नवीन सेवा - मीम एसएमएस TD -mima
नमस्कार,
तंत्रज्ञानाची मदत घेऊन आपण मी मराठीवर नवनवीन सुविधा देत असतोच.
आज त्या एक नवीन सुविधा चालू करत आहोत.
उपयोग
१.
नवीन खाते तयार करताना आता मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन गरजेचे आहे.
तुम्ही तुमचा नंबर तेथे दिल्यावर काही क्षणात तुम्हाला एक एसएमएस येईल TD -mima या आयडीद्वारे, त्यात असलेला व्हेरिफिकेशन कोड वापरून तुम्ही पुढील कार्यवाही पुर्ण करू शकता.
२.
अत्यंत महत्त्वाची माहिती / मदत ची मागणी तुमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी.
३.
पुस्तक लिलाव / नवीन स्किम इत्यादी ची माहिती तुमच्या पर्यंत जलद पोहचण्यासाठी.
* वरील सर्व सेवा मुफ्त आहेत.
धाग्यावर आलेला नवीन प्रतिसाद, व्यक्तीगत निरोप, ५०% पेक्षा जास्त सुट असलेल्या तात्काल पुस्तक विक्री, इत्यादी गरजेनूसार अपडेट देण्याची सशुल्क सोय लवकरच देण्यात येईल, त्याची घोषणा वेगळ्या धाग्यात केली जाईल.
*
कार्यरत सदस्यांनी माझे खाते >> संपादन >> येथे जाऊन वर संपादन टॅब खाली असलेल्या मोबाईल या टॅब मध्ये जाऊन आपला मोबाईल नंबर जमा करावा ( याचे देखील नंबर व्हेरीफिकेशन होईल).
* फक्त मोबाईल नंबर देणे आहे (शुन्य अथवा +९१ देणे नाही आहे) उदा. ७७९८४०९४९६.
* गरजे नुसार एसएमएस मिळवण्याची वेळ निश्चित करण्याची सुविधा आहे. ( उदा. कार्यालयीन वेळात एसएमएस नको असतील तर तुम्हाला तशी वेळ निश्चित करता येईल.)
* ही सुविधा फक्त भारतातील सदस्यांसाठी आहे.
* तुमचे नंबर पुर्ण पणे सुरक्षित असतील व त्याचा वापर तुम्ही सलग्न असलेल्या सेवा व सुविधासाठीच वापरला जाईल.
* तुमचा मोबाईल नंबर इतरांना दिसणार नाही, अथवा त्याचे इतर जागी प्रसार होणार नाही याची हामी मी मराठी.नेट घेत आहे.
* जाहिरातीसाठी एसएमएस सेवेचा वापर केला जाणार नाही.
आपलेच,
आपल्या सेवेस सदस्य तत्पर.
मी मराठी.

.jpg)
{लय भारी...}
राजै छान उपक्रम...
आवडल
:)
{नंबर अपडेट करा रे.. याचा नंतर}
नंबर अपडेट करा रे.. याचा नंतर खूप चांगला उपयोग होईल आपल्याला.
Hope is a good thing...
{नंबर फक्त व्हेरीफीकेशन पूरताच ऊपयोगात आणला जावा}
यासाठी सेंटींग कसे करायचे ? म्हणजे मला एस.एम.एस अपडेट क्रमांक २ व ३ साठी नको असतील तर ?
And then !
{बेसिक अपडेट मिळतीलच, पण}
बेसिक अपडेट मिळतीलच, पण तुम्ही कुठल्या कालावधीत जसे सकाळी ९ ते संध्याकाळी ९ पर्यंत नको असतील.. तर तसे सेटींग वर दिलेले आहे तसे जाऊन माझे खाते मध्ये तुम्ही करू शकता.
* ज्या सशुल्क सेवा असतील त्यासाठी तुम्हाला ही सोय असेल एखादी सोय नाकारण्याची अथवा स्विकारण्याची.
