माझा बाप

0
0

माझा बाप आणि मी लहानपणी एकमेकांचे दुश्मन होतो.

*

निदान मला तरी वाटायचे की माझा बाप माझा कट्टर दुश्मन आहे. बापाला काय वाटत असे माझ्याबद्दल हे कळण्याचे ते वय नव्हते. कारण बापाशी लहानपणी फार बोललो किंवा बापाने कुठे फिरायला नेले असे कधीच आठवत नाही. अगदी लहानपणी खांद्यावर घेवुन झोपवले असेल किंवा मांडीवर घेवुन थापटले असेल तर असेल पण जसे समजायला लागले तेव्हापासुन बापापासुन दुर रहाणेच जास्त फायद्याचे असते असे लक्षात आले होते. कारण सरळ होते कान ओढले जाणे, पाठीत धपाटा बसणे किंवा अंगठे धरुन उभे रहाण्यापेक्षा गल्लीत टवाळक्या करत गोट्या खेळणे किंवा लपंडाव, शिवाशिवी, दगडपाणी असे खेळणे जास्त सोयीचे होते.

*

बापापाशी हट्ट करण्यापेक्षा आईकडे मागणे सोयीचे होते. बापाचा कल कसा असेल त्यानुसार ती बोलुन हो किंवा नाही काढून घ्यायची. बाकीच्या मुलांचे बाप कसे मागितल्याबरोबर हवे ते आणुन देतात अन माझाच बाप मला असे का करतो हे
कळायचे खरे तर ते वय नव्हते. पण खुप राग येत असे. कधी कधी तो राग चेह-यावर दिसे पण गालावर पडलेल्या फटक्याबरोबर तो आतल्याआत जिरुन जात असे. हळु हळु आपल्याला काही हवे आहे हे पण मी विसरुन जायला लागलो.
परमेश्वराकडे सुद्धा कधीच काही न मागण्याची सवय बहुधा मला बापामुळेच लागली. त्यामुळे बापाने सांगावे अन मी ऐकावे, बापाने चालावे अन मी त्याच्या मागुन चालावे असेच जवळपास ठरले होते त्यात कधीच खंड पडला नाही.

त्याबद्दल आता फारसे वाईट पण वाटत नाही.

*

आयुष्यात पहिल्यांदा कधी काही बापाकडे मागितले असेल तर ते दहावीनंतर. दहावीच्या सुटीत सगळे नातेवाईक नेहमीप्रमाणे आलेले असतांना आता पुढे कोणती साईड घेणार अशी चर्चा चालु होती. जेवणे झाली होती. आरामात गप्पा
चालु होत्या. बापाला इतर काही शिक्षणाची क्षेत्रे असतात याची कल्पना होती की नाही हे माहित नाही पण पोराला बीकॉम करायला लावायचे असेच बापाने ठरवले होते. मी घाबरतच सगळ्यांच्या देखत बापाला बोललो.. बाबा, मला सायन्सला
जायचे. श्वास घेतला तरी आवाज होईल अशी शांतता घरात पसरली. बापाने एकवेळ माझ्या चेह-यावर रोखुन पाहीले आणि पहिल्यांदा मला हवे ते मिळाले. बास. त्या दिवसापासुन बापाची अन माझी दुश्मनी संपली. आता मी पुढे चालायला
लागलो अन अनोळखी क्षेत्रात बिनदिक्कत उडी घेवु लागलो कारण मला पुर्ण खात्री होती, की माझा बाप माझ्या पाठिशी आहे.

*

इंजिनीयरींग झाल्यावर एका निर्यातभिमुख सॉफ्टवेअरच्या कंपनीत नोकरीला लागलो. नोकरी लागुन केवळ १८-२० दिवस झाले असतील नसतील तोच लागोपाठ तीन दिवस सुटी होती म्हणुन घरी आलो. घरी आलो तर कळले शेजारच्या घरातील काका सकाळीच वारले. त्यांचा मुलगा आमच्याच कंपनीत पण अमेरीकेत कामाला होता, तो काही येवु शकला नाही. रात्री त्याचा अमेरिकेहुन फोन आला, तो मीच उचलला. वडिलांची अंतिमक्रिया कशी पार पडली यापेक्षा मी तिथे येवु शकेल काय हे विचारण्यातच त्याला जास्त स्वारस्य होते ते पाहुन मी नंतर बोलतो असे सांगुन फोन ठेवुन दिला. बापापाशी आलो. त्याला सगळे सांगितले. बापाचा चेहरा त्याच्या मनातले दुःख सांगुन गेला. दुस-या दिवशी रजिस्टर्ड पोस्टाने कंपनीचा राजीनामा पाठवुन दिला.

