेळ नि अंगाला फारसे झळ न लागणारे कार्यक्रम 'कम्युनिटी इनिशिएटिव' या नावाखाली फाईलबंद केले की संपले यांचे काम. समाजसेवा हा मूलभूत गुण असलेले, स्वेच्छेने काम करणारे खासगी उद्योग वा व्यक्ति नगण्य असतात. हे काम सर्वस्वी सरकारच्या गळ्यात घातलेले असते. सातत्याने कर पद्धतीबद्दल ओरड करणारे उद्योग असंख्य गोष्टी अप्रत्यक्षपणे वापरत असतात त्याबद्दलची किंमत ते कधीही भरत नाहीत. (उदा. पुण्यात आलेले उद्योगधंदे आपल्याबरोबर वाहतुकीचा उग्र प्रश्न घेऊन आले, रिअल इस्टेट बरोबर पाणीपुरवठा नि मलनि:स्सारण व्यवस्थेवर प्रचंड ताण देऊ लागले. पण स्थानिक मनपाला एक पैसा कर न देता फक्त दूषणे देणारे हे लोक या दुरवस्थेबद्दल काही करतात का. एखाद्या चौकात सुशोभीकरण करून आपली पाटी लावली की सरले यांचे कर्तव्य?)

निलाजर्‍या कर्मसिद्धांताप्रमाणे 'ते गरिबीत जन्माला आले तर आमचा काय दोष' असा प्रश्न व्यक्तिवादी अथवा भांडवलशाही समर्थक व्यक्ती विचारेल परंतु सरकारला सर्व समाजघटकाची जबाबदारी घ्यावी लागते, त्यासाठी जिथे पैसा उपलब्ध आहे तिथूनच तो उचलावा लागते. ज्यांच्याकडे मुळातच नाही त्यांच्या हितासाठी ते स्वतःच पैसा कसा देणार ना? त्यासाठी निव्वळ इक्वालिटी पुरत नाही प्रसंगी झुकते माप द्यावेच लागते.

आता equlity of outcome - जर सर्वांचा शेवटी पगार एकत्र केलात व समसमान वितरण केलेत तर काय होईल ? You will destroy incentives to those 85 IT professionals to work in your firm. They will be dis-incentivized and may quit.
ते सोडून जातील कारण त्यांना इतरत्र जास्त पगार मिळेल. You will also destroy incentives for the "others" to work hard and attempt to make a transition. (पण हा युक्तीवाद तुम्हाला माहिती आहे ... त्यात मी नवीन काहीच सांगत नाहिये)

सर्वांना समान पगार हा माझ्या मुद्दाच नाही. (एवढेच नव्हे तर कम्युनिस्टद्वेष्टे हे जे गृहितक कवटाळून बसतात तसा कम्युनिस्टांचाही नसतो!) आकडेवारी दिली ती तुमच्या 'इतरांना पण रोजगार मिळतो' या दाव्यातील फोलपण सिद्ध करण्यापुरती. मुद्दा एवढाच की मूठभर लोक ९०% पैसा घेतात तेव्हा उरलेले कैकपटीने अधिक सख्येने असलेल्या लोकाना १०% वाटून घ्यावे लागतात. त्यामुळे ही व्यवस्था समाजहितकारक, कल्याणकारक म्हणता येणार नाही. थोडक्यात एकाने पोट फुटेपर्यंत खावे, पिशवीत (आता फ्रीजमधे) भरून घ्यावे नि मग शिल्लक उच्छिष्टासमान अन्नात इतरांनी आपले खाणे भागवावे हे अन्यायकारक आहे. मी समान वितरण, समान संधीच्या पलिकडे जाऊन असे म्हणतो की किमान गरजा (दोन वेळचे अन्न, निवास, औषधोपचार) सर्व घटकाना मिळू शकते अशी व्यवस्थाच कल्याणकारक नि सरकारच्या दृष्टीने, सर्वसामान्यांच्या दृष्टीने स्वीकारार्ह असायला हवी. त्यापलिकडे उरलेल्या पैशासाठी, साधनसंपत्तीसाठी खुली स्पर्धा वगैरे ठेवा, मग तो सारा पैसा मुकेशभाई घेऊन गेले तर आमची हरकत नाही. जंगलात देखील एकदा पोट भरले की शिकारीच्या उरलेल्या हिश्शासाठी सिंह इतरांशी भांडत बसत नाही. माणूस हा वैचारिकदृष्ट्या अधिक विकसित असल्याचा दावा करत असेल तर माणसाची व्यवस्था याहून अधिक समावेशन हवी, खरे ना?

कदाचित तुम्ही लेबर थेअरी ऑफ व्हॅल्यु चा युक्तीवाद करत आहात. की कर्मचार्‍यास त्याच्या योगदानाच्या प्रमाणात वेतन मिळावे. पण तसे केल्यास जर कर्मचार्‍याचा पगार कौशल्याच्या मागणी व पुरवठापेक्षा जास्त असेल तर प्राईस सिस्टिम मधूनच सिग्नल्स जातात व पगार जास्त मिळत असल्याने त्याकडे कर्मचार्‍यांचा ओघ वाढतो व पुरवठा वाढतो. (पण हाही युक्तीवाद तुम्हाला माहिती आहे ... त्यात मी नवीन काहीच सांगत नाहिये)

माझा हाही मुद्दा नाही. वरची शेवटची चार वाक्ये पहा


आता माझा महत्त्वाचा मुद्दा - केंद्रीभूत resource allocation mechanism (e.g. Govt.) पेक्षा जास्त एफिशियंट व वापरायला सोपी सिस्टिम म्हंजे प्राईस सिस्टिम. It is an information system which everyone has access to and everyone uses. प्रत्येक जण ती रोज २४*७ वापरतो व त्यातून सिग्नल्स घेतो व त्यात सिग्नल्स पाठवतो. आयटी प्रोफेशनल्स चा पगार जास्त आहे हे त्यातूनच कळते व त्यातून incentives संक्रमित केले जातात. Govt. does not have the ability to match the speed and ease of access offered by price system. म्हणून प्राईस सिस्टीम हा सर्वात विश्वातला शक्तीशाली व उपयुक्त गव्हर्नर आहे.

प्राईस सिस्टिम मध्ये काय येते - वेगवेगळ्या व्यवसायिकांचे पगार, व्याजाचे दर, शेअर्स चे दर, करन्सीचे दर, वस्तूंच्या किंमती, घरभाडी, सोन्याचा भाव .... लिस्ट लांबलचक आहे.

वापरायला सोपी नि एफिशिएंट असेल पण अतिशय तीव्र अशा स्वार्थाने प्रेरित असते त्याचे काय? आणि सिस्टम म्हणजे व्यवस्था या अर्थाने घेत असाल तर तिची कार्यपद्धती ठरवण्याचा हक्क सर्व भागधारकांना (Stake-holders) ना असायला हवा ना? आता अशा व्यवस्थेत तुम्ही आम्ही ग्राहक, चाकर हे ही येत नाही काय? तसेच ते सारे ग्रे कॉलर कर्मचारीही? कारण मूल्याबाबत त्यांचा काहीही संबंध नसला तरी किंमत त्यांच्याही जगण्यावर परिणाम करणारी असते. आता उत्पादन हे उत्पादकाच्या मालकीचे या न्यायाने त्याने किंमत ठरवावी असे असेल तर मग हाच न्याय एका बाजूने शेती उत्पादनाला नि पार दुसर्‍या टोकाला संरक्षण व्यवस्थेला लावला तर चालेल? सुरक्षित राजकीय वातावरण, इन्फ्रास्ट्रक्चर, संदेश०व्यवस्था, दळणवळण व्यवस्था इ. अन्य peripheral गरजा भागवणार्‍या इतर व्यवस्थांच्याबाबतही खरा आहे. देशांतर्गत सुरक्षिततेसाठी लाखभर डॉलर टॅक्स सरकारने लावला तर 'त्यांचे उत्पादन (खरेतर सेवा) म्हणून ते ठरवतील ते मूल्य' हा नियम न्याय्यच म्हणता येईल ना. आता मग करपद्धतीबद्दल उद्योगांनीही तक्रार करण्याचे कारण नाही, कारण ही सरकारने दिलेली सर्विस या दृष्टिने पहावे.

