कोणता झेंडा घेवू हाती ????

0
0

कोणता झेंडा घेवू हाती ????

खरचं सध्याची परिस्थिती अशी झाली आहे ... आज एक ना दोन ..हजारो प्रश्न राज्यापुढे ,देशापुढे आ वासुन उभे आहेत ... राजकारण्यांचे आपापसातील हेवेदावे, एकमेकांवर कुरघोडी, शह-काटशह, आरोप-प्रत्यारोप या सगळ्यांमध्ये सामान्य लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ कुणाकडे आहे ?

राज्यात पाण्याची समस्या असो की विजेची की शेतकर्यांच्या-विद्यार्थ्यांच्या आत्महत्या ... याची कुणाला फिकीर नाही ... शाहरूखचा सिनेमा कसा सुरळीत चालेल किंवा चालणार नाही याकडे सत्ताधारी आणि विरोधक दोहोंचे लक्ष ... घोषणाबाजी , हे-ते, अरे काय चाललयं काय ??

देशपातळीवरही काही वेगळी परिस्थिती नाही .. महागाई , पाकिस्तान, दहशतवाद यांवर उपाय शोधणे राहिले दूर ... कुणाचा दोष आहे यावरचं चर्चा ... "जर आजार कळला आहे, तर औषधे सुरु करा", भांडताय काय की कशामुळे झाला ?मान्य आहे की कारणं शोधली पाहिजेत ...पण उपाय तरी सुरु करा ... जर जनतेनं तुम्हाला निवडून दिले आहे, तर योग्य-अयोग्य निर्णयांची जबाबदारी सगळ्यांची हवी ..परस्परांवर आरोप करून काय फायदा ?

जेव्हा सत्ताधारी आणि विरोधक दोहोंचेही लक्ष नाही तेव्हा लोकशाहीचा चौथा स्तंभ करतोय तरी काय ? राजकीय पक्षांना वाहीलेले[?] न्यूज चॅनेल्स तर आज कॉमेडी चॅनेल्स बनले आहेत .. नि:पक्षपाती असे एक तरी न्यूज चॅनेल आहे का ? बरं त्यांची पण आपापसात स्पर्धा ... टी.आर्.पी आणि दुसर काय काय ?

कंटाळा कंटाळा आलाय सगळ्याचा !!! अशा सगळ्या परिस्थितीत योग्य वाट कोण दाखवील काय ?

{कंटाळा कंटाळा आलाय सगळ्याचा}

1

कंटाळा कंटाळा आलाय सगळ्याचा !!

मला ही.

{कंटाळा कंटाळा आलाय सगळ्याचा !!! }

2

अरे अगदी असेच म्हणावेसे वाटते...
अशा सगळ्या परिस्थितीत योग्य वाट कोण दाखवील काय ?

कोण दाखवणार??? आणी दाखवली तरी तो फक्त दाखवणार... त्या वाटेवर चालत तुम्हालाच जायचय...
बाकी तुम्हाला जे मिळते जसे मिळते त्यासाठी फक्त तुम्हीच कारणीभुत आहात.. बदल हा स्वःता पासुन व्हायला पाहिजे.
एवढेच म्हणावेसे वाटते....


-निखिल

{असेच म्हणतो.}

3

असेच म्हणतो.


Hope is a good thing...

{अंशतः मान्य आहे}

4

मान्य आहे की वाटेवरून मलाच चालायचे आहे .. "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार" हेही मान्य !!!
पण
>> बदल हा स्वःता पासुन व्हायला पाहिजे
नक्की काय बदल करायचा ? डोळे बंद करुन आजूबाजूला जे चालले आहे ते तसेच चालू द्यायचे ? स्वतःचा "रिमोट" करायचा ?
अहो आम्ही भले "optimistic" बनू ..पण किती वेळ .. काही मर्यादा आहेतचं की

{डोळे बंद करुन आजूबाजूला जे}

5

डोळे बंद करुन आजूबाजूला जे चालले आहे ते तसेच चालू द्यायचे
When you cant change the system, accept the fact that you are responsible for the system

नक्की काय बदल करायचा ?
आपण किती वेळा मतदान केले आहे???? आपण आपला राजकारणी निवडता का????
जे आजुबाजुला चालु आहे त्या बद्दल आपण बोलताय त्या बद्दलच्या फॅक्ट्स जाणुन घ्यायचा आपण प्रयत्न केला आहे का?? राजकारणीच फक्त भ्रष्ट आहेत का???