*

काही दिवस इकडे तिकडे नोकरी केली पण मन काही लागत नसे. शेवटी एक दिवस मनाचा हिय्या केला. बापाला सांगितले. बास यापुढे आपण नोकरी करणार नाही. बापाने हसुन मान डोलावली. अन मी धंद्यात घुसलो. जमेल तसे जमेल ते करेत हळुहळू जम बसवायला सुरवात केली अन परमेश्वराची अवकृपा सुरु झाली. कसोटीचा काळ होता. कशासाठी परमेश्वर परिक्षा घेत होता ते कळाले नाही. पण काहीतरी पुढे नक्कीच घडणार असावे याची मनाला खात्री झाली. संकटे एकाच वेळी चहुबाजुने येतात. हीच खरी वेळ असते आपले कोण परके कोण हे समजुन येण्याची अन घेण्याची. अन तेच झाले. सगळ्यांनी पाठ फिरवली. फक्त पाठीशी राहीला माझा बाप. बापाने केलेले संस्कार अन दिलेली व्यवहाराची जाणीव पुढुन येणा-या संकटाना सामोरे जाण्याचे धैर्य देत होतेच, पण मागुन वार होतील ही भिती होतीच. ब-याच वेळा खरी ठरली. पण बापाने कधी अंतर दिले नाही. चुकांना समजावुन घेतले. धीर दिला. परत उभे केले. पण काही घाव मात्र तसेच राहीले.

*

आज बाप थकला आहे. मी परत उभा आहे हे पाहुन समाधानी आहे. कधीतरी रात्री अपरात्री बापाला जाग येते अन हाक देवुन विचारतो अरे त्याचे काय झाले....त्याला फार काळजी असते माझी. मी उठतो. बापाच्या हातावर थोपटत थोपटत सगळे समजावुन सांगतो अन काळजी नका करु असे बजावुन सांगतो. बाप हलकेच डोळ्यातले पाणी पुसुन हसत हसत म्हणतो अरे बापाचे हृदय आहे तुला नाही कळणार.. काहीतरी पुटपुटत बाप समाधानाने झोपी जातो. त्याच्या अंगावरले पांघरूण नीट करुन मी परत गादीवर पडतो. पण माझी झोप आता बापाला दिलेली असते.

मी फटफटण्याची वाट बघत बसतो तेव्हा मात्र अस्वस्थ करत असते बापाचेच पुटपुटणे 'आज तुझी आई असायला हवी होती रे.....'

नि:शब्द. अक्षरशः नि:शब्द.

1

नि:शब्द. अक्षरशः नि:शब्द.


-पुण्याचे पेशवे

खरंच नि:शब्द!!! आईशी इतक्या

2

खरंच नि:शब्द!!!
आईशी इतक्या वेळा वाद घातला... मस्ती केली.. धमाल केली... वाटतं की तिच्या मनातलं अगदी सग्गळं सग्गळं कळालं.. तरी कधी अचानक आनंदाच्या तर कधी हळव्या क्षणी तिच्या डोळ्यांत पाणी उभं राहतं.. नि काय झालं म्हणून आम्ही विचारलं तर तिचं एकच उत्तर असतं,"आई झाल्याशिवाय आईपण कळत नाही"!!!!

नाना.. मनापासून लिहिलंयस रे...

"आई झाल्याशिवाय आईपण कळत

3

"आई झाल्याशिवाय आईपण कळत नाही"!!!!

हे बापाला पण लागू आहे. ते काही तरी वेगळंच असतं यार... सांगता येत नसतं ते...

खरोखर नि:शब्द !! काय प्रतिसाद

4

खरोखर नि:शब्द !!

काय प्रतिसाद देऊ कळत नाही आहे.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

अशा संध्याकाळ्च्या वेळी हे अस

5

अशा संध्याकाळ्च्या वेळी हे अस वाचुन अजुनच हुरहुर लागते

लेखन आवडल.......

नाना नाना नि:षब्द केलेस रे...

6

नाना नाना
नि:षब्द केलेस रे...