जेव्हा अप्रत्यक्ष रोजगारनिर्मितीचा तर्क आपण देतो तेव्हा अशा अप्रत्यक्ष लाभाचा मुद्दा सोयीस्करपणे विसरत असतो.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{मला खाजगी मालमत्ता निर्माण करण्याचा हक्क आहे हे मी मानतो, परंतु }

30

मला खाजगी मालमत्ता निर्माण करण्याचा हक्क आहे हे मी मानतो, परंतु महत्त्वाकांक्षा आणि लालसा, हपापलेपण यात मी फरक करतो.

न्याय्य म्हंजे करारानुरुप. कराराचे उल्लंघन करून जे मिळवले ते न्याय्य नाही.

आता मुद्दा - जे तुमच्या साठी हपापलेपण ते इतरांसाठी महत्त्वाकांक्षा असू शकते. हे पटते का ? इथे क्लासिकल लिबरलिझम येतो.
व्हॅल्यु जजमेंट. मी कोणते मूल्य महत्त्वाचे मानायचे व कोणते नाही हे मी ठरवणार का नाही ? एखादा देशभक्ती महत्त्वाची मानेल ... दुसरा एखादा भटकंती महत्त्वाची मानेल ... तिसरा एखादा नॉस्टॅल्जिया महत्त्वाचा मानेल ... चौथा एखादा क्रिकेट महत्त्वाची बाब मानेल ... यातूनच विविधता वाढीस लागते. संपत्ती ही अनेक गोष्टीत असते - क्रिकेट च्या कौशल्यात, जावा कोड लिहिण्यात, वेल्डिंग करण्यात, दागिने घडवण्यात, कायद्याचा मसूदा बनवण्यात, मासे पकडण्यात .... कारण त्यात ती व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीस उपयुक्त काहीतरी बनवत असते. व दुसर्‍या व्यक्तीला पैश्याच्या बदल्यात विकत असते.

इतरांना त्यांची महत्त्वाकांक्षा साध्य करण्याचे स्वातंत्र्य असावे ना ? दुसर्‍याची मालमत्ता लुबाडून/फसवून घेतले तर ते अन्याय्य. पण तसे नसेल तर ते अन्याय्य का ?


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

{आ हा!}

31

आता मुद्दा - जे तुमच्या साठी हपापलेपण ते इतरांसाठी महत्त्वाकांक्षा असू शकते. हे पटते का ?
आ हा! सापेक्षतेचा मुद्दा घ्यायचा तर साराच डोलारा कोसळेल सायबा. पण ते जाऊ द्या. सध्या फार व्यापक न करता एवढाच मुद्दा घेऊ. आमच्या मागच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे (हपापलेपण, मह्त्त्वाकांक्षा एक मिनिट बाजूला ठेवू) समाजातील सर्वांना किमान गरजांबाबत आश्वस्त करणारी व्यवस्था मी कल्याणप्रद नि स्वीकारार्ह मानतो. त्या पलिकडे उरलेला पैसा 'इज एवरिबडिज मनी, एनिवन कॅन हॅव इट'.

इथे 'सर्वायवल ऑफ द फिटेस्ट' किंवा आपल्याकडील कर्मसिद्धांत सांगण्यात अर्थ नाही. झोपडपट्टीतील लोक बेसुमार पैदास करतात याचा आम्हाला का त्रास हा मुद्दा तुमच्यापुरता खरा असला तरी व्यवहार्य नाही. समाजात जन्मलेल्या प्रत्येक माणसाचे धारण करणे हे समाजाचे कर्तव्यच असते. याचा अर्थ असा नव्हे की त्याला आयते ताट वाढून द्यावे, पण निदान त्याला पोटापुरते मिळण्याची शाश्वती, संधी मिळेल अशी व्यवस्था निर्माण करावी लागते. आता ८०-८५ लोकांना ९०% पैसा नि उरलेल्या (समजा) तीन-चारशेंना १०% अशी विभागणी झाली तर समाजाच्या ज्या घटकातून हे तीन्-चारशे लोक येतात त्या समाजघटकातील व्यक्तींना वर चढण्यास संधीच मिळणार नाही हे उघड आहे. एवढे तुट्पुंजे वेतन असलेल्याची पुढची पिढी एंजिनियर होऊन 'त्या' ८०-८५' लोकांमधे जाण्याची शक्यता नगण्य असते. (एखादीच जन्मजात हुशार माणसाला हे जमतं, उरलेल्या ६०-७० टक्के मिळवणार्‍या सामान्य मुलांचे काय? याचवेळी एवढेच मार्क मिळवणारं त्या ८० मधल्या एखाद्याचे पोरगं पतंगरावांच्या/डीवाय पाटलाच्या कृपेने पुन्हा त्याच घटकात राहते. म्हणजे आता ही समान संधी म्हणायची का? एक जन्मजात आर्थिक स्थिती (पुन्हा कर्मसिद्धांताआधारे समर्थन?) वगळता गुणवत्तेनुसार दोघेही सारख्याच पातळीवर आहेत ना. थोडक्यात निव्वळ संधी समान म्हणजे न्याय असे नसते साहेब.

मी कोणते मूल्य महत्त्वाचे मानायचे व कोणते नाही हे मी ठरवणार का नाही ?
आमचा मुद्दा मूल्याबद्दलचा नाही 'किमतीबद्दल'चा आहे. मूल्यांनी पोट भरत नाही, गरजेच्या वस्तूंना मोजावी लागणारी किंमत ही महत्त्वाची.

बाकी व्हॅल्यू जजमेंट वगैरे तात्विक बाबी आमच्यासारख्या सामान्यांच्या बुद्धीबाहेरच्या. आम्हाला आपलं अन्न, वस्त्र, निवारा या किमान गरजा नि सार्‍यांच्या त्या भागल्याशिवाय एका कोणी अधिक साठवण करणे हा स्वार्थ एवढंच समजतं.

गब्बरशेट. आपले दृष्टीकोन वेगळे आहेत. आपण आहेत त्यात काय चूक आहे असा विचार करता आहात नि आम्ही त्यात काय नाही असा विचार करतो आहोत. उद्योगव्यवस्था ही आम्ही सार्वभौम मानत नाही. हीच व्यवस्था एकाच वेळी सामाजिक व्यवस्था, राजकीय/भौगोलिक व्यवस्था वगैरेंबरोबर आपले प्रभावक्षेत्र वाटून घेत असते, त्यामुळे त्यांच्या प्राधान्यक्रमांचा संघर्ष होणारच. नेहमीच उद्योगव्यवस्था सॉवरिन असावी असा आग्रह चूक आहे. अन्य व्यवस्थेच्या संदर्भात सुद्धा तिचा विचार करावा लागतो, कारण त्यांचे सह-अस्तित्व आवश्यक असते. तुमचेच वरचे उदाहरण उलटवण्याचा प्रयत्न करतो. जसे तुम्हि म्हटलात की समान वेतन वितरणाने काही लोक व्यवस्थेतून बाहेर पडतील, तिचे अहित होईल. उलट बाजूने पाहिले तर मुकेशभाईंसारखे लोक (हे टोकाचे उदाहरण आहे हे खरे पण मुद्दामच सरलीकरणासाठी घेतोय) अधिकाधिक संपत्ती निर्माण करतील तसतसे ग्रे कॉलर व्यक्तींच्या आयुष्यातील आय-व्यवातील तफावत - जरी दोन्ही वाढते राहिले तरी - वाढत राहिल. कारण ज्या वेगाने उत्पन्न वाढते त्याहुन कितीतरी अधिक वेगाने व्यव किंवा खर्च वाढतो. याचे एक कारण इन्फ्लेशन (गेले वर्षभर भारतात इन्फ्लेशन १२ टक्क्याहुन अधिक आहे) आणि उच्चभ्रूंच्या अतिभोगाने वाढलेली अतिरिक्त मागणी नि त्यामुळे वाढलेल्या किंमती. अशा स्थितीत हे लोक बंड करून उठतील नि लुटालूट करू लागतील (सोविएत रशियात जे झाल्याबद्दल आपल्यासकट सारे पाश्चिमात्य खुश होऊन टाळ्या वाजवित होते तेच), संरक्षण व्यवस्था, राजकीय व्यवस्था मोडून अराजक माजेल. मग राजकिय हस्तक्षेपाबद्दल गळे काढणारी ही व्यवस्था आपले संरक्षण कसे करेल? खासगी संरक्षण व्यवस्थांमधून? पण ते ही ग्रे कॉलरवालेच असतील हे विसरू नका (किंवा त्यांना किमान व्हाईट कॉलरवाल्यांइतके वेतन, ग्रे कॉलर काम असूनही द्यावे लागेल!) मग करा तुम्ही न्याय्-अन्यायाची, खाजगी संपत्तीच्या हक्काची वांझोटि चर्चा. नवी व्यवस्था 'बळी तो कान पिळी' हा मंत्र घेऊन येईल आणि त्यांच्या पुरती ती योग्यच असेल की! त ही म्हणतील, तुम्हाला दंडेली करता येत नाही हा आमचा काय दोष.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{चर्चा}