अहो आम्ही भले "optimistic" बनू ..पण किती वेळ .. काही मर्यादा आहेतचं की
pessimist बनुन काय साधणार... तुझी तळमळ चांगली आहे रे... पण अश्या चर्चांचे आउट्कम फारसे काही नाही हे जाणवते.


-निखिल

{सहमत.कुठल्याश्या सिनेमातल}

6

सहमत.
कुठल्याश्या सिनेमातल वाक्य आहे "अगर सिस्टीम को बदलाना चाहते हो तो सिस्टीमे रेहेके बदलो".
नुसत्या आपापसात अश्या चर्चा करुन काय साध्य होणार?
मला फार पुर्वी पासुन वाटत की सध्या एखाद्या पक्षाच सरकार असण्या पेक्षा सर्व पक्षीय सरकार आसाव आणि त्यात फकत चांगल्या नेत्यांनाच मंत्रीपद आसाव. कारण जसे सगळ्याच पक्षात नासके नेते असतात तसेच त्यांच्यात कही चांगले नेते ही असतात. प्रत्येक मंत्र्याला त्याच्या पदाच्या कार्याचा (मंत्रीपदाचा नव्हे) अनुभव वा किमान त्याची शिक्षणीक पात्रता असावी. उदाहरणच द्यायच झाल तर देशाचा संरक्षण मंत्री तोच असावा ज्याने सैनात काही वर्ष सेवा केली असेल. आरोग्यमंत्री डॉक्टर, बांधकाम मंत्री सिव्हिल इंजिनीयर (अगदी गवंडी असला तरी चालेल) असावा.
(फारच स्वप्न रंजन आहे हे.)


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

{आयडियॉलॉजी ...}

7

>> मला फार पुर्वी पासुन वाटत की सध्या एखाद्या पक्षाच सरकार असण्या पेक्षा सर्व पक्षीय सरकार आसाव आणि त्यात फकत चांगल्या नेत्यांनाच मंत्रीपद आसाव.
हे फारच आयडियालॉजी झाली शेठ.
तसं असेल तर लोक राजकारणात पडतीलच कशाला ?
अहो आपल्या कंपनीत पण "फक्त हुशार आणि कमिटेडे लोकांनाच प्रमोशन" हे फॉलोव्ह होते का ?
गावच्या गल्लीतल्या गणेशोत्सवात खजिनदार हटकुन एखादा टग्याच का असतो ?

प्रत्येक मंत्र्याला त्याच्या पदाच्या कार्याचा (मंत्रीपदाचा नव्हे) अनुभव वा किमान त्याची शिक्षणीक पात्रता असावी. उदाहरणच द्यायच झाल तर देशाचा संरक्षण मंत्री तोच असावा ज्याने सैनात काही वर्ष सेवा केली असेल. आरोग्यमंत्री डॉक्टर, बांधकाम मंत्री सिव्हिल इंजिनीयर (अगदी गवंडी असला तरी चालेल) असावा.

अनुभव असावा हे ठिक मात्र त्या क्षेत्रातला एक्सपर्ट नसेल तर उत्तम असे आम्हाला वाटते.
कारण एकदा सत्ता हातात आली भल्याभल्यांचे डोळे फिरतात ...

जाता जाता एक जोक, आमच्या कालेजाचय हॉस्टेलात लाईट वगैरे गेली किंवा काही रिवायरिंग करायचे असले तर आम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणाहुन "इलेक्ट्रिक इंजिनियर्स"ना हाकलायचो. wink
असो.