-निखिल

काय बोलु रे!! _/\_ मनापासुन

7

काय बोलु रे!!
_/\_ मनापासुन लिहितोस तेव्हा खरच खुप छान लिहितोस.


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

मनापासुन लिहितोस तेव्हा खरच

8
मनापासुन लिहितोस तेव्हा खरच खुप छान लिहितोस.

हास्य म्हणजे बाकी वेळेस ... हॅहॅहॅ .. द्या पुणेरी टोले गंपाशेट Laughing out loud

नान्या .. पुन्हा वाचले .. पुन्हा नौस्टैल्जीक का काय ते झालो हास्य

-

दुसर्‍यांदा वाचले

9

तरी पहिल्यांदा वाचले होते तितकेच गलबलले.

Sad

हेच

10

हेच म्हणतो.

हेच म्हणतो.

11

हेच म्हणतो.

हळवा झालो.

12

हळवा झालो.

नाना... सहज सारखेच म्हणतो...

13

नाना... सहज सारखेच म्हणतो...

नानूस................ :(

14

च्यायला...कस्सलं लिहिलंय राव!
अशक्य आहे.

बाकी, ह्या लेखामुळं सुहासशी गप्पा मारताना झालेला विषय आठवला...
पुर्वी हिटलरला दहा रुपये मागितले तरी अर्धातासाचं एकेक रुपया कमवायला किती कष्ट पडतात..फुकटचं गिळायला मिळतंय म्हणुन मस्ती चालु आहे.. वगैरे वगैरे प्रवचन हमखास ऐकावं लागायचंच.
आता स्वतः बक्कळ कमवायला लागल्यानंतर सहजच बर्‍याच काळापासुन शिव्या न खाल्याची आठवण येऊन तिर्थरुपांकडे जाउन, 'वडील...शंभर रुपये द्या हो' असं अंमळ घाबरतच म्हणलं..हो, आधीचं ठीक होतं, आता पुर्वीसारखं फादर भडकले आणि फण्णकन ठेऊन दिली तर उगं बायकोसमोर शोभा नको! तर आमच्या हिटलरनं शांतपणे खिशात हात घालुन शंभराच्या एक नव्हे दोन नोटा हातावर ठेवल्या...
आयच्यान....आपला शेर म्हातारा झाला हे सहनच झालं नाय राव! कुणाला सांगता येइना, का दाखवता येईना म्हणुन गप संडासात जाऊन चोरुन रडुन घेतलो बघा. Sad

आयच्यान....आपला शेर म्हातारा

15

आयच्यान....आपला शेर म्हातारा झाला

असं नाय काय हो भाऊ... शेर शहाणा आहे... शेवटी बापच आहे तुमचा... परताव्याची खात्री झाली आहे आता म्हणून एक सोडून दोन नोटा दिल्या... पूर्वी तुमची लक्षणं काय खरी नसतील... मग कसं देणार? म्हणून तेव्हा तसं... आता असं... कळ्ळं? नसेल कळ्ळं तर आता समजेलच काही वर्षात.... Big smile

>>>>>कळ्ळं? नसेल कळ्ळं तर आता

16

>>>>>कळ्ळं? नसेल कळ्ळं तर आता समजेलच काही वर्षात....

आँ क्काय्य... गुड न्युज की काय?

बाकी मुळ लेखाने हळवा झालो.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

ह्याट्ट!

17

>>परताव्याची खात्री झाली आहे आता म्हणून एक सोडून दोन नोटा दिल्या... पूर्वी तुमची लक्षणं काय खरी नसतील... मग कसं देणार?
ह्याट्ट! एकदा दिल्यावर परत कोण करतंय? त्यांनाही माहितीये की! परत करे बातच नश्शे! सरळ गुडुप्त (होय! आमच्याकडं पोरं हा शब्द अस्साच वापरतात!) संघटनेला निधी म्हणुन विसरुन जायचं असतं ही सवय आमच्यापेक्षा जास्त त्यांनाच लागलीये..म्हणजे आम्ही लावलीये Big smile

त्यामुळॅ आपला युक्तीवाद बाद

आमच्या हिटलरनं शांतपणे खिशात

18

आमच्या हिटलरनं शांतपणे खिशात हात घालुन शंभराच्या एक नव्हे दोन नोटा हातावर ठेवल्या...

खरे आहे धम्या... हे असे होते आणी नंतर कसेतरिच होते... सवय नसते ना बाबांच्या अश्या वागण्याची...