32

चर्चा कशी असावी याचे उत्तम उदाहरण.

अगदी विरोधी मते असूनही कुठेही तोल न सोडता आपला मुद्दा मांडणे आणि पटवून देणे..

दोघांचीही चर्चा ग्रेटच..

{खरंच सुंदर चर्चा चालू आहे..}

33

खरंच सुंदर चर्चा चालू आहे.. मुद्देसूद आणि संयत, म्हातारं आणि गब्बरजी, दोघांच्याही मुद्द्यातून त्यांचा विचार व विद्वत्ता दिसून येते.
हॅट्स ऑफ टू बोथ ऑफ यू.. जालावर इतकी मुद्देसूद चर्चा दुर्मीळच.

चालूद्या वाचतोय..

{चर्चा कशी असावी याचे उत्तम}

34

चर्चा कशी असावी याचे उत्तम उदाहरण.

अगदी विरोधी मते असूनही कुठेही तोल न सोडता आपला मुद्दा मांडणे आणि पटवून देणे..>>>>

१००% सहमत ! वाचतोय, कधी नव्हे तो दोघांच्या वाद-विवादातून खरा खुरा आनंद मिळतोय हास्य


"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"

{दोस्तहो...}

35

I have strong opinions but they are not strongly held. I mean please feel free to disagree with me whenever you can. In fact I like to hear disagreements. I learnt this from the biography of the great Frederich Hayek. That is how he learnt about how the economy works.

मित्रहो ... माझी मते strong असली तरीही मी त्यांना घट्ट चिकटून बसणार नाही. तुम्ही माझ्याशी असहमत असाल तर ते लिहा व का असहमत आहात तेही लिहा. फ्रेडरिक हायेक याच्या चरित्रातून हेच शिकायला मिळते. की अश्या असहमतीतूनच/विवादातूनच शिकायला मिळते.


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

{ज्या }

36

व्यवस्थेने तुम्हाला नेहरूंनी निर्माण केलेल्या व्यवस्थेवर टीका करायाच अधिकार दिला त्याच व्यवस्थेने! अ‍ॅज सिंपल अ‍ॅज दॅट. दॅट इज युअर ओपिनियन, अँड धिस वन इज ऑफ मि. टाटा.

तुम्हाला त्यांच्या मताचे खंडन करायचे तर जरूर करा, तो तुमचा अधिकार आहे. पण त्यांचा अधिकारालाच आव्हान देणे गैर आहे.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{मान्य}

37

मान्य.

माझा मुद्दा त्यांच्या अधिकाराला आव्हान देण्याचा नाहीच. मथळा हा र्‍हेटोरिकलच आहे.

माझा मुद्दा श्रीमंतांना जास्त जबाबदारी सोपवण्याबद्दल व संपत्ती चा विनियोग व त्याचे स्वातंत्र्य याबद्दल आहे. मुख्य म्हंजे गरीब व श्रीमंत यांबद्दल जे गैरसमज आहेत त्याबद्दल आहे.


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

{+१}

38

हेच म्हणतो !!


*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!

माझा ब्लॉग - मन उधाण वार्‍याचे…

{++१ रमतारामजी,तुम्ही माझ्या}

39

++१
रमतारामजी,तुम्ही माझ्या मनातले लिहीले.


..............................................................

क्या फर्क पडता है?

{एक साधा विचार...}

40

एक साधा विचार करुन पहा. टाटा हे नाव घेतल्यावर एक जो आदर मनात निर्माण होतो तो रिलायन्स हे नाव घेतल्यावर का होत नाही?

अवांतर : माझ्या रिलायन्स मधील मित्रा कडून आलेला तिथे फिरत असलेला एक मेल मधला विनोद. एक माणूस देवा समोर हात जोडून म्हणत असतो " हे इश्वर,कुछ ऐसा कर की दुनिया का सारा दर्द मेरा हो जाये, कुछ ऐसा हो की दुनीया का सारा दुख मुझे मिल जाये, मेरी नींद हराम हो जाये और मै तुझे रोज याद करू, एक पल भी तुझे मै ना भूलू. कुछ ऐसा कर."
मूर्ती मधून आवाज येतो " अरे बालक इतना सब क्यो बोले जा रहा है? एक लाइन बोल ना, ठीक है तुझे रिलायन्स मे जॉब चाहिये? तथास्तू!!" Big smile

{(विषय दिलेला नाही)}

41

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud


*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!

माझा ब्लॉग - मन उधाण वार्‍याचे…

{ज्याला नोकरीच नव्हती त्याची. ज्याला मागील नोकरीत कमी पगार होता त}

42

ज्याला नोकरीच नव्हती त्याची. ज्याला मागील नोकरीत कमी पगार होता त्याला नवीन नोकरीत जास्त मिळाला.

हे साफ अमान्य. हा मुद्दा कोणत्याही आस्थापनाबद्दल खरे आहे केवळ खाजगी आस्थापनांनाच हे श्रेय का द्यावे? सहकारी तत्त्वावर चालणारे साखर कारखानेही या श्रेयाला पात्र होतील, सरकारी उपक्रम तर नक्कीच. मग खाजगी आस्थापनांचे काय विशेष.

१) खाजगी आस्थापनांचे विशेष हे की त्यासाठी लागणारा निधी हा व्यक्तीने परताव्याच्या अपेक्षेने दिलेला (स्वतःहून दिलेला) असतो. यात व्यक्ती गुंतवणूकदार म्हणून निर्णय घेते. व त्या निर्णयाच्या परिणामास स्वतः घेतलेल्या समभागांच्या प्रमाणात जबाबदार असते.
व्यक्तीच्या विचारपूर्वक निवड करण्याच्या वृत्तीस बक्षीस. व अविचारयुक्त निर्णयास दंडुका(तोटा).

२) सरकारी उपक्रमात करदात्यांनी दिलेला पैसा करदात्यांची परवानगी न घेताच या उपक्रमांकडे वळवलेला असतो. BHEL, BEL, NTPC, NHDC, RCF, FACT, SBI यासारख्या आस्थापनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सरकारने करदात्यांची परवानगी कधी घेतली होती ?
व सरकारकडे ही सगळी आस्थापने चालवण्यास आवश्यक असणारे इन्सेंटिव्ह्ज, कौशल्ये व मुख्यत्वे माहीती अपुरे असतात त्यामुळे यांमध्ये misallocation होते. परतावा अनेकदा मिळतच नाही. BEL, NTPC, NHDC, RCF, FACT, SBI यासारख्या आस्थापनांमध्ये गुंतवणूक झाली ती १९५०-९० या कालात. त्याचा कधी परतावा (उदा. लाभांश) मिळाल्याचे आठवतेय का ?