{मान्य डॉण्राव, म्हणुनच तर ते}

8

मान्य डॉण्राव, म्हणुनच तर ते शेवटच कंसातल वाक्य आहे ना हॅ हॅ हॅ wink


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

{अशा सगळ्या परिस्थितीत योग्य वाट कोण दाखवील काय ?}

9

नक्की कुठे जायचे आहे? का जायचे आहे? तिथे गेल्यावर काय करणार आहात? अजुन पर्याय काय आहेत? इ इ प्रश्न विचारु लागा स्व:ताला.

हळु हळू मार्गक्रमण करायला लागा, योग्य मार्गाला लागाल. झेंडा /ओझे /पुर्वग्रह न घेता चालू पडलात तर इप्सित(??) स्थळी लवकर पोचाल.

शुभेच्छा!

{+१}

10

असेच म्हणतो हास्य

{खरे आहे. आम्हाला कशाचीच काही}

11

खरे आहे. आम्हाला कशाचीच काही तसे म्हटले तर पडली नाहीये. आम्हाला २ वेळचा आमटीभात सुखाने मिळतो. त्यात जर काही समस्या आली तर सदर लेखावर प्रतिक्रिया देऊ. असो.


-पुण्याचे पेशवे

{खरं तर...}

12

प्रत्येकानं स्वतःचाच झेंडा खांद्यावर घ्यावा पण दुसर्‍या झेंड्यावद्दल आदर पण ठेवावा हे उत्तम. अभिमान आणि अभिनिवेश यात फरक असतो पण फार धूसर.

परिस्थिती खरच चिंताजनक आहे. पण खरच डॉक्टर, इंजिनीअर यासारखे प्रोफेशनल नेते किंवा मंत्री होऊन काय फरक पडणार? अहो सध्याचे पंतप्रधान स्वतः अर्थतज्ञ आहेत पण म्हणुन महागाई कमी झालीये की आर्थिक प्रश्न सुटलेत? खरी गरज आहे ती एकसंध जागृत समाजाची, समाजाशी आणी फक्त समाजाशी बांधीलकी ठेवणार्‍या नेतृत्वाची अन प्रामाणीक प्रोफेशनल्स, नोकरशहांची. ते झाले की पुरे. पण ही दिशा देणार तरी कोण अन कसे. इथेच मला वाटते आय टी एक्स्प्लोजन महत्वाची भुमीका बजावु शकते पण सध्या तरी आयटी ही शहरी लोकांचीच मक्तेदारी आहे. हे चित्र बदलायला हवे.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

{पण सध्या तरी आयटी ही शहरी}

13

पण सध्या तरी आयटी ही शहरी लोकांचीच मक्तेदारी आहे. हे चित्र बदलायला हवे.
थोडीशी अवांतर म्हणता येवु शकते पण...
http://beta.thehindu.com/business/Economy/article103591.ece


-निखिल

{इथेच मला वाटते आय टी}

14

इथेच मला वाटते आय टी एक्स्प्लोजन महत्वाची भुमीका बजावु शकते

तुमच्या मताबद्द्ल आदर.... पण कशा पद्धतीने ?

{अहो!}

15

नेते, माध्यमे, नोकरशाही सर्वांचीच समाजाबरोबरची नाळ तुटलीये. सामान्य माणुस बर्‍याचदा गंभीरपणे विचार करतो पण त्याला व्यक्त करण्यासाठी फोरम नाहीये. त्याला हवी ती माहिती मिळत नाहीये अन असलेली माहिती इतरांपुढे नेता येत नाही. अश्या परिस्थितीत आयटी एक्सप्लोजनने त्याला स्वतःचे माध्यम दिलेय... जालाचे. अन त्याचा सुयोग्य वापर जसजसा वाढत जाईल तसतशी माहितीची देवाण घेवाण वाढेल. त्यातुनच जागरुकता येऊ शकेल असे मला वाटते. अर्थातच हे फ्युच्युरिस्टीक अन ऑप्टीमिस्टीक चित्र आहे पण शेवटी माणुस आशेवरच जगतो ना?