-निखिल

+१

19

खरंय रे!
विचित्रच वाटतं काहीतरी अशी उलटी गंगा वाहताना पाहुन हास्य
त्यापेक्षा सरळ बापसानं कोपर्‍यातली काठी घेऊन अंगावर धावुन यावं...आपण नेहमीप्रमाणे खुष्कीच्या मार्गानं बाबर व्हावं...ते परवडतं बघ. हास्य

परत वाचतानाही आवडले!

20

परत वाचतानाही आवडले!

व्व!!! सुरेख! काय बोलू?

21

व्व!!! सुरेख!
काय बोलू?


- प्राजु

छान लिहीतोस नानू

22

लकी आहेस ( गुणी आहेस ) अस म्हणीन.. खूप लोक वेळ गेल्यावर पस्तावतात..

अवलिया, मस्त मनमोकळं प्रकटन!

23

अवलिया, मस्त मनमोकळं प्रकटन! वडिलांचे आशिर्वाद आहेत म्हणल्यावर यश कुठे जातंय?


-Nile

क्या बात है

24

णिषब्द केलेस.. जियो णाणा जियो!!

निशब्द

25

निशब्द !!

नि:शब्द

26

मस्त ..... नि:शब्द
लहानपणी एकलेली कथा....
एखादी जखम झाली किंवा ठेचकाळलो की "आई ग!" असे उदगार निघतात त्या वेळी मायेची गरज असते अन् एखादा साप बघितला की "बाप रे!" असे उदगार निघतात कारण त्यावेळी सुरक्षेची गरज असते ज्या साठी बापाकडे पाहिले जाते. कदाचित म्हणतात एखाद्या दु:खी क्षणी आईच्या मायेचा पदर असावा लागतो अन् अवघड कसोटीच्या क्षणी बापाचा हात पाठीवर असावा लागतो....
बाकी लिखाण अप्रतिमच झालय.

नान्या, लेख आवडला.... आमच्या

27

नान्या, लेख आवडला....

आमच्या बापाचं पण असच.....लै टरकून.....आम्ही त्यांना
एकदा अभ्यासावरून बोलले म्हणून मनाला लागून मी भिंती वर टाकळं आपटून घेतलं होतं ५ मिनिट.. हास्य

ह्म्म्म्म

28

मी भिंती वर टाकळं आपटून घेतलं होतं ५ मिनिट..

ह्म्म... त्याचे परिणाम अजूनही दिसताहेत.

श्री. अवलिया,

उत्तम लेख.

- फुन्सुक

तुम्ही कुठे पाहिलेत अजून??

29

तुम्ही कुठे पाहिलेत अजून?? पहाल तर तुम्ही आपटाल डोकं.. Big smile

गायब झाले हे बुवा वाटतं

30

Laughing out loud

गायब झाले हे बुवा वाटतं नानाच्या धास्तीने wink


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

लेख

31

लेख मागे वाचला होता तेव्हाही आवडलेला होताच. उत्तम लिखाण.

"लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल

32

"लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी" ला अपवाद असा हा लेख.
परत परत वाचून देखील तितकाच मनाला भावतोय.

अप्रतिम लेख.

अभिज्ञ.

काय बोलू सुचत नाही

33

अगदी नि:शब्द केलेत...

नाना अप्रतीम लेखन रे ! तुच

34

नाना अप्रतीम लेखन रे ! तुच लिहु जाणे बाबा हे असले लेखन.

मस्त लिखाण नानाश्री !!

35

मस्त लिखाण नानाश्री !! व्याख्या नसलेल्या नात्याची दास्तान !!

छानच लिहीलंय... दिपाली

36

छानच लिहीलंय...

दिपाली

(विषय दिलेला नाही)

37

Sad


*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो. हास्य

ऐसी अक्षरे मेळविन

बाप हा बाप असतो

38

उत्तम लिखाण " बाप "
बाप हा बाप असतो..
त्याच्या पुथे कोणताही गुन्हा माफ नसतो...

आई ही आई असते..
गुन्हा केल्यावर तिच्यामागे लपायची घाई असते...

सुरेख

39

एकदम 'बाप' लिखाण.

जमिनीला स्पर्श करता येतो तसं

40

जमिनीला स्पर्श करता येतो तसं आकाशाला नाही पकडता येत...


(आमच्याकडे सर्व प्रकारच्या लेखांना झोडपून मिळेल)