३) व सहकारी आस्थापने यात निधी बलपूर्वक घेतला जात नाही (गुंतवणूकदार स्वेच्छेनेच देतात) हे मान्य पण त्याची पुनर्गुंतवणूक (रीअलोकेशन) बलपूर्वक रोखलेली असते. म्हंजे (सगळ्याच) सहकारी आस्थापनांचे एकदा घेतलेले समभाग खुल्या बाजारात विकता येत नाहीत. जसे रीलायन्स चे समभाग विकता येतात तसे. त्यामुळे व्यवस्थापन जर निधी चा दुरुपयोग करत असेल तर त्यास दंड करण्याचा अधिकार एकदा समभाग घेतले की व्यक्ती/गुंतवणूकदार गमावून बसते. व म्हणूनच सहकारी संस्थांमध्ये भ्राष्टाचार बोकाळतो. The evil of Use of force triumphs over good intentions.

बलाचा वापर हे महत्त्वाचे कारण आहे. कारण बलाचा वापर हा मुळात स्वातंत्र्य विरोधी असतो.

The essential notion underlying capitalism is voluntary co-operation.
The essential notion underlying either socialism or "welfare state" is "use of force".
म्हणून सोशियलिझम, सहकारी संस्था, कल्याणकारी राज्य ह्या मुळात अनैतिक. यात काही लोकांच्या मते इतरांना जे महत्त्वाचे आहे ते पुरवण्याचा प्रयत्न करदात्यांकडून पैसे ओरबाडून घेऊन केलेला असतो.

सरकारी व सहकारी आस्थापनांपध्ये भ्रष्टाचार करण्यापासून व्यवस्थापनांना रोखणासाठी ज्या यंत्रणा उपलब्ध आहेत त्या वापरण्यासाठी सरकारला इन्सेंटिव्हज नसतात. खरं तर त्याविरुद्ध इन्सेंटिव्हज असतात.

खाजगी आस्थापनांमध्ये पण भ्रष्टाचार असतो. त्याचे मी समर्थन करत नाहिये. पण तो करण्यापासून व्यवस्थापनांना रोखणासाठी मार्केट मध्ये arbitrage, leveraged buyout सारख्या यंत्रणा उपलब्ध आहेत. दुर्दैवाने भारतात या यंत्रणा पुरेश्या विकसित झालेल्या नाहियेत. कारण आपल्याकडे भांडवल बाजारावर अजून खूप निर्बंध आहेत. इथे मी जे आहे त्यात त्यात काय नाही असा विचार करतो आहे.

आता तुम्ही म्हणाल की अमेरिकेत या यंत्रणा उपलब्ध असूनही सबप्राईम क्रायसिस का झाला ?
तर त्याचे मुख्य कारण सरकारी हस्तक्षेपच आहे. तुमच्या म्हणण्यानुसारच जे dis-advantaged आहेत त्यांचे पगार गेली चाळीस वर्षे कमी कमी होत गेले. कारण (चाळीस वर्षे) तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती झाली व जे कर्मचारी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करू शकले नाहीत त्यांची उत्पादनशीलता कमी झाली व त्यांचे पगार कमी कमी होत गेले. त्यांचे क्रयशक्ती रीस्टोअर करण्यासाठी त्यांना कमी व्याजदरात गृहकर्जे देण्याच्या योजना बनवल्या गेल्या (सरकारकडूनच). क्लिंटन (डावे) व बुश (उजवे) या दोघांनी ही या योजना राबवल्या. त्यात भर म्हणून ग्रीनस्पॅन यांनी सर्वंकश व्याजदर कमी ठेवला व त्यामुळे गृहकर्जे देण्याच्या योजना आणखी कमी व्याजदरात राबवल्या गेल्या. व हे दुष्टचक्र चालुच राहिले. त्यातूनच बबल निर्माण झाला.

सर्वंकश व्याजदर कृत्रीमरित्या दीर्घकाल कमी ठेवला की गुंतवणूकीवरील आवश्यक परताव्याचा दर कमी कमी होत जातो. आवश्यक परताव्याचा दर व अ‍ॅक्च्युअल परताव्याचा दर हे भिन्न आहेत. सबप्राईम क्रायसिस वर वेगळा धागा काढावा लागेल.

------------

नेहमीच उद्योगव्यवस्था सॉवरिन असावी असा आग्रह चूक आहे.

हे तर मी कधीच अमान्य केलेले नाही. म्हणूनच (क्लासिकल लिबरलिझम नुसार) राज्यघटना सर्वोच्च. राज्यघटना हा करार आहे व त्यात प्रत्येक नागरिक समान भागधारक (मतदान) आहे. म्हंजे ती राबवण्यासाठी ज्या व्यवस्थापनाची (मी, तुम्ही, आपण सर्व) निवड करतो त्याने माझ्याशी वागताना सर्वसामान्यपणे विनाकारण दुसर्‍या व्यक्तीला प्राधान्य द्यायचे नाही. व मलाही नाही.

----------

समाजात जन्मलेल्या प्रत्येक माणसाचे धारण करणे हे समाजाचे कर्तव्यच असते. याचा अर्थ असा नव्हे की त्याला आयते ताट वाढून द्यावे, पण निदान त्याला पोटापुरते मिळण्याची शाश्वती, संधी मिळेल अशी व्यवस्था निर्माण करावी लागते. आता ८०-८५ लोकांना ९०% पैसा नि उरलेल्या (समजा) तीन-चारशेंना १०% अशी विभागणी झाली तर समाजाच्या ज्या घटकातून हे तीन्-चारशे लोक येतात त्या समाजघटकातील व्यक्तींना वर चढण्यास संधीच मिळणार नाही हे उघड आहे.

समाजाचे कर्तव्य म्हंजे त्यातील व्यक्तींचे. बरोबर ?

आता ती जबाबदारी कोणी किती प्रमाणात पार पाडावी ही समस्या. आता दोन गट - १) लाभार्थी, २) बाकीचे.
लाभार्थींकडून योगदान मागणे व परत त्यांनाच पैसे देणे यातून निष्पन्न काहीच होणार नाही.
आता बाकीचे - जर प्रत्येकाने समान योगदान द्यावे म्हणावे तर काही लोकांना त्यांच्या आवकेच्या मानाने खूप द्यावे लागेल. आवकेच्या मानाने द्यावे असे म्हणाल तर ती आजची व्यवस्था झाली.

आजच्या व्यवस्थेत समस्या ही आहे की जे बाकीचे आहेत त्यातील अनेक जण काहीही योगदान देत नाहीत. व जे खूप श्रीमंत आहेत ते फारच देतात. व ते श्रीमंतांकडून वसूल केले जाते - बलपूर्वक. व हे मूलभूत तत्त्वाच्या विरुद्ध. काही लोकांकडून जास्त योगदान वसूल करणे व अनेकांकडून काहीच योगदान वसूल न करणे हे न्याय्य कसे ?

याचा अर्थ असा नव्हे की त्याला आयते ताट वाढून द्यावे, पण निदान त्याला पोटापुरते मिळण्याची शाश्वती, संधी मिळेल अशी व्यवस्था निर्माण करावी लागते.

निगेटिव्ह इन्कम टॅक्स ची कल्पना यासाठीच सुचवलेली आहे. व ही कल्पना उत्तम यासाठी की - त्यात भ्राष्टाचाराची शक्यता कमी. (भ्राष्टाचार अजिबात होणारच नाही असे नव्हे पण कमीतकमी ठेवणे सोपे जाईल) यात व्यक्तीच्या खात्यावरच ठराविक रक्कम जमा केली जाईल. कोणतीही स्कीम न राबवता थेट रक्कम देणे.

निगेटिव्ह इन्कम टॅक्स - मधे समस्या ही की त्यामुळे प्रचंड लोकसंख्या वाढ होईल व निगेटिव्ह इन्कम टॅक्स चा पुरता बोजवारा उडेल.
ती अव्यवहार्य होईल.

---------------------------

प्राईस सिस्टिम वापरायला सोपी नि एफिशिएंट असेल पण अतिशय तीव्र अशा स्वार्थाने प्रेरित असते त्याचे काय? आणि सिस्टम म्हणजे व्यवस्था या अर्थाने घेत असाल तर तिची कार्यपद्धती ठरवण्याचा हक्क सर्व भागधारकांना (Stake-holders) ना असायला हवा ना? आता अशा व्यवस्थेत तुम्ही आम्ही ग्राहक, चाकर हे ही येत नाही काय? तसेच ते सारे ग्रे कॉलर कर्मचारीही?