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

{हम्म.}

16

हम्म.

{व्यक्तीश:}

17

मी स्वतः इंटरनेट आणी माहितीचा अधिकार कायदा याबाबत आशावादी आहे. मला त्यात नवी पहाट दिसते.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

{प्रतिक्रिया}

18

लिखाणातल्या भावना जरी समजल्या तरी "कंटाळा आला सगळ्याचा" ही एक क्षणैक विचार , केवळ अस्थायी अवस्था म्हणूनच सहानुभूती दर्शविण्याजोगी आहे.

सर्वत्र अंधारून आलेले असताना छोट्या छोट्या ठिकाणी, छोट्या छोट्या स्तरांवर माणसे काम करताना दिसतात. काहीजण प्रपंच सांभाळून तर काही जण स्वतःला झोकून देऊन. करोडो रुपयांचा महसूल जिथे फुकट जातो, चोरापोरांच्या हाती जातो तिथे , कसलीही अर्थार्जनाची अपेक्षा नसताना लोक काम करताना दिसतात. हे सगळे नुसते सांगोवांगीचे नव्हे तर प्रत्यक्ष काम - प्रचंड परिश्रम , प्रवाहाविरुद्ध पोहणे.

"कंटाळा आलाय" ही प्रतिक्रिया स्वाभाविक आहे ; पण थोडा विचार केल्यास ती एक चैनीचीही आहे असे आपल्या सगळ्याना उमजेल. ज्याना कंटाळा आलाय , वैताग आलाय , ज्याना त्रास होतो त्या सगळ्यांकरता दोन शब्द : "सामील व्हा." या दोन शब्दांत कदाचित आपल्या वैतागावरची उपाययोजना दडलेली असू शकते.

{उत्तम प्रतिसाद व आवाहन !}

19

उत्तम प्रतिसाद व आवाहन !


Hope is a good thing...

{"सामील व्हा." हे अगदी}

20

"सामील व्हा."
हे अगदी पटते..
पण कसे व कुठे ह्या बद्दलचा संभ्रम लोकांमधे असतोच..
त्याबद्दलही बरेच वेळा मार्गदर्शनाची गरज पडते


-निखिल

{वसंत दादा पाटील केवळ चौथी}

21

वसंत दादा पाटील केवळ चौथी शिकलेले होते.
पण महाराष्ट्रात आज जी मेडीकल इंजीनीयरिंग कॉलेजे आहेत ती त्यांनी केंद्रीय सत्तेच्या विरोधात जाऊन घेतलेल्या निर्णायामुळेच. अन्यथा ती सगळी आज बीहारात असती
केवल चौथीपर्यन्तशिक्षण घेतले म्हणून त्यांच्याकडे नेतृत्वगुण नव्हते असे झाले नाही
त्यांची पुढची पीढीतले बरेच शिकलेले होते. त्यांचे काय झाले हे सर्वानाच माहीत आहे
तीच काहीशी गोष्ट वारणा प्रकल्प उभ्या करणार्‍या तात्या कोरेंची.
केवळ कॉलेजातले तथाकथीत शिक्षन घेतले म्हणून नेतृत्व गुण अवगत झाले असते तर बहुतेक बी एड/डी एड शिक्षीत उत्तम प्रशासक झाले असते


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

{मोठ्ठा विषय आहे ...}

22

मला एक गोष्ट कुणी सांगु शकेल का की ह्या गोष्टी कुठे नाहीत ते ?
अहो एक संस्था ( पर्यायाने देश ) चालवायची म्हणजे हजारो ( देशाच्या संदर्भात करोडो ) लोकांना मॅनेज करावे लागते, काहीबाही देऊन किंवा निदान देण्याचे आश्वासन देऊन चुचकारावे लागले, एखाद्याच्या आनंदासाठी एखाद्याला फटके मारावे लागतात, एकाच्या दुकान चालावे म्हणुन दुसर्‍याला दिवाळखोती घोषीत करायला लावायची असते, असे असंख्य काही आहे.

