एक रास्ता है जिंदगी...

0
0

ट्रींऽग..ट्रिंग

समोरील व्यक्तीने फोन उचलला 'डॉक्टर शहा हियर...'

'गुड मौर्निंग सर...'

'येस माय सन. हाव आर यु... ?'

'सर, एकदम मजेत. यायचे होते. नंबर लावला आहे. उद्या आहे'

'बर. ये उद्याला. पण वेळ करु नकोस. '

'ठीक आहे. ठेवु फोन?'

'हं'

फोन कट झाला. डॉक्टर शहांच्या आवाजात काय जादु आहे तेच कळत नाही. मनातला हिरमुसलेपणा क्षणात पळुन जातो. मनाला परत उत्साहाने भारले जाते. सत्य परिस्थितीची जाणीव बोथट होत नाही पण मनाला आलेली उभारी पायाला बळ देते.

*

'बाबा, उद्या मुंबईला जावे लागेल. डॉक्टरांशी बोललो थोड्या वेळापुर्वी.

सकाळी निघेन मी लवकरच'

'जपुन जा. तीन महीने झाले इतक्यात?'

'होऽ. परत पुढच्या आठवड्यात नाही जमणार. खुप कामे बाकी आहेत.'

'ठिक आहे. ड्रायव्हरला ने. तु गाडी नको चालवुस'

'हं.'

*

'गाडी आरामात घे. मी झोपतो निवांत. काही लागले तर उठव. तुला कुठे थांबुन चहा प्यायचा असेल तर पिवुन घे. मला अजिबात उठवु नकोस.'

ठिक आहे म्हणुन ड्रायव्हरने गाडी सुरु केली अन मुंबईच्या दिशेने निघालो.

सुर्योदय नुकताच होत होता, मस्त वातावरण होते. हवेतला गारवा झोंबायला लागला तशी शाल अंगावर घेतली अन गारव्याने हलकेच डोळे जड होवुन मिटु लागले.

*

'एक्स्क्युज मी.. तुम्ही या खुर्चीवर बसता का ? प्लिज..! '

सिनेमा सुरु होण्याची वाट पहात होतो तर अचानक आवाज कानी आला. पाहिले तर एक मुलगी तिच्या मैत्रिणीबरोबर आली होती अन मला दोन खुर्च्या पलिकडे बसण्याची विनंती करत होती. पाहिले तर तिकडे जरा एक सडकछाप पोरगा बसला होता त्याच्या बाजुने बसण्यापेक्षा मी बरा वाटला असेल म्हणुन म्हणा किंवा काय मला तिकडे बसण्याची विनंती केली. मी एकटाच असल्याने कुठलीही खुर्ची चांगलीच असा विचार करुन मी बसलो. ती पण माझ्या बाजुनेच बसली. पिक्चर सुरु झाला. शेजारी कुणी असल्याचे मी विसरुन गेलो.

मध्यंतरात तो पोरगा नाही असे पाहुन मी म्हणालो 'त्या पोराला घाबरल्या का तुम्ही?'

'नाही. .....पण अगदीच नाही असे नाही.' गोड हसुन ती म्हणाली.

ओळख झाली. आता पिक्चर चांगलाच रंगात आला होता. परत शेजारी कोण आहे हे विसरुन पिक्चर पहात बसलो.

*

दुस-या दिवशी एका कंपनीत कामासाठी गेलो. कामाची बोलणी झाली अन निघालो. तर समोरुन कालचीच मुलगी आली. चक्क तिनेच ओळख दाखवली. थोडा वेळ बोललो अन निघालो. जुजबी ओळख पुढे मैत्रीत बदलली अन मैत्रीची बंधने कधी मागे पडली ते कळलेच नाही. हातात हात घालुन केलेली निरर्थक पायपीट अन काही संबंध नसलेल्या विषयांवरच्या फालतु चर्चा. पण डोळ्यात स्वप्ने असली की डोके काम करत नाही अन डोके काम करायला लागले की स्वप्नांची मांडणी होत नाही.

*

'कुठे गेला होतास अचानक? ते पण न सांगता?'

'अग मुंबईला काम होते. लक्षातच राहीले नाही तुला न बोलता गेलो ते.'

'मग फोन नव्हता का करायचा?'

'कामाच्या गडबडीत लक्षात नाही राहीले.'

'असु दे. मोठा आला कामवाला'

तिचा राग फार काळ टिकणार नाही याची खात्री होती. त्यामुळे शांत बसणे हा उत्तम पर्याय असे समजुन गप्प बसलो.

*

दिवस भराभर जात होते. स्वप्ने तडकणार याची कल्पना आलीच होती पण खात्री झाली नव्हती. एक दिवस ती खात्री पटली. अन मनाचा हिय्या केला.

*

'मला नाही वाटत की आपण दोघे लग्न करु शकु'

'काय?'

'मला नाही नक्की सांगता येत. पण मला असे वाटते की ती आपली एक चुक होती'

'अरे पण...'

'...'

'...'

'...'

'...'

'...'

'तु असा वागशील असे मला अजिबात वाटले नव्हते'

'पण आपण दोघे मित्र म्हणुन कायम राहु शकतोच की...'