तिची कार्यपद्धती प्रत्येक जण ठरवतो. व प्रत्येकजण कमीअधिक स्वार्थाने प्रेरित असतो. प्रत्येक जण एकाच बाबतीत समान स्वार्थी नसतो. काही लोक घराला महत्त्व देतात काही जण सोन्यास, काही जण शेअर्स, तर काही रोख्यांना. प्रत्येक जण सिग्नल्स घेतो व देतो. उदा. ट्रॅफिक सिग्नल हा प्राईस सिस्टिम चा भाग झाला. कारण त्यातून सिग्नल्वर असलेल्या प्रत्येक व्यक्ती आपली अपेक्षा संक्रमित करत असते.

ज्या लोकांना तूर डाळ जास्त आवडते (तूर डाळीत ज्यांचा स्वार्थ दडलेला असतो ते) ते तूर डाळीसाठी जास्त पैसे द्यायची तयारी दर्शवून तूर डाळीचा भाव वाढवतात. त्यामुळे शेतकर्‍यांना सिग्नल मिळतो की ज्या वस्तूचा भाव वाढला तिची (इथे तूर डाळ) मागणी ही पुरवठ्यापेक्षा जास्त आहे. व त्यातले काही शेतकरी तूरडाळ लावण्याचा निर्णय घेतात.

मसूर डाळीचे ही असेच. शर्टचे ही असेच व स्कूटर चे ही असेच. जावा प्रोग्रॅमिंग चे व वीट बनवण्याचे ही असेच. गणित शिकवणार्‍यांचे असेच, मासेमारांचे ही असेच, तबलावादकांचे ही असेच व प्लंबर लोकांचेही असेच. सटोडियांचेही असेच. सर्व वस्तूंचे/सेवांचे असेच. म्हणून प्राईस सिस्टीम मध्ये आपण सर्वजण भागीदार आहोत.

-----------------------------
आमचा मुद्दा मूल्याबद्दलचा नाही 'किमतीबद्दल'चा आहे. मूल्यांनी पोट भरत नाही, गरजेच्या वस्तूंना मोजावी लागणारी किंमत ही महत्त्वाची

जर गरजेच्या वस्तू खरोखर गरजेच्या आहेत तर त्यांची किंमत जास्त असल्यास उत्पादक उत्पादन करण्याप्रति का आकर्षित होत नाहीत ? कारण त्यांना असे वाटते की या वस्तूंचे उत्पादन व वितरण यावर सरकारी बंधने इतकी आहेत की त्यांना विचारपूर्वक व्यवस्थापन केल्यास नफा मिळणार नाही.

---------------------
उच्चभ्रूंच्या अतिभोगाने वाढलेली अतिरिक्त मागणी नि त्यामुळे वाढलेल्या किंमती.

याला उत्तर म्हणून मी जर असे म्हंटले की गरीबांनी अतिरेकी प्रजोत्पादन केले त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव (मागणी प्रचंड असल्याने) गगनास भिडले (त्यात घर सुद्धा आले). तर ते माझ्याकडून गरिबांच्या स्वातंत्र्याचे उल्लंघन होईल व वॅल्यु जजमेंट ही.
कारण माझे सेंट्रल आर्ग्युमेंट हे आहे की कोणी किती भोग भोगायचे व कोणी किती बडेजाव करायचा व कोणी कोणती गोष्ट जास्त साठवायची/ उत्पादन करायचे हे ज्याचे त्याने ठरवावे.

व माझ्याकडून याचे उल्लंघन नाही होता कामा.

म्हणूनच कोणी किती भोग भोगायचे हे त्या व्यक्तीने ठरवणे श्रेयस्कर.
----------------------------------------

तुम्ही गणपा शेतकर्‍याबद्दल जे लिहिलेत त्यात समस्या ही आहे की त्याची जमीन शेतजमीन होती. ती शेतजमीनीची मालकी नसलेल्या व्यक्तीस विकणे नियमबाह्य करून त्याच्या जमिनीच्या ग्राहकांची संख्या कमी केली गेली. ग्राहकांची संख्या कमी झाली की मागणी कमी झाली. पण पुरवठा तेवढाच आहे. त्यामुळे त्याला त्याच्या जमीनीचा रास्त (बाजारभावाने) भाव मिळतच नाही. त्याला खरे तर बाजारभाव + कंट्रोल प्रिमियम दिला गेला पाहिजे. खाजगी क्षेत्रात अ‍ॅक्विझिशन करताना सिनर्जीच्या प्रमाणात कंट्रोल प्रिमियम दिला जातो.

मालमत्तेच्या अधिकाराचे हेच गमक आहे.


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

{एकदम अभ्यासपूर्ण चर्चा}

43

विचारांना चालना देणारी.

{अतिशय अभ्यासपूर्ण लेख आणि}

44

अतिशय अभ्यासपूर्ण लेख आणि चर्चा. वाचतो आहे.

- पिंगू

{वाचतोय....}

45

वाचतोय....


Ignited Mind ! हा माझा , माझ्या कवितांचा ब्लॉग आहे बरं का ! हास्य

{सुरेख.}

46

एक जबरद्स्त चर्चा मिळाली. अप्रतिम.

{शेतक-यांच्या आत्महत्त्येमागे}

47

शेतक-यांच्या आत्महत्त्येमागे लग्न-हुंड्यासाठी शेतीवरच खोटी कर्जे काढुन केलेला अवास्तव खर्च मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे. खोटी इर्शा व प्रतिष्ठा जपण्यासाठी कर्जबाजारी होणारे शेतकरी कोणाची तरी नक्कल करण्याच्या नादात वाहवत जातात. यासाठी श्रीमंतांनीच नीट पायंडा पाडुन दिला तर चांगले होणार नाही काय? कोणी कसा आणि कशासाठी खर्च करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण लग्नावरील खर्च अनुत्पादक आहे एवढेच. बाकी अंबानींनी बांधलेली वास्तु आणि त्यानुषंगाने मुळ लेखकाने लिहिलेल्या मुद्द्यांशी सहमत.

{गेले २ तास}

48

धागा वाचत होतो.

मा. रमताराम व मा. गब्बरसिंग यांचे वाद/प्रतिवाद वाचून समजवून घेतले. वाचन+मनन+चिंतन म्हणून २ तास लागले.

उत्तर दोघांनाही देत नाहीये, पण सोनावणी साहेबांना देतो आहे. याचे कारण म्हणजे पुढिल विधान :

शेतक-यांच्या आत्महत्त्येमागे लग्न-हुंड्यासाठी शेतीवरच खोटी कर्जे काढुन केलेला अवास्तव खर्च मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे.

या विधानाचे विश्लेषण संपूर्ण योग्य आहे. - ते असे :-

खोटी इर्शा व प्रतिष्ठा जपण्यासाठी कर्जबाजारी होणारे शेतकरी कोणाची तरी नक्कल करण्याच्या नादात वाहवत जातात.

पण यापुढे जे लिहिलेत, ते गंडले आहे असे मला वाटते.

यासाठी श्रीमंतांनीच नीट पायंडा पाडुन दिला तर चांगले होणार नाही काय? कोणी कसा आणि कशासाठी खर्च करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण लग्नावरील खर्च अनुत्पादक आहे एवढेच. बाकी अंबानींनी बांधलेली वास्तु आणि त्यानुषंगाने मुळ लेखकाने लिहिलेल्या मुद्द्यांशी सहमत.

लागोपाठ परस्पर विरोधी विधाने.
पायंडा नीट कुणी पाडायचा?
का?
नीट म्हणजे काय?
श्रीमंताघरी लग्न झालं, किंवा गोंधळ घातला अन गांवजेवण घातलं, तर पूर्वी हेवा वाटत नसे? हे आजकालच का होऊ लागले? मारवाड्याची होळी,फाल्गुन्,शिमगा मिळून तीन महिन्याचे व्याज आकारणारी कर्जे पूर्वी शेतकरी घेत नसत असे नाही? मग आजच का आत्महत्या होते?? आयुष्याशी झुंजण्याची हिम्मत कमी होत चालली आहे. असे मला वाटते.