पण हे प्रश्न खरच एवढे इरिटेटिंग आहेत का ?
की आपण परस्पर असे ठरवुन "पलायनवाद" स्विकारु इच्छितो ?

पाण्याची समस्या आली की दिल्या शासनव्यवस्थेला शिव्या की आपले काम झाले का ?
अहो तुम्हीही कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात काम करता, तुम्हाला थोडाफार "व्यवस्थापकीय किंवा तांत्रिक अनुभव" असतोच की, मग तुम्हाला असे नाही का वाटत की ह्या अनुभवाचा उपयोग आपल्या शासनव्यवस्थेला व्हावा ?
त्यासठी प्रत्येक्ष त्यात उतरण्याची आवश्यकता नाही, नुसते सल्ले देऊन किंवा अनुभव शेअर करुन पण काम होते.
शासनव्यस्था सगळीच सडलेली नाही, ती ही माणसेच आहेत की.
स्थानिक प्रश्न हे स्थानिक पातळीवर का सुटत नाहीत ? ह्याचे कारण असे आहे की व्यवस्थेबाहेरील तज्ज्ञ ह्या व्यवस्थेला अजिबात मदत करत नाहीत, नुसते त्यांच्या नावाने खडे फोडतात.
तुम्ही जावा ऑफिसात, अभ्यास करा इरिगेशन सिस्टिमचा, लुप होल्स शोधा आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. समस्या १००% नाही तरी १०% तरी सुटेल ना ?

माझ्यावर विश्वास ठेवा, ह्या मार्गाने कामे होतात.
आमच्या गावाचेच सांहतो, १.५ लाख लोकसंख्येचे गाव आहे पण वर्षातले काही दिवस काही कारणाने ६ ते ८ लाख लोकांचा लोड घ्यावा लागतो, समस्या तर अनेक आहेत, शासनही त्यांच्या परीने करतेच आहे.
पण लोकांनी काय केले तर शासनव्यवस्थेच्या हातात हात घालुन काही समस्यांचा खरोखर अभ्यास केला.
शासनानेही काही "सजेशन्स" उचलुन धरली व अनेक समस्या सहजासहजी सुटल्या ...
१००% नाही पण बर्‍यांच अंशी हा प्रोजेक्ट यशस्वी झाला.
लोकांना काय मिळाले ?
तर मानसन्मान, ओळख आणि समस्यामुक्त रोजचे आरामदायी जीवन. अजुन काय हवे असते हो ?

सोपे असते हो, फक्त त्यात उतरावे लागले, नुसते "गटार" म्हणुन भागत नाही.
"सामिल व्हा" हा मंत्र खरा आहे !!!

{मुख्य उद्देश ...}

23

प्रतिसादांबद्दल धन्यवाद !!!
गेल्या काही दिवसांपासून मिडियावर [print + TV] पाहून्/वाचून फारचं गोंधळून गेलो होतो ... कोण बरोबर ,कोण चूक .. अगदी निरर्थक चर्चा ...
आपण जे काही आजूबाजूला पाहतो / ऐकतो त्यावरूनचं मतं बनवतो , त्यामुळे वैचारिक गोंधळ उडतो
लेखनप्रपंच करण्याचा मुख्य उद्देश हाच होता

{दिशाहीन तरुणाईची व्यथा लेखात}

24

दिशाहीन तरुणाईची व्यथा लेखात प्रतीत होते......

.....परिस्थिती वाईट असली तरी त्याच्याशी झुंजण्याचे मार्ग बरेच आहेत ...वर काही सांगीतले गेलेत... माझा फुकटचा सल्ला......मिडियावर [print + TV] पाहत जा...पण प्लीज रिड बिटविन द लाईन्स....