* बाकी दिवसाला मोबाईल कंपनी वाले फालतु फाल्तु एसएमएस पाठवत असतील आपण किती ही ब्लॉक करून.... ते आपण खपवून घेतोच ना शेवटी
मीमवरून एखादा कामाचा एसएमएस आला तो ही दिवसातून / २ दिवसातून एखाद दुसरा तर चालणार नाही का
Hope is a good thing...
{राजे फारच छान सोय केलीय ही.}
राजे फारच छान सोय केलीय ही.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
{छान सोय, नंबर अॅड केला आहे. }
छान सोय, नंबर अॅड केला आहे.
कालच्या ५०% वाल्या दोन पुस्तकांची स्किम आम्ही मॅसेज टाईप करू पर्यंत संपली देखील
नवीन स्किम आली की आधी मॅसेज मला मिळेल अशी सोय करावी
{फक्त मोबाईल नंबर देणे आहे}
फक्त मोबाईल नंबर देणे आहे (शुन्य अथवा +९१ देणे नाही आहे) उदा. ७७९८४०९४९६
व फक्त भारतातील सदस्यांसाठी ही सोय आहे.
Hope is a good thing...
{तो कन्फर्मेशन कोड एसेमेस}
तो कन्फर्मेशन कोड एसेमेस येईचना. वाट पाहून बंद केले आणि एक तासाने आला.
आता परत ट्राय मारतो.
{० / + ९१ अॅड करू नका, लगेच}
० / + ९१ अॅड करू नका, लगेच येतो. ( जर आला नाही काही वेळात तर, माझे खाते मध्ये जाऊन आधीचा नंबर डिलिट करुन पुन्हा नंबर अॅड करा.)
आता पर्यंत ४२ सदस्यांनी ही सोय घेतली आहे.
Hope is a good thing...
{काहीही अॅड केले नव्हते}
+९१ किंवा ० वगैरे काहीही अॅड केले नव्हते. प्लेन १० डिजिट नंबर दिला होता. परत ट्राय करतोय.
{जबराट सुविधा}
माझ्यासारख्या पुस्तकवेड्यांना एक मोठी पर्वणीच उपलब्ध करुन दिलीत की.
माझा मोबाईल रेजिस्टर केला आहे राजे...
मनापासून धन्यवाद अशी छान सुविधा सुरु केल्याबद्दल ... आणि मीमराठीचे अभिनंदनही
जबराट सुविधा सुरु झाली आहे
असे नवनवीन आणि आगळे वेगळे उपक्रम सातत्याने करणारे मराठी जालविश्वात तुम्हीच एकमेव असाल
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{धन्यु !!}
धन्यु !!
Hope is a good thing...
{+१}
+१
{नीट चालणारी सर्व्हिस आणि}
नीट चालणारी सर्व्हिस आणि नवीनतम सुविधा असल्यावर सशुल्क झाल्या तरी काही वाटत नाही.
अशीच प्रगती होवो..
मीमचे एक दिवस मराठी फेसबूक होवो..
{नको... मराठी फेसबूक करायला}
नको... मराठी फेसबूक करायला गेलं की साईट कंटेंटची क्वालिटी गंडते (कदाचित साईटसुद्धा).
एक वेळ अशी येईल की मी मराठी हाच एक बेंचमार्क होईल...
मीऽच तो...
{+ १ क्वालिटी महत्त्वाची.}
+ १
क्वालिटी महत्त्वाची.
Hope is a good thing...
{mee fakt sadasy sankhya aani}
mee fakt sadasy sankhya aani popularity vishayi compare karat hoto..
{भा.पो. मालक... आमी आपली जरा}
भा.पो. मालक... आमी आपली जरा गम्मत करत हुतो... सायबास्नी क्वालिटीचा लय सोस हाय न्हवं...
मीऽच तो...