असो.

मुद्दा अन धागा is about 'flaunting' your wealth.

मी पैसे कमावले. त्यावरील सर्व देणी : टॅक्स, कर्जावरील व्याज, जॉब मिळवण्यासाठीची अर्हता प्राप्त करतानाचे कष्ट, जॉब टीकवतानाची ओढाताण, कुटुंबाचे हाल.. मोठी यादी आहे.. इ.इ. केले.. मग का लाजू मी पैसेवाला आहे हे सांगायला? (वर कुणीतरी बहुधा रमतारामांनी म्हटले आहे:

आय टी एंजिनियर होण्यासाठी पतंगराव, डी वाय पाटलाच्या शैक्षणिक दुकानात जे अवाच्या सवा पैसे द्यावे लागतात ते कितीही हुशार असला तरी दोन एकर कोरडवाहू शेतीवर कुटुंब पोसणार्‍या बापाच्या पोराने कुठून आणायचे हो? त्याहिपुढे जाऊन गावाकडनं शेरगावात येऊन खाण्यापाण्याची सोय कोण करणार? अंबानीनी कधी विद्यार्शी सहायक समितीसारख्या संस्थेला मदत केल्याचे ऐकिवात आहे का? व्यवसाय हा सर्वस्वी स्वार्थावर आधारलेला असतो साहेब.

आयुष्य परमार्थावर आधारित आहे का हो? नाही. ते स्वार्थावर आधारित आहे. बिरबल अन माकडीणीचे पिल्लू वाली गोष्ट आठवा. निळ्या हिरव्या पांढर्‍या पिवळ्या कॉलर्स गळा आवळत नाहीत तोवर सग्ळा कॅपिटलिझम्/सोशलिझम्/कम्युनिझम सुचतो. शेवटी सुचते फक्त 'सेल्फ प्रिझर्वेशन'
हां. कुणी चोर दरवडेखोर माझे पैसे हिसकावून घेईल अशी भिती आहे म्हणून्, किंवा सरकार जप्त करील, काळा आहे म्हणून पैसा लपवून ठेवणारे असलात तर त्याला माझा इलाज नाही. तिथे परत सेल्फ प्रिझर्वेशन येते. मी पैसे कमावतो. मी माझ्याकडे मी कमावलेले पैसे आहेत हे तोंड वर करून सांगतो. मला लाज वाटत नाही.

रच्याकने: पतंगरावाच्याच शाळेत जाऊन आय्टी इंजिनेर होतो का माणूस? तो या दोन अंबाणींचा बाप पेट्रोलपंपावर पेट्रोल भरणारा पोर्‍या होता म्हणे??

शेवटी, धाग्याचा विषय पुन्हा वाचा असे म्हणतो :
इतरांनी बडेजाव करू नये हे तुम्ही का सांगताय ?

अहो, "ते" टाटांनी, अंबानींना सांगितलं आहे. its OLD money talking to nouveau riche.
आपण फुकट लंगोट बांधून कुस्त्या का लढायलोत इथे? जेवढी कमावली आहे, ती दाखवा.
जर सगळे पुरूषार्थ वापरले असतील, तर there is nothing wrong in flaunting your wealth. अहो, धर्म, अर्थ, काम, मोक्ष.
पहिले दोन च बोलतो आहोत.
धर्माने वागून अर्थ कमावलात ना? मग त्याचे प्रदर्शन करताना लाजू नका. (चोरीची असेल तर आपोआप बोंब पडते. रिलायन्स चे बंद पडलेले पेट्रोल पंप रस्तो रस्ती आहेत. अन रिलायन्सच्या पेट्रोकेमिकल्स कं. च्या शेअर्स मधे मी लाखो कमावलेही आहेत wink)
लाजलात तर अधर्माचा वास येतो...


"To feel superior to other humans, which I often do, I need a better reason than color of my skin." -Archie Goodwin.

{आयुष्य परमार्थावर आधारित आहे का हो? नाही. ते स्वार्थावर आधारित आ}

49

आयुष्य परमार्थावर आधारित आहे का हो? नाही. ते स्वार्थावर आधारित आहे. बिरबल अन माकडीणीचे पिल्लू वाली गोष्ट आठवा.

यात स्वार्थापेक्षा स्वहितसंबंध हा शब्द जास्त संयुक्तिक आहे. व बरेच अर्थशास्त्री तोच वापरतात. एखादा माणूस उदा. ठाकुर बलदेवसिंग) आपल्यामागे प्रचंड इस्टेट ठेवून जातो ती त्याच्या नातलगांना मिळते. अनेकदा अपत्यांना. त्या माणसाने मृत्युपत्र केले असेल व त्याद्वारे ती वाटली असेल तर त्यात त्या माणसाचा (बलदेवसिंग) स्वार्थ खरोखर किती असतो?

Intergenerational Altruism म्हणतात इस्टेट मागे ठेवून जाण्यास. (प्रश्न असल्यास विचारा.)


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

{ते वाक्य}

50

व्यवसाय स्वार्थावर अवलंबून असतो, यावर उत्तर म्हणून होते.

माकडीण शेवटी पिलाचा जीव घेऊन स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करते या अर्थाने. इथे तिने पिलाकरता काय मृत्यूपत्र केले ते अवांतरच होईल.


"To feel superior to other humans, which I often do, I need a better reason than color of my skin." -Archie Goodwin.

{रोचक}

51

रोचक चर्चा होऊन गेली आहे.
लिहिण्यासारखे बरेच वर आलेले आहेच तेव्हा वरातीमागून घोडे दामटत नाही! हास्य

माझी भुमिका गब्बरसिंगजींइतकी प्रो-भपकेबाजी wink नसली तरी 'साधी रहाणी उच्च विचारसरणी' पणाच कसा ग्रेट आहे वगैरे मताचाही मी नाही. असो.


-ऋ

{नाही..}

52

रा.रा. गब्बरसिंगांच्या लेखांच्या दीर्घकालीन वाचनानंतर मला जाणवलं आहे की ते प्रो-भपकेबाजी किंवा प्रो-काहीही नसून व्यक्तिस्वातंत्र्यवादी आहेत. त्यामुळे मग वेश्यागमन असो, विवाहबाह्य संबंध, गे, अफाट खर्च, शोबाजी किंवा अन्य काही.. ज्यातून इतरांना उपद्रव नाही त्याविषयी कोणी कोणाला विचारण्याचा हक्क नाही असं त्यांचं आयडियलिस्टिक पण योग्य मत आहे.

{+१ असेच म्हणतो.}

53

हास्य

+१ असेच म्हणतो.


Hope is a good thing...

{असेल बॉ}

54

असेल बॉ तसंही असेल. दरम्यानच्या काळात काहि तांत्रिक कारणाने मीमवर येता येत नव्हतं त्यामुळे त्यांचं लेखन मी फारसं वाचलेलं नसल्याने माझा असा समज झालेला असु शकतो. हास्य


-ऋ

{चर्चा मुद्दाम उकरून वर काढली आहे}

55

कारण फक्त दोघांचेच मुद्दे (मोस्टली) दिसलेत. अन बर्‍याचदा विसंगतीही दिसत आहेत. अजून इतर कुणाचे दृष्टीकोण यात येतील तर बरे होईल असे वाटते.
मूळ कारण-विषय जरी जुना झालेला असला, तरीही स्वकष्टार्जित राजस्य स्वयमेव मृगेंद्रता ही ओरडून सांगावी, की शेळीचे सोंग घेऊन जगावे हा मूळ द्विधा करणारा विषय तसाच आहे. फक्त दोन्हीकडून बोलणे झाले आहे. सूर एकंदर पैसेवाल्यांविरुद्ध असल्यासारखा दिसतो आहे, अन त्याच वेळी समाज्/साम्यवाद्यांना नावे ठेवणेही आहे... चर्चेचे फलित काय? किंवा किमान समारोप तरी व्हावा अशी नम्र अपेक्षा आहे.


