मनोगत

0
0

मला वाटलं नव्हतं तो पण असाच निघेल,
नवं नातं जुळल्यावर मला वेगळा करेल.

इतकी वर्ष मी त्याला साथ दिली, कधी तक्रार केली नाही,
आम्ही सतत सोबत होतो, कधी अंतर दिलं नाही.

तो पण खूष होताच की माझ्या सोबत,
एकत्रच जगत होतो आम्ही रमत गमत.

पण तिला बघताच तो मला विसरायला लागला,
आणि तिच्या सांगण्यावरून मला टाळायला लागला.

लग्न ठरलं त्याचं तिच्याशी,
प्रतारणा केली त्याने माझ्याशी.

मग मी सुद्धा ठरवलं, आपणही त्याच्या सोबत रहायचं नाही,
आपली वाट वेगळी करायची, आता थांबायचं नाही.

लग्नात होतेच मी त्यांच्या, माझ्या समोरच त्याने तिचा बायको म्हणून स्विकार केला...
त्याने तिच्या डोक्याला डोकं लावताच मी ही दुसरा घरोबा केला...
त्याने तिच्या डोक्याला डोकं लावताच मी ही दुसरा घरोबा केला...

मी? मी त्याच्या केसातली ऊ...

---

आदि जोशी

पूर्वप्रकाशन - http://adijoshi.blogspot.com/

{छान}

1

छान


मी जाह्नवी. एका कल्पनेचं वास्तव

{सुधरा बे..............}

2

सुधरा बे..............


"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"

{तु सुधरला आहेस का ?}

3

तु सुधरला आहेस का ?


Hope is a good thing...

{राजे, सुधरलेल्यांना}

4

राजे, सुधरलेल्यांना दुसर्‍याला सुधरा असा सल्ला द्यायचा अधिकार असतो का? wink


"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"