'कशाला ते? परत तेच समोर डोळ्यासमोर येत राहील'

रडत रडत ती म्हणाली. मी डोळे पुसायला गेलो तर हलकेच दुर झाली. समजुन मी थांबलो अन रुमाल पुढे केला.

शांत झाल्यावर तिने परत विचारले 'मला आधी का विचारले नाहीस निर्णय घेण्यापुर्वी?'

कधी कधी काही प्रश्नांना उत्तरे न देता गप्प बसणेच चांगले असते हे आयुष्याने मला फार लवकर शिकवले होते. आताही तेच केले. थोड्या वेळाने ती निघुन गेली परत कधीही न भेटण्याकरता...

*

हळुच डोळे उघडुन पाहीले. घाट संपला होता. डोळ्यातुन आलेले पाणी हलकेच पुसले. अन परत डोळे मिटुन घेतले. गाडी भरधाव वेगाने मुंबईकडे चालली होती. हलक्या आवाजात टेप चालु होता...'एक रास्ता है जिंदगी...' माझे आवडते
गाणे. गाणे ऐकता ऐकता परत झोप लागली.

*

'साहेब. पोहोचलोच आपण.. दहा मिनिटांत येईल आता.'

'हं. आहे. मी जागाच आहे'

हळुच बाहेर पाहीले. माणसे अन इमारती भराभर मागे जात होत्या. अंगावरची शाल घडी केली. केस नीट केले. चेह-यावरुन हात फिरवला. दोन घोट पाणी प्यायलो. ताजातवाना झालो. गाडी थांबली. उतरलो.

'तु जावुन ये तुझ्या मित्राकडे. दुपारनंतर येवुन थांब. मी बघतो माझे.'

ड्रायव्हरला सांगितले अन तो निघुन गेला.

मला आता बराच वेळ लागणार बिचा-याला का उगीच शिक्षा. समोरच्या इमारतीकडे एक नजर टाकली अन रहदारी पहात रस्ता ओलांडुन निघालो.

आत घुसण्यापुर्वी फाटकावर नाव वाचले ... टाटा मेमोरियल हॉस्पिटल.

छान...... अस तरी कस म्हणु?

छान...... अस तरी कस म्हणु? Sad

नाना... कथा थोडी ढोबळ झाली

नाना... कथा थोडी ढोबळ झाली आहे... म्हणजे शेवट थोडा अजून इनडायरेक्ट करायला हवा होता.

बाय द वे... काही वैद्यकिय कारणामुळे आपल्याला कधीच मूल होणार नाही हे कळल्याने बरीच वर्षे साथ देणार्‍या बॉयफ्रेंडला लग्नाला नकार देणारी मुलगी माहित आहे. त्याची आठवण झाली. तिनेही त्या मुलाला स्पष्ट सांगितले असते तर त्याने कधीच तिची साथ सोडली नसती. पण त्याचे आयुष्य नको अर्धवट राह्यला म्हणून हिने असेच काही नाटक करून त्याला दूर केला. अजूनही अविवाहित आणि एकटी आहे ती. Sad

का बरे?

दत्तक घेता येते माहीत नाही का? केवळ मुल होणार नाही इतकेच कारण असेल तर हा प्रकार वेडेपणा वाटतो.

नानामोशाय कथा -"ओह, अरेरे" Sad

हा नाना असे का

हा नाना असे का लिहितो??
ह्याला छान पण म्हणवत नाहिए...



-निखिल

चांगल तर लिहितोस मग मध्ये

चांगल तर लिहितोस मग मध्ये मध्ये काही फुटकळ धागे का काढत बसतोस रे.
असो भरिव कार्याकडे उचललेल्या पावला बद्दल अभिनंदन.



*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

सहमत.... नाना ह्या व्यक्ती

सहमत....
नाना ह्या व्यक्ती कडे प्रतिभा खुप आहे....

नाना....

छान लिहिलेयस असंही म्हणवत नाही.... Sad

नाना बर्‍याच दिवसांनी खास

नाना बर्‍याच दिवसांनी खास अवलिया शैलीतले लेखन केले आहेस. अपेक्षा पुर्ण झाल्या हास्य

नान्या..ह्याला जीवन अईसे नाव

नान्या..ह्याला जीवन अईसे नाव !!!

काही समजले नाही पण गोष्ट बरी

काही समजले नाही पण गोष्ट बरी वाटली. फक्त शेवटी क्रमश: लिहायचे राहिलेय का?

कथा छान आहे.. पण बिपिनदा

कथा छान आहे.. पण बिपिनदा म्हणतो त्याप्रमाणे शेवट अजून थोडा इन्डायरेक्ट किंवा यू ट्र्न दिल्यासारखा झाला असता तर छान वाटलं असतं.



- प्राजु

मस्त

मस्त




मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

छान आहे....

कथा एकदम अवलिया शैलीतली....!

छान लिहिलेयस असंही म्हणवत

छान लिहिलेयस असंही म्हणवत नाही पण कथा म्हणून खरोखर उत्तम आहे.

सुरेख लिहले आहेस रे नान्या..

सुरेख लिहले आहेस रे नान्या.. !

एकदम स्पेशल नाना टच.



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."