"To feel superior to other humans, which I often do, I need a better reason than color of my skin." -Archie Goodwin.

{म्हातारबाबा व गब्बरशींग यांना}

56

म्हातारबाबा व गब्बरशींग यांना परत आवतन करत आहे..

{ अन बर्‍याचदा विसंगतीही दिसत आहेत.}

57

अन बर्‍याचदा विसंगतीही दिसत आहेत.

विसंगती बद्दल लिहा ना. खूप आवडेल वाचायला व शक्य असल्यास सुधारायला.


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

{...}

58

असहमत! गब्बरसिंग कशाला प्रो आहेत,कशाचे समर्थन करतात , ते अगदी उघड आहे.त्यांच्या लिखाणातून ते दिसतेच.त्यांनी ही ते दडवायचा प्रयत्न केलेला नाही.

त्यांना व्यक्तिस्वातंत्र्यवादी म्हणण्यापेक्षा स्वस्वातंत्र्यवादी म्हणणे योग्य ठरेल. वैयक्तिकता,व्यक्तिगतता अणि हक्क ह्यांनाच स्वातंत्र्याचे स्वरूप देऊन त्यांनी स्वातंत्र्य ह्या शब्दाचा अर्थ फ़ारच संकुचित करून टाकला आहे. स्वातंत्र्य ही वैयक्तक्तिक अथवा व्यक्तिगत बाब नाही हे त्यांच्या लक्षात येत नाही.व्यवस्थेमध्ये ते परस्पर साहचर्यावर,विश्वासावर अवलंबून असणे अभिप्रेत आहे. अगदी व्यवस्थाविहीन समूहजीवनाची(पॅराडॉक्सिकल ? ? ?) कल्पना केली तरी त्यात सुध्दा स्वातंत्र्य हे इतरांच्या सहकार्या शिवाय शक्य नाही. पण गब्बरसिंग ज्या व्यवस्थेचे समर्थन करतात त्या व्यवस्थेचे समर्थक नेहमीच स्वातंत्र ही त्यांनी इतरांना द्यायची गोष्ट आहे असे मानतात.

असो,ह्या निमित्ताने गब्बरसिंग ह्यांना एक प्रश्न!

स्वातंत्र्य म्हणजे काय?

मी तुम्हाला अगदी व्याख्या विचारत नाही पण तुम्ही नक्की स्वातंत्र्य कशाला म्हणता हे जाणून घ्यायची इच्छा आहे म्हणून,

स्वातंत्र्य ही वैयक्तिक(स्वत: व्यतिरिक्त इतर कोणाचाही संबंध नसलेली ,इतर कोणावर ही अवलंबून नसणारी) गोष्ट आहे काय?

हाच प्रश्न वेगळ्या प्रकारे(संदर्भ... तुमची आणि माझी व्य.नि. मधील इच्छा आणि पर्याय ह्या बद्दलची चर्चा..)
स्वातंत्र्य म्हणजे,

पर्यायातून एक निवड करण्याची मुभा असणे

की

पर्यायातून निवड करण्याची सक्ती नसणे?

की,
...आणि काही? wink


..............................................................

क्या फर्क पडता है?

{...}

59

त्यांना व्यक्तिस्वातंत्र्यवादी म्हणण्यापेक्षा स्वस्वातंत्र्यवादी म्हणणे योग्य ठरेल. वैयक्तिकता,व्यक्तिगतता अणि हक्क ह्यांनाच स्वातंत्र्याचे स्वरूप देऊन त्यांनी स्वातंत्र्य ह्या शब्दाचा अर्थ फ़ारच संकुचित करून टाकला आहे.

अहं. व्यवस्थाविरहित परिस्थितीमधे (शब्द अधोरेखित मुद्दाम केला आहे) नेगोशिएशन, देवाणघेवाण नसते. वाघ सश्याला खाण्यापूर्वी कोणती नेगोशिएशन करेल ? सशाला आपले प्राण प्रिय असतील तर तो वाघाने खाऊ नये म्हणून बदल्यात (वाघास) काय ऑफर करेल ?

-----
व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे अशासाठी की सहकार्य सहज शक्य व्हावे.

अधिकार म्हंजे काय -

पायरी १) मी जेव्हा दुसर्‍या व्यक्तीवर बलप्रयोग न करण्याचे माझे कर्तव्य मान्य करतो तेव्हा त्या व्यक्तीस तो अधिकार म्हणून मिळतो.

पायरी २) दुसरी व्यक्ती जेव्हा माझ्यावर बलप्रयोग न करण्याचे तिचे कर्तव्य मान्य करते तेव्हा मला अधिकार मिळतो.

पायरी ३) जेव्हा वरील २ पायर्‍या प्रत्येक व्यक्ती (प्रत्येक इतर च्यक्तीबरोबर) मान्य करू इच्छिते तेव्हा ते संविधानातील एक कलम बनते. लक्षावधी काँट्रॅक्ट्स करावी लागू नयेत म्हणून.

-----

स्वातंत्र्य ही वैयक्तक्तिक अथवा व्यक्तिगत बाब नाही हे त्यांच्या लक्षात येत नाही. व्यवस्थेमध्ये ते परस्पर साहचर्यावर,विश्वासावर अवलंबून असणे अभिप्रेत आहे. अगदी व्यवस्थाविहीन समूहजीवनाची(पॅराडॉक्सिकल ? ? ?) कल्पना केली तरी त्यात सुध्दा स्वातंत्र्य हे इतरांच्या सहकार्या शिवाय शक्य नाही.

अलबत. प्रश्नच नाही. सहकार्याचा प्रतिवाद करण्याचा प्रश्नच नाही. You are refuting propositions no one has asserted. [उलट ट्रांजॅक्शन कॉस्ट (Transaction Cost) चा सिद्धांत सहकार्य कोठे, कसे होते व त्यात कोणत्या अडचणी येतात व त्यांचे निराकरण कसे होते याबाबतच आहे.]

... requires a vast system of social cooperation that is, and can only be, coordinated chiefly by market prices. Insofar as taxes distort these prices and thwart incentives, social cooperation is diminished.

----

स्वातंत्र्याचा अर्थ - (अर्थ थोडक्यात सांगणे कठिण आहे कारण गृहीतके मधे येतात. पण प्रयत्न करतो.)

०) प्रजातंत्र आहे हे गृहित धरले तर - काही अधिकार हे non-waiveable असतात व असावेत अशी अपेक्षा आहे. (उदा. Individual cannot waive his/her right to remain free of being enslaved to other individual(s).)

१) सर्वसामान्यपणे बलप्रयोगाचा/सक्तीचा अभाव म्हंजे स्वातंत्र्य.

२) उपलब्ध विकल्पांपैकी एक किंवा अनेक निवडण्यास व्यक्ती तयार सेल तर विकल्प निवडण्याची सक्ती नसणे म्हंजे स्वातंत्र्य.

३) प्रजातंत्र आहे हे गृहित धरले तर - हव्या त्या पार्टी बरोबर काँट्रॅक्ट करण्याचे स्वातंत्र्य. काँट्रॅक्ट हे विकल्पांची देवाणघेवाण करण्याचे माध्यम आहे. काँट्रॅक्ट मुळे कदाचित एका पार्टीचे आजचे विकल्प कमी होतील व उद्याचे वाढतील. काँट्रॅक्ट हे एकप्रकारे स्वातंत्र्यावर घातलेले बंधनच आहे. पण सर्वसामान्यपणे ते तात्कालिक असते. कायमचे नसते.

४) प्रजातंत्र आहे हे गृहित धरले तर - "काँट्रॅक्ट बाहेरील सक्तीचा अभाव" - म्हंजे स्वातंत्र्य. (आता तुम्ही म्हणाल की ४ हे काहीसे १ च्या विरोधात जाते. पण ते तसे नाही.)

Contractual Obligations ची पूर्तता करण्याची सक्ती करावीच लागते. म्हंजे मी जे आधीच मान्य केलेय ते मला पाळावेच लागेल. (मी जे आधीच "करायचे/न करायचे" मान्य केलेय ते इतरांचे अधिकार व माझे कर्तव्य.)