{अरे ते कुठे फेसबुक ... आणी}
अरे ते कुठे फेसबुक ... आणी कुठे मीम
( कहा गंगू तेली और कहां राजाभोज असे वाचा
)
Hope is a good thing...
{छान उपक्रम...नंबर जमा केला}
छान उपक्रम...नंबर जमा केला
{रजिस्टर केला}
रजिस्टर केला
{ओफ्फेर चे मेसेज येत नाहित}
ओफ्फेर चे मेसेज येत नाहित प्लिज चेक ककरा
{नंबर बरोबर अॅड झाला असेल तर }
नंबर बरोबर अॅड झाला असेल तर १० सेकंद पासून १० मिनिट ( सर्वर स्पिडवर अवलंबून) मॅसेज सर्वांना मिळतो.
Hope is a good thing...
{मला १० सेकंदात मिळाला .... }
मला १० सेकंदात मिळाला ....
अतिशय चांगला उपक्रम .. खुप खुप शुभेच्छा !!
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!
माझा ब्लॉग - मन उधाण वार्याचे…
{ऑपरेटरवर देखील वेग अवलंबून}
ऑपरेटरवर देखील वेग अवलंबून आहे, त्यांच्यामुळे कधी कधी लेट होतो. पण मिळत नाही असे होत नाही.
Hope is a good thing...
{ह्म्म}
आमी नंबर द्येउन सा घंटे जाह्ले, आजून कन्फर्मेशन कोड आल्ल नाय.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{तुम्ही पुणेरी का}
तुम्ही पुणेरी का
Hope is a good thing...
{का}
पुणेकरांना लवकर काही द्यायचं नाही असं तुम्हा कोल्हापूरकरांचा नियम आहे का?
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{हाहहाहहा !!}
हाहहाहहा !!
Hope is a good thing...
{मोबाईल कंपन्या पण व्यक्ती}
मोबाईल कंपन्या पण व्यक्ती सापेक्ष झाल्या का??
{नंबर जमा केला आहे, काही}
नंबर जमा केला आहे, काही तांत्रिक कारणामुळे अर्धा तासापेक्षा जास्त वेळेत व्हेरीफिकेशन कोड आला नाही तर, जमा केलेला नंबर काढून टाका व परत नव्याने नंबर जमा करा. ही विनंती.
Hope is a good thing...
{आज सुट्टी का?}
एसएमएस लिलावाला सुट्टी का?
आज ऑफर नाही मिळाली
ये नही चलेगा ...
शिक्षा म्हणून मला भरघोस डिस्काऊंट वर मला हवी ती पुस्तके पाठवा मालक
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{रवीवार सुट्टी}
रवीवार सुट्टी
Hope is a good thing...
{लई भारी}
आज हापिसात हजेरी लावली आणि रविवारचा विसर पडला.
घ्या घ्या ... सुट्टी घ्या.. चांगल्या गोष्टी करायच्या तर एक दिवस मेंदूला विश्रांती हवीच
उद्या वाट बघतो.....
कशाची ते तुम्हास माहिती आहेच
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{नंबर रजिस्टर केला अनेक ऑफर}
नंबर रजिस्टर केला
मी जाह्नवी. एका कल्पनेचं वास्तव
{आणि सेवांसाठी मी मराठी याचा}
आणि सेवांसाठी मी मराठी याचा वापर करेल अशी आम्हाला खात्री आहे >>>>
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{नंबर रजिस्टर करताना काही अडचण}
नंबर रजिस्टर करताना काही अडचण असेल तर येथे सांगावे ही विनंती.
Hope is a good thing...
{५- ६ वेळेस नंबर दिला .बरिच}
५- ६ वेळेस नंबर दिला .बरिच वाट पन पहिलि
पन कन्फरमेशन कोड येत नाहि काय करावे?
...खचलेला. ....थकलेला.. ...निराश ...
{अडचण दूर झालेली आहे.}
अडचण दूर झालेली आहे.
Hope is a good thing...