पण मी जे "करण्याचे/न करण्याचे" मान्य केलेले नाही काँट्रॅक्ट केलेले नाही ते करण्याची सक्ती नसणे म्हंजे स्वातंत्र्य. याउप्पर मला जे करावेसे प्रकर्षाने वाटते ते मी करेन.


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

{गब्बरसिंग तुम्ही काय म्हणता}

60

गब्बरसिंग तुम्ही काय म्हणता ते समजले.माझा मुद्दा जरा वेगळा होता.

तुम्ही संपुर्ण व्यवस्थेऎवजी घटना किंवा अशाच दुसया उपव्यवस्थेला केंद्रस्थानी ठेऊन तिलाच प्रमाणभूत मानता.त्यामूळे तुमच्या लेखी स्वातंत्र्य ह्या शब्दाची व्याख्या “त्या उपव्यवस्थेने दिलेले हक्क , अधिकार यांची अंमलबजावणी” ह्यापुरतीच मर्यादित राहते.
असो,मला तुम्हाला असे विचारायचे आहे..
जी,व्यवस्था वा उपव्यवस्था,हक्क,अधिकार आणि पर्यायाने स्वातंत्र्य ह्यांचे वाटप करते,त्या साठी व्यवस्था नक्की कोणता निकष वापरते?(क्षमता हे बळी ते कान पिळी ह्या उक्तीचे अतिशय गोजिरवाणे गोंडस नाव आहे.)

कोणतीही व्यवस्था, उपव्यवस्था जी हक्क,अधिकार आणि पर्यायाने स्वातंत्र्य ह्यांचे समान वाटप करायला नकार देते ती व्यवस्था, उपव्यवस्था नैसर्गिक समानतेच्या न्यायतत्वाचा उपमर्द करते असे तुम्हाला वाटते का ?

ह्या हक्क ,अधिकार आणि स्वातंत्र्य ह्यांच्या असमान वाटणीला तुम्ही व्यवस्थेमधील दोष,त्रूटी मानत नाही हे मला माहीत आहे.पण मला तो दोष वाटतो. हा दोष दुरुस्तीच्या कक्षेत आहे असाही भाबडा आशावाद माझ्या मनात नाही.कशीही असेल व्यवस्था आपण आपल्या अपरोक्ष,नाईलाजाने,स्वेच्छेने,अगतिकतेने स्विका्रतोच.व्यवस्थेला नकार द्यायचे स्वातंत्र्य आपल्याला नाहीच. पण जे स्वीकारलेले असते म्हणून ते (व्यवस्था, उपव्यवस्था) समर्थनीय असतेच असे नाही.
जेंव्हा व्यवस्था क्षमतेनुसार हक्क आणि अधिकार देउ करते तेंव्हा पहिल्यांदा स्वातंत्र्यावर मर्यादा आणते.परत हे मर्यादित स्वातंत्र्य परत आधीच्या कमकुवत क्षमतांवर आघात करते.मग परत ह्या जास्त दुबळ्या झालेल्या क्षमतेनुसार हक्क आणि अधिकार ह्यांची वाट्णी..परत आणि स्वातंत्र्याचा जास्त संकोच….हे विच सायकल तुमच्या लक्षात येत नसेल हे मला पटत नाही.त्यामूळे तुमचा नेहमीचा विशिष्ट व्यवस्थेच्या समर्थनेचा जयजयकार जरा जास्त खटकतो.जे स्विकारलेले असते ते समर्थनीय असतेच असे नाही.

हा धागा बडेजाव च्या बाबतीत आहे म्हणून सांगायचे झाले तर..
जे जे नैसर्गिक समानतेच्या न्यायतत्वाला बाधा आणते ते ते धिक्कारणीयच असते. त्यामूळे टाटा म्हणतात ते बरोबरच आहे.

आता प्रश्न असेल बडेजाव करू नये असे म्हणण्याचा हक्क कूणी दिला असे असेल तर?
हक्क ही कोणी कोणाला ,इतरांनी तुम्हाला,तुम्ही इतरांना द्यायची गोष्ट नाही.

तसे असेल तर, हा प्रश्न विचारायचा तरी हक्क तुम्हाला कोणी दिला?


..............................................................

क्या फर्क पडता है?

{माझा अर्थशास्त्र, कम्युनिझम,}

61

माझा अर्थशास्त्र, कम्युनिझम, कॅपिटलिझम इत्यादी विषयांवर फार अभ्यास नाही. पण तरीही इथे चर्चा करणार्‍यांना एक सुचवू इच्छिते... केन फॉलेट लिखित "फॉल ऑफ जायंट्स" हे पुस्तक (कादंबरी) आपण जरूर वाचावे. पहिले महायुद्ध सुरू होण्यापूर्वी युरोप आणि अमेरिकेत काय परिस्थिती होती, महायुद्ध कोणत्या परिस्थितीत झाले, त्याचे युरोपातील देशांवर आणि अमेरिकेवर काय परिणाम झाले, रशियात क्रांती होण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या इत्यादी गोष्टींचे तपशिलवार चित्रण यात लेखकाने केले आहे. ते वाचल्यावर इथे मुद्दे मांडणार्‍यांना चर्चेचे फलित अधिक चांगल्या पद्धतीने काढता येईल असे मला वाटते.

{फॉल ऑफ जायंट्स}

62

फॉल ऑफ जायंट्स - नजिकच्या ग्रंथालयाचा कॅटलॉग शोधून पाहिला व त्यात हे पुस्तक आहे असे दिसते. आज उद्या घेऊन येतो. मी कादंबर्‍या/कथा फार वाचत नाही ... पण ही वाचण्याचा प्रयत्न करतो. नाहीच जमले तर बायको ला देतो. तिला आवडतात कादंबर्‍या. सध्या ती "गुलग आर्चिपेलागो" ही अलेक्झांडर सोल्झेनित्सिन यांची कादंबरी वाचत्ये (शिफारस माझीच होती हास्य ... मी "गुलग बद्दल खूप ऐकले होते. प्रसिद्ध अर्थशास्त्री दिवंगत मिल्टन फ्रिडमन यांनी ह्या कादंबरीचा उल्लेख केला होता त्यांच्या एका भाषणात.).

फॉल ऑफ जायंट्स - Summary - Follows the fates of five interrelated families--American, German, Russian, English, and Welsh--as they move through the dramas of the First World War, the Russian Revolution, and the struggle for women's suffrage.


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

{हम्म}

63

आमची नि गब्बरची चर्चा खासगी आस्थापनांबद्दल चालू असताना त्यात पैसेवाल्यांबद्दल निषेध वा विरोध असल्याचा निष्कर्ष काढला गेलेला पाहून अंमळच नव्हे तर खूपच मौज वाटली. कदाचित पैसा हा फक्त खासगी आस्थापनांकडेच असतो वा तिथूनच मिळू शकतो असे गृहितक असल्यास न कळे. असो.

आमच्या दृष्टीने चर्चा ही निष्कर्ष काढण्यासाठी नव्हे तर मते तपासून पाहण्यासाठी, दुरुस्त करण्यासाठी असते. निष्कर्ष काढण्याची घाई सुरू झाली की आम्ही रणांगण सोडून पळ काढतो. पळपुटेच आम्ही. पण ते असो.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{आमच्या दृष्टीने चर्चा ही निष्कर्ष काढण्यासाठी नव्हे तर मते...}

64

आमच्या दृष्टीने चर्चा ही निष्कर्ष काढण्यासाठी नव्हे तर मते तपासून पाहण्यासाठी, दुरुस्त करण्यासाठी असते. निष्कर्ष काढण्याची घाई सुरू झाली की ....

काकाजी देवासकरांची आठवण झाली. (शिकारीचा मजा नेमका कशात आहे... याबद्दल त्यांचे मत त्यांनी व्यक्त केले होते...)


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

{एवढी सविस्तर व मुद्देसुद}

65

एवढी सविस्तर व मुद्देसुद चर्चा खूप काळानंतर अनुभवतो आहे.
चर्चेत रस आहे, वाचतो आहे.