{खुप वेळा ट्राय केला पन ..}
खुप वेळा ट्राय केला पन .. नाहिच होत रजिस्टर...
माझा टाटा चा नंबर आहे. त्यामुळे कहि प्रोब्लेम येत असेल काय?
...खचलेला. ....थकलेला.. ...निराश ...
{टाटा वॉकी आहे का ?}
टाटा वॉकी आहे का ?
Hope is a good thing...
{नाहि हो. टाटा इंडिकोम चा}
नाहि हो. टाटा इंडिकोम चा आहे.
९२७०२२३७२१ काय प्रोब्लेम असेल बरे??
...खचलेला. ....थकलेला.. ...निराश ...
{इंडीकॉम साठी चालते आहे ही}
इंडीकॉम साठी चालते आहे ही सिस्टीम. माझाही मो.क्र. इंडीकॉमचाच आहे, पण माझी नोंदणी १० मिनीटात झाली.
)
(बिल भरलं आहे का हो?
मीऽच तो...
{हो रे बाबा माझा प्रिपे ड आहे}
हो रे बाबा माझा प्रिपे ड आहे
...खचलेला. ....थकलेला.. ...निराश ...
{काल मी एक टेस्ट मॅसेज केला}
काल मी एक टेस्ट मॅसेज केला होता तो आला का ?
Hope is a good thing...
{हो आला पन तो कोड रजिश्तर झाला}
हो आला पन तो कोड रजिश्तर झाला नाहि
...खचलेला. ....थकलेला.. ...निराश ...
{अॅक्टीव्ह केला आहे तुमचा}
अॅक्टीव्ह केला आहे तुमचा नंबर.
Hope is a good thing...
{मी ही केले रजिस्ट्रेशन, खूप}
मी ही केले रजिस्ट्रेशन, खूप छान सेवा सुरू केली आहेत अभिनंदन
मी जाह्नवी. एका कल्पनेचं वास्तव
{खरच ? पन मल तसा काहि मेसेज}
खरच ? मि आप्ला आभारि आहे
पन मल तसा काहि मेसेज नाय आला.
...खचलेला. ....थकलेला.. ...निराश ...
{येतील येतील}
येतील येतील
Hope is a good thing...
{लंबर कुट लीवाचा ते बी सांगा}
लंबर कुट लीवाचा ते बी सांगा की.. नुसतेच फायदे सांगून राह्यले.... आणि समदे कवतिक करून राह्ल्येत... माजा लंबर लिवून घेवा की...
{प्रोफाईल मधली माहिती बदलणे }
माझा प्रॉब्लेम हा आहे की मी रजिस्टर करतांना माझा मोबाईल क्रमांक दिला नव्हता..
आता द्यायचा आहे.. पण आता कसा देता येईल ते माहित नाही... शिवाय रजिस्टर करतांना जी माहिती दिली होती.. (उदा. शिक्षण वैगेरे) ते बदलायचे असेल तर काय करायचे??
खरंच सांगायला खूप वाईट वाटतंय
पण खात्यात गेल्यावर काही मराठी शब्दांचे अर्थच कळले नाहीत सुरुवातीला (गमन वैगेरे)
... कदाचित प्रोफाईल मधील माहिती बदलणे किंवा आणखी माहितीची भर घालणे यासाठी तिथे एखादा मराठी शब्द असावा
जो मला कळत नाहीये...
कृपया मदत करावी...
{तुमच्या आलेल्या एसएमएसला}
तुमच्या आलेल्या एसएमएसला उत्तर देता येत नाही.
{:)}
{मीमराठी कडून आज प्रथमच एसएमएस}
मीमराठी कडून आज प्रथमच एसएमएस आला
{व्यवस्थापक साहेब }
मीम चे सर्व एसेमेस अगदी वेळेवर पोचतात. या सुविधेबद्दल मी मीम चा आभारी आहे.
अरूण कोर्डे.